सिर्गेइ
नोसव
धनु-कोष्ठक
मराठी भाषांतर
आ. चारुमति
रामदास
“मला काही
सांगायचंय!”
भारतांत मी
फक्त एकदांच गेलेलो आहे, आणि विश्वास ठेवा, माझं भारतावर अतिशय
प्रेम बसलंय.
ह्या
कादम्बरीचं कथानक हिवाळ्यांत बर्फाळ, बर्फाने झाकलेल्या अश्या उत्तरी शहर पीटरबुर्गमधे घडतंय, पण ऊबशीर असलेल्या
भारताचा उल्लेख कादम्बरींत एकदा झालेला आहे : असं वाटतं, की कादम्बरीचे काही
पात्र (जादुगार, ऐंद्रजालिक) भारताला भेट देऊन आलेत - फकीरांच्या कोणत्यातरी गूढ उत्सवासाठी.
मला
लहानपणापासूनंच माहीत आहे, की अंक, ज्यांच्या उपयोग आपण करतो, आमच्याकडे भारतांतून आलेले आहेत. असं म्हणतांत की ‘शून्य’ ह्या संख्येचा आविष्कारसुद्धां भारतीय विद्वानांनीच केला आहे, जे गंगेचा काठावर
ध्यानांत मग्न असायचे.
म्हणजेच, भारताशिवायतर माझी
कादम्बरी लिहिणं शक्यंच नव्हतं, कारण की तिचा नायक – मैथेमेटिशियन आहे.
पण
मैथेमेटिक्स ह्या कादम्बरींत नाहीये.
लेखकासाठी
हे समजावणं कठीण आहे, की त्याने कशाबद्दल लिहिलंय.
सगळ्यांत
सोपं, म्हणजे असं सांगणं आहे, की कादम्बरी पलायन
करण्याच्या अशक्यतेबद्दल आहे – स्वतःपासून आणि आपल्या वर्तमानापासून, वास्तविकतेपासून, मग ती कितीही आकर्षक कां
न असो, आपल्या स्वतःच्या
(वैयक्तिक) आणि तसंच आपल्या सामान्य भूतकाळापासून. पळून गेल्यावर लपण्यासाठी कोणची
जागांच नाहीये, असे ‘धनु
कोष्ठक’ नाहीतंच, जे कोण्या व्यक्तीला
आपल्या अहंभावाच्या बंद कोषांत सुखी राहण्याची परवानगी देऊं शकतील.
पण, मला वाटतं, की मी काहीतरी सोपं
केलंय.
कदाचित, ही कादम्बरी
सोपेपणाबद्दल आणि क्लिष्टतेबद्दल असेल? अश्या भोळ्या-भाबड्या सत्याबद्दल, ज्याच्याकडे, जीवनाला अत्यंट क्लिष्ट करण्याच्या नादांत बघण्याची आपली इच्छांच नाहीये?
मला
आठवतंय, की
शाळेंत असताना आम्हांला गणितं द्यायचे : एल्जिब्राचे (बीज गणिताचे) भारी-भरकम
एक्सप्रेशन्स (पदांना) सोडवण्याचे. हा आहे फ्रैक्शनल नंबर (अपूर्णांक), न्यूमरेटर आहे आणि
डिनॉमिनेटर आहे, तुम्हीं त्याच्या भागांना एक-एक करून सोपं करता, परिणामाला कोष्ठकांच्या बाहेर आणता, परिणाम मिळवंत जाता, आणि एका सुखद क्षणी हा अपूर्णांक लहान होत-होत शेवटी एक सोपं उत्तर देऊनंच टाकतो.
अगदीच सोप्पं. मग त्या कोष्ठकांमधे काहीही असलं तरी फरंक काय पडणारेय. संपलं –
स्वप्नासारखं.
जेव्हां
मी “धनु कोष्ठक” लिहीत होतो, तेव्हां बीजगणिताचं हेच दुरूह पद – जे वर-वर बघताना क्लिष्ट, चतुर, भयानकपणे बोजंड वाटतं, शेवटी एका सोप्या, मानवीय अभिव्यक्तीच्या
रूपांत परिवर्तित होऊन जातं – माझ्यासाठी रूपकांत परिवर्तित झालं: “तुझ्यावर खूप
प्रेम आहे.”
आणखी
काय लिहूं?
मला
वाटतं की माझी कादम्बरी प्रेमाबद्दल आहे, तसं बघितलं तर सम्पूर्ण कादम्बरींत प्रत्येक गोष्टीबद्दल चर्चा होत असते, फक्त ह्याबद्दलंच नाही
(हा विषय कोष्ठकांमधे बंद आहे कां?)
आणि, कदाचित काळाबद्दलसुद्धां, वर्तमान काळाबद्दल, ज्यांत आपण सगळे
राहातोय. अपरिभाषित क्षेत्रांबद्दल ज्यांत आपणासगळ्यांना जायचंच आहे : कोण सांगू
शकतो, की उद्या काय होईल आणि
परवा? आणि तसंच – जीवनाबद्दल
सुद्धां, ज्याला
फक्त एकदांच, एक आश्चर्य समजूनंच जगलं पाहिजे.
जर
मला कोणी म्हणतं, की कादम्बरी ह्याबद्दल नाहीये (कधी-कधी मला विचारण्यांत येतं, की “धनु-कोष्ठक”
कशाबद्दल आहे), तर मी लगेच, आणि आनंदाने ‘हो’ म्हणून
टाकतो. मला वाटतं, की वाचकाला जास्त कळतंय – तो बरोबर असेल.
माझ्या
कादम्बरीची निवड करून, लक्ष देऊन वाचल्याबद्दल आणि “धनु कोष्ठका”चं मराठीत भाषांतर करण्यासाठी मी
डा. चारुमति रामदास ह्यांचा अत्यंत आभारी आहे.
त्या
सगळ्यांना परोक्ष रूपाने धन्यवाद, ज्यांनी आतापर्यंत हिला वाचलं नाहीये, पण वाचणार आहेत.
तर, प्रिय वाचक, कादम्बरीकडे जाऊं
या...नंतर चर्चा करूं.
सिर्गेइ नोसव
प्रस्तावना
सिर्गेइ नोसव
आधुनिक रशियन लेखक, नाटककार आणि निबन्धकार आहेत. त्यांना पीटरबुर्गचे प्रमुख आधुनिकोत्तर
(पोस्टमॉडर्न) लेखक म्हणून ओळखतांत, त्यांना एक्ज़िस्टेन्शियलिस्ट (अस्तित्ववादी) म्हणूनसुद्धां ओळखलं जातं.
सिर्गेइ
नोसवचा जन्म 19 फेब्रुवारी 1957ला पीटरबुर्गमधे झाला. त्यांने विमानंन साधन इन्स्टिट्यूटमधे
शिक्षा ग्रहण केली. सुरुवातीचे काही वर्ष विमानंन साधनाच्या क्षेत्रांतदेखील काम
केलं, मग पत्रकारितेकडे वळले.
रेडिओवर सुद्धां काम केलं.
गोर्की
साहित्य संस्थानात शिक्षण घेत असताना त्यांने काही कविता लिहिल्या होत्या, ज्या त्यांनी जाळून
टाकल्या. सन् 1980मधे ‘अव्रोरा’ नावाच्या पत्रिकेत त्यांच्या
कविता प्रकाशित झाल्या. पहिलं पुस्तक “खाली, नक्षत्रांच्या खाली” सन् 1990मधे प्रकाशित झालं.
सिर्गेइ
नोसवचं नाव अनेक वेळां “नेशनल बेस्टसेलर”च्या आणि “रशियन बुकर”च्या अंतिम फेरींत आलेलं
होतं. आणखी एका महत्वपूर्ण पुरस्काराच्या – “बिग बुक”च्या अंतिम फेरींत सुद्धां त्यांचा समावेश होता, सन् 1998मधे त्यांना पत्रकारितेसाठी ‘गोल्डन पेन’ पुरस्कार देण्यांत आला होता.
“धनु
कोष्ठक”ला सन् 2015चं ‘नेशनल बेस्टसेलर’ घोषित करण्यांत आलं होतं.
सिर्गेइ
नोसवने सुमारे वीसपेक्षां जास्त नाटकं लिहिली आहेत, आणि ती सगळीचं वेळोवेळी दाखवण्यांत येतात. ‘धनु-कोष्ठक’ वाचतानासुद्धां तुम्हांला असं वाटेल, जणु एखादं नाटक किंवा कॉमेन्ट्री चालू आहे.
त्यांने
आतापर्यंत सहा कादम्ब-या लिहिल्या आहेत : फ्रांत्सुआज़ा किंवा ग्लेशियरची यात्रा’, ‘मला एक माकड द्या’, ‘पक्षी उडून गेलेत’, ‘समाजाचा सदस्य किंवा
उपासमारीचा काळ’, ‘दीड ससा’ आणि ‘धनु
कोष्ठक’.
त्यांचं
पुस्तक ‘पीटर्सबुर्गच्या
स्मारकांचं गूढ जीवन’ बरंच प्रसिद्ध झालंय.
सिर्गेइ
नोसवला युद्धाशी संबंधित कथांमधे, विस्थापितांची पीडा दाखवण्यांत, ऐतिहासिक कथांच्या पुनर्मूल्यांकनांत अजिबात गोडी नाहीये. नोसव – शांत
स्वभावाचे लेखक आहेत. त्यांची रुचि आहे जीवनाच्या लहानसहान प्रसंगांमधे – एक
प्राइवेट व्यक्ति, आपल्या सगळ्या अडनीड सवयींबरोबर – फुकटचे अपमान, मनोरंजक फोबिया, आणि विचित्र निष्कर्षांची पोतडी घेतलेला – हा आहे त्यांचा नायक.
धनु-कोष्ठकाचा
नायकपण ह्याच विचित्रपणांत गुंफलेला आहे. सम्पूर्ण कथानकंच न जाणे काय
आहे...वाचताना तुम्हांला कदाचित असं वाटेल की, ‘हे काय वाचतोय’; पण पुस्तक हातांतून सुटणार नाही, तुम्हीं पूर्ण कादम्बरी वाचाल; मग तिला समजण्यासाठी पुन्हां एकदा, पुन्हां एकदा...प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन सापडेल. सगळंकाही जणु समोर, हातावरंच ठेवलेलं आहे, पण त्यांत ‘काहीतरी’ शोधायचा प्रयत्न कराल.
“धनु-कोष्ठक”
वाचून प्रत्येक वाचक आपापला निष्कर्ष काढेल...
कादम्बरीचा
नायक कपितोनव एक मैथेमेटिशियन आहे, जो दोन अंकांच्या संख्या ओळखू शकतो. कपितोनवला ‘रिमोटिस्ट-मेंटलिस्ट’ची पदवी देऊन जादुगारांच्या वार्षिक कॉन्फ्रेन्समधे बोलावण्यांत येतं. ह्याच
कॉन्फ्रेन्समधे भाग घेण्यासाठी तो मॉस्कोहून पीटरबुर्गला चाललांय. आधी तो पीटरबुर्गमधेच
राहायचा, पण
आता मॉस्कोच्या एका इन्स्टीट्यूटमधे मैथेमेटिक्स शिकवतोय. ‘धनु- कोष्ठक’ जणु ह्या दोन दिवसांच्या
कॉन्फ्रेन्सचे ‘मिनट्स’ आहेत. कपितोनोवच्या शनिवारी पीटर्सबुर्गला पोहोचल्यापासून ते सोमवारी परंत
मॉस्कोसाठी विमानाची वाट बघेपर्यंतच्या काळाच्या एक-एक मिनिटाचा हिशेब आहे.
कादम्बरीची वाटचाल अगदी घडाळ्याच्या वेळेप्रमाणे होत असते...
पीटरबुर्गमधे
त्याच्या दिवंगत मित्र - मूखिनची बायको, मरीना, त्याला एक नोटबुक देते. मरीनाच्या म्हणण्याप्रमाणे, मूखिनने ही टिपणं आपल्या जीवनाच्या
शेवटच्या काही दिवसांत लिहिली होती – नोटबुक वाचताना हे स्पष्ट होतं, की तो खरा मूखिन
नव्हतांच, तर
ह्याने त्याला प्रतिस्थापित केलं होतं. तर, जो मेला होता, ज्याच्या अंतिम यात्रेंत हजर राहायला कपितोनोव आला होता, तो कोण होता? आणि ख-या मूखिनचं काय
झालं?
अश्या
प्रकारच्या ‘गायब’ होण्याच्या, ‘प्रतिस्थापित’ व्हायच्या अनेक घटना
आहेत : डिनरच्या वेळेस सगळ्यांच्या प्लेट्समधून कोबीचे कटलेट्स गायब होतात, कपितोनोवची ब्रीफकेस
गायब होते, आणि
जी ब्रीफकेस त्याला सापडते, तिच्यांत हे कोबीचे कटलेट्स सापडतांत; मूखिनची नोटबुक गायब होते आणि महाशय ओझा तिला मरीनाकडे पोहोचवतांत…शेवटच्या
दृश्यांत जेव्हां कपितोनोवबरोबर प्रवास करणारी महिला त्याला सांगते, की ते एक आठवडा
पीटर्सबुर्गमधे थांबले होते, तेव्हां वाचकाच्या मनांत नक्कीच विचार येतो की कपितोनोवचे पाच दिवस कुठे
गेलेत, तो तर फक्त दोन
दिवसांसाठीच पीटर्सबुर्गला आला होता, आणि ठरल्याप्रमाणेच परंत चालला होता, मग हे पाच दिवस कपितोनोव कुठे गायब झाला होता कां की त्याचा वेळ ‘कालभक्षकाने’ खाऊन टाकला?
“तलाव’ कां मरतो? मूखिनला प्रतिस्थापित
करणारा, मूखिन
सारखांच, पण
मूखिन नसलेला – कोण होता, तो कां मूखिन बनून राहात होता, त्याला काय करायचं होतं, ह्यापूर्वी तो कुठे होता, ह्यानंतर तो कुठे जाईल?
विश्वास
ठेवा, तुम्हीं नक्कीच स्वतःला
हे प्रश्न विचाराल. लेखक उत्तर नाही देत, तो काहीच नाहीं म्हणंत...
पण
ह्या ‘साम्याबद्दल” कादम्बरीत
अनेकदा इंगित केलं जातं.
मग, कादम्बरींत काही लोक
मरतात – दोन कादम्बरीच्या कथानकाच्या पूर्वी आणि एक-कथानक चालू असताना...
कपितोनोव
ह्या दोन (किंवा पाच) दिवसांत अनिद्रेने ग्रासला आहे. त्याला फक्त आभासंच होतांत...
जादुगारांची
कॉन्फ्रेन्स आपल्या इतर कॉन्फ्रेन्ससारखीच आहे...
म्हणजे, लेखकाला काहीतरी ‘दाखवायचं’ आहे, पण
तो दाखवंत नाहीये.
मग
‘धनु-कोष्ठक’ कशासाठी? मूखिन सारख्या
(अ)मूखिनने त्यांचा प्रयोग केला आहे, तो हे म्हणतो, की ‘धनु-कोष्ठक’ तिस-या पातळीची सुरक्षा
प्रदान करतात. त्यांचा उपयोग केल्यामुळे ‘ह्या’ मूखिनच्या
विचारांपर्यंत कोणी पोहोचूं शकणार नाही.
नोसवच्या
ह्या कादम्बरींत कधी-कधी निकोलाय गोगलची (पात्रांची नावं, सूक्ष्म व्यंग), दस्तयेव्स्कीची (त्याची
कादम्बरी ‘डबल’) आणि बुल्गाकोवची (जादूच्या
प्रयोगांची) ओझरती झलक दिसते.
नोसवचे
व्यंग अगदी निष्पाप, पण धारदार आहे. भाषा अत्यंत सोपी, नेहमीच्या वापराची, म्हणून असे बरेचशे वाक्य सापडतील, जे सम्पूर्ण जगांत बोलले जातांत. पण भाषेचे जसे प्रयोग नोसव करतात, ते कथानकाला काहीसं
गुंतागुंतीचं, काहीसं सोपं करतांत...
आधुनिक
रशियन साहित्यांत अश्या प्रकारच्या रचना लिहिल्या जात आहेत, आणि त्यांना ‘बेस्ट-सेलर’चा मान मिळतोय, ही जाणीव सुखद आहे.
नोसवच्या
ह्या कादम्बरीचं भाषांतर करणं सोपं नव्हतं...सगळ्या विचित्र, भलत्यांच, वेड्यावाकड्या गोष्टी ‘भलत्यांच’ वाटू द्यायच्या होत्या, कादम्बरीच्या ‘वेळेला’ (काळाला) अगदी तस्संच राहूं द्यायचं
होतं, नावांसाठी मराठीत विकल्प शोधणं, गढणं...
भाषांतर
वाचून आपण प्रतिक्रिया नक्की द्या!
भाषांतराच्या
काळांत माझे पति डा. रामदास आकेळ्ळा, मुलगा – अभिजित, सून- वन्दना आणि नातू – श्रेयसने खूपंच साहाय्य केलं. शब्दांत त्यांचे आभार
प्रकट करतां येणार नाही. ह्यांचं प्रोत्साहन आणि मदतंच माझ्यासाठी प्रेरणेचं
स्त्रोत आहे. थैंक्यू सो मच!
हैदराबाद
चारुमति रामदास
“आधी आमचं शहर ह्या दृष्टीने जास्त सुखी होतं,” – आपले
छोटे छोटे डोळे बारीक करून धगधगत्या कोळश्यांकडे बघंत शरामीकिन म्हणतो. “एकसुद्धां
हिवाळा असा नाही जायचा,
जेव्हां
कोणी प्रसिद्ध व्यक्ति इथे आला नाही. कधी कोणी प्रसिद्ध कलाकार, कधी कोणी गायक...पण आता...सैतानंच जाणे काय झालंय, जादुगार आणि हार्मोनियम वाजवणा-यांशिवाय आणखी कोणी
येतंच नाही.”
- अंतोन चेखव
“सजीव कैलेण्डर”
गेले दिवस आणि गेल्या रात्री.
गेले दिवस आणि गेल्या रात्री.
सळसळली पानं.
- अलेक्सांद्र व्वेदेन्स्की
सन् दोन हज़ार
अमुक-अमुकच्या फेब्रुवारींत (20**च्या नंतरची संख्या कोणाला आठवूं शकते?) : ही त्यावर्षीची गोष्ट आहे, जेव्हां भयानक हिमपाताने जानेवारीतंच मागच्या वीस-तीस वर्षांचं रेकॉर्ड
तोडलं होतं.
काल
शुक्रवार होता, आठवड्याचे दिवस संपलेत, पण ट्रेन चालतेच आहे, आणि कपितोनवच्या डोक्यांत प्रस्तुत क्षणाच्या परिस्थितीचं चित्र आकार घेतंय.
हा
आहे स्वतः कपितोनव. एका मिनिटापूर्वीच तो आपल्या कुपेतून बाहेर निघालाय. ‘बोलेरो’चं रिंगटोन वाजूं लागतं आणि तो खिशांत मोबाइल शोधतोय.
हा
राहिला मॉस्को-टाइम.
16.07
ही
आहे ऑर्गेनाइज़िंग कमिटीची ओल्या.
“नमस्ते, एव्गेनी गेनादेविच. आमचा
माणूस तुम्हांला शोधू नाही शकंत आहे. तुम्हीं, खरं म्हणजे, कुठे आहांत?”
“मी, खरं म्हणजे, ट्रेनमधे आहे.”
“तर
मग बाहेर कां नाही येत आहे?”
“कारण
की मी प्रवास करतोय.”
काही
क्षणांसाठी तिकडच्या ओल्याचं बोलणं बंद होतं. कपितोनव शांत आहे – तो गैरसमजांसाठी
तयार आहे. कॉरीडोरच्या शेवटी लावलेल्या इलेक्ट्रोनिक-बोर्डवर आता वेळ नाही, तर तपमान दाखवण्यांत येत आहे -110
.
ठीक
आहे. मॉस्कोपेक्षा जास्त थण्डी नाहीये.
कुपेला
खूपंच तापवण्यांत आलंय.
“माफ़
करा, तुम्हीं कुठे जातांय?”
आनंदाची
गोष्ट आहे. तो जातो कुठे आहे?
खिडकीच्या
बाहेर एक दोनमजली इमारत डोकावंत होती, जी जमिनीपर्यंत लटकलेल्या बर्फाने झाकलेली होती. आणि मग पुन्हां – झाडं, बर्फ, झाडं.
“पीटरबुर्ग, ओल्या. सेंट-पीटरबुर्ग.”
“पण
ट्रेनतर केव्हांच आलेली आहे. तुम्हांला घ्यायला रेल्वे-स्टेशनवर गेले आहेत.”
“असं कसं? मला तर लादोझ्स्की स्टेशनवर पोहोचायला अजून अर्धा तास लागेल. जर ट्रेन
वेळेवर असेल तर.”
“थांबा, पण लादोझ्स्की स्टेशनवर कां?”
“तर मग कोणत्या स्टेशनवर?”
“मॉस्को स्टेशनवर.”
“ओल्या, लक्ष देऊन ऐक! काल तुम्हींच मला फोन करून सांगितलं होतं की “सप्सान”1चं
टिकिट मिळंत नाहीये, पण जर मला दुस-या दिवशी पोहोचायचं असेल, तर अद्लेरहून येणा-या ट्रेनमधे टिकिट ‘बुक’ करूं
शकतो. तुम्हीं विसरलां कां? मी कज़ान रेल्वे स्टेशनहून ट्रेनमधे बसलो, लेनिनग्राद स्टेशनवरून नाही, आणि सगळ्या गोष्टी लक्षांत घेतल्या, तर मी लादोझ्स्की स्टेशनवरंच उतरीन, ना की मॉस्को स्टेशनवर! सकाळपासून ह्या कोंदट कम्पार्टमेन्टमधे मी थरथरतोय.
ही सगळ्यांत चांगली ट्रेन नाहीये, आणि मॉस्कोहून पीटरबुर्गला येण्यासाठी हा सगळ्यांत चांगला पर्यायसुद्धां नाहीये.”
“माफ करा, एव्गेनी गेनादेविच, ती मी नव्हते, ती दुसरी ओल्या होती. ती तुम्हांला फोन करेल.”
कुपेचं
दार उघडं आहे. सहप्रवासी – एक महिला, जिचं नाव ज़िनाइदा आहे, आणि तिचा ‘डाऊन’ (मन्दबुद्धि)
मुलगा झेन्या, जो वयाने मोठाच आहे, कपितोनवकडे बघताहेत. ज़िनाइदा सहानुभूतीने बघतेय, आणि ‘डाऊन’ झेन्या – आनंदाने.
हातांत
झाडू घेतलेली कण्डक्टर तिथून जाते आहे, तिनेपण हे बोलणं ऐकलं :
“घाबरूं नका, लवकरंच ही ट्रेन कैन्सल होणार आहे, बघा, कम्पार्टमेन्ट
अर्धा रिकामा आहे.”
“मी
घाबरंत-बिबरंत नाहीये.”
आत
आला, बसला. सगळे बसले आहेत, जाताहेत. आता लवकरंच
पोहोचून जातील.
“आधी
मला असं वाटलं, की तुमच्या मुलीने फोन केलांय,” ज़िनाइदाने म्हटलं. त्याला दुःख झालं की मुलीबद्दल हिला कशाला सांगितलं.
कपितोनवच्या
डोळ्यांसमोर पांढ-या भिंतीवर काळे अक्षर पळंत होते – सशस्त्र क्रांतीचं आह्वान.
त्यानंतर – गैरेजेस, कदाचित. तो ह्या बाजूने कधी पीटरबुर्गला आलेला नव्हता. लादोझ्स्की स्टेशन
त्याच्या पीटरबुर्गहून मॉस्कोला जायच्या काही वर्षांपूर्वीच सुरू झालं होतं. तो
फक्त एकदांच लादोझ्स्कीला आला होता – जेव्हां समर-कैम्पहून परंत येत असलेल्या
आपल्या मुलीला घ्यायला बायकोबरोबर आला होता. तेव्हां ती होती अकरा वर्षांची.
ज़िनाइदाला
आपल्या सहप्रवाश्याबद्दल सहानुभूती वाटंत होती:
“सॉरी
हं, तुम्हांला डुलकी नाही
घेता आली.”
“काही
हरकंत नाही,” कपितोनवने
म्हटलं.
प्रवासांत
बराच वेळ काही बोलणं नाही झालं – मॉस्कोपासून, जिथे तो गाडीत बसला होता, म्हणजे, आधीपासूनंच बसलेल्या त्यांच्याबरोबर – आणि जवळ-जवळ ओकूलोव्कापर्यंत. कुपेंत
चौथा प्रवासी नव्हता. तिचा मुलगा सम्पूर्ण प्रवासांत छोट्याश्या टेबलवर ‘दमीनो’च्या फास्यांशी खेळंत होता, आणि कपितोनव वरच्या बर्थवर पडल्या-पडल्या छताकडे बघंत होता, जी त्याच्या अगदी जवळ
होती. आणि असं दाखवंत होती की जग वाजवी नमुन्यांनीच बनलेलं आहे. तीन तासांपूर्वी, ओकूलोव्काच्याही आधी, गरंज नसतानाही, तर कंटाळवाणं झाल्यामुळे, तो एकटाच ट्रेनच्या
रेस्टॉरेन्टमधे चालला गेला, जिथे असं बघून की तो तिथे एकटाच आहे, बीफ़स्टेक खाऊन गेला आणि शंभर ग्राम कोन्याक पिऊन गेला, जी खरं म्हणजे, कोन्याक नव्हतीच, पण, चला, ठीक आहे. आणि जेव्हां
परंत आला, तर
हस-या चेह-याच्या, थकलेल्या, कुपेतल्या ह्या शेजारिणीने घरी बनवलेला केक त्याला दिला, ती हट्टंच करू लागली, की तिच्या आणि तिच्या
मुलाबरोबर त्याने कुपे-डिनर घेतलंच पाहिजे. आणि तेव्हां कपितोनवने तिच्यासमोर पहिली
स्वीकृति दिली: तो आत्ताच जेवून आलाय. मग तिने त्याला कित्येकदा विचारलं : “आणि ह्या
सगळ्याचं आम्ही काय करायचं?” आणि त्याने उत्तर दिलं : आपल्या बरोबर घेऊन जा”. थोडक्यांत बोलणं सुरू झालं.
– “ज़ीना.” – “एव्गेनी.” ‘एव्गेनी गेनादेविच’सुद्धां म्हणू शकंत होता, जसं तो बहुधा सेमेस्टरच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्वतःचा परिचय द्यायचा
(जे खरंच आहे), पण त्याने म्हटलं ‘एव्गेनी’ (खोटं तर नाही सांगितलं), आणि ज़िनाइदा खूष झाली : “बघ, कसं होतं,” तिने आपल्या मंदबुद्धि मुलाला म्हटलं. “आपण दोघं चाललो आहोत, आणि आपल्याला हेपण माहीत नाहीये, की कोणाबरोबर जातोय. अंकल झेन्या, तुझेच नामराशी आहेत.” तिच्या मुलाने खिदळंत अचानक आपला हात कपितोनवसमोर करून
त्याला चकीत केलं, पण तो फक्त आपली बोटंच समोर करून थांबला – खूपंच मरगळलेलं हस्तांदोलन झालं, एकीकडूनंच, म्हणजे कपितोनवकडून, पण अत्यंत प्रेमळपणे, ज्याने ज़िनाइदाला आनंद
व्हावा. जसं काही त्यांच्यामधे काही घडलं होतं. कपितोनवला कळलं की ते लिपेत्स्कहून
येताहेत ज़िनाइदाच्या बहिणीला भेटायला, की ज़िनाइदाला आपल्या मुलाला सेंट पीटरबुर्ग दाखवायचं आहे आणि हे की मुलाचं
स्वप्न आहे – “लहानसं जहाज़” बघणं. त्याने खरोखरंच अनेक वेळा म्हटलं ‘जआज़’. “अंकल झेन्याने जआज़ पाहिलंय कां?”
कपितोनवने
अनेकदा हे जहाज बघितलं होतं – एडमिरैल्टीच्या2 शिखरावर.
देवाची इच्छा असेल, तर अजूनही पाहील.
ज़िनाइदा
सांगंत होती स्वतः बद्दल, स्वतःच्या नव-याबद्दल, ज्याच्याशी झेन्याच्या जन्मानंतर डायवोर्स झाला होता, आणि जो मेटलर्जिकल
प्लान्टमधे काम करंत होता, आणि आणखीही ब-याच गोष्टी, ज्यांच्याशी कपितोनवला काही घेणं-देणं नव्हतं, आणि तो ऐकंतपण नव्हता, पण एका क्षणी त्याला असं वाटलं, की त्यालाही काहीतरी सांगायला हवं, आणि तेव्हां त्याने दुसरी स्वीकृति दिली – ह्याबद्दल की तो अनिद्रेने त्रस्त
आहे आणि दोन रात्रींपासून झोपलेला नाहीये. “ओह, आम्ही डिस्टर्ब करतोय कां?” – “नाही, तुमच्यामुळे
नाही”, कपितोनवने म्हटलं, कारण की त्याच्या
स्वीकारोक्तीत काही इशारा नव्हता (आणि तिच्यात काही अर्थही नव्हता). “तर मग झोपंत
का नाहींये?” त्याने
उत्तर दिलं : “झोप नाही येत.” आणि, ह्यावर तिने म्हटलं : “तरीच, मी बघंत होते कि तुम्हीं कोणत्यातरी काळजींत असल्यासारखे दिसताय”.
आणि
आता ती म्हणतेय:
“तुमचा
रिंगटोन किती मोठ्याने वाजतो!”
बोटाच्या
हालचालीने त्याने “बोलेरो”ला थांबवलं, जो लहानश्या जहाजाचं स्वप्न बघणा-या झेन्याला खूप आवडला होता.
ओल्या
– ‘दुसरी’:
“एव्गेनी
गेनादेविच, काल
तुमच्याशी मी बोलले होते, मीच अद्लेरच्या ट्रेनमधे तुमचं रिज़र्वेशन केलं होतं, आणि आमचे लोक कन्फ्यूज़
झाले, कार तिकडे नाही पाठवली, मॉस्को स्टेशनवर पाठवून
दिली, माफ करा, पण आम्ही तुम्हांला
रिसीव्ह करूं शकणार नाही...आमच्या मदतीशिवाय तुम्हीं येऊं शकता कां?”
सगळं
ठीकंच आहे. त्याने स्वतःच काल सांगितलं होतं, की त्याला घ्यायला नका पाठवू. ही त्यांचीच कल्पना होती – कोणत्याही
परिस्थितीत प्लेटफॉर्मवर त्याला रिसीव्ह करायचंच. त्याच्याजवळ काही सामानही नाहीये, आणि त्याला माहितीये की
मेट्रो म्हणजे काय असते.
ओल्या-दुसरी
जोरजोरांत म्हणंत होती:
“ऐका, तुम्हीं इतके हुशार
आहांत, तुम्हीं चांगलंच केलं की
उद्घाटनाला नाही आले, इथे तर अश्या-अश्या घटना होताहेत, तुम्हीं बघालंच, आणि आता मी तुम्हांला सांगते की हॉटेलपर्यंत कसं पोहोचायचं, तुम्हांला...”
गरज
नाहीये, त्याला
माहितीये.
ओल्या, म्हणजे, कालची ओल्या, ‘दुसरी’ माहीत नाही कां आज खूप घाबरलेली
आहे, खूपंच लवकर-लवकर बोलतेय, बिल्कुल न थांबता, आणि इथे हा पुलसुद्धा
आहे – फिनलैण्ड-रेल्वेचा – आणि तिचे शब्द खडखडाटांत बुडताहेत. मन्दबुद्धि झेन्या
किंचित वर उठतो, ज्याने पांढरी शुभ्र नदी चांगली बघतां यावी. रुंद आहे नीवा, आणि पूर्णपणे बर्फाने
झाकलेली आहे.
कपितोनवला
काही तुटक-तुटक शब्द ऐकू येतात आणि त्यांच्यामधे - “आर्किटेक्ट”. आणि त्याच्यानंतर
ओल्या पुन्हां म्हणते - “आर्किटेक्ट”. त्याला कळतं की हे “आर्किटेक्ट” -
त्याच्यासाठीच आहे.
ट्रेन
हळू हळू पुलावरून चालली आहे, खडखड करंत. कपितोनव जवळ-जवळ किंचाळून म्हणतो :
“मी आर्किटेक्ट
नाहीये, मी मैथेमेटिशियन आहे!”
“कोण
मैथेमेटिशियन आहे?”
(हे
तर आश्चर्यंच झालं!)
“मी
– मैथेमेटिशियन आहे!”
“जआज़!
जआज़!” झेन्या चिडचिड करतोय, खरं तर काही जहाज़-बिहाज़ नाहीये आणि इथे असूंदेखील नाही शकंत.
फिनलैण्ड-ब्रिजच्या
फर्म्सचे समूह दिसताहेत.
“ओल्या, तुम्हीं कोणाला आणि कुठे
बोलावलं आहे? त्याच माणसाला, आणि त्याचं कॉन्फ्रेन्समधे बोलावलंय ना?”
“थांबा, मी पुन्हां फोन करते.”
“फार
छान,” कपितोनव म्हणाला.
उजवा
किनारा. वेग कमी होतोय – लवकरंच पोहोचू. वाट नाही बघावी लागली.
“एव्गेनी
गेनादेविच, तुम्हीं
तर उगाच मला घाबरवतांय, सगळं ठीक आहे, तुम्हीं मैथेमेटिशियन आहे, आर्किटेक्ट – तुम्हीं नाहीये, ते दुसरे आहेत, आज फक्त तुम्हीं दोघंच येता आहांत, मी थोडीशी कन्फ्यूज़ झाले, बस असाच विचार करत बसले, की मैथेमेटिशियन ते आहेत, आणि तुम्हीं आर्किटेक्ट आहांत, तर सगळं ठीक आहे, काही विचार नका करू, येऊन जा, आम्हीं सांभाळून घेऊं...”
मोबाइल
परंत ठेवून तो तयारी करूं लागतो – स्वेटर घालतो. खिडकीच्या बाहेर इण्डस्ट्रियल-ज़ोन
नवीन निर्माणांत मिसळलांय. कपितोनव स्वतःवर रागावतोय. जगाच्यासमोर तो स्वतःला
मैथेमेटिशियन म्हणायचे टालतो. स्वतःबद्दल हे सांगणं, की “मी मैथेमेटिशियन आहे” तसंच आहे, जसं “मी कवि आहे” किंवा “मी दार्शनिक आहे”. स्वतःबद्दल असं म्हणण्यासाठी
मुख्यतः स्वतःला कवि किंवा दार्शनिक समजणं जरूरी आहे. कपितोनव स्वतःला मुख्यतः
मैथेमेटिशियन नाही समजंत. जर कोणी विचारलं, तर स्वतःबद्दल सांगतो, “मैथेमेटिक्स शिकवतो” आणि त्याच्यापुढे बहुधा जोडून देतो : ‘मानविकी विभागांत”. ह्या देशांत
बरेंच लोक मैथेमेटिक्सला अनावश्यक विज्ञान समजतांत. तोसुद्धां हेच समजावण्याचा
प्रयत्न करतो, की एखादं निरर्थक काम करतो. आहेपण तसंच. मानविकीच्या विद्यार्थांना त्याची
जराही गरंज नाहीये. त्याला ह्याबद्दल खात्री आहे.
ज़िनाइदा
झेन्याचं सामान आवरतेय, दमीनोचे फासे डब्यांत ठेवतेय. कपितोनवकडे न बघता – जणु तिला विचारचंय की
लाडक्या, तुम्हीं, आधीच हे कां नाही
सांगितलं? – विचारूनंच
घेते:
“तर, तुम्ही मैथेमेटिशियन
आहांत?”
जसं
तुम्हीं एखाद्या माणसाबरोबर चालले आहांत, आपलं हृदय त्याच्यासमोर मोकळं करता, स्वतःबद्दल तो जे काही सांगतो त्यावर विश्वास ठेवता, आणि नंतर तुम्हांला कळतं, की तो तर माणूसंच नाहीये, कोण्या दुस-या ग्रहावरचा
निवासी आहे.
“म्हणजे, मैथेमेटिक्सच्या
कॉन्फ्रेन्सला चालले आहे?”
(आणि
हे असं घुमतं, जसं “दुस-या ग्रहाच्या”.)
कपितोनवला
मैथेमेटिक्सच्या कॉन्फ्रेन्सला नाही बोलावलंय (आणि दुस-या ग्रहाच्या कॉन्फ्रेन्सला
पण नाही). पण, चला, चालू
द्या.
“हो, मैथेमेटिक्सच्या” – तो
खोटं ठोकून देतो. “मग काय?”
नाही, काही नाही, ना तर डॉक्टर, ना माइनर, केमिकल इंजीनियरसुद्धां
नाही. ज़िनाइदाने रस्त्यांत स्वतःबद्दल सगळं सांगून टाकलं होतं, तोसुद्धां तिच्याशी जणु
मोकळाच झाला होता, पण आता असं वाटतंय की त्याने इतकी महत्वाची गोष्ट लपवली होती – तो
मैथेमेटिशियन आहे.
पण, पहिली गोष्ट, तो ब-याच काळापासून
मैथेमेटिशियन नाहीये – ह्या शब्दाचा खरा अर्थ लक्षांत घेतला तर, आणि दुसरी गोष्ट, त्याने सगळ्यांना कां
सांगंत बसावं, की तो मैथेमेटिशियन आहे?
आपल्याबद्दल
तसंही त्याने बरंच काही सांगून टाकलं होतं. आपल्याबद्दल – जेव्हां सुमारे
तासभरापूर्वी ते ‘मालाया विशेरा’हून जात होते (आणि ही कपितोनवची तिसरी स्वीकारोक्ति होती) : कसं त्याचं
आपल्या मुलीशी नेहमीसाठी भांडण झालं होतं, कशी बायको वारल्यानंतर मुलीशी त्याची नेहमी खटपटंच होत असते. त्याने न जाणे
कां, हेसुद्धां सांगून टाकलं, की काल मुलीने त्याला, आपल्या सख्या बापाला, कुठे पाठवलं होतं
(ज़िनाइदाने हात नाचवले). त्याला स्वतःकडून ह्या स्वीकारोक्तीची अपेक्षा नव्हती.
अनोळखी माणसांसमोर आपल्या मनांतलं सांगणं कपितोनवच्या नियमांत बसंत नव्हतं. आपल्या
माणसांसमोरसुद्धा तो मोकळेपणाने मनातली गोष्ट सांगत नव्हता. स्वतःला सुद्धां. ही
सगळी मानसिक परिस्थिति, हे सगळं अनिद्रेमुळे आहे. शेवटच्या क्षणाला तो ह्या अनावश्यक
कॉन्फ्रेन्ससाठी तयारंच अश्यासाठी झाला होता, की घरांतून पळतां यावे, परिस्थिति थोडीफार बदलू शकेल. आणि, त्याने हे सगळं, हिला कां सांगितलं? रेस्टॉरेन्टमधे घेतलेल्या शंभर ग्राम कोन्याकमुळे जीभ इतकी सैल झाली होती
कां? असं शक्य नव्हतं. हेपण
असूं शकतं, की
ह्या मंदबुद्धि नामराशीने आपल्या उपस्थितीने त्याच्यावर असा प्रभाव टाकला, की मालाया विशेराहून
जाताना कपितोनव इतका परिपक्व झाला की खुल्लमखुल्ला एका बापाच्या समस्या प्रदर्शित
करताना ज़िनाइदाचं समर्थन करून बसला. जणु इतरांच्या संकटांबद्दल ऐकून तिचं मन थोडं
शांत होईल. किंवा स्वतःच्या समस्यांसाठी तो एखादी पातळी शोधंत होता – ज्याने त्या
इतरांच्या समस्यांपेक्षा कमी भासाव्यांत? फू, कित्ती
खालच्या पातळीवर गेला होता कपितोनव. त्याने स्वतःसाठी सहानुभूति प्राप्त केली होती, पण कुणाची? – आणि आता हे बघून की
ज़िनाइदा जिने त्याच्या समस्यांना मनाला लावून घेतलंय, कशी आपल्या मोठ्या मुलाच्या हाफ-जैकेटच्या गुंड्या बंद करायला मदंत करतेय, त्याला आपल्या स्पष्टवक्तेपणावर
पश्चात्ताप होत होता, ज्याची कुणालांच गरज नव्हती.
स्वतःबद्दल
कपितोनवला येवढं माहीत होतं, की तो एक चांगला मैथेमेटिशियन आहे, - आणि ह्याच्यासाठी तो आपल्या मानसिकतेचा आभारी आहे. कपितोनवमधे सगळं सहन
करण्याची प्रवृत्ति आहे, जीवनाच्या परिस्थितींना डोक्यांत खुपसण्याची सवय आहे, किंवा, ह्याच्या उलट, त्यांच्यापासून असल्याच
अन्य काही परिस्थितींच्या मागे लपण्याची भावना आहे – आणि जसं जसं जीवन पुढे चाललंय, कपितोनव शून्यमनस्कतेनेमुळे
बेचैन होऊं लागतो – त्याचं डोकं पुरेसं उदासीन नाहीये.
16.39
“ट्रेन राइट-टाइम आहे,” कपितोनवच्या
खांद्यामागून निर्विकारपणे घोषणा होत आहे, तर कण्डक्टर
लवकर-लवकर (दार उघडलंय) कापडाने हैण्डल पुसते आहे.
प्लेटफॉर्मवर उभ्या
असलेल्या लोकांमधे कपितोनव ज़िनाइदाच्या बहिणीला अचूक ओळखतो. बाहेर निघतात – आणि
त्याला वाटतं,
की तो एका अनोळखी प्रकाराच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रांत पोहोचलाय
: ह्यांत आलिंगनं आहेत, आवाज आहेत, चुम्बनं
आहेत – पण हे सगळं कपितोनवच्या पाठीमागे होतंय : पुढे जाऊं या.
कम्पार्टमेन्टच्या कोंदटपणानंतर
बर्फाळ हवा जमल्यासारखी वाटतेय, आणि बर्फाच्या अभावांत हे अप्रत्याशित वाटतंय,
- एक छप्पर ह्या जागेला फेब्रुवारीच्या आकाशापासून संरक्षण देत आहे,
हिवाळ्याचे पोषाक वातावरणाला अनुरूप नाही वाटंत आहेत, म्हणजे, जर कोणी त्रयस्थ माणूस सिनेमाच्या
दर्शकाप्रमाणे प्लेटफॉर्मकडे नजर टाकेल,
तर फक्त एकंच गोष्ट त्याला हिवाळा असल्याची खात्री देऊं शकते :
श्वास सोडताना तोंडातूंन निघंत असलेली वाफ – असं कोणत्याच सिनेमांत दाखवणं शक्य
नाहीये.
वाफेच्या पहिल्याच ढगाने
फ़राओन खुफूची आठवण आली.
शाळेंतंच असताना कपितोनवने
कुठेतरी वाचलं होतं,
की श्वास आत घेताना आपण फ़राओन खुफूच्या मृत्युपूर्वी सोडलेल्या
श्वासाचा कमीत कमी एक अणु आपल्या आंत खेचतो, आणि तो इतका
घाबरला होता की त्याला ही गोष्ट आयुष्यभरासाठी लक्षांत राहिली, ह्याहूनही वाईट हे झालं, की – महान फ़राओन नेहमीसाठी
त्याच्या डोक्यांत राहून गेला: दर वेळेस जेव्हां कपितोनव उष्णतेतून गारव्यांत येतो,
त्याची आठवण होतेच, - तसा तो त्याला लगेच
विसरतोसुद्धा.
मागच्या वेळेस तो
पीटरबुर्गला चार वर्षांपूर्वी आला होता, कोस्त्या मूखिनच्या
अंत्ययात्रेसाठी. पण तेव्हां उन्हाळा होता.
पीटरमधे मेट्रोचं भाडं
किती आहे? हो, इथे टोकन्स आहेत. तो विसरून गेला होता, की पीटरबुर्गच्या मेट्रोचे टोकन्स कसे दिसतांत. काउन्टरवर क्यू चाललाय,
आणि, एकदम चार विकंत घेऊन तो खिडकीतून
चिल्लरसह खेचून घेतो, ज्यांत टोकन्ससारखीच दहा-दहा रूबल्सची
नाणी जास्त आहेत. आरामांत गडबड होऊ शकते.
जी होतेच – तो गडबडला.
फिरत्या दारापाशी
नेहमीसारखा व्यत्यय. मॉस्कोच्या सवयीनुसार प्लास्टिक-टिकिट पकडलेला हात चेकिंग
मशीनकडे वाकायला तैयार (कपितोनवला माहीत आहे, की ह्या वस्तूला काय म्हणतात),
पण, बस, त्याच्या हातांत
टिकिट नाहीये, - तो मशीनीच्या आत टोकन टाकतो, पण खरं म्हणजे – विसरभोळेपणामुळे – दहा रूबल्सचे नाणेच टाकून देतो आणि
समजू शकंत नाही की मशीन त्याचं नाणं परंत कां करंत आहे. पुन्हां प्रयत्न करतो –
पुन्हां तेच. कपितोनव वैतागतो आणि बाजूच्या फिरत्या दाराकडे जातो, आणखी एका वैध टोकनची वाट पाहणा-या मशीनींत दुसरं दहा रूबल्सचं नाणं टाकतो –
मग आजूबाजूला नजर टाकतो (नमस्ते, बॉर्डर्सच्या, प्रवेशद्वारांच्या, आणि पांढ-या ब्रेडच्या संदर्भांत
‘बन्स’च्या शहरा!) ,
आणि त्याची नजर पोलिसवाल्याकडे जाते. तो चुकला नव्हता : एकीकडे
सरकण्याचा इशारा त्याच्यासाठीच होता.
ते, खरं
म्हणजे, दोघं आहेत. पासपोर्ट दाखवायला सांगतात.
“मी मॉस्कोहून आलोय,” कपितोनवने
अनिच्छेने बाकीच्या ‘साउथ’कडून आलेल्या
प्रवाश्यांपासून दूर होत म्हटलं, ज्यांचा मोट्ठा घोळकाच
फिरत्या दारांत घुसतोय होता आणि कोणच्याही प्रकारच्या शंकेला वाव देत नाहीये.
“तर मग मॉस्को स्टेशनवर
कां नाही गेले?”
“कारण की लादोझ्स्कीवर
आलोय.”
“पण मॉस्को स्टेशन जास्त सोयिस्कर
आहे.”
“असेल.”
“मॉस्को – आपल्या देशाची
राजधानी आहे,”
विचारांत गढून पोलिसवाला पासपोर्टचं एड्रेसचं पान उघडून आपल्या
बरोबरच्या पोलिसवाल्याला सांगतो (त्या दोघांना नक्कीच कंटाळवाणं झालंय). “इथे
येण्याचा उद्देश्य, जर गुपित नसेल तर?”
“कॉन्फ्रेन्स,” कपितोनवने
उत्तर दिलं. “काय, हे आहे तरी काय? काय
आपलं सरकार पोलिस झालं आहे कां? की मी काही वेगळा दिसतोय?”
“तुम्हीं विचित्रपणे
वागतांय. आणि ही कसली कॉन्फ्रेन्स आहे? तुम्हीं उत्तर देण्यास नकारपण देऊं
शकता.”
“एका
संस्थेची आहे,” कपितोनव फक्त अश्यासाठी उत्तर देतोय, कारण की “उत्तर देण्यास नकार देऊं शकता” ऐकू आलं होतं, आणि वरून तो कागदावर छापलेलं आमंत्रणपण दाखवून देतो, हा विचार करून की अश्याने त्याला अन्य काही स्पष्टीकरण नाही द्यावे
लागणार.
“व्वा!”
पोलिसवाला म्हणतो, “चांगल्याचं ओळखीची कॉन्फ्रेन्स आहे.”
“खरंच कां?” कपितोनवचा
त्याच्यावर विश्वास नाही बसंत. “तुमच्याकडे त्याबद्दल काही माहिती आहे कां?”
“ही तीच तर आहे, जिला
उडवून देणार होते,” पोलिसवाला दुस-या पोलिसवाल्याला आमंत्रण
दाखवतो.
“कोणत्या अर्थाने?” कपितोनवला
काही कळंत नाही.
“अर्थसुद्धां आणि
माहितीसुद्धां,”
पहिल्यावाला सगळ्यांच एकदमंच उत्तर देतो, दुसरा
पोलिसवाला आमंत्रणाकडे असा बघंत होता, जसं एखादं भूत बघतोय.
“म्हणजे तुम्हीं न्यूज़मधे नाही ऐकलं कां?”
“कोण उडवणार होतं?” कपितोनव
एकदम चित झाला.
“तसेच जोकर, जसे
तुम्हीं आहांत.”
“असेच मैजिशियन्स,” दुस-याने
‘री’ ओढली, आणि माहीत
नाही कां, दोघं हसू लागले.
कागद परंत करंताना त्याला
जाऊ देतात, पहिल्याच्या तोंडातूंन निघतं:
“स्वतःची काळजी घ्या.”
कपितोनव फिरत्या दाराकडे
परत येतो.
16.58
पोलिसाच्या
माहितीने कपितोनवच्या डोक्यांत विचारांचा इतका कल्लोळ माजतो, की खरं सांगावं तर
कपितोनव काही विचारंच करंत नाहीये. आणि जेव्हां कपितोनव विचार नाही करंत, तेव्हां विचाराची
प्रक्रिया आपणहून होऊं लागते – बेकारची, निरर्थक, त्याचासाठीसुद्धां नकळंत. जेथपर्यंत त्याचं एस्केलेटर जातं, ती खोली एस्केलेटरच्या लांबीची
Sin300, म्हणजे लांबीची अर्धी
आहे, ज्याच्याबद्दल विचार
करण्याची गरंजसुद्धा नाहीये : हे तर तसंही स्पष्टंच आहे. नजर, सवयीनुसार, समोरून वर येत असलेल्या
चेह-यांवर अडखळते, जे सुन्दर महिलांचे नसले, तरी कमीत कमी ‘मिस एस्केलेटर’ प्रतियोगितेच्या प्रत्याश्यांचे तरी असावेत. लैम्प्स – ओळीने लागलेले –
आपणहून मोजले जातांत. उतरताना : 21. तर त्यांच्या मधलं अंतर आणि 300चा
कोण, - ही झाली खोली, 50मीटर्सहून थोडी जास्त.
पण
हे सगळं – बस, असंच – इतर गोष्टींशिवाय. त्याने पहिल्याच मुलीची ‘मिस एस्केलेटर’ म्हणून निवड केली, कुरळे लाल केस असलेली, जे तिच्या फरच्या
हैटच्या बाहेर निघंत होते. समोरून येणा-या एस्केलेटरवरून तर आणखी कुणी डोळ्यांना
आनन्द नाही दिला.
मॉस्कोंत
एक घुमंट असलेले स्टेशन्स जवळ-जवळ नाहीतंच, पण हे, पीटरबुर्गमधे खूप मोठं आहे. शेवटच्या टोकापर्यंत भटके लोक शेकोट्यांजवळ बसले
आहेत : त्यांच्याजवळ ना तर कायदा आणि सुव्यवस्था बघणारे जातांत, ना स्थानीय
अण्डरग्राउण्ड ट्रेनचे कर्मचारी. कपितोनवलापण प्लेटफॉर्मच्या त्या टोकाकडे
जाण्याची गरंज नाहीये.
मॉस्कोला
जाण्याआधी त्याला राजधानीच्या तुलनेंत पीटरबुर्गची मेट्रो चरम साधेपणाचं आणि
सुन्दरतेचं प्रतीक वाटायची, - आता तर त्याला लाइन्स आणि क्रॉसिंग्सशी झगडायचं आहे. तो कम्पार्टमेन्टमधे
हैण्डल धरून उभा आहे आणि मेट्रोचा नकाशा बघतोय, जो कोणच्यातरी बैंकेच्या जाहिरातीमुळे दबलाय. ट्रेन बदलण्याची गरंज आहे
किंवा नाही, हे
बघून घेतो. तिथे एस्केलेटरवर : जेव्हां तो खाली येत होता, तेव्हां एका महिलेचा
आवाज सावधगिरीचा इशारा देत होता : “चालत्या-फिरत्या विक्रेत्यांकडून बेकायदेशीर
वस्तूंचा व्यापार करण्याच्या वाढत्या प्रमाणाबद्दल”, - आता कम्पार्टमेन्टमधे विक्रेता
प्रकट होतो, आणि
पूर्ण आत्मविश्वासाने आपला परिचय देतो : व्यवहारकुशल, स्मार्ट, सुरेख कमावलेला आवाज. त्याच्या हातांत पोलिथीनचं पैकेट आहे, जे सामानाने भरलेलं आहे.
आपल्या गोड आणि आनन्दी आवाजांत आता तो जे सांगतोय, त्यावरून कयास लावता येतो, की हे मोजे साधारण नाहीयेत.
“थर्मो-सॉक्स, रशिया आणि बेलारूसमधे
बनवलेले!...आपोआपंच पायांच्या तपमानाला नियंत्रित करतात, आणि चालताना होणा-या
घर्षणाला कमी करतात!...फैक्ट्रीच्या भावावर देतोय – 50 रूबल्सची जोडी, नो प्रॉफिट!...”
कम्पार्टमेन्टमधे
एकटा कपितोनवंच विक्रेत्याकडे लक्ष देतोय.
विक्रेत्यानेपण
बघून घेतलं की एका माणसाने खिशांतून पन्नास रूबल्स काढलेयंत. तो अगदी बरोब्बर
लवकर-लवकर त्याच्याकडे येतो.
“मी
हे नाहीं विचारंत आहे, की घर्षण कसं कमी होतं, मला ह्या गोष्टींत रस आहे,” कपितोनव विक्रेत्याकडे पैसे देत म्हणाला, “की चालतांना घर्षण कमी कां करायला हवं?”
“पावलांच्या
सुरक्षिततेसाठी आणि पंज्यांना उच्च कोटीचा आराम देण्यासाठी,” कपितोनवला मोजे देत, पापणी न हालवतां
विक्रेता उत्तर देतो.
हा
कुणी देवदूततर नाहीये, जो फक्त कपितोनवसमोरंच प्रकट झालांय? कारण की असं तर होऊंच नाही शकंत की कोणीही थर्मो-सॉक्स विकणा-याकडे बघितलंच
नसावं : कपितोनवच्या शिवाय कुणी त्याचा आवाजंच नाही ऐकला कां, त्याला बघितलं नाही कां?
दारं
उघडतांत आणि थर्मो-सॉक्सचा विक्रेता कम्पार्टमेन्टमधून बाहेर निघून जातो.
17.47
युनिफॉर्म
घातलेली, रेशमी
टाय लावलेली, सोनेरी केसांची रिसेप्शनिस्ट टेलिफोनवर बोलतेय – आत येणा-या कपितोनवकडे तोंड
वळवते, आणि कपितोनवला तिच्या
डोळ्यांत स्वागताऐवजी दिसतं : “आमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत.” हवामानासंबंधी
समस्येचा अंदाज लावायची गरज नाहीये. समस्या एकुलत्या एका ग्राहकाच्या स्वरूपांत
समोर उभी होती. त्याचे लांब, मागे वळवलेले, पांढरे केस होते, दिसायला पन्नास वर्षांचा, आणि कपडे, जे त्याच्या अंगावर होते, त्यांना बस किळसवाणेच म्हणता येत होतं : हा ना तर फर-कोट होता, ना मेंढीच्या कातड्याचा डगला, ना ओवरकोट, ना जैकेट. ना गाउन, ना चिलखत. त्याच्या
पाठीवर झोळा नसून विणलेली पिशवी होती.
“हो-हो,” रिसेप्शन-डेस्कच्या
मागून मुलगी म्हणतेय, “आपलं नाव सांगायला तयार नाहीये...नाही, पासपोर्टसुद्धा दाखवंत नाहीये. म्हणाला, की पासपोर्ट नाहीये. आणि फॉर्म भरायलासुद्धां तयार नाहीये...हेंच, मी हेंच म्हणतेय. पण तो
ऐकतंच नाहीये.”
किंचित
सडका वास, जो
ह्या जागेसाठी अनपेक्षित होता, कपितोनवला त्या ग्राहकापासून एक पाऊल मागे घ्यायला लावतो. तो पासपोर्ट काढून
डेस्कवर ठेवून देतो, - ह्या फालतू कामाला, ज्याचा अर्थ फक्त हा आहे, की तो रजिस्ट्रेशनसाठी तयार आहे, प्रॉब्लम-ग्राहकाने पाहिलं – त्याच्या, त्याशिवायसुद्धां अप्रिय चेह-यावर घृणित भाव दिसंत होते, तर रिसेप्शन-डेस्कच्या
मागून मुलगी प्रशंसात्मक भावाने कपितोनवकडे बघून डोकं हालवते, जणु म्हणतेय, की तुम्हीं चांगले आहांत, सगळं ठीक आहे, आणि टेलिफोनच्या
रिसीवरमधे, कदाचित, आपल्या बॉसला सांगते:
“आत्ता
त्यांच्या ऑर्ग-कमिटीचा एडमिनिस्ट्रेटर येणार आहे, मी त्याला बोलावलंय, त्यांनाच बघूं द्या...माफ़ करा, ह्याला तुम्हांला काही तरी सांगायचंय...” आणि आता त्याला, ज्याचा हात रिसीवरकडे
पोहोचला होता, म्हणते, “घ्या.”
कपितोनव
डब्यांतून फॉर्म काढतो आणि वेळ न घालवतां त्याला भरायला लागतो. तो ऐकतो आहे:
“नमस्ते, मी ‘ईवेन्ट्स-आर्किटेक्ट’3 आहे!... अगदी बरोबर, ईवेन्ट्स-आर्किटेक्ट, दुसरा कोणी नाही...नाही, मला ह्याच नावाने
आमंत्रित केलेलं आहे, भाग घेणा-यांच्या लिस्टमधे मला ह्याच नावाने दाखवलंय, आणि तुमच्या हॉटेलच्या
नियमांशी मला काही घेणं-देणं नाहीये!...मी ना तर सीदरोव आहे, ना राबिनोविच, ना मिक्लुखो-मक्लाय, आणि जॉर्ज
वाशिंगटनसुद्धां नाही, मी – ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आहे...माझ्या सहनशक्तीची परिक्षा नका घेऊं!...नाही, नाही, पुन्हा-पुन्हां
नाही!...वाट बघू शकणार नाही...आणि मी पण कोणाची वाट पाहणार नाही, असं नका समजूं की
पाहीन!...मला तुमची दया येते!...हो, विशेषकरून तुमची!” इतकं म्हणून तो रिसेप्शनिस्ट मुलीकडे रिसीवर परंत देतो आणि
म्हणतो : “मला माझी ब्रीफकेस द्या!”
“आम्ही
ब्रीफकेस नाही देत.”
“मला
माहितीये की ब्रीफकेस तुमच्या काउंटरच्या मागे आहे. मला सांगितलंय.”
“आत्ता
तुमच्या ऑर्ग-कमिटीचा माणूस येईल आणि तुम्हांला ब्रीफकेस देईल.”
“माझ्याकडे
वेळ नाहीये. मी ब्रीफकेसची मागणी करतोय.”
“पुन्हां
सांगतेय. ब्रीफकेस
तुमच्या कॉन्फ्रेन्सची ऑर्ग-कमिटी देईल, आणि आमचा तुमच्या ब्रीफकेसेसशी काही संबंधही नाहीये!...आम्हीं फक्त त्यांना
काउन्टरच्या मागे ठेवण्याची परवानगी दिली होती.”
“हे
तर तुमच्यासाठी आणखीनंच वाईट आहे!”
तो
झर्रकन् वळतो आणि बाहेरच्या दाराकडे जाऊं लागतो.
“अहो, थांबा, आत्तांच तुमच्या
कॉन्फ्रेन्सचा एडमिनिस्ट्रेटर येणार आहे!”
पण
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट दाराच्या बाहेर निघून गेलेला आहे.
“ओह-हो-हो”
मुलगी पुटपुटते.
“मी
दिलगीर आहे,” कपितोनव
फॉर्म भरता-भरता म्हणतो. “कोणी साम्प्रदायी वाटतो.”
“कॉन्फ्रेन्सचा
सदस्य आहे,” रिसेप्शनिस्टने
उत्तर दिलं.
“मीसुद्धां
सदस्य आहे.”
कधी-कधी
ढंगाचे लोकही येतांत.”
“माझ्याकडे
माझं आडनाव आहे, लपवण्यासारखं काहीच नाहीये.”
“आत्ता
बघते, काय आहे ते,” रिसेप्शनिस्ट कपितोनवचं
पासपोर्ट उघडते आणि म्हणते, “कपितोनव.”
“कपितोनव,” कपितोनव डोकं हालवतो.
“एव्गेनी
गेनादेविच,” मुलगी
म्हणते.
“जर
वडिलांच्या नावाबरोबर म्हणाल, तर हो,” कपितोनव ह्यावर म्हणतो.
“आहे!”
तिला लिस्टमधे त्याचं आडनाव सापडलं होतं. “आणि माझी काय चूक होती?...तुम्ही तर स्वतःच सगळं
बघितलंय नं?...कारण
की आम्हीं कोणत्याही टोपणनावाने रजिस्ट्रेशन करून घेतो, आणि मग...”
“लिस्टमधे
काय त्याचं हेच नाव आहे...ईवेन्ट्स-आर्किटेक्ट?”
“हो.
तसले तिघं आहेत – टोपणनाव असलेले. त्या दोघांकडे कमीत कमी पासपोर्ट तरी होते...”
ऑर्ग-कमिटीची
प्रतिनिधि जिन्याकडून लवकर-लवकर हॉलमधे येते. बैजकडे बघतां – ओल्गा मात्वेयेवा.
“नमस्ते.
हे तुम्हीं आहांत?” ती ए.गे.कपितोनवशी एका अश्या प्रतिनिधीच्या थाटांत बोलूं लागली, जो कोणतीही समस्या
सोडवूं शकतो. “कसे आलांत? काही समस्या आहे कां? काळजी नका करूं, आपण सगळं व्यवस्थित करू...”
“नमस्ते, ओल्गा, पण...”
“तो
आत्तांच निघून गेला,” काउन्टरच्या मागून सोनेरी केस वाली मधेच टपकली.
“कुणीकडे?”
“तिकडे.
म्हणाला की आपल्या सगळ्यांना भोगावं लागेल.”
“ओह, हेल!” आणि ऑर्ग-कमिटीची
ओल्गा जशी आहे तशीच, म्हणजे गरम कपडे न चढवतां बाहेर, बर्फांत जाऊ लागते, पण लगेच परंत येते. “कमीत कमी, तो दिसायला कसा आहे?”
“तुम्हीं
लगेच ओळखाल,” रिसेप्शनिस्ट
उत्तर देते.
“पिवळा
डगला,” कपितोनव ओरडून
सांगतो, पण
ओल्गा मात्वेयेवाने, जी दाराच्या बाहेर निघून गेली होती, खचितंच त्याचं म्हणणं ऐकलं असावं.
“फक्त, तो डगला नव्हता,” विचारांत गढलेली रिसेप्शनिस्ट प्रतिवाद करते, “त्याला काहीही म्हणा, पण डगला नको...सही करा, प्लीज़. (कपितोनवने फॉर्म तर भरला होता पण सही करायला विसरून गेला होता.) रूम
नं, 32, तिसरा मजला.
ब्रेकफास्ट साडे सहा ते दहा पर्यंत. खोलींत धूम्रपान करायची मनाही आहे.”
“आणखी
कोणच्या गोष्टीची तर मनाही नाहीये नं?”
“नियम
वाचून घ्या, तुम्हीं
सही केलीये ना, की नियमांची ओळख झालीये.”
“म्हणतांत
की आज तुमच्याकडे काहीतरी उडवून देणार होते?” किल्ली घेऊन कपितोनव उत्सुकता दाखवतो.
“तुम्हीं
आपल्या लोकांनाच विचारलं असतं, ते जास्त चांगलं सांगू शकतील. आमच्याकडे उन्हाळ्यांत फुटबॉल-फैन्स थांबले
होते, ते असताना जास्त शांति
होती.”
ओल्गा
बाहेरून परंत येते, ब्लाउज़वर हिमकण होते, तिने स्वतःच आपले खांदे धरलेयंत.
“मी काही त्याच्यामागे धावणार नाहीये!
जेव्हां परंत येईल, तेव्हां लगेच मला फोन करं. जास्तीत जास्त, त्याला कोणाच्यातरी फ्लैटमधे थांबवून देऊं.”
“हूँ, काहीतरी असंच करावं
लागेल,” काउन्टरच्या
मागची मुलगी म्हणते.
“आणि
तुम्हीं – कपितोनव?” ओल्गा कयास लावते. “एव्गेनी...गेनादेविच? चला, शेवटी...ट्रेनच्या
बाबतीत गडबडंच झाली, तो, मी
तुम्हांला फोन केला होता. आठवलंय?”
कपितानोवला
केव्हांच समजलं होतं, की ती दोघी ओल्यांपैकी एक आहे, आणि त्याला कळलंय की ही कोणची आहे. जिने त्याला आर्किटेक्ट म्हटलं होतं, जेव्हां ट्रेन पुलावरून
जात होती.
“तुम्हीं
मला ‘हा’ समजल्या?”
“कठीण
दिवस आहे,” ओल्याने
म्हटलं. “गोष्ट फक्त येवढीच होती, की तुम्हीं दोघं शेवटचे होता आणि दोघेही एकांच वेळी आलांत...”
“तुम्हीं
काय सगळ्यांनाच रिसीव्ह करतां?”
“ओह, नाही. ‘तलाव’ने4 सांगितलं होतं की तुम्हांला नक्कीच रिसीव्ह करायचंय”
“मला?”
“आणि
हा आहे पित्रोज़वोद्स्कचा. तोच आहे. त्याच्याबरोबर नेहमी काही न काही प्रॉब्लमच होत
असते...हो! तुम्हांला ब्रीफकेस द्यायचीय...” ती काउन्टरच्या मागे शोधते आणि काळी
ब्रीफकेस काढते, साधारण ब्रीफकेसपेक्षा लहान. “तुम्हांला, सदस्य म्हणून. कॉन्फ्रेन्सचे कागद पत्र वगैरे, बघून घ्या...”
“आर्किटेक्टनेपण
मागितली होती, मी नाही दिली.” सोनेरी केसवाली काउन्टरच्यामागून सांगते.
ओल्गा
मात्वेयेवा काचेच्या भांड्यातून चॉकलेट काढते:
“छान
वाटतं. मला तर अगदी वेड लागलंय. तुम्हांला कोणच्या? तिस-या? चला, आपला
रस्ता एकंच आहे,” कपितोनवला लिफ्टकडे घेऊन जाते.
कपितोनवच्या
डाव्या खांद्यावर झोळा आहे, उजव्या हातांत – ब्रीफकेस, ती वजनदार नाहीये. कपितोनव वळून बघतो, पण सोनेरी केस वाली रिसेप्शनिस्ट त्याच्याकडे बघंत नसून कागदांमधे काहीतरी
बघतेय. तिरप्या नजरेने कपितोनवला आपल्या गाइडच्या ओठांवर हसू दिसतं.
त्यांनी
बोलावल्याबरोबर लगेच लिफ्ट नाही येत. वाट बघतात.
ओल्गा
मात्वेयेव्नाची उंची त्याच्यापेक्षा अर्ध डोकं कमी आहे, ती किंचित वाकून चालते, तिच्या चेह-याच्या भावांत पक्ष्यांसारखं काहीतरी आहे, - तिच्याकडे नुसतं
बघण्यापेक्षा कपितोनव तिला विचारतो:
“आणि
ही बॉम्बची भानगड काय आहे?”
“कोण्या
डुकराच्या पिल्लाने पोलिसमधे फोन केला आणि सांगितलं की हॉलमधे बॉम्ब लपवलेला आहे.
बस, येवढंच. सेशन खड्ड्यांत
गेलं. पूर्ण दिवस बेकार गेला. म्हणजे, तुमचं काही नुकसान नाही झालं. सगळं – उद्यांच होईल.”
“ह्यामागे
कोणाचा स्वार्थ आहे?”
“म्हणजेच, कोणाचातरी नक्कीच आहे,” ओल्गा म्हणाली. “हा ईवेन्ट्स-आर्किटेक्ट
जर सकाळी आला असतां, तर सगळ्यांना असंच वाटलं असतं, की हे त्यानेच केलंय. भाग्यवान आहे.”
“मीपण,” कपितोनव म्हणतो.
“नाही, तुमच्यावर कोणी शंका
घेतली नसती.”
“आणि, तो कोणत्या ईवेन्ट्सचा
आर्किटेक्ट आहे?”
“हे
पहा, मी तर त्याला बोलावलं
नाहीये. माझ काम फक्त पाहुण्यांना रिसीव्ह करायचं आहे.”
लिफ्ट
खाली आली : आरामांत दारं उघडते, मग विचार करते, की त्यांना बंद करायचं का. तसंही लिफ्ट एक पवित्र जागा आहे – इथे बोलंत
नाहींत, आणि
बटन्स, बघण्याची परंपरागत वस्तु
असल्यामुळे, आपल्या
दररोजच्या चेह-याने, दररोजच्या विचारांना बाहेरंच ठेवतात. जोपर्यंत तिस-या मजल्यावर बाहेर नाही
निघंत, दोघंही चुपंच राहतात आणि
विचारसुद्धां करंत नाही.
“तुम्हांला
इकडे, आणि मला कॉरीडोरच्या
त्या कोप-यापर्यंत जायचंय. जर ऑपेरा बघायचा असेल – तर सात वाजता दुस-या मजल्यावर, खास करून डेलिगेट्ससाठी.
कॉन्सर्ट. पण मला वाटतं, की तुम्हीं डुलक्या घेऊं लागाल. नीट झोप नाही झाली, हो ना?”
“हो, इथे मेडिकल स्टोअर कुठे
आहे?”
“अनिद्रा? तुम्हांला मेडिकल
स्टोअरची गरंज कां पडली?”
“मॉस्कोत
माझी तब्येत बिगडली होती.”
“आणि
मला वाटलं की ट्रेनमुळे...थोडीशी ‘रम’ घ्या, जास्त चांगलं राहील, ‘मिनिबार’मधे असेल...आणखी एक :
ब्रीफकेसबद्दल...त्यांत इतर गोष्टींसोबत एक ‘सुवेनीर’पण आहे – जादूची छडी, फक्त छडी, लाकडी, ताईतासारखी, बघा...घाबरूं नका, ही फक्त गम्मत आहे. इथे, असं वाटतं की सगळ्याच लोकांना विनोद कळंत नाही, म्हणूनंच मी तुम्हांला सांगून ठेवते. नाहीतर तुम्हीं काही-बाही विचार करूं
लागाल...”
18.15
आणि कसलीही डुलकी नाही, उलंट विचाराची अनुपस्थिति, तसं,
कदाचित, शॉवरच्या खाली उभ्या-उभ्या एक-दोन
सेकंदासाठी तो ‘गुल’ झाला असेल.
विचाराच्या अनुपस्थितीचा विचार कपितोनवला वास्तविकतेंत परंत आणतो, त्याला आठवतं, की त्याला झोपायचं होतं, आणि तो पाणी बंद करतो.
कपितोनवच्या मनांत एक
छोटीशी भीति आहे : हॉटेल्समधे तो कधीही टूथ ब्रशला सिंकच्या जवळच्या ग्लासमधे नाही
सोडंत. हे असं सुरू झालं काही दिवसांपूर्वीच एका संवाददात्याची बिंग फोडणारी
रिपोर्ट प्रकाशित झाल्यावर,
जी स्कैण्डलसाठीच एका फाइव स्टार हॉटेलमधे सफाई-कर्मचारीम्हणून
राहिली होती. तिने ठासून सांगितलं होतं, की सफाई करणा-या
बाया जास्ती काम असल्यामुळे सिंकला वैज्ञानिक पद्धतीने स्वच्छ नाही करंत, आणि काम लवकर-लवकर संपवण्यासाठी पाहुण्यांच्या टूथ ब्रशेज़चा उपयोग करून
टाकतात. कपितोनव ह्यावर विश्वासापेक्षां अविश्वासंच करतो, पण
प्लास्टिकच्या खोळीत कापडाचा तुकडा घालून ठेवलेला टूथ ब्रश आपल्या ट्रेवल-पर्समधे
टाकून घेतो.
नीनाने एकदा
त्याला म्हटलं होतं की तो अनेक प्रकारच्या भयगंडांचा पुतळा आहे. बरं आहे, की हे अकारण भय खाण्या-पिण्याच्या वस्तूंपर्यंत नाही पोहोचंत. आयुष्यभर तो
सुरुवातीच्या कम्पार्टमेन्ट्सपासून दूर राहिला. काही काळापूर्वी(जे तो
चांगल्याप्रकारे लपवतो, नीनाला ह्याबद्दल कळलंसुद्धा नाही), जेव्हां तो मोठा झाला होता, लहानग्या आन्काबरोबर झालेल्या घटनेनंतर, तो रक्त बघून घाबरायला लागला – नाही, रक्त बघून नाही, पण ह्या भीतीने, की असं केल्याने त्याचं नुक्सान होईल : जसं, कपितोनव अशा फिल्म्स बघायला घाबरतो ज्यांत केचप किंवा क्रेनबेरी जूसच्या
उपयोगाची शक्यता असते. जरी तो शाळेत आणि विद्यापीठांत दादागिरी करण्यांसाठी
प्रसिद्ध होता तरीही. पण शाळेंत असतानांच, जेव्हां पाचवींत इतिहासाच्या वर्गात, शिस्तप्रिय किरील सिर्गेयेविचने रोमन सेनेंत ‘डेसिमेशन’बद्दल (विद्रोही
सैनिकांतील दहापैकी एकाला मारून टाकणं – अनु.) सांगितलं
आणि बोलतां-बोलतां प्राचीन रोमन्सच्या, फार प्राचीन अश्या नसलेल्या, अनुकरणाबद्दलसुद्धां सांगितलं (त्यांच्या वर्गांत तिघांना गोळी मारली असती –
तेपण शिल्लक उरलेल्या कॉम्रेड्सच्या प्रयत्नाने), काही महीने तो आपल्या जीवनांत 10च्या अंकाला महत्व देऊं लागला – जे, जर मेट्रिक प्रणालीच्या
समर्थनांत काही सांगायचं झालं तर सम्पूर्ण पोज़िशनिंग प्रणालीचा आधार आहे. पण – दहा
नंबरची बस, दातांच्या
डॉक्टरच्या लाइनींत दहावा नंबर...कदाचित म्हणूनंचतर कपितोनवने मैथेमेटिक्सची निवड
केली नसेल (कधी कधी तो ह्याबद्दल विचार करतो), म्हणजे नकळतंच आपल्या किशोरवयाच्या डेसिफोबियापासून मुक्त होता येईल?
ही
खोली अत्यंत साधी असूनही, तिच्यांत विचित्रपणे आरश्यांचा सुळसुळाट आहे. प्रवेशदालनांत आणि बाथरूममधेतर
ठीक आहे, पण
खोलींत – आणि तिथे तीन-तीन आरसे कशासाठी? कपितोनवला स्वतःवर प्रेम करायचा शौक नाहीये आणि ह्या संभावनेनेपण तो बिल्कुल
खूश नाहीये – पलंगावर पडल्या-पडल्यासुद्धां, डोकं वळवून, जो पलंगावर झोपलेल्या त्याचा स्वतःचाच अंश आहे, आपलाच चेहरा बघण्याची.
तर, आइडिया हा होता की झोप
नाही आली, तर
कमींत कमी डुलकी घेता यावी.
हे
स्पष्ट झालं, की झोपूं शकणार नाही, आणि ह्याला जवाबदार टेलिविजन नाहीये (चैनल्स बदलतो), तर व्यक्तिगत अनुभव आहे
हा अवजंड उत्साहीपणा सहन करण्याचा, जो बिछान्यांत पडतांच पूर्ण ताकदीनिशी जाणवूं लागतो.
वरून
साउण्ड-प्रूफिंग. आश्चर्य आहे.
आधी
तर कपितोनवला असा भास झाला, की भिंतीच्या पलिकडे कोणीतरी घोरतंय. आत्ताशीच? कपितोनव कान लावून ऐकतो. हे घोरणं नाहीये. हे, कोणाचातरी गळा घोटतात आहेत. त्याने काहीतरी उपाय केला असता, पण स्वतःच्या कानांवर
विश्वास करणे नाकारतो. आणि, हे बरोबरपण आहे. ओकारी करण्याचे प्रयत्न – भिंतीच्या पलिकडे हेंच चाललंय.
कपितोनवला
आश्चर्य वाटतंय. तो टेलिविजनचं वॉल्यूम वाढवतो. एका प्रसिद्ध यूरोपियन ऑफिसरच्या
प्रेमिकेबद्दल बातमी दाखवतांत आहेत, जिने एका प्रमुख समाचार पत्रिकेवर ‘केस’ केली
आहे.
तेवढ्यांत
दारावर टकटक होते.
“प्लीज़...वॉल्यूम!...”
भिंतीच्या पलिकडून मोठ्या मुश्किलीने ओकारी थांबवंत शेजारी कर्कशपणे म्हणतो.
कपितोनवला
आजारी माणसाशी वाद घालायचा नाहीये आणि तो टेलिविजन बंद करतो.
“थैन्क्यू...”
कपितोनव
अविश्वासाने स्तब्धता ऐकतोय : भिंतीच्या पलिकडला माणूस जिवन्त आहे का? जीवनाचे दुसरे कोणते
लक्षणं ऐकूं येत नाहीये. (पण हे तरी काय जीवन आहे, जेव्हां आतड्या बाहेर निघताहेत?)
कपितोनवने
ब्रीफकेस उघडली.
ब्रोश्यूर्स, प्रोग्रामशी संबंधित
डॉक्यूमेन्ट्सच्या फाइल्स. चार्टरचा मसुदा.
नोटपैड, बॉलपेन्स.
ह्या शहराच्या स्मारकांच्या रहस्यमय जीवनासंबंधी एक पुस्तिका – सुवेनीर. आणखी एक
सुवेनीर – जादूची छडी. कपितोनव स्वतःसुद्धां हे समजूं शकंत होता, कारण की प्लास्टिकच्या
त्या पैकेटवर, त्यांत ही वस्तू ठेवली होती, एक स्लिप चिटकवलेली होती जिच्यावर लिहिलं होतं “जादूची
छडी”.
खरं
तर ही चाइनीज़ रेस्टॉरेन्टची एक चॉपस्टिक होती – विनोदाचा भाग हा होता, कि साधारणपणे पैकेटमधे
अश्या दोन चॉपस्टिक्स असतात आणि त्या खाण्यासाठी असतात, आणि इथे आहे एक, आणि, म्हणूनंच
कोण्या दुस-या कामासाठी आहे. कपितोनवला सुचवलं जातंय की त्याने स्वतःला हैरी पॉटर
समजावे. त्याला असं वाटलं की त्याच्यावर नजर ठेवली जात आहे आणि त्याच्या
प्रतिक्रियेची वाट बघताहेत – की तो हसेल किंवा नाही. कपितोनव नाही हसंत, त्याला हे आवडलं नाही.
पण कोणत्यातरी वस्तूने त्याला चाइनीज़ रेस्टॉरेन्टची चॉपस्टिक फिरवायला भाग पाडलं, - इंटरेस्टिंग!
कॉन्फ्रेन्सचे सगळेच डेलिगेट्स चॉपस्टिकशी असंच करतांत कां, जसं आत्ता कपितोनव करतोय, आणि असं करताना काही लोक
‘अब्रा-का-दब्रा’सारखं काही तरी म्हणतात कां?
कपितोनव
जादूच्या छडीला ब्रीफकेसमधे ठेवून देतो आणि मेम्बर्सच्या नावांची लिस्ट असलेलं
ब्रोश्यूर काढतो. प्रत्येक मेम्बरसाठी एक-एक पान आहे. त्याचा फोटो आणि परिचयात्मक
शब्द आहेत.
सगळ्यांत
आधी परिचय दिलेला आहे चेखवच्या प्रसिद्ध नायकाचं आडनाव असलेल्या अस्त्रोवचा
(कदाचित उपनाम असावे, कपितोनव विचार करतो). “अस्त्रोव, अलेक्सान्द्र एस्कोल्दोविच. विस्तृत क्षेत्राचा सूक्ष्म मैजिशियन –
माइक्रोमैग (इथे तात्पर्य आहे – माइक्रो मैजिशियनशी –अनु.) ‘गोल्डन-फनल’ने सम्मानित. माइक्रो मैजिशियन्स आणि
मैजिशियन्सच्या अंतरराष्ट्रीय अकादेमीचे सदस्य”. कपितोनवला अस्त्रोवचं हास्य आवडंत
नाही, धृष्ठ नजरेचा त्याच्याशी
मेळ नाही बसंत. तो पान उलटतो आणि कॉन्फ्रेन्सच्या पुढच्या मेम्बरच्या फोटोच्या
ऐवजी त्याचं सांकेतिक रूप पाहतो – एका फ्रेममधे डोकं आणि धड ह्यांची फक्त रूपरेशा.
रिसेप्शन काउन्टरवर झालेल्या घटनेनंतर ह्यांत आश्चर्य करण्यासारखं काहीच नाहीये :
“ईवेन्ट्स-आर्किटेक्ट”. आणि, पुढे फक्त एकंच शब्द : ‘रिमोटिस्ट’. ह्या शब्दाचा काय अर्थ असेल, हे जरी कपितोनवला समजलं नाहीये, तरीही तो किंचित अस्पष्टशी कल्पना तर करूंच शकतो : रिमोट कन्ट्रोल वाली
एखादी वस्तू, नाहीं? – चला, जाऊ
द्या, ह्यावर डोकं फोडायची
काही गरज नाहीये, - त्याचबरोबर त्याने हे सुद्धां बघितलं, की वर्णक्रम तुटलाय: नियमाप्रमाणे ईवेन्ट्स आर्किटेक्टला अस्त्रोवच्या आधी
असायला पाहिजे (इथे प्रश्न रशियन वर्णक्रमाशी संबंधित आहे – अनु.). असं
वाटतं की ह्या संदर्भ-पत्रिकेच्या संकलनकर्त्यांना एका चेहराहीन चेह-यापासून सुरुवात करायची नव्हती, पण त्या चेहरेवाल्या
चेह-यांत असं काय विशेष आहे...कदाचित, तेच, जे
त्याच्या कुलनामांत आहे.
मग
कपितोनव लगेच ‘क’ अक्षराकडे
जातो आणि ‘कपितोनव’ला शोधून काढतो.
त्याच्या
आंत सगळं संकुचित होऊं लागतं. हा फोटो दोन वर्षांपूर्वी बायकोने काढला होता, जेव्हां ते तुर्कीला
गेले होते. हा ह्या ब्रोश्यूरमधे कसा आला? पण तेव्हांच त्याला आठवलं की त्याने स्वतःच डिसेम्बरमधे हा पाठवला होता, जेव्हां ऑर्गेनाइज़िंग
कमिटीच्या लोकांनी त्याच्याशी संपर्क केला होता.
“कपितोनव, एव्गेनी गेनादेविच.
मैथेमेटिशियन-मेंटलिस्ट. दोन अंकांच्या संख्या.”
तो
हसला. ‘मैथेमेटिशियन-मेन्टलिस्ट’ – कदाचित असंच म्हणतात.
आणि ‘दोन अंकांच्या संख्या’ वाचून सहयोग्यांना काय
विचार करायला हवा?
पहिल्यांदाच
तो त्यांच्याबद्दल ‘सहयोगी’ म्हणून विचार करतोय, आतापर्यंत ते एका अमूर्त समूहाचे तत्व होते. तो मजेत ब्रोश्यूरची पानं
उलटतोय आणि “सहयोग्यां”बद्दल माहिती घेतोय.
त्यांच्यापैकी
बहुतांश माइक्रो-मैजिशियन्स आहेत. कोणाकोणाचं स्पेशलाइज़ेशनसुद्धां दाखवलेलं आहे : ‘माइक्रोमैजिशियन-मैचस्टिक्स’, ‘माइक्रोमैजिशियन-स्लीव्ज़’… बरेचसे ‘मास्टर्स’ आहेत – फक्त ‘मास्टर्स’, आणि त्याचबरोबर ‘मास्टर्स ऑफ ड्राइंगरूम मैजिक’ आणि तसलेच. इतर काही लोकांना ‘एक्सपर्ट-चीटर्स’ म्हटलेलं आहे, तसे त्यांच्यांत दोन ‘मास्टर्स’पण आहेत. दोन ‘अत्यंतसूक्ष्मधारी’ आहेत. ईवेन्ट्स-आर्किटेक्ट शिवाय कपितोनवला आणखी दोन ‘रिमोटिस्ट्स’ दिसतात. हे आहेत कोणी
महाशय नेक्रोमान्त5 (ओझा, मांत्रिक-अनु.) आणि काळ-भक्षक6.
त्यांच्यापुढे माणसांसारखी नाव दिलेली नाहीत, पण ईवेन्ट्स-आर्किटेक्टपेक्षां वेगळं, म्हणजे दोघांचे फोटो दिलेले आहेत. काळ-भक्षक – आजा-यासारख्या अशक्त आहे, त्याचे गाल लटकलेले
आहेत. महाशय नेक्रोमान्त, तो नेक्रोमान्त (मांत्रिक) सारखांच आहे.
.
लैण्डलाइन
फोनची घंटी कपितोनवला पलंगावरून उठायला भाग पाडते.
“प्रवास
कसा झाला, एव्गेनी
गेनादेविच? मी
‘तलाव’, तुम्हांला त्रास देतोय.
मी डिस्टर्बतर नाही केलं?”
“नमस्ते,” ‘तलाव’ला नाव आणि वडिलांचे नाव घेऊन
संबोधित करण्याची जोखीम न उचलतां कपितोनव म्हणतो, (खात्री नव्हती की आठवतंय...) – “थैन्क्यू. सगळं ठीक आहे.”
“फाइटिंग
मूडमधे आहेस ना?” ‘तलाव’ विचारतो.
“एकदम.”
कपितोनव उत्तर देतो. “काय युद्धाची वेळ येणारेय?”
“एव्गेनी
गेनादेविच, मी
खाली रेस्टॉरेन्टमधे बसलोय. तुम्हांला एक कप कॉफी घ्यायला आवडेल कां? एकमेकांना थोडंफार
समजतां येईल, अमोर-समोर बसून ओळख करूं या. नाहीतर आपण काय – फक्त, लिस्टप्रमाणेच आहोत कां?”
“ओह, नक्कीच, थैन्क्यू, येतो.”
खोलीतून
निघण्यापूर्वी त्याने लिस्टवर नजर टाकली – ब्रोश्यूरमधे ‘तलाव’ला शोधलं: तोच आहे – वलेंतीन
ल्वोविच.
18.57
नाही, फक्त, कॉफीच्या ऐवजी ग्रीन टी
– प्लीज़.
“झोप
डिस्टर्ब झालीये?” ‘तलाव’ने
लगेच ओळखलं.
हॉटेलच्या
रेस्टॉरेन्टमधे एका लहानश्या टेबलाशी बसतात.
आपल्या
अनिद्रेबद्दल विस्ताराने सांगायची कपितोनवची इच्छा नाहीये.
“तुम्हीं, मी आशा करतोय, की आरामशीर खोलीतून
बाहेर खेचून आणल्यामुळे माझ्यावर रागावणार नाहीं? कदाचित, तुम्हांला ऑपेरा ऐकायचा असेल? दुस-या अंकात पोहोचून जाल, पहिला तर समजून घ्या, की गेला.”
“नाही, नाही, मला ऑपेराची आवड
नाहीये.”
वेट्रेस
चहाची किटली घेऊन आली.
कपितोनव
लक्ष देऊन पाहतोय की जर किटलीला उलटून झाकण खाली केलं, ज्याने त्याचं तळ वर होईल आणि तोटी आपल्याकडे
केली, तर ती बरीचशी ‘तलाव’च्या चेह-यासारखी दिसूं लागेल. सुस्तावलेलं नाक, गोल-गोल गाल, एकदम संपत आलेलं कपाळ, जणु ‘तलाव’ चोवीस तास शीर्षासनाच्या
मुद्रेत उभा होता. डोक्यावर केस फक्त समकोण बनवंत असलेल्या मिशांसारखे होते, जणु काही ‘तलाव’च्या नाकाच्या खाली एखादा टेप चिकटवलांय. पण त्याचे डोळे खूप प्रसन्न होते
आणि नजर – तीक्ष्ण.
कदाचित, बाथ-हाउसमधे नंगा ‘तलाव’ विदूषक म्हणून चालला असता, पण इथे काळ्या कडक सूट मधे, गडद लाल वास्कटमधे, ज्याच्या खालून जांभळा टाय डोकावतोय, तो अगदी लॉर्डसारखा दिसतोय.
“तर, एव्गेनी गेनादेविच, काय म्हणतां?” ‘तलाव’ उत्सुकतेने विचारतो. “काय
प्रगति आहे, एव्गेनी?”
“प्रगतीचा
काही वांधा नाहीये, वलेन्तीन ल्वोविच. सगळं ठीक आहे.”
“कळलं.
इथे आमन्त्रित केल्यामुळे तुम्हांला आश्चर्यतर नाही ना झालं, एव्गेनी गेनादेविच?”
“आश्चर्यतर
झालंच.”
“
‘श्याम-वन’7 स्वतः तुम्हांला
बोलावण्याच्या मताचा होता. त्याने जोर दिला, पण प्रस्ताव मी मांडला. कारण की तुमच्या ‘आइटम’बद्दल
मला क्रूप्नोवने सांगितलं होतं. क्रूप्नोव आठवतोय?”
“हो, त्याने
टूरिस्ट-सेन्टरमधे प्रोग्राम केला होता, आम्हीं ऑक्टोबरमधे भेटलो होतो.”
“तो
तर – ठीक-ठाक आहे, तो लूप्सचे चमत्कार दाखवतो. हातचलाखी, जसं म्हणतात, पण तुम्हीं, म्हणजे, अगदी डोक्याने, बुद्धीने, हो ना? तो खूप प्रभावशाली होता, पण आपल्या दर्शकाला आश्चर्यचकित करणं कठीण आहे.”
“ते, तिथे एक कॉमन टेबल होतं,” कपितोनव मागच्या वर्षीचा
प्रसंग आठवंत सांगतो, “तुमचा क्रूप्नोव आराम करंत असलेल्या लोकांच्या जवळ बसून गेला, मी पण ट्रिक दाखवली.
असंच, उत्सुकतेपोटी.”
“म्हणजे, व्यावसायिक प्रदर्शन
नाहीं करंत?”
“बिल्कुल
नाही. असंच कधी-कधी टेबलाशी बसून, ग्रुपमधे.”
“पण
टेबलाशी बसूनपण व्यावसायिक रूपांत करता येतं. आजकाल तर हेच जास्त चालतं.
कॉर्पोरेट्स माइक्रोमैजिशियन्सला असंच बोलावतात. टेबलाशीच, ग्रुपमधे
बसल्या-बसल्या.”
“ओह, तर हेच आहेत ‘माइक्रोमैजिशियन्स’? आधी काही दुसरं नाव
होतं...”
“प्रेस्टिडिजिटेटर्स...पण, असं वाटतं की हे नाव
आवडंत नव्हतं. पण ‘माइक्रोमैजिशियन्स’ आपणहून जिभेवरून उडी मारतं. तरुणांना, माहितीये, प्रेस्टिडिजिटेटर्स म्हटलेलं आवडंत नाही, त्यांत काही प्रेस्टीज नाहीये, त्यांनातर हा शब्द उच्चारतांसुद्धां येत नाही, बघा, तुम्हींसुद्धां
विसरलात...पण, माइक्रोमैजिशियन्स, सगळ्यांना आवडतं. हे केव्हांचंच प्रचलित झालेल आहे. ब-याच दिवसांपासून. पण
आम्ही, तसे नाही आहोत, म्हणजे –
माइक्रोमैजिशियन्स, प्रेस्टिडिजिटेटर्स, आम्हीं – बरेंच विस्तृत, विस्तृत आहोत...तर तुम्हीं, म्हणजे की, मनांत विचार केलेली संख्या ओळखून घेता?”
“दोन
अंकांची.”
“तुम्हीं
तर मैथेमेटिशियन आहांत ना?”
“हो, मानविकीच्या
विद्यार्थांना लेक्चर्स देतो...आणि ह्या ट्रिकबद्दल म्हणाल, तर ह्यांत काही विशेष
मैथेमेटिक्सची गरंज नाहीये.”
“अशी
कशी नाहीये, जर
संख्या मैथेमेटिकल आहे तर? किंवा, कसं? तुम्हीं
मला दाखवा, डेमो
दाखवा. आत्ता शक्य आहे कां?”
“सोपं
आहे. मनांत एक संख्या धरा, दोन अंकांची.”
“तीन
अंकांची नाही चालणार?”
“दोन
अंकांची. तीन अंकांच्या संख्येने नाही होत. दहा पर्यंतची संख्यापण घेऊ शकता, पण तेव्हां त्या
संख्येचा टेलोफोन नंबर सारखा विचार करावा लागेल, जसं – 07, 09…दोन अंकांची सोपी असते, लवकर समजते.”
“ठीकाय, धरली.”
“त्यांत
नऊ जोडा.”
“एक
सेकण्ड, जोडले.”
“सात
वजा करा.”
“केले.”
“तुमची
संख्या होती 36.”
“नॉट
बैड. नॉट एट ऑल बैड. पण हे जोडणं आणि वजा करणं कशाला? पण, मी
हे कां विचारतोय. हे तर तुमचं सीक्रेट आहे.”
“ओह, नाही, काही सीक्रेट-बीक्रेट
नाहीये, फक्त
ह्याच्याशिवाय हे होत नाहीं.”
“कदाचित, कारण की मी पत्त्यांवर
काम करतो. तुम्हांला तर माहितीये की माझी स्पेशलिटी – प्लेयिंग कार्ड्स आहे? म्हणूनंच, हँ?”
“काय – म्हणूनंच?”
“36.
कारण की एका साधारण पैकमधे 36 पत्ते असतांत. मी नाही विचार केला, ते आपणहूनचं डोक्यांत
आलं.”
“मला
कुणी नाही सांगितलं, की तुम्हीं पत्त्यांवर काम करतां. मला कसं कळणार, की तुम्हीं पत्त्यांवर काम करता, की हैटमधून निघालेल्या सस्यावर काम करता.”
“प्रमुखतेने
पत्त्यांवर. ससा – एकदम वेगळा प्रकार आहे. तसं, माहितीये, मी उंदरांवरसुद्धां काम करतो. माझी ज़ूज़्या सगळे पत्ते ओळखते. एक-एक पत्ता!
कधी बघा ज़ूज़्याला. चला. आणखी एकदा. मी संख्या धरली.”
“आठ
जोडा.”
“आहा, आता आठ झाले.”
“दोन
वजा करा.”
“केले.”
“54.”
“कारण
की हा आहे पत्त्यांचा पूर्ण पैक, दोन्हीं जोकरांना धरून. मी तर पुन्हां गडबडलो.”
“तुम्हीं
प्रत्येक संख्या पत्त्यांशीच जोडून घेता.”
“सैतान!
ही आहे ट्रिक! आइडियोमोटोरिक्स, सगळं समजलं.”
“नाही, इथे आणखी काही आहे.”
“हो, माझ्या चेह-यावर सगळं
लिहिलंय. तुम्हांला, बस, ते
वाचतां येतं. मी जर पार्टीशनच्यामागे असलो, तर काही होणार नाही.”
“होईल.”
“ठीक
आहे, आपण बघू...ठरलं? पण...कामाबद्दल, मित्रा. माझी अशी इच्छा
आहे, की तुम्हीं आमच्याबरोबर
असावे, ना की त्या फुकट्या
बदमाशांबरोबर, जे गिल्डमधे सत्तेच्या मागे धावतांत. लक्षांत ठेवा “ ‘श्याम-वन’. इतर कोणीही नाही. त्याला धरून राहा. तो – आमच्या पार्टीचा आहे. आणि आम्हांला
काहीही करून आपल्या माणसाला प्रेसिडेन्ट म्हणून निवडायचंय. जर ज्युपिटेर्स्कीचा
माणूस सत्तेवर आला, तर आपण सगळे संपून जाऊ. हे गिल्डसाठी घातक ठरेल. बघा, कोणा-कोणाला त्यांनी
बोलावलंय. तुम्हीं बघितलंय?” – त्याने ब्रीफकेसमधून कॉन्फ्रेन्सच्या डेलिगेट्सची लिस्ट असलेलं ब्रोश्यूर काढलं
– “हे सगळे ‘अत्यंतसूक्ष्मधारी’ आहेत! कम्पार्टमेन्ट-चीटर्स! वाचा : पत्त्यांना कशाही प्रकारे ठेवा, मास्टरंच जिंकेल’! हे तुम्हांला कसं वाटतंय? ‘मास्टर’. मी स्वतःसुद्धा
पत्त्यांवर काम करतो, आणि मी बनवाबनवी करणा-यांना आणि जादुगारांना ओळखू शकतो. इतर
गोष्टींबद्दलसुद्धां असंच आहे! खिसेकापू स्वतःला माइक्रोमैजिशियन्स- मेनिप्युलेटर्स
म्हणवून घेतांत. आणि ते असंपण दाखवतांत की आमच्या संगठनेंत त्यांचा एक विशेष वर्ग
आहे! माहीत आहे, जहाजाला पाण्यांत जसं सोडाल, तसंच ते तरंगेल. जसा आधार असेल, तसंच जीवन मिळेल. इथे प्रत्येक वोट महत्वपूर्ण आहे. म्हणूनंच मी तुमच्याबरोबर
बसलोय. मी तुमच्यावर विश्वास ठेवूं शकतो कां?”
“तुमच्याकडेतर
सगळंच खूप गुंतागुंतीचं आहे...मी विचारंच नव्हता केला.”
“विचार
करूसुद्धां नका. तुमचा आवडता विषय आहे – मेन्टल मैजिक. फुकटच्या गोष्टींबद्दल
तुम्हांला विचारपण करायला नको. तुमच्याबद्दल सगळं ठरवून झालंय. तुम्हीं फक्त मला
धरून राहा आणि कुणावरही विश्वास नका ठेवूं. फक्त माझ्यावर, म्हणजे, माझ्या माध्यमाने – ‘श्याम-वन’वर.”
“तुम्हीं
मेन्टल मैजिक म्हणतांय? त्याला काय ह्याच नावाने ओळखतांत?”
“नाहींतर, आणखी कसं? मेन्टल मैजिक. आणि, जर तुमच्याकडे लोक आले
आणि त्यांनी तुम्हांला पटवायचा प्रयत्न केला, की कोणाबरोबर मैत्री ठेवायला पाहिजे, कोणाच्या विरुद्ध ‘मत’ द्यायला
पाहिजे, तर
माझी गोष्ट लक्षांत ठेवा : इथे कोणावरही विश्वास ठेवायचा नाहीये, फक्त माझ्यावर, आणि माझ्या माध्यमाने
- ‘श्याम-वन’वर.”
“मी
डेलिगेट्सची लिस्ट बघितलीय. असाधारण लोक आहेत...जर सौम्यपणे सांगायचं तर.”
“साधारणंच
जास्त आहेत. आणि, असाधारण कोण आहेत?”
“कोणी
नेक्रोमान्त...”
“महाशय
नेक्रोमान्त,” ‘तलाव’
दुरुस्त करतो. “हा आमचा माणूस आहे, तो बरोबर ‘मत’ देईल...”
“काळ-भक्षक...”
“अरे, तुम्हीं तर
रिमोटिस्ट्सबद्दल सांगताय,” ‘तलाव’ तोंड
वाकडं करंत म्हणतो. “एक तिसरापण आहे, तोसुद्धां आजंच आलाय.”
“हो, मी त्याला बघितलंय.
त्याने रिसेप्शनवर रजिस्ट्रेशन करण्यास नकार दिला होता.”
“तुम्हीं
बघितलं का, की
तो कुणीकडे गेला?”
“बाहेर
रस्त्यावर.”
“रस्त्यावर
कुणीकडे? आमच्या
हातून तो निसटला.”
“माहीत
नाही, बस, चालला गेला.”
“मी
त्याला घडवलंय. ब-याच लोकांना आवडलेलं नाहीये, की मी त्यांना बोलावलंय. तुम्हांला तो कसा वाटला?”
“मला
वाटतं, की तो वेडा आहे.”
“सगळेच
रिमोटिस्ट्स झुरळांसारखे आहेत...”
“माइक्रोमैजिशियन्सपण?”
“उलंट, माक्रो आहेत. पण आपण
सगळे...तोपण, आणि तुम्हींपण, आणि मी, आणि आमचे इतर भाऊ-बंध...आपण सगळे नॉनस्टेजर्स आहोत...तुम्हांला, कदाचित, माहीतंच असेल, की नॉनस्टेजर्स कोण
असतांत?...”
“कोण?”
“नाही
माहीत?... नॉनस्टेजर्सच्या
कॉन्फ्रेन्समधे आले आहांत आणि माहीत नाही? स्वतः नॉनस्टेजर आहांत आणि माहीत नाही?”
“ओह, तर मी
नॉन्स...नॉन्सेन्स...टे?...”
“नॉनस्टेजर. म्हणजे, ज्याला कमीत कमी सामानाची गरंज असते किंवा कोणत्याही सामानाची गरंज नसते –
ते नॉनस्टेजर्स असतात. मग ते माइक्रो आहेत किंवा माक्रोमैजिशियन्स आहे, हे महत्वपूर्ण नाहीये.
मेन्टलिस्ट्ससुद्धां तसेच असतात. तुम्हांलापण कोणच्या विशेष सामानाची गरज नाहीये
ना? हो, जर कवटीवाल्या
डब्ब्याबद्दल सांगायचं सोडलं तर?...”
“मला
नाही वाटंत की कवटीवाल्या डब्ब्याचीपण गरज आहे.”
“चला, ह्याबद्दल आपण आणखी
बोलूं. बिल, प्लीज़,” त्याने वेट्रेसला
बोलावलं.
“आणि
तुमच्याकडे ही बॉम्बची काय भानगड होती?” कपितोनव विचारतो.
“बॉम्ब
तर नव्हता, पण
अवैधानिक प्रकाराने कॉन्फ्रेन्समधे व्यत्यय आणायचा प्रयत्न केला होता. पण आम्हीं
हे असंच नाही सोडणार. तसं, ऑपेरानंतर डिनर आहे – न जाण्यापेक्षां उशीरा गेलेलं बरं आहे. तर, तुम्हीं दुस-या
अंकापर्यंत पोहोचून जाल. प्रोग्राम हॉटेलमधेच होतो आहे. कदाचित गाणं सुरूसुद्धां
झालंय.”
“काही
ऐकूंतर नाही येत आहे.”
“प्रोग्राम
कॉन्फ्रेन्स हॉलमधे होतोय. दुसरा मजला.”
“मला
थोडं झोपायला पाहिजे.”
“तिथेपण
डोळा लागेल.”
“बरं
होईल. आणि तुम्हीं जातांय कां?”
“नाही, मी थियेटरमधे नाही जात.
सर्कसलापण नाही जात.”
“ऑपेराचं
नाव काय आहे?”
“केलिओस्त्रो.”
“मला
अश्या कोणच्याही ऑपेराबद्दल माहीत नाहीये.”
“इन-हाउस
आहे. काँग्रेसच्या डेलिगेट्ससाठी.”
“तर, ही काँग्रेस आहे, की कॉन्फ्रेन्स?”
“काय
फरक आहे? तुमच्यासाठी
सगळं एकंच नाहीये कां?”
“हा
काय त्याच केलिओस्त्रोबद्दल आहे कां?”
“कदाचित.
आणि, तुम्हाला दुस-यांबद्दल
माहीत आहे कां? सांस्कृतिक कार्यकमाची जवाबदारी माझी नाहीये. कोणचारी विषय घेऊन बनवलांय.
तरीही – आमचांच माणूस आहे.”
येणा-या
वेट्रेसने अजून फोल्डर टेबलवर ठेवलंसुद्धां नव्हतं – ‘तलाव’ लगेच
तिच्या हातातून फोल्डर हिसकावून घेतो आणि, बिल बाहेर न काढतां, हळूच कवरखाली काहीतरी घुसवतो आणि लगेच फोल्डर परंत करतो.
इतक्या
चपळतेने स्तब्ध झालेली वेट्रेस काही क्षण तिच्यापासून तोंड फिरवणा-या ‘तलाव’समोर पुतळ्यासारखी उभी राहते – मग शुद्धीवर येऊन वळते आणि काउन्टरकडे जाते.
“ऐका
तरं,” आरशांत दूर जात
असलेल्या वेट्रेसकडे बघंत कपितोनव म्हणतो, “हे इथे इतके आरसे कां आहेत? माझ्या खोलींत नको तितके आहेत.”
“हॉटेलच्या
पार्टनर्सपैकी एक – ‘नेव्स्की मिरर्स’ कम्पनी आहे.”
“आह, तर असं आहे...पण, तरीही, मला कळंत नाहीये, की माझ्या एका वोटांत
येवढं काय आहे? की तुम्हीं सगळ्यांनाच असंच...पटवतां?”
“पटवतोय
फक्त तुम्हांला, कारण की तुम्हीं शेवटचे आहांत. बाकीच्यांना, ज्यांची गरज आहे, सगळ्यांना पटवून झालंय.”
वेट्रेस
पुन्हां फोल्डर घेऊन आली, चेह-यावर त्रासल्याचा भाव दिसतोय.
“माफ
करा,” ती ‘तलाव’ला म्हणते, जो तिच्याकडे बघतंच नाहीये, “पण ह्यांत पैसेच नाहीयेत...”
“मग
काय आहे?” तोंड
न वळवतां ‘तलाव’ विचारतो.
“कार्ड8
(इथे नकाशाशी तात्पर्य आहे – अनु.)...”
“आफ्रिकेचा?”
“नाही...”
“यूरोपचा?”
“नाही...खेळायचं
कार्ड...पत्ता...”
“इस्पीकचा?...किलवरचा?...चौकटचा?...”
“बदामाची
छक्की...” वेट्रेस पुटपुटते आणि कपितोनवला उघडलेलं फोल्डर दाखवते, कारण ‘तलाव’ आधीसारखंच दुसरीकडे बघतोय.
कपितोनवला
खरोखरंच बदामाची छक्की दिसते.
“बंद
करा,” ‘तलाव’ अनिच्छेने म्हणतो. “इकडे
द्या. हे काय आहे?”
फोल्डरला
हातांवर सांभाळंत तो, न उघडतांच त्याला टेबलावर ठेवून देतो.
“तुम्हीं
मला मूर्ख कां बनवताय,” ‘तलाव’ म्हणतो, “सगळं अगदी तस्संच आहे, जसं असायला पाहिजे.”
वेट्रेस
फोल्डर उघडते आणि त्यांत बदामाच्या छक्कीच्या ऐवजी हजार रूबल्सची नोट बघते.
कपितोनव सुद्धां, ज्याला साक्षीदार बनवलं होतं, हेंच बघतो.
“नो
चेंज,” ‘तलाव’ उठतो. “चल जाऊं या, मित्रा.”
“असं
कसं?” उत्तेजनेने
वेट्रेस विचारते.
19.55
हॉलमधे
येऊन ‘तलाव’ कपितोनोवला निरोप
द्यायची घाई नाहीं करंत. तो त्याला रिसेप्शन डेस्कपर्यंत नेतो. त्याला कळतं की
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट परंत आलेला नाहीये.
“एक
सेकण्ड,” ‘तलाव’ म्हणतो आणि टेलिफोनचं रिसीव्हर
उचलतो. “ओलेच्का, मी इथे खाली आहे, एव्गेनी गेनादेविच कपितोनवबरोबर, त्यांना झोपेची प्रॉब्लम झालेली आहे, आणि त्यांच्या भिंतीच्या पलिकडचा शेजारी – तुला माहितीये, की कोण आहे. दुसरी गोष्ट
अशी, की आपल्या आर्किटेक्टने
अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. तर, एव्गेनी गेनादेविचला आर्किटेक्टच्या खोलींत, जी त्याच्या खालच्या मजल्यावर आहे, शिफ्ट करणं शक्य आहे का?...ओह, कां...जर
आर्किटेक्ट आला, तर त्याला कसंतरी समजावून देशील...हं? हे काय इतकं कठीण आहे?...” तो नाराजीने काही अडचणींबद्दल ऐकतो, मग म्हणतो:
“पण
आपण एव्गेनी गेनादेविचला ह्या सगळ्या त्रासाच्या ऐवजांत कमींत कमी ट्रेनने नाही, पण विमानानेतर मॉस्कोला
पाठवूंच शकतो?...आणि रिज़र्व फण्ड, ओल्या?...नाही, माझं
तात्पर्य काळ्या बॉक्सशी आहे..तू बघ तर खरं...नाही डियर, आधी तू बघ, आणि मग सांग की रिकामा
आहे...हो, आत्ता, ह्याच क्षणी.”
त्याने
रिसीव्हर बाजूला केला.
“
दिलगीर आहे, की
काळ-भक्षक आणि ईवेन्ट्स-आर्किटेक्ट एकाच मजल्यावर नाही राहू शकंत. पण मला वाटतं, की तुम्हांला विमानाची
भीति नाहीं वाटंत?”
त्यांनी
हस्तांदोलन केलं. ‘तलाव’ बाहेर
निघून गेला.
20.01
रिसेप्शन डेस्कच्या वरचा
इलेक्ट्रोनिक बोर्ड 20.01 दाखवतोय. कपितोनव हे समजण्याचा प्रयत्न करतो की ‘तलाव’ला अस्वस्थ्य शेजा-याबद्दल कसं कळलं? खोलींत परंत
जाऊन ओकारीचा आवाज कपितोनवला खरोखरंच ऐकायचा नाहीये. तसा ही टाईम – बस, इंटरवल होण्यातंच आहे. आणि जर खरोखरंच इंटरवल झाला असेल तर?”
दुस-या मजल्यावर जाताना
त्याची खात्री होते की,
की त्याचा अंदाज बरोबर होता : इंटरवल आहे.
हॉलची दारं उघडी आहेत, काही
रिकामटेकडे लोक एक्वेरियमच्या मासोळ्या आणि भिंतींवर टांगलेले फोटो बघंत हॉलमधे
फिरताहेत.
जास्त विचार न करतां कपितोनव
हॉलमधे घुसतो.
कपितोनवला वाटलं होतं, की हा
तथाकथित ‘बिग’ हॉल खरंच मोठा असेल – तो
मोठा अश्यासाठीपण वाटंत होता की कॉन्फ्रेन्सचे बहुतांश डेलिगेट्स ह्या सांस्कृतिक
कार्यक्रमाला आलेले नाहीयेत.
कपितोनव शेवटच्या ओळींत
कोप-यावर बसतो,
इथून त्याला फक्त इकडे-तिकडे बसलेल्या दर्शकांचे डोकेच दिसताहेत.
चेहरे तर तो फक्त त्यांचेच बघू शकतो, जे कोप-यातल्या
दारातूंन आत येताहेत, - शिवाय, त्याने
ब्रोश्यूरमधे दिलेल्या फोटोंना पण इतकं लक्षपूर्वक बघितलं नव्हतं, की आत येत असलेल्या लोकांपैकी एखाद्याला तरी ओळखू शकेल. पण, कां : हा राहिला माइक्रोमैजिशियन अस्त्रोव, तोच,
फोटोंत ज्याच्या हास्याचा त्याच्याच धृष्ठ नजरेने बट्ट्याबोळ करून
टाकला होता. आता अस्त्रोवच्या चेह-यावर शांति आणि निडरता होती. आणि तसंही, ते हॉलमधे निर्विकार चेह-यानेच प्रवेश करतांत. एक तर उच्च कोटीच्या कलेशी
भेट चालू ठेवण्यासाठी स्वतःला तयार करंत असतात, किंवा,
आधीच्या अंकाने भाव विभोर तरी झालेले असतांत.
सगळे बसून गेले, आणि
लाइट्स बंद होतात.
स्टेजवर आहेत दोन तरुण
माणसं, ज्यांनी नक्कीच अठराव्या शतकातील पोषाक नाही घातलाय. मुलगा खुर्चीवर बसून
हॉलकडे बघतोय, आणि मुलगी त्याच्या मागे उभी राहून कात्रीचा
आवाज करतेय, हे दर्शवंत की केस कापून झालेयंत.
तिने पांढरे गोळे असलेला आखूड
निळा स्कर्ट,
फुटबॉल जर्सी घातलीय, आणि पाय – अनवाणी आहेत.
आणि मुलाने काय घातलंय, इकडे कपितोनव लक्ष नाही देत – काहीतरी
भुरा स्पोर्ट्स-शर्ट आहे.
ती म्हणते:
“काही हरकत नाही. खूपंच
छान आहे. घाबरू नको,
मी थोडं-थोडं. आता तू तसांच आहे, जसा एका
महिन्यापूर्वी होता...तर, तुला आठवतंय, जेव्हां...”
तो म्हणतो:
“जर पारिभाषिक शब्दावलीला
चिकटून राहिलं,
तर म्हणता येईल, की आज आपला ‘मधु-मास’ पूर्ण झालांय.
ती :
“वेड्यासारखं नाव आहे. आणि
काहीही पूर्ण होत नसतं...”
गळ्याला गुंडाळलेल्या
टॉवेलातून त्याला मुक्त करंत ती म्हणते:
“जा, आरशांत
बघून घे.”
तो उत्तर देतो:
“गरंज नाहीये. माझा
तुझ्यावर विश्वास आहे.”
“बाथरूममधे जा,” ती
म्हणते, “आळस नको करू, आरशांत बघून
घे.”
“जाऊन काय टपकंत असलेली छत
बघू? आज हे बघण्याचा दिवस नाहीये, की छतांतून पाणी कसं
टपकतंय...”
तरीही तो उठून एकीकडे जातो, हे
दाखवण्यासाठी की स्वतःला आरशांत बघण्यासाठी बाथरूममधे गेला आहे. येवढ्यांत मुलगी
जुन्या टेलिफोनवर नंबर फिरवते आणि प्लम्बरला बोलावते.
कोणीच गात नाही.
हे तर ऑपेरासारख
नाहीये.
“प्ल-अ--म्ब-अ-र”
तो जसा बाथरूममधून आवाज देतो. – “हा शब्द आपल्याला किती बोरिंग वाटतो, पण तू ऐक,
तो महान वाटतो, एकदम शानदार. प्ल-अ--म्ब-अ-र!”
मुलगी त्याला
म्हणते:
“कधी-कधी मला असं
वाटतं...की आपण सम्पूर्णपणे आत्मनिर्भर नाहीये...जणु आपण कोणत्यातरी अजबंच
दुनियेतले आहोंत,
ज्याची कल्पना कुणीतरी केली होती...”
कपितोनव ठरवतो, की हा
आधुनिक ऑपेरा आहे. नाटकाच्या तत्वांसहित. आता ते गायला सुरुवात करतील.
“मला ह्या
आत्मनिर्भरतेबद्दल काही माहीत नाहीये,” विचारांत मग्न होऊन नायक म्हणतो,
“पण आपण खरंच बरोब्बर प्रमाणांत कल्पना केलेले आहोंत. तू माझी
कल्पना करतेस, मी – तुझी, आपल्या दोघांची
– समज, ग्रीशा, ज्याची कल्पना केली
होती आस्याने... आपण सगळे एक दुस-याची कल्पना करतो, एकमेकांची
रचना करतो. हे नैसर्गिक आहे. आपण, स्पष्ट आहे, की आहोंत, पण महत्वाची गोष्ट ही नाहीये, की आपण कसे आहोत, तर ही आहे, की
आपण एकमेकांना कसं बघतो, एकमेकांची कशी कल्पना करतो...”
“आणि, परिणाम हा
निघतो, की तू कोण्या प्लम्बरच्या कल्पनेचा परिणाम आहे.”
आजूबाजूच्या
लोकांची प्रतिक्रिया बघण्यासाठी कपितोनव इकडे तिकडे नजर टाकतो, हे विसरून
की तो शेवटच्या ओळींत आहे.
ह्या दरम्यान
कलाकार स्टेजवर प्रेमाबद्दल बोलूं लागतात. ती विचारते:
“असं कां असतं, की
जेव्हां आपण प्रेम करतो, तेव्हां ‘एडवेन्चरस’
वाटतं?”
तो समजावतो, की ते काम,
जे त्याने केलं होतं, (म्हणजे, पहिल्या अंकात), बिल्कुल एडवेन्चर नव्हंत. ह्यावर ती
म्हणते :
“कधी कधी मी
स्वतःची बैंक-रॉबरच्या रूपांत कल्पना करते. सान्ताक्लाज़चा मास्क घालून घुसून जाते
: सगळे उभे राहा!...हा दरोडा पडतोय!...ज्याला सांगितलंय, तो
पडूनंच राहील!...कोणीही आपल्या जागेवरून हलू नका!”
मग तोपण ओरडतो, जणु
तोसुद्धा खेळांत सामील झालांय:
“हात डोक्याचा मागे!...कोणीही
हालायचं नाही!...स्विचवरून हात काढ, तुझ्या आईला, वेडी कुठली!...”
स्टेजवर कुठलही
स्विच-विच नाहीये.
जरी कपितोनवला
दर्शकांचे चेहरे दिसंत नाहीये, तरी त्याला समजतंय की ते बेचैन नाही होत आहेत.
त्यांनी पहिला अंक बघितलाय, पण कपितोनवला ह्याचा काहीच अत्ता-पत्ता
नाहीये. कदाचित ते आता गाणं पण गातील आणि केलिओस्त्रीसुद्धां प्रकट होईल.
आता स्टेजवर एक
तिसरा, मोठ्या वयाचा माणूस प्रकट होतो – स्पष्ट आहे, की तो
केलिओस्त्री नाहीये. त्याच्या हातांत चेस-बोर्ड आहे, तो
प्रत्यक्षांत विचार करतोय:
“स्ट्राँग मूव. ह्याचं
उत्तर शोधावं लागेल...”
ती:
“संगीतकार, महाशय!”
तो तिची चूक
दुरुस्त करतो:
“संगीत-निर्देशक.”
“संगीत-निर्देशक, महाशय,
मी तुमचे केस कापू का?”
पुढे होत असलेल्या
वार्तालापावरून कपितोनवला कळतं, की संगीत-निर्देशक ह्या तरुण जोडप्याच्या घरांत
राहतोय, कारण की त्याची किल्ली हरवलीय. आणि आता तो, माहीत नाही कां गार्डनकडे चालला जातो.
कपितोनव आपल्याच
ओळींत दोन जागा सरकतो आणि समोर वाकून सगळ्यांत जवळच्या दर्शकाला विचारतो:
“हा ऑपेरातर
नाहीये?”
तो उत्तर देतो:
“बैलेसुद्धां
नाहीये.”
कपितोनव
खुर्चीच्या पाठीला टेकतो. अच्छा-अच्छा.
“माझ्या मनांत
त्या सगळ्यांच्या प्रति खूप आदराची भावना असते, ज्यांच्या किल्ल्या हरवतात,”
नायिका म्हणते. “मी आपल्या वडिलांना विसरूं लागले आहे, मी सात वर्षांची होते, जेव्हां ते बुडून गेले होते.
आणि, मम्मा बरोबर माझे...ऊँ...माहीत नाही, आमच्या संबंधाना काय नाव देऊ...आदर्श. बस, आदर्श
प्रकाराचे संबंध आहेत. कधी कधी तर मला भीतिसुद्धां वाटते, की
माझ्यांत आणि तिच्यांत सगळं किती छान आहे...”
“असं कमीच
असतं...आणि किल्ल्यांचं काय?”
कपितोनव डोळे बंद
करतो, कारण की नायिका काहीतरी इतिहास सांगणार आहे, आणि
तिचा आवाज सुखद, धीर देत असल्यासारखा होता.
“मला तर, खरं
म्हणजे, ह्या जगांत असायलाच नको होतं. माझा जन्म तर
संयोगानेच झालाय. जर माझे पप्पा अगदी बरोब्बर वेळेवर भल्या लोकांसोबत वोद्का पीत
नसते आणि जर त्यांच्या किल्ल्या हरवल्या नसत्या, च्-च्,
तर अंजेलिनोच्का ह्या जगांत नसती...काही लोक नशेंत असल्यामुळे
गर्भांत येतात, पण मला नशेंत असल्यामुळे मम्माच्या गर्भांत
सुरक्षित राहू दिलं. आपल्या जन्मासाठी मी पप्पांच्या नश्याची आभारी आहे. आणि
किल्ल्या हरवल्यामुळे.”
“काय उखाण्यांत
बोलतेय...” तिचा जोडीदार म्हणतो, जणु तो कपितोनवच्याच मनांत नकळंत आलेल्या
विचाराची पुनरावृत्ति करतोय.
पुढची गोष्ट
कपितोनव डोळे मिटून ऐकतो:
“नको होते मी
त्यांना, हेच गूढ आहे. म्हणजे व्यक्तिगत रूपांत मी नाही, तर
मुलंच नको होती त्यांना...माझ्या बाबतीत सगळं नॉर्मलंच होतं...जेव्हां मी जन्मले
होते. पण तेव्हां, मम्मा क्लिनिकमधे पडलेली होती, माझ्यापासून मुक्त व्हायला. आणि पप्पाकडे घरी मित्र आले आणि त्यांने
वोद्का प्यायला सुरुवात केली. मग कोणीतरी विचारलं : तुझी अल्योना कुठे आहे,
काय कामावर गेलीये? पप्पाने सांगून टाकलं की
कोणच्या कामासाठी गेलीये. हॉस्पिटलमधे आहे – एबॉर्शन करायचंय. मित्र म्हणाले,
तिला हॉस्पिटलमधे पाठवून तू मूर्खपणा केलास, मुलं
होऊं दे, म्हणाले. तुला कशाला पाहिजे एबॉर्शन?…वेड लागलंय कां? मुलं – जीवनाचा प्रकाश असतात,
मुलं – चांगली गोष्ट आहे!...तिला लगेच घरी आण, मूर्खा!...ते म्हणाले, पठ्ठ्यांनो, उशीर झालांय, म्हणाले, गाडी तर
निघून गेली. काही उशीर-बिशीर नाही झाला, पट्ठ्या. टैक्सी घे
आणि निघून जा!...नाही, म्हणाले, उशीर
झाला, आधीच जायला हवं होतं. चला, अल्योनाच्या
तब्येतीसाठी पिऊँ या, आणि तुम्हां सगळ्यांसाठी, आणि पृथ्वीवरच्या सगळ्या प्राण्यांच्या सुखासाठी, आणि
त्यांच्यासाठी, जे समुद्रांत आहेत...आणि जे समुद्रांत
नाहीये...म्हणजे, त्यांने जेवढी वोद्का होती, तेवढी सगळी पिऊन टाकली, मित्र घरी जाऊं लागले,
तो दारावर त्यांना निरोप देऊं लागला, बरोबर
जाणार होता, पण त्याला समजलं की त्याच्याकडे किल्ल्यांच
नाहीयेत. हरवल्यांत. म्हणाला, अल्योनाकडे तिच्या
किल्ल्यांसाठी जावं लागेल, नाहीतर, किल्ल्यांशिवाय
कसं...अंकल झोरा घरी थांबले, ड्यूटीवर, आणि अंकल पेत्या आणि माझे पप्पा टैक्सी करून निघाले क्लिनिकला. क्लिनिकमधे
पोहोचले, मम्माला खाली बोलावलं, ती चक्क
क्लिनिकच्याच गाउनमधे खाली आली. काय झालं, काय भानगड आहे?
ते नशेंत होते, बहकले होते, काही नाही झालं, किल्ल्या हरवल्यांत, तुझ्या किल्ल्या दे. पण मग त्यांने नजरेनेच एकमेकाला इशारा केला : हे असतं
नशीब. ठीक आहे, प्रोग्राम बदललाय, आम्हीं
तुला घ्यायला आलोय. हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. ती जशी होती, तशीच तिला उचलून टैक्सीत टाकलं. जर, थोडा वेळ जरी
थांबले असते, तर उशीर झाला असता. बस, हीच
कहाणी आहे. तिला घरी आणलं. आणि दुस-या दिवशी माझे पप्पा क्लिनिकमधे गेले तिचं
सामान आणायला, पूर्ण शुद्धींत. आणि हो, किल्ल्या दुस-या कोटांत सापडल्या.”
“मम्माने सांगितलं,” जोडीदार
जणु कपितोनच्या मनांतलीच गोष्ट नायिकेला विचारतो.
“मला – मम्माने, आणि तिला –
अंकल झोरा आणि अंकल पेत्याने, आणि माझ्या पप्पानेपण...खोटं
नाही बोलूं दिलं. जेव्हां मी सतरा वर्षांची झाले तेव्हां तिने माझ्या जन्माचं गूढ
सांगून टाकलं. भावविह्वल होऊन. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशिवाय जीवनाची
कल्पनासुद्धां करूं शकंत नाही, पोरी. खरं म्हणजे तुला
जन्मदिवस साजरा नको करायला, तर एबॉर्शन पासून सुटकेचा दिवस
साजरा केला पाहिजे. जीव वाचण्याचा. हे केव्हां झालं होतं : एप्रिलच्या शेवटी,
वसन्त ऋतूंत. हा, बस, चमत्कारंच
आहे, की मी आहे.”
“ग्रेट.”
“मी पण हाच विचार करते, ग्रेट.”
‘हरकत नाही,
हरकत नाही, वाईट गोष्ट नाहीये’, कपितोनव विचार करतो, त्याला जाणीव होते की तो अजून
झोपला नाहीये, आणि मुश्किलीनेच झोपू शकेल, पण, तरीही, तो पूर्वीप्रमाणेच
डोळे मिटून ऐकंत राहतो.
“ऐक...चमत्काराबद्दल,” नायक
म्हणतो आणि अचानक वाढत्या उत्साहाने सांगू लागतो. “मी कधी कधी आपल्या जन्माबद्दल
विचार करतो – अंगावर जश्या मुंग्या चालू लागतात!...बापाला तरुणपणांतच चाकू खुपसला
होता, आजोबा युद्धावर होते, डोकं जखमी
झालं होतं...आणि, प्रत्येक पूर्वजाला, कदाचित,
असंच काही-काही झालेलं होतं...पण मी दुस-याच गोष्टीबद्दल, अश्या परिस्थितीबद्दल, जी जीवनाशी संबंधित
नव्हती...बस! आणि ते शंभर करोड आहेत. सगळे कोणच्यातरी लक्ष्याकडे जाताहेत. पण
लक्ष्य प्राप्त करतो, फक्त एकुलता एक!...”
“तू कशाबद्दल बोलतोयंस?”
“स्पर्म्सबद्दल.”
कपितोनवने डोळे उघडले.
नवीन काहीच नाहीये.
स्टेजवर दोन व्यक्ती आहेत. ते बोलताहेत.
तो पुढे म्हणतो:
“आणि फक्त ह्याच निश्चित
स्पर्ममुळे जन्म घेतो,
खास मी. कुणी आणखी नाही, पण फक्त मी! जर कोणी
पुढे निघाला असता, शंभर करोडमधला कुणीही, तर माझा ‘डबल’ असता, म्हणजे, माझा भाऊ, त्याच वंश
परम्परेचा...जसं जुळा – तसाच, जसा मी आहे, पण मी नाही!...”
“जर कुणी दुसरा तुझ्यापुढे
निघाला असता, आणि तू तू नसता? तुला विश्वास आहे का, की तू नाही?”
“दुसरा, एंजेलीना,
दुसरा! माझी गोष्ट ऐक. एक विशिष्ठ माणूस आपल्या स्वरूपासाठी एका
विशिष्ठ स्पर्मचा आभारी असतो. समज, गर्भधारणातर कोणत्याही
परिस्थितीत होऊनंच जाते, पण ह्या गोष्टीची संभावना कितपत आहे,
की तो गर्भ माझाच आहे – तसा नाही, जसा मी आहे,
तर फक्त मी?...खूपंच कमी संभावना
असते!...अण्डाणुबद्दल मी काहीच बोलणार नाही...ह्या उद्देश्याने, की माझा निर्माण व्हावा, फक्त माझा, जो आत्ता तुझ्यासमोर उभा राहून हातवारे करतोय, दोन
विशिष्ठ सेल्सला, सूक्ष्म...अत्यंत सूक्ष्म सेल्सचा एक
व्हावं लागतं...फक्त त्याच दोघांना, अन्य कुणाला नाही –
त्यांच्या सारख्या असलेल्या अगणित सेल्समधून!...आणि जर त्या गोष्टीवर विचार करायचा
झाला, जी तू सांगितली होती...हे सगळे जीवनाशी संबंधित ‘केसेज़’...तर काय परिणाम निघतो?...कोणची तरी अगदीच फालतू गोष्ट!...हे सगळे युद्धं, महामा-या,
एबॉर्शन्स, दुर्घटना...असफल जन्मदात्यांचे
अकाल मृत्यु – हे सगळं आपल्या विरुद्ध आहे, सगळं आपल्या
विरुद्ध आहे, माणसांच्या विरुद्ध – खरोखरंच अवतीर्ण झालेल्या
लोकांविरुद्ध!..आपण स्वतःहून कोणचाही अवतार धारण करण्यास असमर्थ आहोत!...कळतंय कां
एंजेलीनूश्का? तुला शक्य नाहीये. आणि मला सुद्धां शक्य
नाहीये.”
“पण आपण तर जन्म घेतलाय.
आणि, सगळेंच जन्म घेतात.”
“लोक जन्म घेतात, ही एक
सामान्य गोष्ट आहे, ह्यांत विचित्र असं काहीच नाही.
आश्चर्याची गोष्ट दुसरीच आहे : ती अशी की ह्या जन्म घेणा-यांत तू आहेस, मी आहे, उदाहरणार्थ, आस्या आहे,
जी ह्या वेळेस आपल्या स्कीज़ घालून पहाडावरून खाली उतरतेय, ग्रीशा आहे, ज्याच्या खुर्चीची पाठ तिने तोडली आणि
ज्याला संगीतकार बागेत फिरवतोय...एखाद्या फ्रिजसाठी खिडकीतून बाहेर उडी घेणं सोपं
आहे, माझ्या आणि तुझ्या पृथ्वीवर जन्म घेण्यापेक्षां! आपल्या
जन्म घेण्याची संभावना – अगदी शून्य आहे! हे आश्चर्य आहे, प्राकृतिक
आश्चर्य!”
“आणि आपण एक दुस-याला
भेटायचं शहाणपण दाखवलं!” ती उद्गारते.
कपितोनवचा फोन साइलेन्ट
मोडवर कसमसतोय. आता,
स्टेजवर अचानक म्यूज़िक आणि काही जगमगाट होतोय. बाहेर जाण्याचा दार
बाजूलाच आहे : कपितोनव पट्कन उठतो – आणि बाहेर लॉबीत निघून जातो.
मरीनाचा फोन आहे.
20.42
“झेनेच्का9 , नमस्कार,
डियर, फक्त हे नको म्हणू की तू पीटर10मधे
नाहीये.”
“तुला कसं कळलंय, मरीना?”
“अरे, तुझ्या
कॉन्फ्रेन्सबद्दल दिवसभर ‘बातम्यां’मधे
दाखवताहेत. तुमच्या त्या वेडपट बॉम्बमुळे...ही तुझी तर गम्मत नाहीये नं?”
“माझी? मी तर
आत्ता संध्याकाळीच आलोय, मला स्वतःलाच काही कल्पना नाहीये.
पण तुला कुणी सांगितलं की मी डेलिगेट आहे?”
“स्वतःच अंदाज़ लावला.”
“नाही, असं
शक्यंच नाहीये.”
“ओह, तुझ्याबद्दल
सांगत होते,…स्पेशलाइज़ेशनसह...म्हणाले की संख्या ओळखणारापण
आहे. मी समजून गेले की तो तूच आहेस.”
“ओळखणारे माझ्याशिवाय
इतरही आहेत. मला तर काल सकाळपर्यंत पत्ता नव्हता, की कॉन्फ्रेन्समधे जाईन.”
“म्हणजे, तुझ्याबद्दल
मला तुझ्यापेक्षा जास्त माहितीये.”
“चमत्कारंच आहे. तसं, इथे
आत्तांच चमत्काराचीच गोष्ट होत होती...ऐक, कसं चाललंय?”
“येऊन जा, स्वतःच
बघून घे. नव-यालापण भेटून घे. आत्ता तू कुठे आहेस?”
“कोणा मूर्खाला माहितीये, की मी
कुठे आहे. ऑपेरा बघतोय.”
“मारीन्स्कीत?”
“ओह, नाही,
इथेंच हॉटेलमधे...काही गेस्ट-रूम सारखी, क्लबसारखी
वस्तू आहे. बिल्कुल ऑपेरासारखं नाहीये. ते गद्यांत बोलताहेत,
आणि स्पर्म्सबद्दल...”
“कदाचित, लेक्चर
असेल?”
“नाही, मरीना,
‘शो’ आहे.”
“तसं, तू आहेस
कुठे? हॉटेलचं नाव काय आहे?”
त्याने नाव सांगितलं.
स्ट्रीटचं नावपण सांगितलं.
“ओह, तर मग
तुला इकडे येण्यांत काही त्रास नाही होणार.”
ती समजावून सांगते की कुठे
आणि कसं यायचंय.
“तू तर कदाचित फोनही नसता
केला. माझी आठवणसुद्धा नसती केली.”
“मरीना, मी सांगतो
तर आहे, की आत्ताच आलोय...”
“ठीक आहे. फक्त, काही
विकंत नको घेऊं. घरी सगळं आहे.”
कपितोनवने फोन ठेऊन दिला.
ओल्या- दुसरी (तीच) जिना
उतरतेय.
“येव्गेनी गेनादेविच, कित्ती
छान झालं की तुम्हीं इथेंच भेटलांत. तुम्हीं विमानाने मॉस्कोला जाल. टिकिट 14,51चं आहे, सोमवारी. ठीक आहे? की
तुम्हांला इथे थांबायचंय?”
“नाही, थैन्क्यू,
मंगळवारी मला कामावर जायचंय. ओल्या! तुम्हांला माहीत आहे का,
की तिथे काय दाखवतात आहे? हा तर ऑपेरा ‘केलिओस्त्री’ नाहीये?”
“बदललांय. हे नाटक आहे, “चमत्कार
आहे, की मी आहे.” हे पण जादू आणि
चमत्कारांबद्दल आहे...तुम्हांला आवडलं नाही कां?”
“थोडंच बघितलंय, मला
जायचंय.”
21.20
बाहेर जायचं दार बंद आहे, कारण की
छतावर जमलेला बर्फ खाली पाडतांत आहेत. अंगणांत निघून कपितोनव बॉइलर-रूमच्या जवळून
जातो. बर्फाचे कण स्ट्रीट-लैम्पच्या खाली पंतंग्यासारखे फिरताहेत. भुरकट मांजर
त्याच्या रस्त्यातून आडवं जातं. ह्या ठिकाणी ब-याच मांजरी असतांत, इथे त्यांना, कम्पाउण्डच्या मांजरांना, खाऊ घालतांत. भाजलेल्या सॉसेजचा, आणि न जाणे कां
कोबीचा सुगंध येतोय.
21.32
हा आहे कपितोनव, आणि तो
रूट-टैक्सींत (इथे रूट-बसशी तात्पर्य आहे – अनु) जातोय. आजकाल ह्या शहरांत
परिवहनाच्या ह्या साधनाला, जसं कपितोनवला कळलं, म्हणतात “टेश्की” – अक्षर ‘T’च्या सम्मानार्थ,
ज्याच्या पुढे रूट नंबर लिहिलेला असतो. ही गोष्ट काही घशाखाली उतरंत
नाहीये. आधी असं नव्हते म्हणंत, पण ही तेव्हांची गोष्ट आहे,
जेव्हां कपितोनव स्वतः पीटरबुर्गवासी होता.
खिडक्या थिजून गेल्या
होत्या. खिडक्यांना बघून अंदाज लावणं कठीण आहे, की हे पीटरबुर्ग आहे, पण फक्त त्याच्यासाठीच, ज्याला माहीत नाहीये की
कोणत्या शहरांत हिंडतोय.
जवळ-जवळ प्रत्येक माणूस
आपापल्या इलेक्ट्रॉनिक खेळण्यांत मग्न आहे. काही लोक ह्या खेळण्यांच्या माध्यमाने
कोणाशीतरी बोलताहेत. स्टीयरिंगवर बसलेला ड्राइवरसुद्धां (तो आपल्या भाषेंत), तेपण जे
पैसेजमधे उभे आहेत, बोलताहेत – जवळ-जवळ अर्धी बस बोलतेय,
आणि ब-याच जो-याने बोलतेय. मॉस्कोमधे पण असंच चित्र आहे.
कपितोनव मोबाइल काढतो, हे बघायला
की कोणता ‘मिस्ड-कॉल’तर नाहीये?
चार ‘स्पैम्स’ आहेत.
फर्नीचरचा प्रस्ताव आहे, फ्लैट्स विकले जाताहेत, एंटेलियाला जाण्याचं बक्षिस आहे, आणखीपण काहीतरी
आहे. माहीत नाही कां, त्याला असं वाटंत होतं, की आन्काचा मैसेज नक्कीच असेल. मुलगी गप्प आहे. ठीक आहे, आम्हींपण गप्पच राहू.
त्याच्या शेजारी, जिवंत
शेजा-याकडे लक्ष न देता, जोरजोरांत बकवास करते आहे, विचार करा, एक स्टूडेन्ट. ती कुणाला तरी जीव तोडून
सांगतेय, की त्या दोघींच्या ओळखीच्या बाईवर विश्वास नको
ठेवूं. तुमची इच्छा असो, किंवा नसो, ऐकावंच
लागेल :
“तुला वेड लागलंय कां!
तिच्यावर विश्वास ठेवण्याबद्दल विचारसुद्धां करू नकोस, ती
सगळ्यांना फसवते! तिच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नको ठेवूं. तुलासुद्धा फसवेल! ती
तशीच आहे! तुला माहीत नाहीये, आम्ही ‘शिशिर-कैम्प’मधे “सत्य” हा खेळ खेळंत होतो. थोडक्यांत...कोणीतरी तिला एक संख्या
म्हणायला सांगितली. थोडक्यांत म्हणजे, हे की किती खेळाडू
होते. माहितीये, तिने काय म्हटलं? तेरा!
हे तर विचित्रंच झालं. खुल्लमखुल्ला असं खोटं कां बोलावं? सगळे
समजून गेले की ती खूप कमी सांगतेय. नाही, कोणा-कोणासाठी हे
भयानक-भयानक आहे, मला वाटतं, पण आपण,
आपण तर तिला ओळखतो, चांगल्या प्रकारे जाणतो.
थोडक्यांत तिला कळून चुकलं, की तिच्या सांगण्यावर कोणीच
विश्वास नाही केला. तिला लाज वाटली, की इतकं खोटं कां बोलली,
की तिचं खोटेपण पकडलं गेलंय...तर, तुला काय
वाटतंय, तिने असं कां केलं असावं? तिने
आपली लबाडी कबूल केली?...असं कसं असू शकतं!...जर तिने
स्वीकार केलं असतं, तर आम्हीं, कदाचित,
तिच्या खोटेपणाला माफ केलं असतं, पण ती तर
स्वतःला खरं सिद्ध करू लागली...जणु ब-याच दिवसांपासून चर्चमधे जात असावी...म्हणजे,
लाजिरवाणं, एकदम लाजिरवाणं...विचार करूं शकतेस?
तिच्यावर विश्वास ठेवायलाच नको. फसवेल.”
कपितोनव उठतो आणि वाकडा
होऊन पैसेजकडे,
आणि पैसेजमधून दाराकडे जातो.
22.09
“येव्गेनी,” मरीना
कपितोनवची आपल्या नव-याशी ओळख़ करून देते, आणि कपितोनवशी
आपल्या नव-याची : “तोडोर”. आणि फुकटच्या शानने पुढे म्हणते : “अस्सल बेल्जियन.”
“पण पुआरो (अगाथा
क्रिस्टीने निर्माण केलेला डिटेक्टिव्ह – अनु.) नाही,” तोडोर
बोटाने आपल्या नाकाखाली मिशांची अनुपस्थिती दर्शवतो.
कपितोनवला त्याच्या
बोलण्यांत काही विशेष लकब नाही जाणवंत.
अस्सल बेल्जियन –
हृष्ट-पुष्ट,
सावळा.
स्वर्गवासी मूखिनच्या एकदम
विपरीत.
“माझी मम्मी – बल्गारियन
होती आणि पापा ब्रूसेल्सचे.”
‘नाटो’चं हेडक्वार्टर, कैबेज. लेस. बीयर.
क्षणांत संदर्भ आठवतो.
कपितोनवला आपल्या
आई-बापाबद्दल सांगायला हवं कां?
“थोडक्यांत रशियन,” मरीना
त्याचं म्हणणं पूर्ण करते.
“संक्षिप्त रशियन.” तोडोर ‘री’
ओढतो.
“तू कसा-काय संक्षिप्त
असूं शकतोस?”
“तर मग कसं? तुमच्या
लोकांपैकी कोणीतरी म्हटलं होतं : रुंद आहे रशियन माणूस, लहान
करावा लागेल.”
“मला वाटतं की तिथे होतं, ‘अरुंद’.”
“ते महत्वाचं नाहीये.”
खोलींत गप्पा चालल्या
आहेत.
“झेन्या10नेसुद्धां
ब्यूस्टेमधे काम केलेलं आहे,” मरीना नव-याला सांगते.
“ब्यूरो ऑफ
स्टेटिस्टिक्समधे,”
नवरा म्हणतो, कपितोनवला कळावं की त्याला
बायकोचं म्हणणं कळतंय.
(ब्यूस्टेमधे, मूखिनबरोबर
– हा अर्थसुद्धां निहित आहे.)
तोडोर बल्गारियन
रेड-वाईनची बाटली उघडंत (पाहुण्याने वोद्का घ्यायला नकार दिला होता) सांगायला
सुरुवात करतो की तो काय काम करतो: तो काम करतो... पण कपितोनवला कळंत नाही की हे
कोणचं क्षेत्र आहे : फूड-इण्डस्ट्री, मेडिसिन, PR? गोष्टीच्यामधे एक प्रश्न विचारून कपितोनवला कळलं की काहीही न विचारणंच
चांगल आहे : अस्सल बेल्जियन बरीच पोहोचलेली वस्तू आहे. त्याचं काम दह्याच्या एका
पेयाशी संबंधित होतं, जिचं बल्गारियाच्या डोंगराळ प्रदेशांत
परंपरागत पद्धतीने उत्पादन केलं जायचं. ह्या प्रदेशांत मागच्याच्या मागच्या
शतकांतसुद्धा खूप वर्ष जगणा-यांची संख्या बरीच होती. आपल्या काळांत मेडिसिनसाठी
नोबेल पुरस्कार प्राप्त करणा-या प्रोफेसर मेच्निकोवने ह्यांत बरांच रस दाखवला होता
– आपल्या अन्वेषण कार्याचे बरेच प्रयोग त्यांने पैरिसच्या पाश्चर इन्स्टिट्यूटमधे
केले होते, जिथे त्यांचा अस्थि-कलश सुरक्षित आहे.
“भेटीप्रीत्यर्थ,” मरीनाने
प्याला उचलला.
जेव्हां तोडोर सांगतोय, तेव्हां
ती एका कोप-याकडे बघतेय, टेबलाच्या त्या भागाकडे जिथे
स्टैण्डमधे नैपकिन्स ठेवलेयंत, आणि तिच्या चेह-यावर
ताणलेल्या उत्सुकतेशिवाय आणखी कोणचा भाव नाहीये.
तोडोरची रशियन इतकी स्पष्ट
आहे, की त्याच्या अ-रशियन होण्याचं गुपित उघड करतेय. पण, कदाचित
कपितोनव स्वतःच आपल्या तीक्ष्ण नजरेची मखलाशी करतोय.
“ योगूर्त11 (दही-अनु.)
(दुस-या स्वरावर स्वराघातासहित, जे रशियन भाषेच्या नव्या नियमानुसार आहे आणि
ऐतिहासिक दृष्टीने बरोबर आहे – ज्याचं शुद्ध उच्चारण तोडोरने आत्मसात् केलं होतं),
ज्याचं उत्पादन पश्चिमेंत होत, अगदीच योगूर्त नाहीये.
अगदी तसंच, जसं रशियामधे पश्चिमी टेक्नोलॉजी वापरून त्याला
बनवतांत. आम्हांला हे विसरून नाही चालणार, की मेच्निकोवने
दुधाच्या जीवाणु आणि त्यांच्या फायद्याबद्दल काय लिहिलंय. मेच्निकोवची रुची
नैसर्गिक मृत्युच्या समस्येमधे होती. हे तेव्हां होतं, जेव्हां
जीवनाने काठोकाठ भरलेल्या शरीरांत मृत्युची भीति कुंद होऊन जाते, आणि हे शक्य होतं व्यवस्थित आहारामुळे.”
तोडोर स्वतःच म्हणतो:
“आरोग्यासाठी.”
कपितोनवला आश्चर्य होतंय, की त्याला
हे कां कळंत नाहीये, की तोडोर खरोखरंच गंभीर आहे, की इतक्या सफाईने विडम्बन लपवतोय.
अस्सल बेल्जियनला हे
जाणण्याची उत्सुकता आहे की कपितोनवला पीटरबुर्ग आवडतंय कां?
“मी आत्तांच तर इथून
गेलोय.”
“हो. ते मला माहितीये. पण
मला हे माहीत करायचंय,
की तुम्हांला काही बदल दिसलेत का.”
“आइसिकल्स12 कपितोनवच्यावतीने
मरीना उत्तर देते.
“काय करणार, अशी थंडी
आहे!” तोडोर उद्गारतो. “तुम्हांला ‘बोर’ तर नाही वाटंत आहे? मॉस्को – सेंट पीटरबुर्ग
नाहीये.”
“टाइम नाहीये, नाहीतर
शहरांत भटकलो असतो.”
“निसरडं, निसरडं!
सगळे पाय तोडून बसतात. आत्ता तात्याना इग्नात्येव्ना आपलं ‘हिप-जॉइन्ट’ तोडून बसली!”
कपितोनव नाही विचारंत, की ही
तात्याना इग्नात्येव्ना कोण आहे. आणि मरीनापण नाही सांगत. मरीना त्याला
कॉन्फ्रेन्सबद्दल सांगायचा आग्रह करते. कपितोनव थोडक्यांत सांगतो की ज्यांत त्याला
भाग घ्यायचा आहे त्या कॉन्फ्रेन्सचा उद्देश्य, त्याच्या मते,
काय आहे, पण तो कॉपरफील्डबद्दल विचारलेल्या
तोडोरच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊं शकला – त्याला माहीत नाही की बरेंच दिवसांत
कॉपरफील्डची काही बातमी कां नाहीये.
“तर मी स्वतःच तुम्हाला सांगेन.”
तो सांगतो.
जर तोडोरच्या म्हणण्यावर
विश्वास ठेवला, तर संयुक्त राज्यांत जादूच्या करामातींचं पेटेन्ट केलं जातं, ह्या अनिवार्य अटीवर, की सात वर्षांनी त्यांच गूढ
प्रकट केलं जाईल. हर्षोल्लासाचे दिवस गेले, आणि आता
पेटेन्ट्स इंटरनेटवर ठेवलेले आहेत. तोडोरने इंग्रजींत त्यांना वाचलं आणि त्यांच
अध्ययन केलं, आता त्याला सगळं माहीत आहे.
“पण, तो उडू
कसा शकला?” मरीना विचारते. “तो खरोखरंच उडाला होता नं?”
तोडोर खूप मजबूत, पातळ
प्लास्टिकचे तार आणि विशेष प्रकाराने फिरत असलेल्या रिंग्सच्या साहाय्याने
समजावतो. कपितोनवला कॉपरफील्डच्या गूढ रहस्यांत काही रस नाहीये.
“आणि तुम्हीं, म्हणजे,
दोन अंकांची संख्या ओळखू शकता? मी एखादी
संख्या मनांत धरूं कां?”
“प्लीज़,” कपितोनव
म्हणतो.
“हो, धरली.”
“पण, फक्त दोन
अंकांची!” मरीना मधेच टपकते.
“ज़ाइन्का, मला
कळतंय.”
“त्यांत बारा जोडा,” कपितोनव
म्हणतो.
“हो,” तोडोर
उत्तर देतो.
“अकरा वजा करा.”
“हो.”
कपितोनव विचारमग्न झाला.
“एक तर माझी चूक तरी होतेय, किंवा –
दहा.”
“हो.”
“दहा?”
“हो. हो.”
“कुणी दहाचा अंक धरल्याचं
मला आठवंत नाही. दोन अंकाची सगळ्यांत लहान संख्या.”
“तोडोर ‘मिनिमलिस्ट’
(कमीत कमी स्वीकार करणारा – अनु.) आहे,”
मरीना म्हणते.
“नाही, मी ‘मिनिमलिस्ट’ नाहीये. पुन्हां धरूं कां?”
“नाही,” मरीना
म्हणते.
“कां नाही? बिल्कुल
धरू शकता,” कपितोनव परवानगी देतो.
“नाही. पुरे झालं.”
“पण कां?”
“कदाचित, दुस-यांदा
होणार नाही...”
“बकवास, नक्कीच
होईल. आणि जर नाहीसुद्धां झालं, तर काय होणारेय?”
“झेन्या,” मरीना
उत्तर देते, “माहितीये, मला
लहानपणापासूनंच जादूगार कां नाही आवडंत? ते कित्तीतरी वस्तू
वर फेकतात, त्याच्याशी माझं काही घेणं-देणं नाहीये. पण मला
ह्या गोष्टीची वाट बघणं खूप अवघड वाटतं, की केव्हां कमीत कमी
एकदातरी, कुणाच्या हातून चूक होईल.”
“ठीक आहे,” तोडोर
म्हणतो, “तुम्हीं जादुगार आहांत आणि मी डिबेटर. चला, वाद घालूं या, की जर तुम्हीं मला एक हजार रूबल्स
द्याल, तर मी तुम्हांला पाच हजार रूबल्स देईन.”
“मी आरामांत तुमच्यावर
विश्वास ठेवतोय. वाद कशाला?”
“तुम्हांला खात्री आहे का, की जर
तुम्हीं मला एक द्याल, तर मी तुम्हांला पाच हजार देईन?”
“पण तुम्हीं
स्वतःच तसं सांगितलंय?”
“आणि तुम्हीं माझ्यावर
विश्वास ठेवला?”
“पण, मी
विश्वास कां करू नये?”
“थांबा. तुम्हांला असं
म्हणायचंय का,
की मी ईडियट आहे?”
“माझ्या सोन्या, झेन्याने
असंतर नाही म्हटलंय.”
“कोणाला कोणाशी वाद
घालायचांय?” कपितोनव विचारतो, “तुम्हांला माझ्याशी, की मला तुमच्याशी?”
“तर, आपण वाद
घालतोय? मला एक द्या, आणि पाच घेऊन
घ्या.”
“कितीवर वाद घालणार?”
“तुमची इच्छा असेल, तेवढ्यावर.
एक रूबलवर.”
“झेन्या आणि तोडोर, थांबवा.”
“हे राहिले तुमच्यासाठी एक
हजार.”
“थैन्क्यू. मी
तुम्हांला पाच हजार नाही देऊ शकंत. म्हणजे, दिलगीर आहे की मी
हरलोय. तुमच्या जिंकण्याची रक्कम घ्या.” तो रूबल परंत देतो.
“हा लहान मुलांचा वाद गार्डनेरच्या
“मैथेमेटिकल गेम्स” नावाच्या पुस्तकांत दिलेला आहे, मी सातव्या वर्गांत असताना
वाचला होता.”
“म्हणजे, तरीही
तुम्हांला असं म्हणायचंय की मी ईडियट आहे.”
“माझ्या सोन्या, झेन्याने
असं नाही म्हटलं. त्याला पैसे परत दे.”
तोडोर हजार रूबल्स परंत
द्यायचा प्रयत्न करतो,
पण कपितोनवला परंत नाही घ्यायचेत.
“काही परंत-बिरंत नाही. मी
जिंकलो, आणि मी प्रामाणिकपणे रूबल कमावलाय.”
“वेडेपणा नको करू. हे
राहिले तुमचे एक हजार. उचला. ही फक्त गम्मत होती.”
“प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणाने,” कपितोनव
ताणून धरतो. “एक हजार आता तुमचे झालेंत, इथे गम्मत कसली आली?”
“हा वाद फक्त नमुन्याखातर
होता.”
“असं तर आपण ठरवलं नव्हतं.”
“जेव्हां तुम्हांला माहीत
होतं, की तुम्ही हारणार आहांत, तर वाद कशाला घालायचा?”
“पण मी तर जिंकलोय!”
“झेन्या,” मरीना
कडकपणे म्हणते, “जर तू पैसे परंत नाही घेतले तर मी रागावेन.”
“खूप छान,” एक हजार
खिशांत ठेवंत कपितोनव पुटपुटतो. “माझ्याकडून माझी विजय हिसकावली जात आहे.” तो रुबल
टेबलवर ठेवतो.
“हो,” रूबल
उचलंत तोडोर म्हणतो.
एक असहज शांतता पसरली.
“खरं सांगायचं झालं, तर मी ही
ट्रिक विसरून गेलोय,” कपितोनव म्हणतो, “बाइ- चान्स आठवली”
“ठीक आहे,” तोडोर
उत्तर देतो. “ एक ‘जोक’ चुटकुला ऐकणार
कां?”
सांगितल्यावर, लगेच म्हणाला:
“आता मला क्षमा करा.
तुम्हांला भेटून आनंद झाला. मला लवकर उठायचंय. आमच्या घरीच थांबून जा, हॉटेलची
काय गरंज आहे?”
तोडोर खोलीतून निघून जातो, कपितोनव
घड्याळीकडे बघतो.
22.55
“बस!” खुर्चीतून उठायच्या
त्याच्या प्रयत्नाला विरोध करंत मरीना म्हणते.
“तुला घाई नाहीये. रात्री
आमच्याकडे थांब. आमच्याकडे एक खोली रिकामी आहे.”
“मी त्याचा अपमान केला कां?”
“नाही. त्याला खरंच लवकर
उठावं लागत. तो भारद्वाज पक्षी आहे. हे तर आपण आहोत घुबंड.”
“तोडोर नसल्यामुळे वातावरण
जास्त शांत, मोकळं झालं.
कपितोनव रात्री थांबायला
नाही म्हणतो.
“रात्रभर फ्लैटमधे हिंडत
राहीन, भुतासारखा. कशाला?”
मरीना विचारते:
“तुला तो नाही आवडला?”
“कां नाही आवडलां? बिल्कुल
आवडला.”
“मी अगदी ठीक आहे, तू काही
विचार नको करूंस,” मरीना म्हणते.
“मी बघतोय, विचार
नाही करंत.”
“नाही, खरंच,
आमच्यांत सगळं अगदी नॉर्मल आहे,” आणि पुढे
म्हणते, “मूखिनपण ‘बोरिंग’ होता.”
“मरीन, मी
विचारलं नाही...मला आत्तापर्यंत कळलं नाही की मूखिन बद्दल शेवटी काय झालं...तपास
आणि बाकी सगळं...”
“काहीच नाही. ‘केस’
बंद करून टाकली. उत्तरांपेक्षा प्रश्नंच जास्त होते. काही दिवसांपूर्वीपर्यंत
मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव ठेवायचा विचार करंत होते. आता तसं नाही वाटंत. पण ज्या
गोष्टीवर माझा विश्वास नाहीये, ती ही आहे, की तो ‘तोच’ होता.”
“तेव्हां, अंत्य संस्काराच्या
वेळेस मी खूप निरर्थक बोलंत होतो, तू माफ करशील.”
“कोणाच्या लक्षांत
राहतंय.”
“नीनाच्या लक्षांत होतं.”
“नीनोच्का...बघतोयंस नं, आपल्यासोबत
कसं सगळं एकसारखं होतं. मी त्या वेळेस येऊंच नाही शकले, ह्या
गोष्टीसाठी तू मला माफ़ कर.”
आन्काबद्दलसुद्धां विचारलं.
“तुझ्याकडे फोटो आहे कां?”
त्याच्याकडे आहे –
मोबाइलमधे.”
“ओय, सुन्दर!
ओय, प्रिन्सेस!...मला तिची त्यावेळची आठवण आहे. हवा भरलेल्या
मगरीबरोबर. ती मला ‘मलीना आन्ती’ म्हणायची.”
“ती मगर तूच तर तिला दिली
होती...”
“ओह, हो.”
“ती ‘साउथ’मधे त्याला सोडायचीच नाही.”
“मुलांसाठी!” मरीना प्याला
उचलते.
प्याले किणकिणले.
प्यायल्यानंतर कपितोनव
म्हणतो:
“आमच्याकडे कुठेतरी
काहीतरी चांगलं नाही होत आहे.”
“आमच्याकडे...काय
बिल्कुलंच चांगलं नाहीये?”
“ओह, नाही,
माझ्यांत आणि तिच्यांत – तिच्यांत आणि माझ्यांत, तिच्याबरोबर माझे...”
“प्रॉब्लेम्स?”
“नेहमी भांडंत असतो. ती
मला, कदाचित, तानाशाह समजते. मी काहीही विचारलं तरी ते
जसं तिच्या स्वातंत्र्याचं, स्वाधीनतेचं, प्रभुसत्तेचं हनन असतं. मी तर काहीही विचारणंच सोडून दिलंय. दुस-या बाजूने
बघतां, मी कां नाही विचारू शकंत? मी,
काय – बाहेरचा माणूस आहे? ती स्वतःच तानाशाह
आहे!...तिला माझ्या प्रत्येक गोष्टीची चीड वाटते, अगदी
प्रत्येक गोष्टीची. नाही: रागाने वेडी होते. ‘मला ह्या
गोष्टीचा राग येतो!’ – असं म्हणते.”
‘ऐक,
तुझी कोणची गोष्ट तिला राग आणंत असेल?”
“अगं, प्रत्येक
गोष्ट! मी जोडे चढवायचं शूहार्न हुकला कां लटकावत नाही. मी लवकर-लवकर कां खातो. समोर
हजर असलेल्या लोकांबद्दल मी ‘तो मुलगा’ किंवा ‘ती मुलगी’ कां म्हणतो.
टी-बैग्स कां वापरतो. मी इतका तटस्थ कां असतो...प्रत्येक माणसाबद्दल, प्रत्येक वस्तूबद्दल...तिला, उदाहरणार्थ, हे आवडंत नाही की ज्या बाईशी मी तिची ओळख करविण्याचा निर्णय घेतला होता,
ती काळा चष्मा कां काढंत नाही. ती मला असं नाही सांगंत, की आवडंत नाही, पण मला तर अनुभव होतो नं, बघतो नं...जसं एखाद्या माणसाकडे काळा चष्मा न काढण्याचं काही कारण असूंच
शकंत नाही. कारणं तर असू शकतात. आणि, तिला ह्याच्याशी करायचं
काय आहे?”
“खरं आहे, तिला
ह्याच्याशी काहीही करायचं नाहीये, पण कारण काय आहे?”
“आता तूसुद्धां. कारण की
तिचे दोन्हीं डोळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, एक – गडद भुरा, दुसरा – निळा.”
“तिला हे माहीत आहे कां?”
“कसं नसणार, जर ते
तिचे डोळे आहेत?”
“नाही, मी
मुलीबद्दल विचारतेय.”
“आणि, तिला माहीत असायलांच पाहिजे कां? असल्या गोष्टी मी
समजावूं कां? तू हे ‘सीरियसली’ म्हणतेयंस का, मरीना?”
“कदाचित, समजावयाला
नको...पण तू अश्या प्रकारे सांगतो आहेस...”
“टी-बैग्स विकंत
घेतो...सांगितलं...लवकर-लवकर खातो...हो...मी वेगळ्या स्वभावाचा कां नाही झालो, झालो तर
असा...आपल्या उणीवांशी झगडंत का नाही...”
“ऐक, माझा विश्वास नाही बसंत! ती इतकी डोकं-खाऊ आहे
कां?”
“डोकं-खाऊ
तर मी आहे! परिभाषेनुसार! ती मलांच डोकं-खाऊ समजते! माहितीये, तिला माझी लाज वाटते. तिला
असं वाटतं की ती एका अपयशी माणसाची मुलगी आहे.”
“तिने
असं म्हटलं कां?”
“नाही, मला स्वतःच माहीत आहे.
मला माहितीये की ती असा विचार करते.”
“कदाचित
तू स्वतःच असा विचार करतो – स्वतःबद्दल?”
“मी
असा विचार कां करेन? मी ह्याबद्दल कधी विचारसुद्धां करंत नाही. माझी फक्त येवढीच इच्छा आहे, की तिने अपयशी न व्हावं.
पण सगळं तिकडेच जातंय.”
“कुणीकडे
जातेय? ती अठरा वर्षाची आहे.”
“एका
आठवड्यानंतर एकोणीसची होईल. नाही, मरीना. तू तिला ओळखंत नाहीस, तिने स्वतःला अयशस्वी बनवण्याचा प्रोग्राम ‘सेट’ केलेला
आहे – जीवनांत अयशस्वी व्हायचा. युनिवर्सिटी – तिला त्यांत प्रवेश मिळाला नाही –
सोडतेय, आणि
इथेपण मी हतबल आहे. जवळ-जवळ सोडलीच आहे.”
“असं
कां?”
“मला
सतावण्यासाठी. ती प्रत्येक काम मला सतावण्यासाठीच करते.”
“म्हणजे, तिच्या जीवनांत तुला
महत्वपूर्ण स्थान आहे.”
“हो
– कारण की मी तिला जगायला ‘डिस्टर्ब’ करतो.”
“तू
‘डिस्टर्ब’ नको करू.”
“पण
मी कुठे ‘डिस्टर्ब’ करतो? कोणत्या गोष्टींत?”
“मला
कसं माहीत की कोणत्या गोष्टींत? कदाचित तू तिला आपल्या ‘कंटाळवाणेपणाच्या’ कवेंत घेतलं असेल? नक्कीच, घेतलंच आहे!...तुम्हीं सगळे लोक असेच आहांत! ...तिचा काय ‘कुणी’ आहे?”
“चांगला
प्रश्न आहे. मला वाटतं की, कुणी आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे, तो लग्न झालेला आहे.”
“
‘वाटतं’, ‘माझ्या माहितीप्रमाणे’...”
“ती
मला काही सांगतंच तर नाही. बस, नुसती हसते. मी काय – विरुद्ध आहे? जगायचंतर तिला आहे. एक गोष्ट मी स्वीकार करू शकंत नाही – अनिश्चितता. तिला
माहितीये की मला अनिश्चितता सहन नाही होत, पण मुद्दाम...मला वाटतं की मुद्दामंच...”
“मला
समजलं नाही, तुम्ही
एकत्र राहताय ना? की ती वेगळी राहते?”
“वेगळ
राहण्याच्या तुलनेंत, एकत्रंच जास्त आहोत.”
“तर
वेगळे झाले असते, वाटणी केली असती. काही प्रॉब्लेम आहे?”
“काही
प्रॉब्लेम नाहीये...बस, हे होईल कसं? कुणालातरी हे करावं लागेल...”
‘स्वाभाविक आहे. आणि तो मुलगा? तो कोण आहे?”
“तो
कोण आहे? तो
ठीक आहे. जास्त वाईट गोष्ट – काहीतरी दुसरीच आहे. मला असं वाटतं, तो, सौम्य शब्दांत म्हणायचं
झालं तर तो, अर्धवट, गोंधळलेला आहे. एक न एक
दिवस अश्या बिनडोक माणसाला बायको घरातून काढूनंच टाकेल, आणि तेव्हां माझी मुलगी त्याच्याबरोबर राहू शकेल...”
“कदाचित, तू ईर्ष्या करतो?”
“प्लीज़, माफ कर.”
“म्हणजे, वडिलांच्या
दृष्टिकोणातूंन?”
“मरीना, तू काय म्हणतेस? ती तरुण आहे. ती प्रेम
करते. तिच्याकडे तिची स्वतंत्र खोली आहे. मी सहन करणा-यांपैकी आहे. मी तानाशाह
नाहीये. पण, कदाचित, माझं स्वतःचंसुद्धा काही
मत असेल. जे, प्रकट करण्याची घाई मी नाही करणार. तिलासुद्धां माहीत आहे, की मी काय विचार करतो.
आणि मग...मरीना, मला वाटतं की नीनाच्या मृत्यूसाठी ती मला जवाबदार मानते.”
“पण
तुझा तर काही दोष नाहीये.”
“पण
मला वाटतं की ती मला आपल्या मम्मीच्या, माझ्या बायकोच्या, मृत्युसाठी जवाबदार मानते...”
“तुला
तर बरंच काही वाटंत असतं! ती काय विचार करतेय, हे तुला कसं कळू शकतं?! ऐक, तू
फक्त आत्मकेंद्रित आहेस. तू तरुण बाप आहे आणि म्हाता-या खोडासारखा विचार करतोस...”
“
‘तरुण बाप’,” कपितोनव हसू लागतो.
“तर
काय, तरुण नाहीये?”
“हुँ, थैन्क्यू.”
“हरकत नाही. एक गोष्ट मला समजंत नाही, तू तर मनोवैज्ञानिक
आहेस.”
“मी, मनोवैज्ञानिक?”
“संख्या
ओळखतोस, आणि
मनोवैज्ञानिक नाहीये?”
“फक्त दोन अंकांच्या.”
“आणि
मनोवैज्ञानिक नाहीयेस?”
“हे
मनोविज्ञान नाहीये.”
“तर
काय आहे? अंकगणित?”
“काही
अंक-बिंकगणित नाहीये.”
“मग
काय आहे? टेलिपैथी?”
“माहीत
नाही काय आहे. बस, माझ्याने ते होऊन जातं. पण कसं – माहीत नाही.”
“पण, मग तुला माहीत असायला
पाहिजे, की
दुसरे लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात. आणि तुला काहीही माहीत नाहीये, तुला फक्त ‘वाटतं’. विचित्र गोष्ट आहे. मलातर असं वाटतं, की ती प्रत्येक गोष्ट, जी तुला ‘वाटते’, ती तुझीच कल्पना असते.”
“मी
पीटरला येणार नव्हतो, कॉन्फ्रेन्सचं आमंत्रण होतं माझ्याकडे, पण मी ठरवलं होतं की नाही जाणार, पण नंतर, लेव टॉल्स्टॉयसारखं – कालच्या प्रकारानंतर...निघून गेलो. दार धडाम् बंद
केलं.”
“त्याने
दार धडाम् बंद नव्हतं केलं. काल झालं काय होतं?”
“काल
आम्हीं भांडलो, मी थुंकलो आणि निघून गेलो. म्हणजे, आम्हीं भांडलो नाही. तिने, बस,
मला पाठवून दिलं.”
“कॉन्फ्रेन्सला?”
“असंच
म्हणू शकतो.”
“अभिनंदन.
मला वाटतं, की
तुम्हीं दोघं अगदी एकमेकाच्या लायकीचेच आहांत.”
“मी
तिला म्हटलं, की नीना गेल्यानंतर, ती नीनाची नक्कल करायला लागलीये. आणि, असं करायला नको – स्वर्गवासी आईची नक्कल करणं. मी असं म्हटलं, आणि तिने मला पाठवून
दिलं. माझ्या मते, हे ठीक नाहीये.”
“असं
म्हणायला नको होतं.”
“पाठवायलासुद्धा
नको होतं.”
मरीना
खांदे उचकावते.
“माझ्या
‘ह्याला’ म्हणी फेकायला खूप आवडतं. त्याने
म्हटलं असतं : प्रत्येका कॉटेजचे आपापले खुळखुळे असतांत.”
“छान, चल, कॉटेजसाठी. तुझी कित्ती
छान आहे, आणि
खुळखुळ्यांसाठी नाही पिणार.”
प्याल्यांची
किणकिण होते.
“माहीत
नाही, हे सगळं तुला कां
सांगतोय. स्वतःबद्दल मी कोणालाच सांगत नसतो. पण, नाही, आज
ट्रेनमधे शेजारीण-पैसेन्जरला सांगितलं.”
“काही
हरकत नाही – कोणालाच नाही सांगत, फक्त जुनी मैत्रीण आणि ट्रेनमधल्या शेजारिणीलाच सांगतोस.”
“तिचा
मुलगा मन्दबुद्धि आहे. तो मोठांच आहे. बरोबरंच जात होतो. तिला त्याला एडमिरैल्टीचं
लहानसं जहाज दाखवायचं होतं.”
“म्हणजे, त्या मुलालासुद्धां
सांगितलं?”
“तसं, हो. पण तो ऐकंत नव्हता.”
“आणि
तुझी मुलगी तुझ्या योग्यतेबद्दल काय म्हणते?”
“तुला
असं वाटतं का की मी फक्त आपल्या योग्यतेचंच प्रदर्शन करंत बसतो? तिला ह्याच्याशी काही
घेणं देणं नाहीये. शांतपणे बघते. मी त्यांच्यापैकी नाही, जे तिला चकित करूं
शकतात. जर मी पाण्यावरसुद्धां चालंत असतो, जसा जमिनीवर चालतो, तर हे सुद्धां तिने शांतपणेच बघितलं असतं...”
“पण, जाऊ द्या, पाण्यावरतर तू चालणार
नाहीस, तर तुझ्या पाण्यावर
चालण्याला तिने कसं बघितलं असतं – ही, पुन्हां कल्पनेचीच गोष्ट
आहे, बस.”
“हो, आत्ताच कल्पनेबद्दल नाटक
दाखवंत होते.”
“तू
म्हटलं होतं, की स्पर्म्सबद्दल.”
“मला
समजंत नाहीये, की ते कश्याबद्दल होतं. ऐक, मरीन, तुला
काय खरंच टेलिपैथींत विश्वास आहे?”
“टेलिपैथींत
कां?”
“तू
मला टेलिपैथीबद्दल विचारलं होतं.”
“माहितीये
ना, मी, तसा, पट्कन विश्वास करते. मी
प्रत्येक गोष्टीवर विश्वास करूं शकते,” मरीना उत्तर देते आणि, कपितोनव चुपचापंच राहतो, पुढे म्हणते – हळूंच: “मी कोष्ठकांवरसुद्धां विश्वास करू शकते, धनु-कोष्ठकांवर.”
“कश्यावर
विश्वास करतेस?”
“हो, बस, आपापले खुळखुळे...”
दोघंही
चूप आहेत.
“तू
काहीतरी म्हटलं, पण मला समजलं नाही.”
“बघ, मी ना तर ट्रेनमधे
पैसेंजर्सला भेटले होते, ना ही कोण्या मंदबुद्धीला, ज्यांना अत्यंत वैयक्तिक गोष्टी सांगू शकले असते. पण फक्त तुला. आणखी कुणाला
नाही सांगू शकंत. मी आत्तांपर्यंत ह्याबद्दल कोणाशीच बोललेले नाहीये. अगदी
कोण्णाशीच नाही.”
“कशाबद्दल?”
ती
प्यालातली वाइन संपवते, मिठाची बाटली टेबलावरंच इकडे तिकडे करते आणि सरळ कपितोनवच्या डोळ्यांत बघते.
“जर
मी काही चूक बोलेन, तर दुरुस्त करशील,” मरीना म्हणते. “मैथ्समधे धनु-कोष्ठकांचा उपयोग केला जातो, हो ना? म्हणजे, अशा प्रकारचे,” – बोटांनी हवेत बनवून
दाखवते. “चौकोनी-कोष्ठक नाही. त्यांचा प्रयोग लैब्नित्ज़ने13 केला होता.
मी बरोबर सांगतेय?”
“लैब्नित्ज़बद्दल
मला जास्त माहिती नाहीये. कदाचित, त्यानेपण केला असेल. कां
नाहीं.”
“त्यानेच, अगदी त्यानेच. मला
उत्सुकता वाटली. मला सांग, त्यांचा काय उपयोग आहे.”
“तुला
हे तर माहितीये की मैथ्समधे धनु-कोष्ठकांचा प्रयोग कुणी केला होता, आणि हे नाही माहीत की
कां?”
“मी
तर त्यांच्या प्रयोग नाही करंत. मला फक्त इतकंच नको सांगू की ते शाळेच्या
पाठ्यक्रमांत आहेत.”
“पण
तुला त्यांची गरज कां पडली?”
“बस, असंच.”
“असंच? जर असं आहे, तर म्हणजे...कोष्ठक, म्हणतेस...मैथ्समधे
कोष्ठकांची आवश्यकता कां असते? ज्याने की आपल्या आत काहीतरी ठेवता यावे, बंद करता यावे. आधी ठेवतात लघु-कोष्ठकांत, आणि, ते, जे लघु-कोष्ठकांत बंद
आहे, त्याला चौकोनी कोष्ठकांत
ठेवतात, आणि
ते, जे चौकोनी कोष्ठकांत
ठेवलंय, त्याला
ठेवतात धनु-कोष्ठकांत. काटेकोरपणे सांगायचं तर, कोष्ठकाचा प्रकार आत ठेवण्याची, सुरक्षिततेची पातळी दर्शवतो.”
“काय
‘सुरक्षितता’ - असा कोणता शब्द आहे कां?”
“
‘सुरक्षितता’,” कपितोनव आपलं म्हणणं
चालू ठेवतो. “धनु-कोष्ठक तिस-या पातळीची सुरक्षितता प्रकट करतात.”
“आणि
चौथी पातळी कोण दर्शवतं? आणि पाचवी? आणि सहावी?”
“त्याच्या
पुढेसुद्धां धनु-कोष्ठक लावूं शकतो, पण बहुधा तिथपर्यंत जायची गरंज नाही पडंत.”
“का
नाही पडंत?”
“अश्यासाठी
नाही पडंत. अशासाठी, की आपल्याला सुसंबद्धता
आवडते. स्पष्ट संक्षिप्तता.”
“खात्री नाही वाटंत,” मरीना म्हणते.
“कशाची?” कपितोनवला कळंत नाही.
“साधारणपणे, ते सुरक्षा करतात. मलापण
असंच वाटंत होतं, जसं तू सांगितलंस.”
“मी
काय म्हटलं? कोणाची
सुरक्षा करतांत?”
“आणि
तू फार चांगलं समजावलंस : सुरक्षितता.”
“मरीनच्का, आपण कशाबद्दल बोलतोय?”
“दोन
मिनिट थांब, प्लीज़? मी आत्ता तुझ्यासाठी काहीतरी
आणते.”
मरीना
दारामागे जाते. कपितोनव तुकड्यांनी एक चौकट बनवतो. असं वाटतंय की तिने शिडी ठेवली
आणि पोटमजल्यावर चढतेय.
23.29
“हे
कोस्त्याचे नोट्स आहे, झेन्या. हे ते आहे, जे तो मृत्युच्या काही दिवसांपूर्वी लिहीत होता. ह्यांना कुणीही पहिलेलं
नाहीये, फक्त
मला सोडून. कुणीही
वाचलेलं नाहीये, फक्त मी वाचलंय. ह्यांच्या अस्तित्वाबद्दल कुणी कल्पनाही नाही करू शकंत.
माझा नवरासुद्धा. माहीत नाही की मला डिटेक्टिवला दाखवायला पाहिजे होतं किंवा नाही, कदाचित मी चांगलंच केलं, की नाही दाखवलं, तपासांत ह्यांची काही
मदत नसती झाली, पुन्हां प्रश्न हासुद्धां आहे, की त्यांनी कुठून सुरुवात केली असती.”
हिरवी
नोट-बुक, पारदर्शी
प्लास्टिकच्या कवरमधे, अजूनपर्यंत तिच्या हातातंच आहे.
“तो
माझ्यापासून ही लपवायचा,” मरीना सांगत राहते, “तरी मी बघितलं होतं, की तो काहीतरी लिहितोय, पण माझ्या डोक्यांत सुद्धा येऊं शकंत नव्हतं की ते काय आहे. मला वाटायचं, की ऑफिसबद्दल आहे. मला
फक्त येवढं नाही कळलं, की तो हाताने कां लिहितोय, आपण सगळेच ब-याच काळापासून रेघोट्या ओढंत नसतो, तूसुद्धां तर हाताने नाही लिहीत? आणि तो बहुधा कम्प्यूटरवर बसलेला असायचा. आणि अचानक झालं – असं.”
मरीनाला
वाटतं की तो काहीतरी म्हणेल, पण कपितोनव चुपंच राहतो, म्हणून ती पुढे सांगते:
“हा
एकदम विशिष्ठ लेख आहे.”
“मैथेमैटिक्सशी
संबंधित काहीतरी?” कपितोनव विचारतो.
“हो, ह्यांत आहे, तुमच्या ब्यूस्टेबद्दल, पण फार जास्त नाही, त्याबद्दल आहे, जे तुम्हीं लोक तिथे
करायचे...खाण्यापिण्याच्या वस्तूंबद्दल, जसं, तुमच्या
त्या ... ‘मीट’च्या समोस्यांबद्दल...”
“कोणच्या
समोस्यांबद्दल?”
“मासेभरलेल्या, तुला आत्ता आठवंतसुद्धां
नाहीये. तुम्हीं लोक तिथे काहीतरी करायचे, काही कैल्कुलेशन्स, डिस्ट्रिब्यूशन्स, तुला जास्त चांगलं माहितीये. मलातर तुमच्या ह्या मैथेमेटिकल-स्टैटिस्टिक्सबद्दल
काही माहीत नाहीये...ह्यांत आहे त्या...फैक्टोरियल कॉन्ट्रास्ट्स आणि अश्याच
कोणच्यातरी वस्तूबद्दल...माहितीये, हे खूप कठीण नोट्स आहेत, पण मला तोंडपाठ आहेत.”
“म्हणजे, त्यांत कैल्कुलेशन्स
आहेत?”
“तू
काय म्हणालास?”
“त्यांत
काय फॉर्मुले आहे?’
“फॉर्मुले
कशाला? काही फॉर्मुले-बिर्मुले
नाहीयेत. फक्त शब्द आहेत. जीवनाबद्दल. पण बिल्कुल, मानवी नाहीयेत. किंवा, कदाचित, मानवी असतील, पण मूखिन सारखे नाहीयेत. तो वेगळ्याच प्रकाराचा होता, अगदी वेगळ्याच
प्रकाराचा. प्रेमळ, उत्साही, खूप बुद्धिमान. तो विद्रूप नव्हता, हो ना? मी बाह्य रंग-रूपाबद्दल सांगत नाहीये.”
कपितोनवला
गप्प राहणंच ठीक वाटतं.
“तो
कोणाचा हेवा करंत नव्हता, तुझातर हेवा नाही करायचा?”
“माझा?”
“मी
ह्याचबद्दल म्हणतेय. किंवा सगळ्यांच्या डोक्यांत असंच होत असतं? मी माझ्या नव-याबरोबर
राहते, तो चांगला आहे, पण, त्याच्या डोक्यांत
सैतानंच जाने काय चाललंय? किंवा, तुझ्या, मलातर माहीतंच नाहीये, की तुझ्या डोक्यांत काय चाललंय. जसं, तुला सगळं ‘वाटतं’. कदाचित तू शांत ‘सनकी’ आहेस, आणि मला हे माहीतंच नाहीये.
माझं फक्त स्वतःबद्दल विशेष मत असू शकतं. माझ्या डोक्यांत सगळं व्यवस्थित आहे. बस, ह्याच गोष्टीची सगळ्यांत
जास्त भीती वाटते. कदाचित मी नॉर्मल नसेन?”
“तू
अगदी नॉर्मल आहेस. आणि तुला शांत करण्यासाठी मी तुझ्यासमोर स्वीकार करतो, की माझ्या डोक्यांतपण
सगळं व्यवस्थित आहे. जर माझ्या डोक्यांत काही समस्या आहे, तर...फक्त ही, की मला झोप नाही येत...”
“मी
तुला वोलोकोर्डिन देईन, एक लहानशी बाटली, फक्त आठवण देशील.”
“ठीक
आहे, थैन्क्यू, आठवण करून देईन. आणि, तुमच्याकडे टैक्सी कशी
बोलावतांत?”
“अगदी
सोपं आहे. थोडं थांब, पण जर असं आहे, तर हे आणखीनंच वाईट आहे. जर असं आहे, जर आपण सगळे नॉर्मल आहोत, तर मग what
the hell is this? असं त्याच्याबरोबरंच कां झालं? हे काय आहे?”
“मरीनच्का, मला कळंत
नाहीये, की तू कशाबद्दल बोलतेयस?”
“तू हे वाचायला सूरुवात
करशील, त्या आधी मी तुला सांगून ठेवते. ह्या नोट्समधे बरेचसे अंतरंग वर्णन आहेत.
विशेषकरून माझ्याबद्दल, पण पानं तर फाडता येणार नाहीत?
मला लाजिरवाणं वाटतंय. हे वाचणारा तू पहिला आणि शेवटचा असशील. मला
सोडलं तर.”
“मरीना, तुझी
इच्छा आहे का, की मी हे वाचावं?”
“हो, नक्कीच,
मला खरंच असं वाटतं. जर तुला आवडत असेल तर, मी
कधीही प्रबल आवेगाचं नाटक नाही केलं, ह्या बाबतीत त्याने
गडबड केलीये. तुला ह्यासाठी सांगतेय, की तू चुकीचा निष्कर्ष
नको काढू. आवेगाची स्थिति नेहमीच असेल, असं नव्हतं, असं अजिबात नव्हतं, पण ह्यांत, सैतान घेऊन जावो, नाटक कशाला? आणि
जेव्हां मी हातांत खिळे काढायचा हातोडा घेऊन उभी होते, त्याने
मला चांगलंच घाबरवलं, आणि त्याचे ओठ, खरंच,
खूपंच थंड होते.”
“म्हणजे असं... मी ते नाही
वाचणार.”
“तू वाचशील. हॉटेलचा पत्ता
काय आहे?”
ती टैक्सी बोलावते – ‘सगळ्यांत
स्वस्त आणि वेगवान.’ “वाचशील, वाचशील...मी
बरेचदां विचार करते, की आपल्यांतील संबंध कधी बिस्त-यापर्यंत
कां नाही पोहोचले. माहीत नाही?”
“कदाचित अश्यासाठी...कारण, की कदाचित,
आपण मित्र आहोत.”
“पास! उत्तर कबूल आहे. तू
हे शेवटपर्यंत वाचशील आणि,
जर तुला वाटलं तर मला काही सांगशील. पण, फक्त,
जर वाटलं तर. कदाचित, माझ्या डोक्यापर्यंत जे
पोहोचंत नाहीये, ते तुला समजेल. कदाचित, तुला एखादी अशी गोष्ट माहीत असेल, जी मला माहीत नाहीये,
शेवटी, तुम्हीं दोघांनी बरोबर काम केलं होतं,
तुमचे कॉमन फ्रेण्ड्स आहेत. जे...थोडक्यांत,
मी तुला विनंती करते, की हे वाच. सांगून ठेवते,
की सुरुवातीला वाचणं कठीण जाईल, पण मग...मग
सोपं वाटेल. मी हे तुला मुद्दाम सांगतेय, ज्याने तू घाबरून
जाऊं नये. नाहीतर दोन-चार पानं वाचून फेकून देशील. आणि, ह्या
गोष्टीनेपण घाबरू नकोस, की हे हाताने लिहिलेलं आहे...त्याचं
अक्षर खूप छान आहे. हे बघ.”
ती नोटबुकचं मधूनंच एक पान
उघडून दाखवते,
आणि तिला हातांतून दूर न करता, आपल्या
भूतपूर्व नव-याच्या हाताने लिहिलेली दोन पानं दाखवते.
“मी कशाची वाट बघतोय? मूखिनच्या
बायकोशी – ह्या एका विचारानेसुद्धां...” कपितोनोव उजव्या पानाची सगळ्यांत वरची ओळ
वाचतो. हे तो कोणाबद्दल लिहितोय? आपल्या स्वतःबद्दल? पण आश्चर्य दुस-याच गोष्टीचं होतंय :
“मला माहीत नव्हतं की तो
सुलेखक होता.”
“जास्त तारीफपण नको करायला.”
“पण, आम्ही
सगळेतर असं लिहितो, जसे कोंबंडीच्या पंजाच्या खुणा असतात.”
“तुला असं वाटतं का, की हे
अक्षर त्याचं नाहीये?” मरीना गंभीरतेने विचारते.
कपितोनवला कळंत नाही की
काय म्हणावं.
“टैक्सी गेटवर आहे,” ऑपरेटर
सूचना देतो.
“तर, असं आहे,”
मरीना म्हणते. “आणि, आता मला वचन दे. पहिली
गोष्ट : तू ही सम्पूर्ण वाचशील. दुसरी गोष्ट: उद्या परंत करशील.”
“स्पष्टंच आहे, उद्या.
परवा तर मी परंत चाललोय.”
मरीना नोटबुकमधे स्वतःचं
विज़िटिंग कार्ड ठेवते. ते निरोप घेतात. त्यांनी दारावर एकमेकाचं चुम्बन घेतलं.
आठवड्याचा हा दिवस होता –
शनिवार, जो ह्याच क्षणाला संपंत होता : कपितोनव बाहेर निघतो, त्याच्या हातांत मूखिनच्या नोटबुकचं पाकिट आहे, आणि
अशा प्रकारे येऊन ठेपतो,
रविवार.
00.06
इथलं पीटरबुर्ग बिल्कुल
पीटरबुर्गी नाहीये,
काहीतरी एक टिपिकल वस्तू डोळ्यांत गडतेय, - कपितोनवला
ती फिल्म आवडंत नाहीये, जिला कारच्या खिडक्यांतून दाखवतांत
आहे.
टैक्सी ड्राइवरने
हवामानाबद्दल फुकंटची बडबड सुरू केली, ह्याबद्दल की रस्त्यांवर रीगेंट14
शिंपडतात आणि लोकांचा काही मान-सम्मानंच नाहीये, आणि
साधारणपणे, एक तर लोकांना मारून टाकताहेत, किंवा त्यांना महागडे औषधं घ्यायला भाग पाडताहेत, - तो पट्कन माहीत करून घेतो की पैसेन्जर मॉस्कोचा आहे, आणि लगेच सांगून टाकतो, की मॉस्कोंततर तो कोणत्याही
परिस्थितींत राहणार नाही, जरी तिथे, कदाचित,
रस्त्यांची बर्फ जास्त चांगल्या प्रकारे साफ करतांत.
आह, तर असं
आहे : पैसेन्जर – भूतपूर्व पीटर्बुर्गवासी आहे.
“तर, मग,
कंटाळवाणं तर नाही होत?”
दोन तासांपूर्वी हेच
विचारलं होतं.
कपितोनवने म्हटलं की
त्याला लहानपणापासून पीटरमधे असा बर्फ पडल्याचं आठवंत नाहीये.
“मागच्या हिवाळ्यांतसुद्धा
कमी नव्हता,”
आपल्या शहराबद्दल गर्वाचा अनुभव करंत ड्राइवर उत्तर देतो.
“मागच्या हिवाळ्यांत मी
इथे नव्हतो आलो.”
“अरे, उगीचंच.
येऊंपण शकले असता. मस्त असते हवामान. यायला पाहिजे होतं, न
येण्यांत काही अर्थ आहे? तुम्हीं येत चला.”
विचित्र गोष्ट आहे :
कपितोनवला असं वाटतं की त्याला भूतकाळांत बोलावताहेत. पण, कां नाही?
आमंत्रणतर नेहमी भविष्यकाळासाठीच असतं, हे
बरोबर आहे, पण ह्या आमंत्रणांमधे जास्त करून फक्त अलंकारिकंच
असतात, तेवढ्याच यशस्वीपणाने भूतकाळांत आमंत्रित कां करूं
नये?
ह्या दरम्यान ड्राइवर
कपितोनवला शहराच्या टैक्सी-उद्योगाच्या यशाबद्दल सांगतो. काही काळ पीटरबुर्गच्या
रस्त्यांवर जाण्यायेण्यासाठी शेयर्ड टैक्सी ‘बोम्बिल’चा
गवगवा होता (जी आपणहूनंच बोम्बलली), जिचं संचालन लोकांचे
समूह करायचे, आणि आता लोक, आधीसारखेच,
टेलिफोन करून घरी टैक्सी बोलावतांत, स्वस्त,
वेगवान आणि आरामशीर.”
“वाह, फेब्रुवारीचा
महिना सुरू झालाय, आणि तुमच्याकडे अजूनही चौकावर क्रिसमस
ट्री आहे.”
“हे नव्या वर्षाचं
नाहीये.”
“असं कसं नाहीये नव्या
वर्षाचं? अगदी पूर्ण माळांनी लगडलंय!”
ड्राइवरला कळंत नाही, की ह्याचं
काय उत्तर द्यायचं, म्हणून त्याच्या डोक्यांत जी पहिली गोष्ट
येते ती सांगून टाकतो:
“दिवसातर ‘जाम’
लागलेला असतो. फक्त रात्रीचं चालवूं शकतो.”
कपितोनवला पार्क केलेल्या
गाड्यांच्या ऐवजी बर्फाच्या मोठ्या-मोठ्या टेकड्या बघण्यांत मजा वाटतेय, पण त्याला
आणखीनही काहीतरी पहायचंय. ड्राइवर बरोबर आहे: कपितोनवला पीटरबुर्गची आठवण येत
असते. आणि, जर कार एक-दोन घंट्यासाठी – तीन घंट्यासाठी भाड्यावर
घेतली, रात्री नेवाच्या तटांवर, नेव्स्की
प्रॉस्पेक्टवर, जुन्या कोलोम्नावर...तर किती खर्च येईल?...सुमारे दोन हजार?
“दोन हजारांत तर मी एकदम
आत्ता, ह्या क्षणी, तैयार आहे,” ड्राइवर
म्हणतो.
“मी तयार नाहीये,” कपितोनव
म्हणतो.
“बरं, असं करूं
या,” ड्राइवर म्हणतो. “मी ऑपरेटरला फोन करून देईन, सांगून देईन की गाडी बिघडलीय, हे सोपं आहे.”
“नाही, थैन्क्स,
काम आहे.”
“रात्री – काम? कामतर मला
आहे. तुम्हांला काय काम आहे? नंतर नाही होणार. आज मी
नेवावरून येत होतो, तिथे बर्फ कापायचं मशीन जात होतं,
पाण्यावर वाफेची भिंत तयार झाली होती...महालांपेक्षाही उंच! काय
सुरेख होतं! आणि, ती एका ठिकाणी उभी नाही राहात, तर नेवावर तरंगतेय आणि गोल-गोल फिरतेय, पण फारचं
लवकर तरंगतेय, थोडीशी टक्कर लागली की पूर्णची पूर्ण
खाडींत!...तर? नाहीतर हे काय फिरणं झालं? तीनशे रुबल्स...खिडकीतून बघण्यासारखं काहीच नाहीये...”
“पुन्हां केव्हांतरी,” कपितोनव
म्हणतो.
वाद घालण्यासारखं काहीच
नाहीये – हा शहराचा सर्वोत्तम भाग नाहीये.
“पुन्हां केव्हांतरी – तर
तुम्हीं माझ्याशिवाय जाल.”
0.33
तिस-या मजल्यावर सगळे
झोपले नाहीयेत,
ह्याबद्दल कपितोनवला लिफ्टमधून बाहेर पडल्याबरोबर कळतं. हल्ल्याचं
स्त्रोत कॉरीडोरच्या दुस-या दाराच्या मागे आहे: सहयोगी पीत आहेत. उजवीकडे
लॉबी-कॉर्नर आहे – कपितोनव निघून गेला असता, जर डोळ्याच्या
कोप-यातूंन बंद टी.वी.च्या समोर खुर्चींत बसलेल्या एका माणसाला बघितलं नसतं. हा
झोपलाय कां? की त्यापेक्षांही वाईट काहीतरी आहे? बेहाल, चेह-यावर
वेदनेचे लक्षण, डोळे न उघडता तो म्हणतोय:
“तुम्हांला काय वाटतं की
स्वादिष्ट आहे,
पौष्टिक आहे?”
‘माझा
शेजारी आहे.,’ कपितोनवला अंदाज येतो.
“तुम्हीं कशाबद्दल बोलताय?”
“मी काळाबद्दल बोलतोय.
वर्तमान काळाबद्दल. बकवास,
बकवास, बकवास.”
तर हा आहे कपितोनवचा
शेजारी – काळ-भक्षक,
त्याने अंदाज लावला.
“कदाचित, तुम्हांला
डॉक्टरकडे जायला हवं?”
“आणि कदाचित, तुम्हांला
डॉक्टरकडे जायला हवं?”
“ओह, माफ करा.”
कपितोनव कॉरीडोरमधून
आपल्या खोलीकडे जातोय,
पण तेवढ्यांत दार उघडतं:
“मास्टर, हे
तुम्हीं आहांत? या, प्रकाशांत तुमचं
स्वागत आहे!”
आणि एक अज्ञात, घातक
शक्ति कपितोनवला तिकडे घेऊन जाते.
टेबल, खाण्या-पिण्याच्या
वस्तू, ब्रेड, फरशीवर विखुरलेले पत्ते.
हा हाइपर-पत्तेबाजांचा, हाइपर-सट्टेबाजांचा
क्लब आहे – सगळं कळलं, की कुठे फसला होता.
पलंगावर पाय वर करून एक
खूप आनन्दी मुलगी बसली आहे. कपितोनवला खूप आश्चर्य होतं – ही तीच मुलगी आहे, जिला
त्याने संध्याकाळी स्टेजवर बघितलंय.
नाही, थैन्क्स,
तो वोद्का नाही पीत. नाही, थैन्क्स, त्याला अजून काम करायचंय. हो, असंच आहे, रात्री काम करणार आहे. नाही, अंकांवर नाही, एका लेखावर. ठीक आहे, - जर इथे सगळे असेच प्रतीकवादी
आहेत, तर प्रतीकात्मकरूपाने ‘हो’.
प्रोटोकोल. आपल्या सामूहिक सफलतेसाठी आणि तब्येतीसाठी!
ते मागणी करतांत की त्याने
आपला ‘कमाल’ दाखवावा.
“तान्कावर प्रयोग करा.”
“तान् त्याच्यासाठी
कोणचातरी अंक मनांत धर,
तो दाखवेल.”
“खरंच, हो?
त्यांत काय आहे, मी धरूं शकते. आणि काय,
तो ओळखेल?”
कपितोनव जोडायला, वजा
करायला सांगतो. हे खूप सोपं आहे: तिचा अंक आहे 23.
तान्या ओरडते, ‘ब्रेव्हो’.
तिच्यावर कोणीच विश्वास नाही करंत, सगळे ओरडतांत
की ती कपितोनवसाठी खोटं बोलतेय, तिने दुसराच अंक धरला होता.
कपितोनव तिथून जायचा प्रयत्न करतो, त्याला सोडंत नाही.
तेवढ्यांत कळलं की अजूनपर्यंत सार्डीनचा15 डबा उघडलेलांच नाहीये.
तात्यानाला ड्यूटी-ऑफिसरकडे कैन-ओपनर आणायला पाठवतांत. ती पलंगाच्या एका बाजूने
उडी मारून चुपचाप चालली जाते.
कपितोनव जायचा प्रयत्न
करतो, त्याला पुन्हां थांबवून घेतात.
बो-या सैप, हाइपर-चीट,
‘सेका’16 खेळायला सांगतो.
कपितोनवला जायचंय.
“तो आपल्याला कमी लेखतो!”
“ठीक आहे, ‘फूल’17
– वन-टू-वन.”
बो-या सैप पत्त्यांची
गड्डी पिसतो,
कपितोनवला कापायला देतो, वाटतो.
“तुम्हीं ट्रम्प काय
निवडणार?”
“चौकट,” कपितोनव
म्हणतो.
गड्डीच्या खाली चौकटची
छक्की पडलेली होती.
कपितोनवच्या हातांत फक्त
ट्रम्पचेच पत्ते आहेत – चौकटच्या नहल्यापासून इक्क्यापर्यंत.
हारणंतर अशक्यंच होतं, पण त्याला
माहीत होतं की तो हारेल, नाहीतर काही अर्थच नाहीये. आणि,
आता कुणी दुसरांच ओरडतो : “खोटारडा! खोटारडा!” – आणि तो कपितोनवच्या
बाहीतून दुसरा इक्का काढतो, हापण चौकटचाच इक्का आहे, पण ह्या गड्डीतला नाही. “खरंच खोटारडा आहे!” – आणि बरेंच हात त्याच्या
दिशेने येतांत आणि कपितोनवच्या बाह्यांतून, कॉलरच्या खालून,
खिश्यातून चौकटचे इक्केच इक्के काढतांत...तो प्रतिकार करायचा
प्रयत्न करतो.
“कैण्डल स्टैण्डने मारणं
पण कमीच शिक्षा आहे त्याच्यासाठी!”
त्याला जायचंय – जाऊ नाही
देत. खेळ पूर्ण करायचा!
कपितोनव पूर्ण खेळ खेळला.
कपितोनव हारला.
एक आवाज ऐकूं येतो:
“आणि कशावर पैज लावली होती?”
आणि दुसरा शेरा मारतो:
“मोबाइल फोनवर!”
आणि तिसरा:
“अमर आत्म्यावर!”
“ठीक आहे,” कपितोनव
उठतो. “मी तुमच्या कलेचा सम्मान करतो.”
पण तेवढ्यांत एकाने मनांत
कोणचीतरी संख्या धरली – ती ओळखावी लागेल.
“दहा जोडा,” भुवया
उंचावून कपितोनव म्हणतो.
“स्वतःच जोडून घे,” संख्या
धरणारा त्याला म्हणतो.
“ठीक आहे, तर मग
माझ्याशिवायंच खेळून घ्या.”
“अरे जोडून घे नं! तुला
दुःख होतंय कां?”
चीट्स-उस्ताद संख्या धरणा-याला ओरडून सांगतात.
“बरं, बरं,
जोडले.”
“सात वजा करा.”
“मला काही दुःख नाही, वजा
केले.”
“50.”
“60.”
“चूक.”
“चूक म्हणजे काय? मी काय
खोटं बोलतोय?”
“50,” कपितोनव
गंभीरतेने पुन्हां म्हणतो.
“मी म्हटलं 60! सिद्ध करा
की 50 आहे.”
“50, आणि
बनवा-बनवी करायची काही गरंज नाहीये.”
कपितोनव जायचा प्रयत्न
करतो, आणि तो कपितोनवची कॉलर धरण्याचा प्रयत्न करतोय.
कपितोनव त्याच्या हातांवर
मारू लागतो. कपितोनव रागांत आला. कन्स्ट्रक्शन-ब्रिगेडमधे त्याचं टोपणनाव होतं
साइको-मैथेमेटिशियन.
तो टेबलापासून दूर उसळला, खुर्ची
उचलली, खुर्ची फिरवूं लागला – गंभीरतेने आपला उद्देश्य
प्रदर्शित करू लागला.
“तर?”
हात तर लावून बघा!
तो हल्ल्याचं उत्तर
द्यायला तयार आहे. फक्त जेव्हां रक्त बघतो, तेव्हांच सहन करूं शकंत नाही –
अंधारी येते. हाइपर-चीट्स “शांति! शांति!” ओरडतात, - त्यालासुद्धां
शांत करायचा प्रयत्न करतात आणि कपितोनवलासुद्धा.
“खबरदार, काच
फोडशील!”
“इथून निघून जा, तुम्हीं
आमच्या परंपरेचे नाही!”
तो मूखिनच्या नोटबुकचं
पाकिट उचलतो,
जे जमिनीवर पडलं होतं, आणि बाहेर निघून जातो.
त्याच्या आंत सगळंच खदबदतंय, आणि हात जणु खुर्चीचा पाय मुरगळतोय.
कॉरीडोरमधे तात्यानावर
आदळतो, जी कैन-ओपनर घेऊन येत आहे.
“तुम्हीं तर एक्ट्रेस
आहांत! तुम्हीं चमत्काराबद्द्ल सांगत होता! तुम्हीं इथे कश्या? पळा,
पळून जा!...”
“मी? एक्ट्रेस?
काय, पापाजी, रंगांत आले
कां? झाकण सरकलंय का?”
खरंच चूक झाली होती. आणखी
कुणी समजला होता – सुरुवातीलाच. स्टेजवर कुणी दुसरी होती.
पण संख्या त्याने अगदी
बरोबर ओळखली होती. ह्यांत काही शंकाच नाहीये.
01.08
शॉवर. टॉयलेट. झोप नाही
येणार. तो वाचंत बसेल.
01.20
लोळला. नोटबुक उघडली.
पहिला पैरेग्राफ.
01.21
आणि पुन्हां –
सुरुवातीपासून. कारण की समजायला कठीण आहे.
01.22
आणि पुन्हां – कारण की
खरोखरंच कठीण आहे:
{{{ हा
तिसरा आठवडा आहे, जेव्हांपासून मी - - : कन्स्तान्तीन
अन्द्रेयेविच मूखिन आहे, वय एकोणचाळीस वर्ष, कोणच्यातरी वस्तूंचा स्पेशलिस्ट, लग्न झालेलं आहे,
मनमिळाऊ, आवडतं खाद्य पदार्थ - - : फ्राइड
वेजिटेबल कबाब; एक्स्ट्रा वजन 8 किलोग्राम, अपरिहार्य प्रश्न - - : तर मग मूखिनचं काय? त्याला
माहीत आहे कां, की मूखिन तो नाही, परंतु
मी आहे? उत्तर नकारार्थी आहे - - : नाही. मूखिनला माहीत
नाहीये आणि तो माहीत होण्यास अयोग्य आहे, जसा न माहीत
होण्यासपण अयोग्य आहे, आपल्या स्वतःच्या अनुपस्थितीमुळे,
मी झाल्यामुळे. जेव्हां मूखिनच्या जागेवर मी आहे, तेव्हां तो नाहीये. मूखिन तेव्हांच मूखिन होईल, जेव्हां
मी मूखिन होणं बंद करेन. आशा आहे, की कधीतरी मूखिन होणं
समाप्त करेन, कारण मूखिन होणं भाग्याचा खेळ आहे. - - :
प्रश्न - - : मी मूखिन होणं केव्हां थांबवेन? - - : उत्तर
नाही देणार; ते माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. }}}
कपितोनव इलेक्ट्रिक केटल
चालू करतो. बाथरूममधे जाऊन पुन्हां एकदा तोंड धुतो – आधीच्या शॉवर व्यतिरिक्त.
कपितोनव शांत आहे. तो
स्वस्थ्य आहे आणि पूर्णपणे शुद्धीवर आहे. तो नोट्सला ग्रहण करण्याच्या आणि त्यांची
मीमांसा करण्यासाठी तैयार आहे.
01.28
{{{आधीचं ‘नोट’ चाचणीसाठी लिहिलं होतं. मला धनु-कोष्ठकांची
विश्वसनीयता तपासायची होती. चाचणी यशस्वी झाली. कोणतीही संदेहास्पदवस्तू आढळली
नाही. दोन तासांच्या ‘मैन्टेनेन्स-ब्रेक’नंतर पुन्हां लिहिणं चालू करतो.
सध्यां मला, ठळकपणे,
जे झालेलं आहे, आणि जे होतं आहे, त्याचा सार प्रस्तुत करायचा आहे. सोपी गोष्ट नाहीये. पण असं कुणी म्हटलं
होतं, की सोपं असेल? प्रयत्न करीन. जर
जमलं, तर पुढे अगदी सोपं होईल; माझा
ह्यावर विश्वास आहे.
तर गोष्ट अशी आहे.
बुधवारी मी स्वतःला मूखिन
अनुभवंत होतो,
पण गुरुवारी वाटलं, की हा माझा भास होता. हे प्रतिस्थापन
तर फार पूर्वीच झालेलं होतं. पण केव्हां? जसं की आज, लक्षणं आठवतांना, मला समजलं, की
प्रतिस्थापन मागच्याच्या मागच्या आठवड्यांत झालं होतं, आणि
जर आजपासून उलट मोजणं सुरूं केलं तर - - : अठरा दिवसांपूर्वी, त्या दिवसाला धरलं तर. विचित्र गोष्ट ही आहे, की
ह्या गुरुवारपर्यंत मी खरंच स्वतःला, मूखिन सारखा, खरा मूखिन समजंत होतो, जणु प्रतिस्थापन झालेलंच
नव्हतं. हा मध्यंतरीचा काळ जरा जास्तंच लांबला, पण आता सगळं
मागे राहिलंय.
पुन्हां एकदा ‘पॉइन्ट्स’
प्रमाणे.
1. अडीच आठवड्यांपूर्वी
प्रतिस्थापन झालं. बाह्य नियंत्रक शक्तीच्या माध्यमाने ‘ऑब्जेक्ट’
मूखिनचं मूखिन होणं थांबलं, आणि तो ‘सब्जेक्ट’ ‘मी’ झाला, ज्याला तोपर्यंत समजंत नव्हतं, की मी मूखिन नाहीये,
आणि त्याच मूखिन द्वारे स्वतःला प्रतिस्थापित करून बसलो आहे. रूपांतरणाची
प्रक्रिया पंधरा दिवस चालली, ह्या गुरुवारपर्यंत, आणि ह्या पंधरा दिवसांत, सगळ्यांत महत्वपूर्ण राहून,
तसा अनेक स्तरांच्या स्कैनिंग सिस्टमचा निष्क्रिय अवयव असूनही,
मी नकळतंच रिवर्स ट्रेंचिंगचा उद्देश्य पूर्ण करंत राहिलो.
2. गुरुवारी मला ह्या
गोष्टीचा अर्थ कळला,
की मागच्याच्या मागच्या आठवड्यांत काय झालं होतं - - : मला कळंल,
की वास्तवांत मी कोण आहे. जास्त बरोबर होईल हे सांगणं, मी ह्या गोष्टीला जास्त चांगल्या प्रकारे समजून चुकलो की सगळ्यांत आधी मी
कोण नाहीये - - : सैद्धांतिक रूपाने मूखिन नाहीये. उत्तर देणं कठिण वाटतंय,
या तर ते सगळ्यांच्या हितासाठी असो, किंवा
माझ्या स्वतःसाठी हानिकारक असो, मी हेच समजलो आहे. मला मान्य
आहे, की प्रोजेक्टच्या उद्देश्यांच्या दृष्टीने, ज्यांना मीसुद्धां ब-याच प्रमाणांत समजलेलो नाहीये, मूखिनहून
भिन्न ‘सब्जेक्ट’च्या रूपांत स्वतःबद्दल
माझे अनुमान, न केवळ काही शक्यतांचा आविष्कार करतील, तर ते कोणाच्यातरी समस्यांनीपण ग्रस्त आहेत, आणि खरं
सांगायचं तर माझ्या स्वतःच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. काहीही असो, मला विश्वास आहे - - : माझ्या द्वारे, ज्याने
मूखिनला प्रतिस्थापित केलेलं आहे, स्वतःला मूखिनहून भिन्न
समजणं, माझ्या स्वतःच्या प्राकृतिक विकासाचं कृत्य नाहीये,
तर ते नियंत्रक शक्तीद्वारा माझ्यावर करण्यांत आलंय.
3. त्याच
क्षणी मला सामान्य उद्देश्याच्या जवळ-जवळ सम्पूर्ण आकाराची कल्पना देण्यांत आली
आणि सगळ्या संभावित क्षेत्रांच्या सदस्याच्या जवाबदारीची जाणीव करून देण्यांत आली.
गोष्ट चाललीये आकाराची, न की खुद्द उद्देश्याची, ज्याचं सार जाणण्याची, स्पष्ट आहे, मला परवानगी नाहीये. त्याचबरोबर मला काही प्रमुख अवधारणा समजून घेण्याचं
काम दिलं गेलं, ज्यांच्याशिवाय मी ह्याचा अर्थ समजूंच शकलो नसतो;
ह्या अवधारणा आहेत - - : प्रोजेक्ट, नियंत्रक
शक्ति, रिवर्स ट्रेन्चिंग, स्कैनिंग
सिस्टम, संशोधक. त्याचबरोबर मला प्रतिबंधांची, सीमांची, परवानग्यांची कल्पना देण्यांत आली.
सगळ्यांत आधी मला माझ्याद्वारे अवगत झालेला हा अर्थ लपवावा लागेल आणि कोणत्याही
परिस्थितींत हे प्रकट होऊं द्यायचं नाहीये, की मी मूखिन
नाहीये - - : ना तर मौखिक रूपांत, ना लिखित रूपांत. मला
जाणीव आहे की मी ह्या प्रतिबंधांच उल्लंघन करतोय - - : आत्ता, स्वतःला तो सार प्रदर्शित करण्याची अनुमति देऊन, जो
मला सुद्धा पूर्णपणे समजलेला नाहीये.
4. आत्ता, वर
निर्दिष्ट केलेलं समजण्याच्या तिस-या दिवशी, मी, स्वतःला तो सार प्रकट करण्याची अनुमति देऊन, जो
मलासुद्धा पूर्णपणे कळलेला नाहीये, प्रतिबंधाचं उल्लंघन करतो
आहे. मी प्रतिबंधाचं उल्लंघन करतोय, हे आपलाच विनीत पाठक
असल्यामुळे मला स्पष्टपणे कळलेलं आहे. पण मी न घाबरतां प्रतिबंधाचं उल्लंघन करतो
आहे, निःसंकोचपणे, बेधडकपणे, कारण की मला त्या क्षेत्राबद्दल समजलंय, जे
कोणत्याही नियंत्रक शक्तीच्या अधीन नाहीये आणि जे संशोधकाच्या नजरेपासून सुद्धां मुक्त
आहे. हा आहे माझा आविष्कार - - : तिहेरी धनु-कोष्ठकांचा ऑपरेटर - - : {{{-
- - - - }}}. अविश्वसनीय वाटतंय, पण हे असंच
आहे - - : जर मजकूर तिहेरी धनु-कोष्ठकांच्यामधे ठेवला, तर
नियंत्रक शक्तिला कळणारसुद्धां नाही! सोपं आणि कल्पक! मी जवळ-जवळ भाग्यशाली आहे.
हे नाही सांगणार की मला नियंत्रक शक्तीच्या ह्या अंधा-या कोप-याचा पत्ता कसा लागला;
अनेक महान आविष्कारांप्रमाणे, माझा
आविष्कारसुद्धां संयोगानेच (Incidental Case) प्रतीत झालेला वाटतो. मी पुनरुक्तिचा प्रयोगतर
नाही केला - - : “Incidental Case”? तसं म्हटलं तर,
‘केस’म्हणजेच घटना (Incident) असते ना? पण मी
पुनरुक्तिला नाही घाबरंत. भलेही काहीही घटित झालं असलं, तरी
एक घटना जरूर उत्पन्न होत असते. घटनेची नियतीच आहे घटित होणं, म्हणूनंच ती घटना आहे! ‘केस’ प्रतीत
होत असते - - : ‘केस’ प्रतीत होते - -
: विश्वसनीयतेसकट, न की आवश्यकतेसहित. ‘केस’ आणि घटनेंत अंतर हे आहे - - : घटना प्रतीत नसते
होत, पण ‘केस’ घटित
होऊं शकते. ‘केस’ जास्त गतिमान आणि
लवचिक असते. म्हणून मी ह्या गोष्टीशी सहमत आहे, की ह्याला ‘केस’ म्हणूं, वाद नाही घालणार,
वरून वादपण स्वतःशीच. ‘केस’ घटित झाली. धनु-कोष्ठक - - : संयोगवश! - - : विस्मयकारक गुण असलेले. मी
अदृश्य व्हायचा उपाय शोधून काढला - - : लिखाणांत. ह्या आविष्काराने मला काही
प्राप्त होईल कां? हो, पण थोडंसं.
मुक्ततेचं स्तर, पण तरीही - - : मला! आणखी कुणाला नाही,
तर मला. मूखिनला नाही - - : मला! मी समजण्याचा प्रयत्न करूं शकतो,
की मी कोण आहे, कां मी मूखिन नाहीये, आणि कां नेमकं मूखिनला मी मागच्याच्या मागच्या आठवड्यांत प्रतिस्थापित
केलं, आणि काय प्रतिस्थापनाच्या भविष्याबद्दल माझे अंदाज
विश्वसनीय आहेत, ज्यांच्याबद्दल इतक्यांत सांगायची माझी
जरासुद्धां इच्छा नाहीये - - : शब्दांशी खेळण्याची माझी जबरदस्त आणि आनन्ददायक
योग्यता असूनही, जी, मला वाटतं,
की समजायला अगदी सोपी आहे (ओह, ती मला फार,
फार कळते, तसं, स्वतःला
कसा नाही समजणार?). आता, तीन
धनु-कोष्ठकांच्या आत, मी काहीही लिहिलं तर त्यांत कोणी
संशोधन नाही करू शकणार. मी अदृश्य आहे. माझा उल्हासोन्माद बाह्य शक्तींना अप्राप्य
आहे, त्यांनी आपल्या काळांत माझ्या डोक्यांत कितीही शाखा
उघडल्या असल्या तरीही! पण आपल्या आविष्काराचा दुरुपयोग मी नाही करणार. खरं तर
त्याने काहीही बदलणार नाही. मी विश्वासघाती नाहीये, मी
देशद्रोही नाहीये; मी एका विशिष्ठ उद्देश्याला समर्पित आहे,
मग मला हेसुद्धां माहीत नसलं तरी चालेल की कोणत्या उद्देश्याला.
बस - - :... धनु-कोष्ठक, तिहेरी -
- :... किती छान आहे हे! - - : ... विशेष गोष्ट - - : त्यांना बंद करायला विसरायचं
नाही - - :...कल्पना करतानापण भीति वाटते, की जर विसरलो तर -
- : ... सगळंच संपेल! सुरुवातीसाठी पुष्कळ आहे. मी बंद करतो.}}}
01.33
कपितोनव चहा बनवतो (कप, उकळलेलं
पाणी आणि पैकेट). तो खात्री करून घेतो की दाराचं कुलूप बंद केलंय. कप स्टूलवर
ठेवून बिस्त-यावर पडतो आणि बेड-लैम्प ठीक करतो.
01.36
{{{धनु-कोष्ठक
बंद केल्यानंतर चोवीस तास झाले आहेत - - : कोणताही प्रतिबंध नाहीये! - - : मस्त! -
- : पुन्हां उघडतो! - - : उघडले!
आता तपशील. धनुषावृत
मजकूराच्या क्रमांक 2पासून सुरू करतो (खूप सांकेतिक शब्द आहे, अपेक्षा
करतो की पुढेसुद्धां ह्याचा उपयोग करेन).
ह्या गुरुवारी मला ज्याची
परवानगी दिली होती,
त्याच्या विश्लेषणाने सुरू करतो. इथे तात्पर्य आहे, माझ्या परिस्थितीचं माझ्या द्वारे केलेल्या विश्लेषणाशी.
परिस्थिती अशी
आहे.
पाऊस पडंत होता. मनांत
काहीही शंका न आणता,
की मी मूखिन आहे, मी काळी इंग्रजी छत्री घेऊन
मूखिनच्या धिम्या चालीने घरी चाललो होतो. मूखिनच्या सवयीनुसार मी आकाशांत होतो,
प्रत्येका गोष्टीबद्दल विचार करंत होतो - - : परक्यांच्या
गोष्टींबद्दल, पण फक्त बाह्य प्रतिक्रियांच्या
स्त्रोतांबद्दल विचार नव्हतो करंत, ज्यांच्या अस्तित्वामुळे
स्वतःच्या विचारांना उत्तेजित करायचं माझ्याकडे येवढही कारण नव्हतं. हे पण जोडतो -
- : स्वच्छ, मूखिनसारख्या स्पष्ट, शुद्ध
विचारांना.
तर, त्यावेळेस
जी गोष्ट मला त्रास देत होती, तिचं वर्णन मी
प्रोटोकोलसारख्या सटीकतेने करू शकतो. सगळ्यांत आधी, एका
वैताग आणणा-या जडत्वामुळे मी आपल्या मेहनती डोक्याला कामाशी संबंधित विचारांनी
त्रस्त करून बसलो, आणि तेपण तेव्हां, जेव्हां
मी कामावरून घरी परंत येत होतो. त्याला डोक्यातूंन पूर्णपणे काढून टाकणं जास्त
चांगल झालं असतं. उपभोक्त्यांच्या प्राथमिकतांशी संबंधित
सैद्धांतिक प्रश्न स्वतःत मजेदार आहे, पण प्रत्येक गोष्टीची
एक वेळ असते, वरून दुनियादारीच्या दृष्टीने तो माझ्यासाठी
जरूरी नव्हता, कारण की त्या उदास दिवसांत मला जीवनाच्या
आवश्यक साधनांपासून वंचित केलेलं होतं (आपणहूनंच स्वतःला वंचित केलं होतं).
स्वाभाविकपणे माझे विचार देशवासियांच्या हिताकडे वळले, जशी
शासनाला कल्पना करायला हवी. म्हणजे, मी कल्पना करंत होतो की
कल्पना कशी असली पाहिजे. शासन प्रमुखाद्वारा भ्रष्टाचाराविरुद्ध घोषित केलेल्या
युद्धाकडे माझं लक्ष नव्हतं जात, मला दुसरंच काहीतरी त्रास
देत होतं - - : प्रेसिडेन्टने जुगार-व्यवसाय सुव्यवस्थित करण्यासंबंधी दिलेलं वचन,
जे माझ्या घरापासून शंभर पावलांवर असलेल्या ‘तुमचं
सुख’ ह्या मनोरंजन केंद्राला बंद करण्याचं धोक्याचं सिग्नल
होतं - - : हे नुकसान सहन करण्याची ताकत माझ्याकडे आहे कां?
शिवाय मी त्या हिरव्या
पावडरबद्दलपण विचार करंत होतो, जी मला आज माझ्या ब्रीफकेसमधे सापडली होती.
माझ्याकडे एक मोठी, जुनी ब्रीफकेस आहे, जिचा मी गरजेसाठी नाही, तर स्टाइलसाठी उपयोग करतो,
म्हणून सावधपणाने तिचा उपयोग करण्यांत काही वांधा नाहीये. तर,
आज आपल्या ब्रीफकेसमधून मैच-टेबल्स काढताना मी बघितलं की त्यांच्या
किनारींवर किंचित हिरवा रंग लागलाय. ब्रीफकेसच्या तळाशी एक अज्ञात प्रकाराची पावडर
होती. मी तिला अंगणांत, घाण पाण्याच्या टाकींत झटकून टाकलं,
जी आमच्या ऑफिसच्या प्रवेशद्वारापासून थोडींच दूर आहे. एक आवारा
हपापलेल्या नजरेने माझ्याकडे बघंत होता. कदाचित विचार करंत असावा की जर मी जुनी
ब्रीफकेस फेकून दिली तर - - :
हाच सगळा विचार करंत होतो
मी, कामावरून घरी परंत येताना, सगळं काही स्पष्टपणे
समजण्याच्या तासभर आधी.
जिना चढून वर गेलो, घण्टी
वाजवली; बायकोने दार उघडलं आणि एकही शब्द न बोलता टी.वी.
बघायला खोलींत धावली. माझ्या स्लिप्पर्सवर, जर समोरून
कोणत्या तिस-या डोळ्याने बघितलं तर, मोट्ठं अक्षर W आहे, माहीत नाही निर्मात्याला ह्यांतून काय प्रकट
करायचं होतं - - : सान्ताक्लाज़ला फार मजेदार आणि ज्ञानवर्धक वाटलं असतं, की ह्या स्लिप्पर्सवर मी ते नाही बघणार, जे इतर लोक
बघतात - - : माझं अक्षर M, उलंट दोन अक्षरं. मी ओली छतरी
उघडून, वाळण्यासाठी प्रवेशकक्षांत ठेवली. जर मला टी.वी.मुळे
बायकोचा हेवा वाटला असता, तर फारंच हास्यास्पद वाटलं असतं,
पण तरीही, कामावरून आलेला नवरा, माझ्या मते, थोडंसं लक्ष द्यायच्या लायकीचा तर
असतोच. आमचं किचन बरंच मोठं आहे आणि त्यांत प्रकाशपण भरपूर असतो, कुंडीत एलोवेरा लागलाय, हो, हे
स्वीकार करावं लागेल, की पाणी टपकण्याच्या डागांमुळे छत खूप
ओंगळवाणी झालीये. गैसच्या शेगडीवर एका भांड्यांत मला सॉसेज दिसलं, बघावं लागेल, गार आहे. डिनरसारखं तर ते कुठूनही
वाटंत नव्हतं, तरीही गैसपासून न हलता मी त्याचे तीन तुकडे
खाऊन टाकले - - : भूक शांत करायला नव्हे, तर माझ्या हुशार बायकोला
टोमणा देत, जी नव-याशी बोलण्याच्या ऐवजी टी.वी.ला जास्त
महत्व देत होती. माझे हाव-भाव जरी दुर्लक्षित राहिले; नाही,
त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं, पण त्यांच
विश्लेषण माझ्याप्रमाणे नाही केलं गेलं. भांड्यावर झाकण आदळल्याचा आवाज ऐकून बायको
ओरडली - - :
“कदाचित, घरी
येताना तू काहीतरी आणलं आहेस? कदाचित, तू
कमीत कमी समोसे तरी आणले असशील?”
हे बायकोचे वाग्बाण होते.
तिला चांगलंच माहीत होतं - - : मी काहीही आणलेलं नाहीये, कारण की
आणूंच नव्हतो शकंत.
जेव्हां मी बायकोबद्दल
बोलतोय, तर माझं तात्पर्य, स्वाभाविकपणे, मूखिनच्या बायकोशी आहे; आशा आहे, की पुढे हे स्पष्ट करायची गरज नाही पडणार.
मी चूप राहिलो; खोलीत
गेलो; टी.वी.बॉक्सवर सीरियल येत होतं.
मला टी.वी.बॉक्समधे काहीतरी शंकास्पद जाणवलं. थोडा वेळ विचार करून, मी, चकित होऊन, उद्गारलो - - :
“ह्यालातर मारून टाकलं
होतं!”
“कोणीच त्याला मारल
नाहीये” (माझ्या बायकोने उत्तर दिलं).
“मला काय, दिसंत
नाही? काही एपिसोड्स आधी मारून टाकलं होतं!”
“तू सीरियल्स बघंत नाहीस, मूर्खासारखा
बोलू नकोस” (बायको म्हणाली).
मला बेचैनी वाटू लागली - -
: काहीतरी गडबड आहे.
“पुन्हां जिवन्त झाला कां?”
“हा दुसरा आहे.”
“कोणी दुसरा-बिसरा नाहीये, मला नक्की
आठवतं, तोच आहे!”
हा दुसरा आहे, एकंच
एक्टर ह्याचा ‘रोल’ करतोय!”
बरोबर तर आहे - - : हा
खरंच ‘तो’ नव्हता, ज्याला मी मागच्या
आठवड्यांत स्क्रीनवर बघितलं होतं, त्यालातर मारून टाकलं होतं,
तेपण माझ्याच डोळ्यांसमोर, आणि हा - - : दुसरा
आहे, जरी एक्टर एकंच असला तरी. एकंच एक्टर, जणु काही झालंच नव्हतं, दुस-याला प्रदर्शित करतोय,
जसं की असंच असायला पाहिजे; मला धक्कांच बसला.
“त्यांच्याकडे काय एक्टर्स
नाहीत?”
मी हा प्रश्न पुन्हां
विचारला असता,
पण बायकोचा मान ठेवंत चुपचाप तिच्या शांततेशी सहमत झालो - - : चला,
माझ्या प्रश्नाला अत्युक्ति समजूं या, ज्याला
उत्तराची अपेक्षा नसते.
तेव्हां, जेव्हां
बायको शांततेचा खेळ आणखी काही वेळ चालू ठेवणार होती, अप्रत्याशितपणे
माझ्या तोंडून निघालं - - :
“बॉक्स खरोखरंच
ईडियट्ससाठीच आहे!”
“बॉक्स ईडियट्ससाठी आहे? (क्षणभरांत
बायको रागाने लाल झाली). ब्रेव्हो, कोस्त्या, सुपर! एका हाताचा दरोडेखोर18 – हा बॉक्स ईडियट्ससाठी नाहीये, हा बॉक्स
विद्वानांसाठी आहे!”
तिला टोमणा मारायचा मौकाच
मिळाला - - : एका हाताचा डाकू; कालंच तर मी हरलो होतो.
हार कबूल करावीच लागली - -
:
“माफ़ कर. माझा अर्थ होता -
- : ईडियट्स बॉक्सच्या आंत आहेत, बाहेर नाही. मला तुझा अपमान करायचा नव्हता. एक
हुशार, सुरेख बाई ईडियट्सकडे टक लावून बघते आहे.”
आणि मी खोलीतून निघून गेलो, जेपण
सापडेल तेच खायला - - : आता पोट भरून खाईन.
“आपलं तोंड बघून घे!”
(मागून आवाज ऐकू आला).
मी फ्रिज उघडलं. आणि मला
माशीची19 आठवण आली. ही
राहिली. माशी - - : दाराच्या आंतल्या बाजूला, अण्ड्यांच्या शेल्फच्या वरती.
आमच्या फ्रिजमधे माशी राहते. काही दिवसांपासून; कदाचित
कालपासून. काल संध्याकाळी मी पहिल्यांदा तिला बघितलं होतं. काल संध्याकाळी मी
फ्रिज उघडलं आणि पाहिलं की कशी एक पेंगुळलेली माशी त्याच्या आंत उडते आहे. ती उडून
बाहेर नाही आली, तसं मी बराच वेळ फ्रिज उघडं ठेवलं होतं,
आणि मी तिला हाकललं नाही. आज ती बेशुद्धावस्थेत होती. तिला स्वप्न पडतंय
कां? माशांना स्वप्न पडतांत कां? जर
माशांना दोन दिवस फ्रिजमधे बंद ठेवलं तर त्यांना स्वप्न पडतांत कां? मला ह्यांत शंकाच नव्हती की माशी जिवन्त आहे. जर माशी मेलेली असती,
तर ती दाराच्या भिंतीवर बसलेली नसती, तर खाली
पडली असती. ती इथे करते काय आहे? आमचं फ्रिजतर रिकामं आहे.
ती इथे आली कशी? ती फ्रिजमधे घुसलीच कशी?
माशीबद्दल आणि काहीतरी
खाण्याच्या इच्छेबद्दल विसरून मी फ्रिजचं दार बंद करून टाकलं, कारण की
विजेच्या लखलखाटाप्रमाणे माझे विचार अगदी स्पष्ट झाले होते - - : डोक्यांत अचानक
विचार आला - - : आणि मी? - - : आणि मी कोण आहे? - - :
मी मूखिन आहे कां?
मी अचानक स्पष्टपणे समजलो
की मी काही मूखिन-बीखिन नाहीये; मूखिनचं आपलं स्वतःचं अस्तित्व आहे, आणि माझं आपलं; आणि हे, की ना
तर मी मूखिनचा भाऊ आहे, ना यार; आणि
मूखिन आहे मी - - : फक्त तात्पुरता मूखिन आहे, पूर्णपणे
मूखिन नाही - - : फक्त रंगा-रूपाने मूखिन, रूपाने.
ह्या शोधाने विस्मित होऊन
मी आ वासला - - : अगदी असांच ह्यावेळेस मी आहे.
मूखिनची प्रत्येक गोष्ट
माझ्याकडे होती - - : सगळ्यांत आधी, त्याची स्मरणशक्ति, मला अनुभव झाला, की मूखिनची कोणतीच गोष्ट मी विसरलो
नाहीये, आणि विसरणारसुद्धां नाही, अगदी
तसंच, जसं मूखिनशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट आत्मसात् नाही
करणार. माझ्याकडे पुरेश्या मात्रेंत मूखिन होता, जरा जास्तीच
होता, पण हे सगळं माझं नव्हतं. तर मी आहे कोण? (मी स्वतःला विचारलं). कोण आहे मी? पण मला माहीत
नाहीये, की मी कोण आहे.
मी कुणीही होतो, तरी मूखिन
झालोय, सम्पूर्णपणे मूखिन नसूनही.
मी मूखिन होतो, पण मूखिन
नव्हतो, आणि मूखिन नव्हता.
पण सगळ्यांत महत्वपूर्ण
गोष्ट मला आता स्पष्टपणे समजलीये, की मूखिन आत्ता, ह्याक्षणी
गायब नव्हता झाला आणि मी मूखिनमधे आत्ता, ह्या क्षणी
परिवर्तित नव्हतो झालो.
हे आधीच झालं होतं, बरंच आधी,
माझ्या फ्रिज उघडण्याच्या बरंच आधी.
केव्हां? काल?
मागच्या आठवड्यांत? काही वर्षांपूर्वी?
मला काय झालंय? मला कां
ऐकू येतंय आणि एक एक अक्षर दिसतंय :
प्रॉजेक्ट, नियंत्रक
शक्ति, स्कैनिंग सिस्टम?
मला कां हे समजतंय, की मला
आत्म्याला थिजवून टाकणा-या रहस्यमय नियमांच पालन करावं लागणार आहे, जे शब्दांच्या माध्यमाने प्रदर्शित होत नसतात, पण
पूर्णपणे आकलनीय आहेत?
मला समजलंय की माझ्याकडून
काय अपेक्षा आहेत - - : गुप्त राहा आणि लपवंत राहा की तू खरोखरंच मूखिन नाहीये.
मला भीति वाटू लागली; आणि अंगावर
शहारेपण आले - - : मी स्वतःला माशी समजूं लागलो, जी तिथे बंद
होती.
तिला बाहेर काढायला हवं; मी फ्रिज
उघडलं. माशी दारावर नव्हती. कुठेतरी पडलीतर नाही? ती ,काय, मरून गेली आणि पडली? माझ्या
आत्मज्ञानाच्या एका मिनिटाच्या अवधीत एक माशी मरू शकते कां?
मी दाराचे सगळे शेल्फ्स
शोधले - - : माशी कुठेही नव्हती, मी सम्पूर्ण फ्रिज पाहिलं, भाज्यांची ट्रेपण बाहेर काढली - - : रिकाम्या फ्रिजसमोर गुडघ्यांवर बसून
मी प्लास्टिकच्या डब्यांच्याखालीसुद्धां बघितलं, जिथे
भाज्यांना चांगल्या दिवसांत सुरक्षित ठेवतात - - : माशी कुठेच नव्हती.
“काय अगदीच डोकं फिरलंय?(माझ्यावरून
ऐकू आलं). ‘चीज़’चा चुरा शोधतोय कां?”
गुडघ्यांवरून न उठता मी
खांद्यांच्या मधे डोकं आखडून घेतलं. हिला काय पाहिजे? मूखिनची
बायको इथे कां आलीये?
“शेजारिणीकडे जाऊन दोन
अंडे मागून आणते,
कमीत कमी स्क्रैम्बल्ड अण्डे करीन, किंवा
त्यांना उकडीन - - : काय दिवस आलेयंत, लाजिरवाणे!”
ती निघून गेली, आणि मी,
गुडघ्यांवरून न उठता, फ्रिजमधे हात ठेवूनंच
राहिलो. जे झालंय, त्यानंतर मला मूखिनच्या बायकोशी कसं
वागायला पाहिजे? तिच्याबरोबर कसा राहूं?
बौद्धिकरीत्या आत्मसात्
केलेले नियमं,
शांतपणे म्हणंत होते - - : हिम्मत ठेव, टिकून
रहा, असं काहीही करू नकोस, ज्याने तुझं
बिंग फुटेल (की तू मूखिन नाहीये), कोणत्याही परिश्तितीत,
कोणालाही आपल्या रहस्यांत सामिल नको करू.
आपल्या रहस्यांत - - : त्यांच्या आणि माझ्या!
आणि आता - - : थरथरंत (
माझे हात थरथरूं लागले,
ओय-ओय!) - - : मी, नियमांचा उल्लंघनकर्ता,
सध्या ह्या उद्वेगाला दूर करण्यास समर्थ आहे, ज्याने
अचानक मला घट्ट दाबून ठेवलं होतं, मदतीसाठी तिहेरी
धनु-कोष्ठकांना, जसं राक्षसांना, बोलावतो
- - : टाइम झालाय. टाइम झालाय, आणि तसं मीसुद्धां स्वतःला
बरंच स्वातंत्र्य दिलं होतं!}}}
{{{ पुन्हां
उघडलेल्या आणि आधी बंद केलेल्या धनु कोष्ठकांच्यामधे सुमारे अडीच तासांच अंतर आहे.
वरवर बघतां काही प्रतिक्रिया नाही दिसली. मी निश्चिंत आहे; परिस्थितीवर
माझं नियंत्रण आहे; आशा वाटतेय. लिहीत आहे.
दयाळु शेजारिणीने
अण्ड्यांसोबत बायकोला दोन कैबेज-रोल्स आणि ब्रेडचा चूरापण दिला. मला वाटतं की डिनर
मस्त झालंय - - : ह्यापेक्षांही वाईट होत असायचं. कैबेज-रोल खाऊन मी बाल्कनींत
चाललो गेलो - - : अस्पष्ट गोष्टींबद्दल विचार करायला. हवेंत उष्णता होती; जुलैचा
महिना होता. तो अजूनही चाललाय - - : जुलैचा महिना - - : ह्या जुलैचा आनन्द घ्यायला
अजून बराच वेळ आहे. डास उडंत होते; अंधार होत होता.
पॉइन्ट नं. 2पासून पॉइन्ट
नं. 1वर येतो (माझ्या आरंभिक ‘धनुष्यांत’ दिलेले
पॉइन्ट्स बघा). सध्या मला प्रतिस्थापनाच्या प्रक्रियेत स्वारस्य आहे.
तर, बाल्कनींत
मी ह्याबद्दल विचार करंत होतो - - : हे झालं केव्हां होतं?...
मला मूखिनचं जीवन आठवलं -
- : लहानपण, किशोरावस्था, त्याचे विद्यापीठ, सुरुवातीचं प्रौढत्व. मी त्याच्या जीवनाचं ते धोकादायक वळण शोधायचा
प्रयत्न करंत होतो, जेव्हां माझ्या द्वारे मूखिनला
प्रतिस्थापित केलं गेलं होतं.
मला आठवलं – अगदी लहान
कोस्त्या, उन्हाळ्याच्या, जुलैच्याच संध्याकाळी कामेन्का
नदीच्या काठावर, वय वर्षे सहा, तो
आत्तांच ‘हुक’ला कीडा अडकवणं शिकलाय;
वडील, ज्यांच्याकडेपण मासेमारीची काठी होती,
कोस्त्याच्या नावेवर सतर्क नजर ठेवून होते. तोंड मारल्याचा भास
झाला. वेताची लांब काठी मूखिनच्या समोर वाकते. त्याने जीवनात आपली पहिली मासळी
बाहेर काढली.
मी मूखिनला आपल्या तरुण
मित्रांबरोबर वनस्पति आणि प्राणिमित्रांच्या सोसाइटीत प्रवेश करताना बघितलं होतं.
ती रात्र, जेव्हां तो वयस्क झाला होता, जेव्हां त्याने
मूर्खपणाने ट्रेन थांबवली होती. एका धुन्द सकाळी त्याला आपलं कौमार्यत्व गमावताना
पाहिलं होतं. बघितलं होतं की मूखिन कसा शिळेवर रांगंत होता. कसा तो पू वाहत
असलेल्या एपेंडिक्समुळे तडफडंत दवाखान्यांत पडला होता.
पू निघंत असलेलं एपेंडिक्स
सगळ्यांत अप्रिय आठवण नाहीये. माझ्या बौद्धिक नजरेला दिसतोय एका दोनमजली बैरेकमधे
जात असलेला मूखिन;
चरमरंत असलेल्या पाय-या, रेल्वे-कर्मचा-यांचा
दिवस, रिकामा कॉरीडोर, सगळे लोक बाहेर
आहेत, त्याने दार उघडलं, ज्याच्यावर
चाकूने एक फालतू शब्द ‘शलगम’ कोरलेला
होता. लवकर-लवकर परंत चालला जातो. तासभरानंतर तो रेस्टॉरेन्ट-कारमधे वोद्का पिताना
दिसेल, विसरण्यासाठी. स्वतःला विसरण्यासाठी. अंशतः तो ह्यांत
सफलपण होतो.
मूखिन मूखिनंच होता.
मला मूखिनबद्दल ते सगळं
नाही आठवायचंय,
जे त्याला कधीही आठवावंसं नव्हतं वाटंत.
खाली लॉनवर राख झटकंत मी
दुस-या टोकाने विचार करायला सुरुवात केली, किंवा सोप्या शब्दांत सांगायचं
झालं तर - - : शेवटपासून, न की सुरुवातीपासून. काही तरी मला
सांगंत होतं की हे इतक्यांतच झालंय.
मला एक ‘शॉकिंग’
घटना आठवली, कारण की ती मला ‘शॉक’सहित आठवली होती - - : चक्क, स्पष्ट, विरोधाभासासकट, जणु ती
आत्ताच घटित होत आहे - - : माझ्या डोक्यांत नाही, तर
मूखिनच्या किचनमधे (तेव्हां, जेव्हां मी अजून बाल्कनींतच होतो).
आमच्या - - : माझ्या? त्याच्या - - : बायकोशी गोष्टी चालल्या
होत्या - -: पुन्हां - - : काय त्याच्या? काय माझ्या बायकोशी?
- - : हे निर्भर करतं.
मूखिन शून्यांत बघंत होता.
गोष्ट मागच्याच्या मागच्या
आठवड्याची आहे,
पण मागच्याच्या मागच्या बुधवारची नाही, तर
तिस-या बुधवारच्या आधीची. मी नंतर मोजलं होतं - - : पंधरा दिवसांपूर्वी, म्हणजे ह्या गुरुवारपासून, किंवा एकोणीस दिवस आधी,
जर आजपासून मोजलं तर, आणि आज, जेव्हां मी हे लिहितोय, रविवार आहे.
मूखिन शून्यांत बघंत होता.
चूक होण्याची भीति आहे,
पण, माझ्या मते, त्याला
आपल्या बायकोला सांगायचं होतं की त्या दिवशी कामावर हा प्रश्न ऐकून कसा स्तब्ध
झाला होता - - : तो कुणाची हत्या करूं शकतो कां. जसं की, सावत्र
वडिलांची. त्याचातर कधी सावत्र बाप नव्हताच. गमतीचं सार हे
आहे, की असिस्टेन्ट अलीनाला एन्थ्रोपोमेट्रिक-रिसर्चच्या
फाइलमधले फोटो बघंत असताना हे कळलं की एका गुन्हेगाराचे नाक-डोळे अगदी मूखिनसारखे
आहेत. वयांत अंतर असून देखील (मूखिन बरांच मोठा होता), डोळ्यांच्या
मधलं अंतर आणि हनुवटीच्या उंचीच प्रमाण एक सारखं होतं (तसं, इथे
वयाचं मुश्किलीनेच काही मह्त्व आहे). सगळ्यांना हे ऐकून खूप गंमत वाटली, पण मूखिनला संताप आला; आपल्या रंग-रूपाबद्दल तो बराच
गंभीर होता आणि जर त्यावर कुणी टोमणा मारला, तर त्याला आवडंत
नव्हतं.
पण, मला ह्या
गोष्टीची खात्री करायची नाहीये, की त्याला खरंच बायकोला हे
सगळं सांगायचं होतं, पण ही गोष्ट, की
शून्यांत बघंत (आणि किचनमधे हजर राहून) तो ह्याचबद्दल विचार करंत होता - - : ही
अशी वस्तुस्थिति आहे, जिच्या सत्यतेची मी ग्यारंटी घेऊं शकतो.
टी.वी.वर गैसच्या
किंमतीबद्दल सांगंत होते.
“चहा की कॉफी?” (बायकोने
विचारलं).
उत्तर दिलं - - :
“चहा”.
“की कॉफी?”
उत्तर दिलं - - :
“कॉफी”.
“मी तुला विचारलंय की तू
काय पिणारेय,
आणि तू काय उत्तर देतोयेस?”
“मी उत्तरंच देतोय, की काय
प्यायचंय.”
“विचारतेय - - : चहा? तू - - :
चहा. विचारते - - : कॉफी? तू - - : कॉफी.”
“तर मग तू कॉफीबद्दल कां
विचारतेयस, जेव्हां की मी उत्तर देऊन चुकलोय, की कॉफी पिणारे.”
“टॉमेटो-जूस पी. उपयुक्त
आहे.”
“मला टॉमेटो-जूस नकोय. मला
एकटं सोडं. मला चहाही नको, आणि कॉफीसुद्धां नकोय.”
“तुला स्वतःलाच माहीत
नाहीये, की तुला काय नकोय. आणि, काय हवंय, हेसुद्धां नाही माहीत, तुला काहीच नकोय! - - : तुला
काहीही नकोय! - - :...काहीही नाही! - - : ...काही नाही – येवढसंसुद्धा नाही! - -
:”
हे शब्द माझ्यासाठी
म्हटलेले होते. आधीचा मूखिन ते ऐकंत नव्हता. आधीचा मूखिन झपाट्याने गायब होत चालला
होता, मी त्याला प्रतिस्थापित करंत होतो, पुन्हां त्याचं
रूप घेत होतो. त्याने दात खाल्ले आणि बाहेर निघून गेला. हो, मी
बाल्कनीत आलो, उभा राहिलो, जसा आता उभा
आहे, आणि सिगरेट पीत राहिलो, घरांच्या
छप्परांकडे बघंत, जसा आता बघतोय. हा होतो मी! आणि हे झालं
होतं मागच्याच्या मागच्या आठवड्याच्या बुधवारी! तेव्हांच मी समजलो होतो, की हे सगळं कसं झालं! (आणि, हे मला समजलं गुरुवारी!)
माणसाचे शेवटचे शब्द नेहमी
महत्वपूर्ण असतात. जसे मूखिनचे - - : “मला एकटं सोड. मला चहाही नको, आणि
कॉफीसुद्धां नकोय!” - - : हे त्याचे शेवटचे शब्द होते. तेव्हांच तो गायब झाला,
खरं म्हटलं तर, मुक्त झाला, आणि मी हे शब्द विसरूं शकंत नव्हतो.
बाहेरच्या जगांत ह्या
काळांत काहीही नाही झालं - - : ना तर घड्याळ थांबली, ना बल्ब फ्यूज़ झाला,
ना कॉर्निस पडली, जिच्यावर पडदा टांगतात. टी.वी.लापण
स्विच-ऑफ करणं, किंवा स्क्रीनवर एखादी असाधारण गोष्ट दाखवणं
ज़रूरी नाही वाटलं. कॉफीसुद्धा पळून गेली नाही. आणि, काय कॉफी
होती? आणि, काय मूखिन होता? (मला विचारावसं वाटतंय).
जर मूखिन खरंच होता, तर मला
माहीत करायचंय, की काय गायब होताना त्याने स्वतः काही अनुभवलं
होतं.
जसं, मी,
त्याला प्रतिस्थापित करताना, काहीच अनुभवलं
नव्हतं. बेपर्वाईचा माझ्यावर पगडा बसला होता. बाल्कनीत उभा होतो आणि काहीही
अनुभवंत नव्हतो; उंची आणि तिने घाबरण्याच्या आवश्यकतेला पण
अनुभव नव्हतो करंत.
बस, हीच ती
सीमा होती - - : मी मूखिनला प्रतिस्थापित करंत होतो, तोपर्यंत
हे न समजतां, की मी काय करतो आहे.
त्याला प्रतिस्थापित
केल्यावर तब्बल पंधरा दिवस मी समजूं नाही शकलो, की मी मूखिन नाहीये!
कदाचित, मी विचार
केला, कि पहिल्यासारखांच मूखिन आहे आणि विशेष असं काही
घडलेलं नाहीये.
कदाचित, ह्या दोन
आठवड्यांत मी जुन्या मूखिनच्या तुलनेंत जास्तच ‘तुमचं सुख’
मनोरंजन केन्द्रांत जाऊन ‘एका हाताच्या
दरोडेखोराशी’ एकटाच युद्ध करंत राहिलो.
सोमवारी संध्याकाळी
शॉपिंगसाठी दिलेली रक्कम हरलो - - : एक-एक कोपेक, आणि मंगळवारी आपली
बचतसुद्धां, जी मी घरून घेऊन गेलो होतो.
पण ही गोष्ट मला केव्हां
समजली, ह्याबद्दल मी आधीच लिहिलंय.}}}
{{{ हो,
स्वीकार करावं लागेल - - : मूखिनला लूडोमैनिया20 होता, त्याच्यानंतर मी
सुद्धां थोडा-सा लूडोमैनियाक झालोय. आतापर्यंत मला पूर्ण खात्री नाही झालीये,
की खरोखरंच मी कितपत लूडोमैनियाक आहे, तसे
सगळे लक्षण स्पष्ट आहेत, पण आशा हे, की,
तरीही, मी मूखिन इतका लूडोमैनियाक नाहीये.
वास्तविकतेला समजण्याच्या माझ्या योग्यतेमुळे ही आशा मला प्राप्त होते - - : बहुधा
लूडोमैनियाक ही गोष्ट स्वीकार नाही करंत, की ते लूडोमैनियाक
आहेत, पण मी तर स्वीकार करतो - - : हो, मी लूडोमैनियाक आहे, कदाचित टिपिकल नसेन, पण आहे तर लूडोमैनियाकंच, आणि निःसंदेह मूखिनच्या
लूडोमैनियाला मी मान्य करतो.
आणखी एक गोष्ट, हे सांगणं
म्हणजे अतिशयोक्ति होईल, की मला लूडोमैनियाचा त्रास होतो;
येवढंच पुरे आहे, की तो माझ्यांत आहे; जर कुणाला त्रास होत असला, तर ती आहे माझी बायको,
तसं, जेव्हां माझी बायको मूखिनची बायको होती,
ती, मला वाटतं की बरींच त्रासून जायची. वाद
घालण्यासारखं काहीच नाहीये - - : तिने माझ्या जुगारांच्या खेळांच्या माझ्या
आवडीमुळे (माझ्या वर्तमान क्षमतेंत) तेवढं दुःख नाही झेललं, जितकं
मूखिनच्या आवडीमुळे, आणि मुश्किलीनेंच
02.00
मला ह्या गोष्टीबद्दल दोष
देण्यांत येऊं शकतो की माझ्या आत्ताच्या पराभवामुळे तिच्या सहनशीलतेचा प्याला उतू
गेला - - : जर मूखिन मूखिनंच राहिला असतां, तर सहनशीलतेचा प्याला आणखी लवकर उतू
गेला असता - - : मधेच कुठेतरी ‘तिच्या’ जोडायची इच्छा होतेय - - : “तिचा प्याला सहनशीलतेचा” किंवा “प्याला तिच्या
सहनशीलतेचा”, फक्त मी कोणत्याही परिस्थितींत कल्पना नाही
करूं शकंत - - : तिची - - : ह्या बोधगम्य प्याल्यासकट. हे, तसं,
अप्रत्यक्षपणे माझ्या अंतरात्म्याची निर्मलता दर्शवतं. मूखिनकडे
स्वतःला दुःखी करण्याचे अनेक मार्ग होते, आणि तो कधी कधी
बेफाम आत्म-आलोचना आणि आत्मपीडनाचासुद्धां शिकार व्हायचा. आठवायची इच्छा नाहीये.
त्याच्या अंतरात्म्याचा विषय आहे, माझ्या नाही. हा तो होता,
जो आपला संपूर्ण पगार जुगारांत हरून जायचा, हा
तो होता, जो कर्जबाजारी झाला होता, हा
तो होता ज्याने आपल्या बायकोची एक प्राचीन वस्तू गहाण ठेवली होती, पण पिच्छा सोडवावा लागेल मला आणि, मला वाटतंय की हे
लवकरंच करावं लागेल. मागच्या काही दिवसांत झालेल्या माझ्या छोट्या-छोट्या
पराभवांची त्या मोठ्या-मोठ्या पराभवांशी काही तुलनाच नाहीये, जे त्याच्या आजाराबरोबरंच मागच्या दीड वर्षांत वाढतंच गेले, थेट त्या दिवसापर्यंत जोपर्यंत मूखिन, ह्या नावाच्या
ख-याखु-या अर्थाने, मूखिन होणं बंद झाला. ह्यांत काही शंकाच
नाहीये, की आजार तीव्रतेने बळावंत गेला, पण, ह्या विचाराशी सहमत होऊनही, की हे आमचं दोघांचं दौर्भाग्य आहे, मी त्या प्रत्येक
माणसाचा ज़ोरदार विरोध करीन, जो मूखिनच्या मैनियाच्या वाढंत
असलेल्या तीव्रतेला त्या मूखिनशी जोडण्याचं धाडस करेल, जो मी
आहे. गंभीर नजर, जी मी स्वतःच,
इतक्यांतच, स्वतःला दाखवली आहे - - : ह्या गोष्टीच ठोस
प्रमाण आहे की सगळं काही नियंत्रणांत आहे. नाही, काहीतरी
लक्षण तर आहेच, पण फक्त माझा लूडोमैनिया उग्र स्वरूप नाही
घेत आहे; उलंट ह्याचा विपरीत होतं आहे.
गंभीरतेने विचार करताना, मी ह्याला
सौभाग्यंच म्हणेन की मूखिनला पत्त्यांच्या खेळांत काहीच रस नव्हता, आणि रुलेट21 मधेपण. तो तर सगळ्यांत पुरातन खेळावर बसायचा - - : जवळ-जवळ दर रोज
संध्याकाळी कामावरून परंत येताना मनोरंजन केंद्रात घुसायचा, जे
आमच्याच स्ट्रीटवर आहे, आणि तिथे एखाद्या ऑटोमेटिक-गेमवर
बसून जायचा. तो आपल्या हारण्याचा-जिंकण्याचा रेकॉर्ड ठेवायचा - - : जशी की अपेक्षा
होती, तो बहुतकरून हरायचांच. आम्हीं समजवूं नाही शकंत - - :
ना तर मूखिनला, आणि ना त्याच्यानंतर मला - - : ह्या दुर्दैवी
मशीनींशी आमच्या दोस्ती-दुश्मनीची कहाणी. एकंच शब्द - - : संसर्ग - - : मीसुद्धां म्हणतो, आणि तोसुद्धां हेच म्हणायचा. पण
आम्हीं खेचले जात होतो, खेचले जात आहोत; संध्याकाळ होईल, आणि, मला
माहितीये, की कोणची तरी शक्ति आम्हांला खेचून तेथे नेईल,
परत न पाठवण्यासाठी!
खुद्द आमच्याचसाठी
सगळ्यांत आश्चर्याची गोष्ट ही आहे की, आम्ही - - : किंवा, नाही, दुहेरीपणाच्या भावनेपासून वाचण्यासाठी फक्त
एकाचबद्दल बोलेन, मूखिनबद्दल - - : सगळ्यांत आश्चर्याची
गोष्ट ही आहे, की मूखिनला ‘थ्योरी ऑफ
प्रॉबेबिलिटी’बद्दल माहिती होती, विशेषकरून,
मोठ्या संख्यांच्या नियमाबद्दल. मी हे काय म्हणतोय! माहिती होती - -
: हा शब्द बरोबर नाहीये. ह्या क्षेत्रांत तो एक प्रकारचा विशेषज्ञ होता; तो ‘ब्यूस्टेंत काम करायचा. ‘ब्यूस्टे’
काय आहे? ओह, ही ती जागा
आहे, जिथे मी आपल्या सगळ्या ‘कलीग्स’बरोबर काम करतो, जे मला मूखिन समजतात. ‘ब्यूस्टे’ – ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स, दुस-या शब्दांत सांगायचं झालं तर, ब्यूरो ऑफ
स्टेटिस्टिकल इन्वेस्टिगेशन्स. जर मी ‘प्राइव्हेट’ शब्द जोडला, तर तो, खरोखरंच
काहीही बदलणार नाही. म्हणजे, माझा संबंध रॅन्डम-प्रोसेसेज़
आणि रॅडम-वेरियेबल्सशी आहे. मूखिनसुद्धां, स्पष्ट आहे,
हेच करायचा - - : स्टेटिस्टिकल डेटाचं ‘कोरिलेशन’
इत्यादी प्रोसेसच्या मदतीने प्रसंस्करण करायचा, काही परिणाम प्राप्त करायचा, म्हणजे नंतर ह्या
परिणामांच्या आधारावर दुसरे विशेषज्ञ ह्या शोध कार्यांच्या ग्राहकांना सल्ला देऊ
शकतील. थ्योरी ऑफ प्रोबेबिलिटी काय प्रकार आहे, हे मला
चांगलंच माहितीये; मूखिनलासुद्धां माझ्यायेवढीच माहिती होती.
‘तुमचं सुख’मधे येणा-यांमधे आणखी कुणी नव्हतं, ज्याला
मूखिनसारखी (स्वतःचं उदाहरण नाही देणार), ह्या फालतू
खेळाच्या नुक्सानदायक प्रभावाची माहिती असेल. मूखिनला माहीत होतं, की तो कोणत्या दिशेने चाललाय; माहीत होतं आणि तो
जात होता. पण कां, हे त्याला माहीत नव्हतं आणि मी ह्याचं
उत्तर देणार नाही.
मूखिनची बायको नव-याचं हे
खूळ वेगळ्या प्रकारे समजावयाची - - : स्वैराचार; कुटुम्बाबद्दल गैरजवाबदारी;
चट्कन पैसा कमावण्याची इच्छा (“जर मेहनतीने
काम केलं असतं, एक-एक कोपेक वाचवला असता!”); आणि शेवटी आत्मपीडन.
ह्या शेवटच्या गोष्टीवर
एकमत होऊं शकतं,
जर आत्मपीडनाचा अर्थ असेल – मुद्दाम स्वतःच्या हितांना नुक्सान
पोहोचवणे, आणि विशेषकरून - - : वित्तीय. मग आत्मपीडन
मूखिनच्या इतर कार्यकारी क्षेत्रांतसुद्धां प्रकट व्हायला पाहिजे होतं, पण असं बघण्यांत नाही आलं. माझ्याचसारखा, इतर
कोणत्या गोष्टींत तो आत्मपीडकासारखा नव्हता, तर ह्याच्या उलट,
म्हणजे ‘उलट’ त्या
अर्थाने नाही, की तो किंवा मी, पर्याप्त
प्रमाणांत आपआपल्या प्रकारचे उत्पीडनप्रिय होतो किंवा आहोत, तर,
ह्याच्या उलंट, आम्हीं, आपल्या
क्रमिकते-पूर्वापरतेकडे न बघतां, दुहेरी नाही, तर एका माणसासारखे - - : दोघंही समजदार आहोत.
मला खात्री नाहीये, की हा ‘नोट’ धनुषावृत्त करायला हवं किंवा नाही, जरी, ह्याला धनु-कोष्ठकांनीच सुरूं केलं होतं. तसं -
- : कशाला? उलट पूर्ण खात्री आहे! तो बिल्कुल हानिरहित
नाहीये! माझ्यांतली आणि मूखिनच्यामधली पृथक्करण रेषा अगदी बरोबर काढलीये, समस्या तपशीलवारपणे समजलीये; म्हणून भानगडींपासून
दूर राहण्यासाठी तिहेरी धनु-कोष्ठकांनीच संपवतो.}}}
{{{शुक्रवारी
मी कामावर गेलो. चला, ऑफिसमधे माझी कल्पना करूं या.
माझ्यासमोर कम्प्यूटर आहे, ज्याच्यावर काही
दिवसांपूर्वीपर्यंत मूखिन काम करायचा. फिश-समोसांच्या ग्राहकांच्या आवडीचे
डायग्राम्स पडले आहेत. शुक्रवारी तान्याने त्यांना बनवलं होत, मला त्यांच्यावर काम करायचंय.
ही अफवा, की तान्या
मूखिनवर प्रेम करते, जराशी अतिरंजितच आहे. माझ्याबरोबर तर
तिचं काही लफ़डं नव्हतं. हे खरं आहे, की तिला ही गोष्ट माहीत
नाहीये, कारण की ती मला मूखिन समजतेय.
मूखिन एका टीममधे होता; आता ह्या
टीममधे आहे मी. टीममधे पाच माणसांचा कोर-ग्रुप आहे. मूखिन कोर-ग्रुपमधे होता;
आता मी कोर-ग्रुपमधे आहे. कोर-ग्रुपचे सगळे लोक डोक्याने काम करतांत
- - : फक्त डोक्याने - - : विश्लेषण करतात, परस्पर-संबंध
स्थापित करतात, निष्कर्ष काढतात. मी हेच करतो.
डोक्याने काम करणं सोपं
नाहीये - - : अगदी मनोवैज्ञानिक. मी तर कामाशिवायसुद्धां पूर्ण वेळ विचार करंत
असतो. कामावर असताना जरा जास्तंच विचार करतो, पण ह्याच्यावरंच तर काम आहे. पण ते
- - : काम आहे. आणि, जेव्हां काम नसतं, तेव्हां काम नसतं. मला, मानावं लागेल, ह्या गोष्टीची चीड येते, की काम करताना मी स्वतःसाठी
नाही, तर मूखिनसाठी विचार करतो. मी तर
जेव्हां कामावर नसतो, तेव्हांही मूखिनसाठीच विचार करतो,
पण कामावर मूखिनसाठी विचार करणं चांगलं नाही वाटंत, कारण की हे काम तर अजूनही त्याचंच आहे.
कामावर सगळे लोक मला, जसं मी
सांगितलंय, मूखिन समजतात.
मूखिनच्या कामावर, दोनदा रेखांकित
करतो, सगळे मला मूखिन समजतात.
जर आणखी काही असतं, तर
विचित्र झालं असतं; मला ही गोष्ट स्वीकार करावी लागेल.
आमचं ऑफिस - - : मला ‘कार्यालय’
हा शब्द जास्त आवडला असता - - : आमचं ऑफिस-कार्यालय भूतपूर्व
कम्युनिटी रेसिडेन्सीच्या बिल्डिंगमधे दुस-या मजल्यावर आहे, ही
बिल्डिंग पूर्णपणे आमच्या ‘ब्यूस्टे’ सारख्या
कार्यालयांना दिलेली आहे.
माझाकडे एक टेबल आहे.
स्पष्टंच आहे,
की हे टेबल मूखिनचं होतं. ते अजूनही मूखिनचंच आहे - - : कारण की,
पहिली गोष्ट, जर निष्पक्षपणे सांगायचं झालं, तर मूखिन, खरोखरंच, मी आहे;
आणि दुसरी गोष्ट, मी मूखिनला प्रतिस्थापित
करतोय, आशा आहे की अस्थाईपणे, ना की
स्थाई रूपाने.
तर, आम्हीं
डोक्याने काम करतो - - : किंवा, खरं सांगायचं तर, डोक्यांनी - - : कारण की सार्वजनिक विषयांवर काम करता करता आमचे डोके
संयुक्त झालेले आहेत.
सार्वजनिक विषय - - :
म्हणजे सार्वजनिक जागा नाही.
सार्वजनिक जागा - - : हे, जसं की
सगळ्यांना माहीत आहे, सर्वविदित सत्य आहे, गुळगुळीत झालेली म्हण, पुरातन विचार आहे.
सार्वजनिक विषय, जे आमच्या
डोक्यांना संगठित करतात, नियमानुसार, मौलिक
आहेत.
मला वाटतं की जर कोणी
बाहेरचा माणूस आमच्याकडे आला आणि त्याने ऐकलं की आम्हीं कशाबद्दल बोलतोय, तर त्याला
काहीही समजणार नाही. एकदा मूखिनची बायको नव-याकडे एक डॉक्यूमेन्ट घेऊन आली,
जे तो घरी विसरून आला होता (ही फार पूर्वीची गोष्ट आहे) - - : कॉफी
पिता-पिता ती ऐकंत होती, की कशाबद्दल गोष्टी चालल्या आहेत,
पण तिला काहीही समजलं नाही.
तिने असं काही ऐकलं - - :
“जॉर्ज, तुला काय वाटतं, उच्चतम शक्यतेचं मॉडेल घ्यावं,
की मुलींना फिटिंगसाठी पाठवावं?”
किंवा, उदाहरणार्थ
- - : “कपितोनव, आपले डेटा संतुलित नाहीत; सगळ्या ‘कंद’भाज्यांच्या
फैक्टोरियल विषमतेचं मूल्यांकन कर आणि मग वेरिअन्स एनैलिसिस कर!”
“मृत्य-दराची तालिका कुणी
टेबलवरून उचलली?”
- - : “मी, बरीस कार्लोविच, मला रिग्रेशन-मॉडेलवर काही शंका आहेत - - :”
अश्या प्रकारे आमच्या इथे
बोलायचे; अश्या प्रकारे आमच्या इथे बोलतात.
मला आठवतंय - - : “तुम्ही
लोक तिथे करतां काय?”
- - : रात्री, बिछान्यांत, मूखिनच्या विस्मित बायकोने नव-याला विचारलं आणि मूखिनने, मला आठवतंय, तिला सगळं समजावलं, काहीही लपवलं नाही, पण तिला समजलंच नाही.
गायब व्हायच्या आधी तो
स्वतः फिश-समोस्यांच्या आवडीचं पैकिंगचं वजन आणि डेट ऑफ एक्स्पायरीप्रमाणे
इंटरब्लॉक एनैलिसिस करंत होता. इनरब्लॉक एनैलिसिस - - : त्यांच्या फैक्टोरियल
एक्सपेरिमेन्टच्या आधारावर - - : मी आधीच केलेलं होतं. आजकाल सगळे डेटा कपितोनवकडे
पाठवले जातात,
पण मला विश्वास नाहीये, की तो वेळेवर रिपोर्ट
तयार करेल. कपितोनव फार निष्काळजी झालाय, त्याला काम म्हणजे
ओझं वाटूं लागलंय; तो ‘सूटकेस-मूड’मधे आहे - - : नीनाला, कपितोनवच्या बायकोला, मॉस्कोमधे कामाची ‘ऑफर’ आलीये
- - : कपितोनव अटैचमेन्टसारखा जाईल.
जोपर्यंत एंथ्रोपोमेट्रिक
शोधाचा प्रश्न आहे,
तर तो माझा विषय नाहीये, त्यावर एक फार मोठ्या
कम्पनीच्या आपराधिक-प्रयोगशाळेच्या आदेशावर उदाल्त्सोव काम करतोय. तिथे कुणीतरी
लोम्ब्रोजोच्या विचारांवर एक शोध-प्रबन्ध लिहीत होतं, तसं,
मला खरंच ह्याबद्दल काही समजंत नाही, आणि
समजायचंसुद्धां नाहीये - - : माझ्यासाठी येवढंच पुरे आहे की त्या लट्ठ फाइलीत,
जी अलीना बघतेय, अन्य काही
फोटोग्राफ्सबरोबरंच एका तरुण मारेक-याचा
फोटोपण आहे, जो तरुणपणाच्या चांगल्या दिवसांच्या मूखिन सारखा
दिसतो. साधारणपणे आमच्याकडे दुस-यांचा कामांत लोक रस नाही घेत. फिश-समोस्यांच्या
मागणीत व्यस्त असल्यामुळे मला, कदाचित, कधीही चेह-याच्या अनुपातांचे सूचकांक आणि काही विशिष्ठ गोष्टी, जसं नाकाच्या वरच्या आणि नाकाच्या खालच्या बिन्दूंबद्दल, आणि ज्या गोष्टीमुळे आजकाल उदाल्त्सोव वैतागला आहे, त्याच्या
बद्दल काहीही कळलं नसतं, जर का अलीना मूखिनला चिडवण्याच्या
मूडमधे नसती - - : तो प्रसंग चांगलाच आठवतोय मला - - : ती टेबलाच्या मागे बसली
होती, जे माझ्या, पण आधीच्या मूखिनच्या
टेबलासमोर आहे, आणि तिने विचारलं - - : तोपर्यंतच्या मूखिनला
(मला नाही) : कन्स्तान्तीन अन्द्रेयेविच, तुम्हांला आपल्या
सावत्र बापाला मारायची कधी इच्छा नाही झाली कां? - - : “माझा
कोणी सावत्र बाप नव्हता (मूखिनने दचकून तालिकेवरून नजर दूर करंत उत्तर दिलं).
असा विचित्र प्रश्न कां विचारतेस?” - - : “ते
अशासाठी, की हा तरुण बराचसा तुमच्यासारखा आहे. ह्याने सावत्र
बापाला मारून टाकलंय”. तिने तरुणाचा फोटो दाखवला - - : त्या शोधकर्त्याच्या
फाइलमधून. तिला हे तर कळू शकंत नव्हतं, की तरुणपणी मूखिन कसा
होता; त्याला हे साम्य उगाचंच थोपल्यासारखं वाटलं; ही गंमत त्याला आवडली नाही. त्याने विचारलं - - : “डोळ्यांच्या मधलं अंतर
मोजलं का?” - - : “तेसुद्धां निहित आहे” (अलीना म्हणाली).
मला वाटतं, की मी
ह्याबद्दल आधीसुद्धां लिहिलंय. हो, हे त्याच दिवशी झालं होतं,
जेव्हां उशीराने झालेल्या माझ्या आत्मज्ञानानंतर, मूखिन नव्हता राहिला, आणि मी होऊन गेला. त्या
दिवशीच्या घटना मला सारखा त्रास देताहेत, ज्यांना स्वीकार
कराव लागेल, की ओढून ताणूनंच घटनांच नाव देता येईल.
सोप्या शब्दांत सांगायचं
झालं तर उदाल्त्सोव काही अन्य विषयांवरपण काम करंत होता, म्हणून तो
असिस्टेंट अलीनाला घाई करायला नव्हता सांगत, जी दिवस-दिवसभर
सगळ्या संभावित गुन्हेगारांच्या फोटोंच्या मागेच असायची आपले स्केल आणि कम्पास
घेऊन.
दुस-या शब्दांत, हे खरं
नाहीये, की आम्हीं मूर्खपणाचं काम करत असतो, आणि कुणालाच आमच्या रिसर्चची गरज नाहीये. साधारण वर्षभरापूर्वी
मूखिनसुद्धां असांच विचार करंत होता - - : की त्यांची गरज नाहीये, पण मग वेगळ्या प्रकारे विचार करू लागला. आजकाल आमचं काम खूप वाढलंय. आम्ही
लोकप्रिय झालो आहोत. आमच्या क्लाएन्ट्समधे आहेत मेडिकल आणि बिजनेस इन्स्टीट्यूशन्स,
राजनीतिक संगठन, जे प्रशासकीय अधिका-यांच्या
निवडणुकांमधे काम करतात, शिपिंग इण्डस्ट्री, कन्फेक्शनरी-फैक्टरी, पोल्ट्री-कॉम्प्लेक्स, नागरी प्रशासनाच्या अनेक कमिटीज, ज्यांत प्रमुख आहेत
शिक्षा-कमिटी. आमचे पार्टनर्स आहेत - - : पब्लिक-ओपिनियनचे अध्ययन करणा-या प्रमुख
एजेन्सीज़; आमची सफलता प्रमाणित करणारे सर्टिफिकेट्स
प्रमुखाच्या खोलीत लावलेले आहेत.}}}
{{{ मूखिनच्या
बायकोचं स्पष्ट मत आहे, की हात बाथरूममधे धुवायला हवेत,
आणि भांडे किचनमधे. भांडे किचनमधे धुवायला हवेत, ह्यावर मूखिनला काहीच आपत्ति नव्हती, पण हात धुण्यावर
लागलेल्या प्रतिबंधांचा तो आपल्या सम्पूर्ण ताकदीने विरोध करायचा. त्याने किचनमधे
हात न धुण्यास फक्त नकारंच नाही दिला, वरून भांडे धुवायच्या
साधनांनी हात धुण्यावर लावलेल्या प्रतिबंधालापण समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला,
विशेषकरून जेव्हां साधारण साबण सिद्धांतवश किचनमधे दिसायचा नाही. मी
बरेचदां विचार करतो, की सारखे नियम मोडून त्याला सिद्ध तरी
काय करायचं होतं – त्याला फळ मिळालंच.
मूखिनच्या बायकोने नव-याला
सुधारण्याची आशा नाही सोडली.
अकरा वर्ष ही “रीमेकिंग”ची, “रीफिनिशिंग”ची,
“रीशेविंग”ची, “रीफोर्जिंग”ची प्रक्रिया चालू
राहिली - - : आणि परिणाम स्वरूप, आमचा परिणाम झाला - - :
अगदी जीरो.
मूखिन असताना मी आपल्या
सवयी नाही बदलंत. स्वतःवर आग झेलतो.
हरकत नाही, सहन करूं!
शेवटी, मी
स्वतःला आठवण देतो, की बायको ती माझी नाहीये, तर बायको, ठळकपणे, कन्स्तान्तीन
मूखिनची आहे, आणि मला सहन करायची काही गरज नाहीये, किंवा, खरं सांगायचं तर, गरज
आहे, नक्कीच, मूखिन सारखी - - : सहन
करणं, पण तसं नाही, जसं मूखिनने केलं
असतं, जर तो मी नसता तर, पण मूखिनने हे
सहन कसं केलं - - : अकरा वर्ष? - - : डोकं गरगरू लागलंय.
मी हात धुतले, आणि
तेसुद्धां बाथरूममधे नाही - - : किचनमधे. शिवाय मी त्या सगळ्याचा वापर केला,
जे सिंकवर होतं - - : भाण्डे धुवायच्या केमिकलने - - : न की त्या
साबणाने जो बाथरूममधे होता! त्याहीपेक्षां वाईट काम हे केलं, की हातपण मी भांड्यांच्याच टॉवेलने पुसून टाकले - - : आणि तेसुद्धां
मूखिनच्या बायकोच्या डोळ्यांसमोर!
“कोस्त्या”, (कडक
आवाजांत बायकोने म्हटलं, जसं की असंच व्हायला पाहिजे,
म्हणजे, न व्हायला पाहिजे, कारण की मी तीन-तीन गुन्हे केले होते).
तिच्या आवाजांत मला
निर्भर्त्सनेची झाक जाणवली;
आणि मग माझ्याच्याने सहन नाही झालं - - :
“कोस्त्या? तुला काय
येवढा विश्वास आहे, की मी तुझा कोस्त्या आहे?”
स्तब्धता जास्त वेळ नाही
टिकली.
“तर मग कोण आहेस?”
“कदाचित, आज मी
कोस्त्या आहे, वाद नाही घालणार, आणि
उद्या मी - - : प्रेसिडेन्ट! किंवा - - : शेजारी, जो आपल्या
खाली राहतो! किंवा बूगोर्का स्टेशनवरची बार-गर्ल ओल्या! तू कल्पना नाही करूं शकंत
कां?”
बेकार. सांगायला नको होतं.
प्रतिबन्ध लागलेला आहे.
बायको हातांत प्लेट घेऊन
जणु थिजून गेली.
“ही कसली
गंमत आहे?”(आणि मी बघितलं, की ती
घाबरली आहे).
मी चूपंच राहिलो - - :
जास्तंच बोलून गेलो होतो. बोलायला नको होतं.
“कोणची ओल्या – बार-गर्ल, कोणचा
प्रेसिडेन्ट” (बायको बडबडली).
“ज्याब्लिक22 (मूखिन
नेहमी तिला ज्याब्लिक म्हणायचा) - - : ज्याब्लिक, माझ्या लाडके, मला कधीही डिवचूं नको
02.30
वेगळ्या प्रकारचं सत्य
सांगायला” (आणि मी बोटाने वर खूण केली, सत्याच्या स्तराकडे खूण करंत,
उच्चतम स्तराकडे).
टेबलावरून उठून, हाताने
खूण करंत आज्ञा दिली, की कोणताही प्रश्न विचारू नको; आपल्या खोलींत चाललो गेलो.
आपल्या खोलींत दीवानावर
लोळलो; वर्तमानपत्र घेतलं, केलिफोर्नियांत एका भूतपूर्व
जजला साक्षीच्या दरम्यान सार्वजनिक रूपाने हस्तमैथुन करण्याच्या आरोपांत एक
वर्षाचा कारावास आणि दहा हजाराचा दण्ड भरण्याची शिक्षा सुनावण्यांत आली. त्याने
टेबलाच्याखाली एका विशेष उपकरणाचा प्रयोग केला होता. त्याच्या विशिष्ठ आवाजाने आरोपीचं
बिंग फोडलं.
विचार करण्याचा प्रयत्न
करतोय; कल्पनाशक्ति कमी पडतेय.
ती माझ्याजवळ आली.
“मला घाबरवूं नको, कोस्तेन्का,
मी बघतेय, की तुझ्याबरोबर काहीतरी ठीक नाहीये.
जणु की तू स्वतःचा नाहीयेस”.
खोटं बोलतेय.
मी स्वतःचा नाहीये, हे ती बघू
शकंत नाही - - : कारण की मी, निर्विवादपणे, स्वतःचा आहे - - : आणि मूखिनसारखा आहे.
“हा तूंच आहेस कां?”
ओह, तिची
दृष्टी खूपंच तीक्ष्ण आहे. पण, मी स्वतःच तर तिच्यासमोर
स्वीकार केलं होतं. तिला समजलंय का?
आणि ह्याने मला काय
प्राप्त झालं?
काहीही प्राप्त नाही झालं.
मी सारवा सारव केली - - :
“सगळं ठीक आहे” (चेह-यावर
हसू आणंत हळूच म्हटलं).
केसांत हात फिरवंत, तिने माझं
डोकं कुरवाळलं. मी डोळे बंद केले; मी घुरघुर करू लागलो - - :
घुर्र घुर्र घुर्र. मूखिनवर दया येतेय. अगदी मूर्ख आहे.}}}
{{{ तर,
वर्तमानपत्र ठेवून मी दीवानवर लोळलो, बाजूला
बायको बसली होती; माझं कपाळ, ज्याला ती
आपल्या ऊबदार तळहातांनी कुरवाळंत होती, सरळ होऊ लागलं,
कदाचित आठ्या असाव्यात. मी तिच्या चेह-याकडे पाहिलं - - : तिच्या
डोळ्यांत भीति होती. तिला घाबरवून मीसुद्धां खूप घाबरून गेलो होतो; हे खूप भयानक आहे - - : फालतू गोष्टी बरळणं, विशेषकरून
माझ्या परिस्थितीत. मला आशंका आहे, की ह्याचा जाब द्यावा
लागेल - - : तिच्यासमोर नाही - - : आणि तिलापण नाही - - : आणि ह्याक्षणीसुद्धां
नाही.
लक्ष दिलं पाहिजे, की
मूखिनची बायको - - : आकर्षक बाई आहे.
हे वाक्य समजण्याचा
प्रयत्न करूं या. त्याचं विश्लेषण करायल हंवय.
दुस-या भागापासून सुरुवात
करू. मूखिनची बायको - - : आकर्षक आहे. ठीक, असंच आहे. तिला सुंदर म्हणताना मी
कचरलो असतो. मी कलाकार नाहीये, पण मला माहीत आहे की
सौन्दर्याचं मापदण्ड काय असतं - - : कानांचे कोपरे डोळ्यांच्या कोप-याच्या ओळींत
असले पाहिजे, आणि कानांच्यापाळी नाकाच्या खालच्या भागाच्या
अनुरूप असल्या पाहिजे. मूखिनच्या बायकोचे एक तर कान तरी आवश्यकतेपेक्षा जास्त उंच
आहेत, किंवा नाक जरा जास्तंच खाली आहे. कदाचित, म्हणूनंच ती लटकणारे ईयर रिंग्स घालते. ते तिच्यावर उठून दिसतात. मला
असंपण वाटतं, की तिचं कपाळ नाकाच्या हाडापर्यंत अत्यंत
सौम्यपणे उतरतं, ज्याने, जर तिच्या
चेह-याकडे एका बाजूने बघितलं तर तो पुढे आलेला वाटतो. जर मूखिनने आपल्या बायकोचं
अत्यंत रिअरिलिस्टिक पद्धतीने बनवलेलं पोर्ट्रेट बघितलं असतं, आणि जर त्याला माहीत नसतं, की ही त्याची बायको आहे,
तर त्यानेच निर्णय घेतला असता - - : दुस-या एखाद्या दर्शकासारखाच -
- : की - - : जो कोणीपण कलाकार आहे - - : तो, पहिली गोष्ट,
मॉडेलच्या प्रति उदासीन नाहीये, कारण की
निर्जीव-थंड नाकाबरोबरंच तिच्यातल्या अप्रत्याशित सेक्स-अपीलला प्रदर्शित करणं
अशक्य झालं असतं, आणि दुसरी गोष्ट, रियलिस्ट-कलाकाराकडून
ह्या गोष्टीची न्यूनतम अपेक्षा आहे, कारण तो स्वतःला
किंचितश्या विलक्षणपणाची मुभा देऊन एक सनकीपणाचा भाव प्रकट करतो. सामान्य
अनुपातांपासून झालेले हे साधारण विचलन मूखिनच्या बायकोला एक विशिष्ठ मोहकपणा देतात
: तिला, जसं मी सांगितलंय, आकर्षक
बनवतात. अगदी बरोब्बर शब्द आहे. ती आकर्षित करते, आणि
कोणचीतरी गोष्ट तिच्याकडे आकर्षित करते, तिच्याबद्दल
आकर्षणाची भावना असणं अगदी सोपं आहे. म्हणजे, मला म्हणायचंय
- - : तिच्याबद्दल आकर्षण.
आता ते, जे त्या
वाक्याच्या पहिल्या भागाशी संबंधित आहे. मी म्हटलं - - : लक्ष दिलं पाहिजे.
पहिल्या शब्दावर जोर देतोय. लक्ष देणं. आकर्षण, ज्याच्याबद्दल
इतक्यांत बोलत होतो, तिच्या आकर्षणाकडे माझ्याद्वारे लक्ष
देणं बंद झालंय, जास्तंच स्पष्ट सांगायचं तर, खरोखरंच, मूखिनद्वारे आधीच लक्ष देणं बंद झालं होतं,
मी तर, तसं, ही गोष्ट
नाहीये, की लक्ष देणं बंद केलंय, उलट
मला तर तो सुवर्णावसर मिळालांच नाही की ह्या गोष्टीवर लक्ष देऊं, ज्यावर, मूखिन असल्यामुळे, केव्हांपासूनंच
मूखिनने लक्ष देणं बंद केलेलं होतं - - : त्याच्या पत्नीचं
आकर्षण. दुस-या शब्दांत, मूखिनच्या बायकोच्या आकर्षकपणावर
मूखिनसाठी नकळतंच त्याच्या द्वारे लक्ष देणं बंद झालं होतं, ज्याबद्दल
माझ्या द्वारे आत्ताच लक्ष दिलं गेलं आहे, हा अंश लिहिता
लिहिता. मूखिनला समजू शकता येतं, अकरा वर्ष बरोबर
राहिल्यामुळे ब-याच काहीवर, कदाचित, प्रत्यक्षावरसुद्धां
लक्ष देणं बंद होत असतं; आणि माझ्यासाठीपण, जो मूखिन झालेला आहे, जर माझ्या मूखिनपणाच्या (हा
शब्द काही काळानंतर माझ्या संशोधकाकडून ऐकला आणि ज्याच्या आश्चर्यजनक सटीकतेमुळे
मी त्याच्या उपयोग केल्याशिवाय नाही राहू शकंत) अल्पावधिकडे लक्ष दिलं तर, हे समजणं कठिण नाहीये. त्यांच्या असहज वैवाहिक जीवनाचा अनुभव माझ्याद्वारे
चुपचाप स्वीकारला गेला होता. त्यांच सहजीवन चांगलं असो की वाईट असो, गतायुष्यतर मी बदलू शकंत नाही, ते सुद्धा दुस-यांच
गतायुष्य.
तर हा अर्थ आहे “लक्ष दिलं
पाहिजे”चा. आणि मी लक्ष दिलं, मी त्याच्यावर लक्ष दिलं, ज्याच्यावर मूखिनने केव्हांतरी लक्ष देणं बंद केलं होतं - - : तिचा मौन
मोहकपणा, तिच्या वाकड्या-तिकड्या दातांचं आकर्षण, हृदयाला भिडणारी तिच्या नाकाची तीक्ष्णता, तिच्या
तळहातांची कोमलता, लाडिकता. तिने, नक्कीच,
ठरवलं होतं, की मी वेडा झालोय, आणि, आता दीवानावर लोळलेल्या माझ्यावर दया करंत,
अचानक उसळून आलेल्या कोमलतेने माझं कपाळ कुरवाळते आहे, आणि मी, ज्याचं कपाळ ती कुरवाळतेय, मीपण प्रत्युत्तराखातर तिच्यावर अधिकाधिक दया करंत होतो, क्रमशः वाढंत असलेल्या तीव्रतेने, कारण की हा विचार
करणंच कसं वाटतं, की तुमचा नवरा पूर्णपणे वेडा झाला आहे?
मी तिच्याकडे बघून स्मित केलं, जणु, सगळं ठीक होईल, आणि ती डोळ्यांच्या कोप-यातून माझ्याकडे
बघंत हसली. कदाचित, तिने मूखिनसाठी मला क्षमा केलं? मूखिनला क्षमा केलं - - : माझ्यांत? माझ्यांत आपल्या
मूखिनला निरोप देऊन टाकला? सगळं शक्य आहे. मी चुपचाप मूखिनशी
घृणा करत होतो. अधिकाधिक. मूखिन मूर्ख होता, ईडियट होता. मला
मूखिनवर दया नव्हती येत; मला स्वतःवर दया येत होती, जो मूखिन झाला होता. मूखिनच्या बायकोबद्दल माझी दया, जी तिच्या माझ्याबद्दल दयेंत परावर्तित होत होती, पुन्हां
माझ्यांत माझ्यांचबद्दल दयेच्या रूपांत प्रतिबिंबित होत होती, पण ह्याचा मूखिनशी काही संबंध नव्हता.
त्या वेळेपासून, जेव्हांपासून
माझ्या द्वारे मूखिन प्रस्थापित केला गेला होता, मी एकदाही
त्याच्या बायकोकडे ‘सेक्स-ऑब्जेक्ट’ म्हणून
नव्हतं पाहिलं. मूखिनला काही काळापासून - - : महिन्या, दीड-दोन
महिन्यांपासून - - : बायकोबरोबर प्रॉब्लेम्स होत्या. आणि बायकोशी असलेल्या ह्या
प्रॉब्लेम्सला मी मूखिनकडून वारसा हक्काने मिळवले होते! त्यांच्यात काहीसा बेबनाव
होता. ही वेळ नाहीये त्याबद्दल वाद घालण्याची. कारण की आत्ता, म्हणजे, तेव्हां, दीवानावर
पडल्या-पडल्या एक आश्चर्यजनक विचार माझ्या डोक्यांत आला - - : ह्या मूखिनवर
बायकोच्या बदफैलीचा ठप्पा कां न लावावा? - - : अगदी तिथेच
आणि अगदी तेव्हांच! म्हणजे इथे आणि आत्ता.
म्हणजे - - : तरीही - - :
तेव्हां.
तिच्या अंगावर निळा गाउन
होता, ज्यांत ती दीवानावर लोळंत असलेल्या माझ्याकडे आली; कोणच्यातरी
विचित्र साबणाच्या सुगंधीत मी अगदी स्पष्ट संदेश ऐकला:
“सलोखा आणि तत्परता”.
मी उशीर कां करतोय? मूखिनवर
बायकोच्या व्यभिचाराचा ठपका - - : ह्या विचारानेच मी क्षणभरांत पेटून उठलो. माझ्यांत
वासना उसळी मारंत होती. तिच्या बाजूला बसून, क्षणभरांत मी
तिला आपल्या बाहुपाशांत घेतलं आणि ओठांच्या ताकदीने तिच्या ओठांवर हल्ला केला.
माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट ही होती, की तिच्यासाठी ही
आश्चर्याची गोष्ट नव्हती, तसं, कदाचित,
तिच्यासाठीपण माझी ही आकस्मिकता आश्चर्याची गोष्ट होती. पण आश्चर्य
मला फक्त क्षणभरंच झालं, जेव्हां मला जाणवलं की ती किती
आवेगाने मला प्रतिसाद देत आहे - - : जसा कधीही मूखिनला दिला नसेल! समोरून - - :
ह्या शब्दांत ऐकूं येतं “तोंड” - - : आमचे तोंड एकमेकांत मिसळले, जिव्हा संघर्षरत झाल्यात, आणि, जर त्यांच्याकडे, आमच्या जिव्हांकडे, कोणते जननांग असते, तर शंकेला जागाच नाही, की आमच्या आधी जिव्हा एक झाल्या असत्या - - : आम्हांला एकमेकाची इतकी
इच्छा होत होती. आम्ही स्वतःला स्प्रिंग-बॉक्सवर नाही, तर
फरशीवर झोकून दिलं - - : मूखिनबरोबर असं नव्हतं होत. हे मी तिला खाली पाडलं होतं.
तसेच फरशीवर गडगडंत आम्ही अनावृत झालो - - : उत्तेजित खेचाताणीत, हे कळल्याशिवाय की कोण कोणाचे कपडे खेचतोय - - : आपले, की दुस-याचे, तरीही - - : तिच्या अंगावर फक्त गाउन
होता; कपडेतर मी घातले होते.
मला ते सगळं माहीत होतं, जे
मूखिनला माहीत होतं, मूखिनच्या बायकोबद्दल. ते सगळं जे
मूखिनच्या बायकोबद्दल मूखिनला माहीत होतं, मूखिनच्या
बायकोबद्दल मला माहीत होतं. ही दुसरी गोष्ट आहे, की मूखिनला
कितपत माहीत होतं. त्याला वाटायचं की त्याला बरंच माहीत आहे. विशेषतः शरीराबद्दल -
- : तिच्या. आम्ही दोघंही म्हणू शकत होतो, पण मी फक्त
स्वतःबद्दल सांगेन - - : मी, न की आम्हीं, मी तिच्या शरीराला आपल्या स्वतःच्या शरीरापेक्षा जास्त चांगलं ओळखंत होतो,
आणि हे अगदी खरं आहे. जसं की, अवलोकनाच्या
अभावांत मी ह्या गोष्टीची फक्त अस्पष्टशीच कल्पना करू शकतो, की
माझी पाठ कशी दिसते, माझ्या खांद्याची हाडं कशी दिसतात,
आहेतर ती मागची बाजू, पण, मी काही नार्सिसिस्ट23 नाहीये आणि दुहेरी आरश्यांचा प्रयोग
नाही करंत, पण आता समोर दिसंत असलेली तिची लवचिक पाठ,
पाठीचा स्पष्ट कणा, तिच्या खांद्याची टोकदार हाडं
आणि सामान्यतः एखाद्या चित्राच्या विशेषतेसारख्या ह्या सगळ्या गोष्टी, मागून, बाजूने, समोरून - - :
स्मृतीत स्पष्ट आणि नेहमीसाठी अंकित झाल्यांत, सूक्ष्म
विवरणांसहित. मागच्या काही वर्षांत, जेव्हां मूखिन जास्त
उत्सुक होता, आणि ती जरा जास्तंच मेहेरबान, आणि, कदाचित आत्मविश्वासाने भरपूर, ती त्याला काही विशिष्ठ परिस्थितीत आपल्या बाह्य स्वरूपाच्या काही सजीव
आणि संवेदनशील अंगांना बघायची परवानगी द्यायची. तशी मैग्निफायिंग-ग्लासपर्यंत मजल
नव्हती जात, पण त्याला सूक्ष्म विवरणातंच रस होता - - :
नाभिच्या जवळ एखादा तीळ, एखादा पातळ केस, एखादं डिम्पल, एखादा खळगा. हे मी अश्यासाठी सांगतोय,
की आपल्या ज्ञानाची मात्रा प्रदर्शित करता यावी. पण ह्या वेळी,
मूखिनच्या बायकोच्या नग्नतेला मला तिच्या नव-याच्या नजरेने नव्हतं
बघायचं. आणि बघण्याची फुर्सतपण नव्हती! जे बघितलं, ते बघितलं
- - : परक्या, आणि आपल्या परकेपणाची जाणीव नसलेल्या, बायकोला. तुझी हीच शिक्षा आहे, मूखिन, चांगली अद्दल घडवली! अत्यंत आवेगाने आम्ही एक झालो. मला मूखिनसारखं नव्हतं
करायचं, कोणत्याच गोष्टीत मला तिला मूखिनची आठवण नव्हती
द्यायची, आणि, माझ्या मते, ती मूखिनबद्दल विसरून गेली, हो, हो, मला पूर्ण विश्वास आहे! जर कधी कुणाला, कुठेतरी ह्याची फिल्म बनवावीशी वाटली, तर तो ह्या
फालतू पोर्नोग्राफीची शूटींग करूं शकतो. मी, बस, घुरघुरलो नाही. आणि, तिच्याजवळ, ओरडण्यासाठी आवाजंच नव्हता! मूखिन बरोबर होता, जेव्हां
मागच्या काही वर्षांत त्याला बायकोची शंका यायची, की ती
ओरडून कामोत्तेजनेचं ढोंग करते. ही आहे खरी कामोत्तेजना! मूक, बिनआवाजाची!
जेव्हां डोळे उघडले, तेव्हां
माझ्याकडे असं बघितलं, जणु पहिल्यांदा बघतेय.
“आणि मला वाटंत होतं, की आता हे
नाही होणार - - :”
पण मी म्हटलं - - :
“बेइमान”.
“म्हणजे?” (तिने
विचारलं).
अर्थ मी नाही समजावला. }}}
{{{इच्छा
होती की मी चूक असावं, पण, असं वाटतंय
की कुणाच्यातरीद्वारे धनु-कोष्ठकांना उघडायचा प्रयत्न केला गेला होता. कोणत्या ठोस
पुराव्यांच्या आधारावर नाही सांगत आहे, पण मला - - : जाणीव
करून दिली गेली आहे.
कदाचित ह्याच संबंधात, पण मी
कपितोन24 आणि रेज़ोनेन्ट एक्सेसेज़ (अनुनादी प्रचुरते) बद्दल विचार करूं
लागलो. नेहमीच्या जीवनांत अश्या प्रकारच्या घटनेला म्हणू शकतात “हद्द पार करणं”,
पण प्रस्तुत घटनेच्या संदर्भांत जास्त चांगलं राहील - - : पुन्हां
नेहमीच्या जीवनांच्या संदर्भात - - : मला सुचतोय शब्द – “बाउन्स”.
कपितोनव आणि मूखिन बराच
काळ मित्र होते;
पण पहिल्याचं मरीना रमानोव्नाशी, मूखिनच्या
भावी बायकोशी, बराच आधी परिचय झालेला होता, दुस-याच्या तुलनेत - - : बस, ह्याच संदर्भात तो
पहिला होता. माहीत नाही, की मूखिनपण असाच विचार करंत होता का,
पण व्यक्तिगत रूपाने मी, ज्याने मूखिनला
प्रतिस्थापित केलंय, कपितोनला एक साधारण सुमार व्यक्ति समजतो,
तसं, वाद नाही घालणार, मी
मूखिनच्या तुलनेंत कपितोनला कमी ओळखतो. दोन अंकांच्या संख्यांच्या स्तरावर ‘अनुनादी प्रचुरता’, माहीत नाही डोक्याची कोणची
उपलब्धि आहे - - : म्हणजे, डोकं - - : सुमार दर्जाचं कां
नाही असू शकंत? पण तरीही, आश्चर्याची
गोष्ट आहे - - : कपितोन आपल्याचं बाउन्सेसबद्दल प्रतिक्रिया व्यक्त नाही करूं
शकंत! हे बाउन्सेस कधी कधी प्रत्यक्षदर्शी लोकांवर ज्याप्रकारचा प्रभाव टाकतात,
त्याला त्यांच्या प्रदर्शनाने त्या सीमेपर्यंत नाही समजावता येणार,
जेवढं, माझ्या मते, कपितोनच्या
सहजतेने.
म्हणतात - - :
उदाल्त्सोवकडून समजलं - - : कपितोनमधे प्रचण्ड मानसिक ताणामुळे ह्याचा पत्ता लागला, जेव्हां
त्याची सहा वर्षाची मुलगी नदींत जवळ-जवळ बुडालीच होती - - : वैयक्तिक रूपांत
मूखिनला विवरणांत काही रस नाहीये; पण मला, जर हे एखादं मिथक नसेल तर, तर, तरीही ह्या मिथकाचा तोच-तोपणा त्रास देतो - - : मानसिक ताण, वीज पडणे आणि असं बरंचसं.
स्वतःला कपितोनच्या जागेवर
ठेवतो - - : दोन अंकांच्या संख्यांच्या पातळीवर उत्पन्न होणा-या आपल्या ‘रिए’चं (इथे रिज़ोनेन्ट एक्सेसेस – अनुनादी प्रचुरतेशी
तात्पर्य आहे – अनु.) मी काय केलं असतं? काय ह्याला आकस्मिक पुरस्कार समजलो असतो सर्वोच्च शक्तींचा, ज्या माझ्या आकलनापलिकडे आहेत? की ह्याला एखाद्या
आजाराचं लक्षण समजलो असतो, ज्याचं गूढ आणि विनाशक स्वरूप
अजूनपर्यंत प्रकट झालेलं नाहीये? काय ह्यांत अस्तित्वाच्या
विफलतेला पाहिलं असतं - - : वैचारिक विस्ताराला पाहिलं असतं? काय ह्याला अत्यंत जटिल आणि माझ्यापासून लपलेल्या उपकरणांच्या
प्रस्तुतिकरणाचं एक तत्व समजलो असतो, ज्याबद्दल माला कोणताच
निर्देश, किंवा टेक्निकल माहिती, किंवा
कोणच्यातरी संबंधित उद्देश्याची रूपरेषा दिलेली नाहीये? स्वतःपासून
काही लपवणार नाही - - : मला ह्या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीये.
हा विचार करणं धोकादायक
आहे की मी कपितोनवचा हेवा करतो. मला माहितीये की कोणीही असा विचार नाही करंत, पण असा
विचार करणं धोकादायक आहे.
दुर्दैवाने, कपितोनवच्या
मॉस्कोला जाण्याने अस्पष्टतेचं धुकं आणखी दाट होऊन जाईल.
आणखी एक गोष्ट - - :
ज्याच्याबद्दल आत्ता विचार करंत होतो - - : आणि खरंच - - : मूखिनंच कां? मला
मूखिनलाच प्रस्थापित करायला कशाला सांगण्यांत आलं, आणखी
कुणाला कां नाही, उदाहरणार्थ, त्याच
कपितोनवला कां नाही?
हा फक्त प्रश्न आहे; पण अत्यंत
रोचक प्रश्न.}}}
ज्याची भीति होती, तेच झालं
- - : संशोधकाने मूर्त रूप धारण केलं.
हे तर चांगलं होतं, की तो मला
‘दयाळु रूपांत’ दिसला - - : दृश्य
रूपांत नाही - : शब्द रूपांत. बस, तेवढंच.
त्याच रात्री, किचनकडे
जाताना (पाणी प्यावसं वाटलं) दाराच्या कोप-याला जोरदार टक्कर मारली. मी काही
म्हटलंतर नाही, पण माहीत नाही कां, विचार
करू लागलो - - : “कशाला?” अशाप्रकारे विचार करायला नको.
विचार अशाप्रकारे नको करायला. लगेच उत्तर मिळालं, आणि विशेष
गोष्ट ही होती - - : विचारांमधे - - :
“मृगजळ आणि
चौकीदारांसाठी”.
भीतीने मी थिजून गेलो. मला
माहीत होतं की हा कुणाचा आवाज आहे. तसं माहीत नाही, की हे कां माहीत आहे.
कदाचित, तो विचार
करत असेल, की मी लगेच बोलायला सुरुवात करेन? नाही, मी चूप राहिलो. माझ्या चूप राहण्याने अप्रसन्न,
त्याने हुकूम सोडला की मी बाथरूममधे जावे. आपल्या गुन्ह्याची मला
जाणीव होती, म्हणून मी त्याचं म्हणणं ऐकलं.
त्याने मागणी केली की मी
बोल्ट लावून दार बंद करावं. बंद केलं.
थोडा वेळ काही नाही झालं.
मी बाथ-टबच्या किना-यावर बसलो होतो. मला एका मिनिटापेक्षांही कमी वाट बघावी लागली.
बल्बच्यासमोर एक लहानसा कीडा आवाज न करता फिरंत होता - - : बादलीत घाणेरडे कपडे
असल्याचं प्रमाण. मी स्वतःला आरशांत पाहिलं, मी आपल्यासारखाच होतो - - : म्हणजे,
मूखिनसारखा. कीड्याची आठवण आली : “जणु पतंग”. मला वाटलं की तो चालला
गेला. मी विचारलं - - :
“झालं?”
आणि तेव्हां सुरुवात झाली
- - :
“मी तुला बाथरूममधे बंद
करायला इथे नाही आलोय. मी इथे ह्यासाठी आलोय, की तुला नियमांच पालन करण्याच्या
आवश्यकतेबद्दल चेतावनी द्यायचीय. तुला, कदाचित, समजलं नाहीये, की ही गंभीर बाब आहे. तर, लक्षांत ठेव. तू त्याचं उल्लंघन केलंय, ज्याचं उल्लंघन करायला नको. तू दोषी आहेस. तू असा दोषी आहे, जसा कुणीच नाहीये.”
चूप झाला. मला उत्तर
द्यायचंय. पण,
मला तर माहीत होतं, की मला आठवण दिली जाईल - -
: जसं की इतक्यातंच मूखिनच्या बायकोशी बोलताना, मी न जाणे
कां स्वीकार केलं होतं की मी कुणी मूखिन-बीखिन नाहीये. फक्त ह्याच एका गोष्टीसाठी
माझी हत्या होऊं शकली असती. पण मी आपल्या मूर्ततेच्या आयामाबद्दल इशारासुद्धा केला
होता - - : स्टेशनच्या रिफ्रेशमेन्ट रूमच्या परिचारिकेपासून देशाच्या
प्रमुखापर्यंत. मी दोषी होतो.
“मी दोषी आहे” (मी आपला
गुन्हा कबूल केला).
“दोषी? तुझ्या
स्वीकारोक्तीने काय प्राप्त होणारेय? आणि प्लीज़, लाइट बंद कर.”
“हो, हे जास्त
चांगलं होईल” (मी लाइट बंद केला).
अंधारांत त्याचा आवाज - -
: जर ह्याला मानवी आवाज म्हटलं तर - - : आणखी जास्त घुमू लागला.
तुझी चूक दुरुस्त करणं
माझं कर्तव्य आहे. आठवण करून देतोय - - : तुझ्या गतिमार्गाचा प्रत्येक बिंदु, तुझ्या
अस्तित्वाचा प्रत्येक क्षण पूर्णपणे स्कैन केला जातो. तुझं काम आहे, प्रत्येक गोष्टींत मूखिनसारखं व्हायचं, जसं प्रकृति
त्याला ओळखंत होती आणि ओळखतेय. तू स्वतःबद्दल वाट्टेल तो विचार कर, आम्हांला फक्त मूखिनमधे रस आहे, तुझ्यांत नव्हे.
पुन्हां सांगतो, त्याच्यासारखा हो.”
आपल्या विचारांमधे मी
त्याच्याशी सहमत झालो. कारण की तो विचारांतच मला ऐकू शकंत होता, वरून
माझ्या डोक्यांत - - : तो तिथेच तर स्थित होता.
“काही शंका?” (माझ्या
आंत विचारण्यांत आलं).
मी सुटकेचा श्वास घेतला.
असं वाटतं की मला दोषी ठरवण्यांत आलं होतं. मी, मान्य करतो, की
ह्याच्याहीपेक्षां वाईट गोष्टीची आशंका होती. ते सगळं, जे
त्याने मला सांगितलं, त्याच्याशिवायसुद्धा मला माहीत होतं.
मला माहीत नव्हतं का, की माझ्यावर दोषारोपण करण्यांत आलंय.
“हो, हो,
बरेचसे प्रश्न आहेत! - - : ...मूखिनंच कां, कोणी
दुसरं का नाही? कपितोनव कां नाही. कीर्किरोव, गायक कां नाही? मूखिन कोणच्या गोष्टींत श्रेष्ठ आहे?”
“कोणत्याच गोष्टींत
श्रेष्ठ नाहीये. पण निवड करण्याच्या परिस्थितींशी तुझं काही घेणं-देणं नाही. निवड
करण्याचा हक्क तुला नाहीये. आणखी काही विचार.”
“मूखिन मी काही
दिवसांपूर्वीच झालो आहे. मूखिनच्या आधी मी कोण होतो?”
“हा काय प्रश्न आहे! तुला
त्याने काय फरक पडतो,
की तू कोण होता? आणि, तू
होता तरी कां? विचारण्यासाठी तुझ्याकडे आणखी काहीच नाहीये
कां?”
“बस, असंच - -
“ हा असा मौका मिळालाय - - : सरळ तुमच्याकडून जाणून घेण्याचा - - :”
“थकबाकीसाठी ऐवजी
वासरू”
(संशोधक म्हणाला).
“???”
“अपंगाची सकाळ.
आस-याच्या शोधांत,
निर्वासितांची पाठवणी...विस्मृत
आर्टिस्ट-पेरेद्विझ्निक25 निकोलाय वासिल्येविच ओर्लोव. सत्यशोधक. की, तुला
सत्यशोधक आवडंत नाहीत? आणि : तू चक्क प्योत्र पेत्रोविच
पदमर्कोव होऊं शकंत होता, तो पीन्स्क शहरांत मुलींच्या
शाळेंत शुद्धलेखन शिकवायचा. आणि बोर्या गूरेविच, इंजिनियर
आणि त्याच्या पहिल्या बायकोबद्दल, वलेंतीनाबद्दल काय वाटतं?”
“नवरा आणि बायको - - :
एकाच वेळेस?”
“एकाच वेळेस कशाला? - - : वेगवेगळ्या
कालखण्डांत. राहिला लिंगाचा प्रश्न, तर तो आमच्यासाठी
03.00
महत्वाचा नाहीये. तुझी रूपरेषा
- - : विशिष्ठ मानसिक प्रकाराची आहे - - : आणि क्षेत्र - - : वर्तमान काळांत हे
क्षेत्र आहे उत्तर-पश्चिम.”
मी दचकलो.
“काहीच आठवंत नाहीये - - :
भूतकाळातलं.”
“जेव्हां हुकुम देतील, तेव्हां
आठवेल.”
पुढचा प्रश्न विचारायच्या
आधी विचारांना संयत करावं लागेल - - : “मला काय बराच काळ मूखिन म्हणून राहावं
लागेल?”
“मला वास्तविक मूखिनला
भेटणं आवडणार नाही. आशा करतो, की असं नाही होणार?”
संशोधक माझ्या डोक्यांत खोकला.
“वास्तविक मूखिन, जसं की तू
समजतो आहेस, मेलेला नाहीये. तो थोड्या काळासाठी
पर-अस्तित्वहीनतेच्या स्थितीत आहे...”
“पर - - : काय? - - : कोणच्या
स्थितीत आहे?”
पर-अस्तित्वहीनतेच्या
स्थितीत. पर-अस्तित्वहीनतेला घाबरू नको. पर-अस्तित्वहीनता पर-अस्तित्वाशी अश्या
प्रकारे भिन्न आहे,
जसं, उदाहरणार्थ, तू
मूखिनपासून भिन्न आहे. पण तू माझं बोलणं मधेच तोडलं. तर, तुझ्या
वैध मूखिनतेच्या सम्पूर्ण काळांत तो पर-अस्तित्वहीनतेच्या स्थितीत राहील. निश्चित वेळ
आल्यावर मूखिन तुझ्या हातातून छडी घेऊन घेईल, जशी तू मूखिनची
रिले-रेसची छडी घेतली होती - - : फक्त समानता दाखवण्यासाठी स्पोर्ट्सच्या
क्षेत्रांतील उदाहरण देतोय. शारीरिक निरंतरतेची ग्यारण्टी आहे, तशीच, जशी परस्पर उपयोगाच्या सिद्धांताची ग्यारण्टी
दिलेली आहे. मूखिनशी तुझी भेट - - : हा फालतूपणा आहे, ते
अशक्य आहे, तुला धीर देतो. तसं, जर,
कोणत्या विशिष्ठ बौद्धिक परिस्थितींवर लक्ष नाही दिलं तर - - :”
मी सतर्क झालो - - :
“म्हणजे कशा प्रकारच्या?”
“म्हणजे, अशा की,
जणु तुम्हीं अगदीच दूर नाही झालांत. ह्याबद्दल विचार नको करू. भेट
होणार नाही.”
“माझं मिशन काय आहे?” (संशोधकाला
विचारलं).
“मूखिन होणं.”
“फक्त येवढंच? माझ्यावर
कोणाची हत्या करायला तर जोर नाही ना टाकण्यांत येणार?”
“नाही, मूखिनतर
माशी मारायच्या लायकीचासुद्धां नाहीये” (तो स्वतःच्या टिप्पणीवर हसला).
“रिपोर्ट्स लिहावे लागतील
कां?”
“रिपोर्टची आवड आहे! - - :
.... काय म्हणता! - - : स्वतःच विचारतोय! तू, ब्यूरोक्रैट, डोक्यांतून हा कचरा काढून टाक! - - : ...समजलं? ही
काही ‘एलिएन्स’ची फिल्म नाहीये! - - :
मग म्हणशील ‘ऑर्डर्स’! - - : म्हणशील ‘निर्देश! - - : “ऑर्डर फ्रॉम स्पेस! - - : (माहीत नाही का, त्याला ह्या विचाराने गुदगुद्या झाल्या - - : कोणाचा विचार? - - :
“ऑर्डर्स फ्रॉम स्पेस’वाला; तो जोराने हसू लागला, पण हे हसू चांगलं नव्हतं). आता
हेसुद्धा म्हण की तुला आवाज ऐकू येतात - - :”
मला समजलं नाही, की तो
माझी परीक्षा घेतो आहे, की नुसतं मूर्ख बनवतो आहे.
“पण तुम्हीं - - : तुम्ही
काय आवाज नाहीये?”
“मी - - : आवाज?! जर मी
आवाज आहे, तर प्रकार गंभीर आहे. माझं अभिनंदन.”
त्याने आठ्या चढवल्या - -
: मला भौतिक स्तरावर ह्याची जाणीव झाली - - : माझ्या चेह-याच्या स्नायूंद्वारे.
“फक्त नाटक नको करूस!
आम्हाला हे आवडंत नाही! - - : नाही, मित्रा, नाटक
नको करूस, तू पूर्णपणे स्वस्थ्य आहेस.”
“ह्यांत काही शंका नाही, की मी
स्वस्थ्य आहे - - : पण तुमच्यातोंडून हे ऐकणं जरा विचित्र वाटतंय - - : ...तुम्हीं
तर नाकारत नाही आपल्या - - : ...वास्तविकतेला?”
“माझं वैयक्तिक मत ऐकायचंय
का? तर, ऐक, मित्रा, तुझ्या ह्या सगळ्या गोष्टी सैतानांबरोबर, सगळ्या
प्रकारच्या आत्म्यांबरोबर, काळा जादूवाल्यांबरोबर, डबल्सबरोबर, दूतांबरोबर, संदेशवाहकांबरोबर
- - : ...हे सगळे डोक्याचे खेळ आहेत - - : असल्या प्रकाराचं साहित्य आहे, असल्या प्रकारचं...तू कुठे हा विचारतर करंत नाहीयेस ना, की तू आणि आम्ही तसल्याच डोनट्सची आशा करतोय? - - : बस,
जास्त आ(शिवी) करायची गरज नाहीये! तुला समजलं?”
“पण - - : ...हा मी नाहीये
- - : ...(मी विस्मित होतो) - - : हा तर - - : ...आत्ता-इतक्यांत - - :” (‘तुम्हीं जोडायला हवं होतं, पण मी आपली जीभ चावली - - : संशोधक, कदाचित, गोष्टींमधे वाहवंत जाऊ शकतो! - - : माझ्यासाठी हा एक आविष्कार होता).
जसं की डोनट्सची गोष्ट - -
: हे कशासाठी?
मधेंच तो दृढतेने म्हणाला
- - :
“तुझ्या तुलनेंत मूखिन एक
सम्पूर्ण व्यक्ति आहे;
मूखिन - - : सम्पूर्ण आहे; तो एक युनिट आहे;
मूखिन - - : तुकड्यांमधे विभाजित नाही होऊ शकत! जेव्हां मी म्हणतो ‘मूखिन होणं’, तेव्हां माझा अर्थ आहे खरोखरंच ‘आपल्या सारखा राहा’. आम्हांला पाहिजे मूखिन
सम्पूर्णतेत, परिपूर्णतेत. तुझ्याकडून केलेली कोणतीही
हेराफेरी तुझा - - : तुला कळलंय, कुणाचा? - - : तुझा गुन्हा समजली जाईल. मी स्पष्टपणे समजावलं कां? आमच्यासाठी
तू नाहीयेस, आहे तर फक्त मूखिन!”
“वाह, असं कसं!
मी आहे, ह्याचांच अर्थ आहे, की मूखिन
नाहीये!”
“मुद्दामहून वेड नको
पांघरू (संशोधकाने म्हटलं). स्वतःला फार समजतोयेस. तू आहे कोण? मूखिनच्या
शिवाय तू आहेस कोण? तू काय फक्त मैथेमेटिकल ऑपरेटर नाहीयेस?
तू काय एका समुच्चयाच्या तत्वांच्या मधली अनुकूलता नाहीयेस? तू - - : कोणी नाहीये. तू मूखिनच्या विना नाहीयेस! तू नाहीये, मूखिन आहे! तू - - : मूखिन आहेस! आपल्या सीमेत राहा, मूखिन! मूर्खपणा करू नकोस! माझं म्हणणं ऐक!”
“कोन्स्तान्तिन! हे तू
कोणाबरोबर बोलतोय?”
“हे कोण आहे?” (संशोधक
उत्तेजित झाला).
“घोडा आहे कोटांत! (त्याने
मला ताव आणूनंच दिला!) माझी बायको, मूखिनची बायको!”
“आ-आ - - : ...मरीनोच्का -
- : ...मग ठीक आहे,
काही हरकत नाही - - :”
“कोस्त्या, तू लाइट
कां बंद केलास? तू बंद कां झालायेस? तू
तिथे करतो काय आहे?”
“तर, तू लाइट
कां बंद केलास? तू बंद कां झालायेस? तू
तिथे करतो काय आहे?” (बायकोची नक्कल करंत, उपहासाने तो माझ्याकडे वळला).
मला ह्यांत काही गंमत नाही
दिसली. कदाचित त्यालापण समजलं की जरा जास्तंच करतो आहे - - : त्याने सांत्वना
द्यायचं ठरवलं - - :
“मूर्खपणा. स्टैण्डर्ड
सिचुएशन. आम्ही ह्याला ‘मीडियन’ म्हणतो. तू कधी मीडियनबद्दल ऐकलंय?”
“त्रिकोणांत - - : ती
त्याला दोन भागांत विभक्त करते - - :”
“नाही. आम्ही मीडियनला
वेगळ्या अर्थाने समजतो. मीडियन - - : ही, म्हणजे, जेव्हां
तुम्हीं-आम्हीं वाद घालंत असतो, आणि कुणी तिसरा, बहुतकरून एखादी बाई, ऐकते आणि बेकारचे निष्कर्ष
काढते, स्टैण्डर्ड सिचुएशन, मी म्हणतो.
साहित्यांत आणि फिल्म्समधे भोक होईपर्यंत झिजलेला, असभ्यतेपर्यंत,
तिथे डोनट्सने काम नाही चालंत”.
पुन्हां डोनट्सबद्दल.
“कोस्त्या, प्लीज़,
दार उघंड, मला बाथरूमला जायचंय.”
“खोटं बोलतेय (संशोधकाने
म्हटलं). तिला कुठेच नाही जायचंय”.
“बडबड बंद कर! (बायको
ओरडली). मला घाबरवू नको!”
“तू काय बडबड करतोस? (संशोधकाने
विचारलं). तू, काय कोणाला घाबरवतोस?”
“दार उघड, मी गंमत
नाही करंत आहे!”
“व्वा-व्वा, जसं पाठ्य
पुस्तकांत असतं.”
“कोस्या! काय दार तोडावं
लागणारे, चांगला धडा शिकवीना!”
“काय ताकत आहे! (संशोधकाने
म्हटलं). किती उत्साह आहे!”
मी स्वतःला आवरू नाही शकलो
- - :
“कमेन्ट्सशिवाय काय काम
नाही होऊ शकंत?”
आपल्या कमेन्ट्सनी मला
वैताग आणला. हा स्वतःला समजतो काय आहे? परक्या घरांत, परक्या डोक्यांत!...मी बायकोला समजू शकतो, ती
त्रासली आहे. जर ती अशी बाथरूममधे बंद होऊन, तिथे कुणातरी
बरोबर गोष्टी करंत असती तर मी स्वतःपण त्रासलो असतो. मी शक्य तितक्या जोराने
ओरडलो:
“घाबरू नको! लवकरंच
उरकेन!”
शांतता पसरली. बायको, आणि तो,
आणि मी शांततेला चाचपडंत होतो. आधी तो म्हणाला - - :
“मीडियनला अनेक प्रकारांनी
निष्क्रिय करता येतं. आवाजाला कुजबुजण्याच्या स्तरापर्यंत कमी करता येतं.
मोबाइलच्या संभाषणाची नक्कल करूं शकतो. हल्ला करणारे इलेक्ट्रिकल उपकरण चालू करू
शकतो, जसं फैन. बहुधा मीडियनकडे लक्ष न देणं फायद्याचं असतं, पण हे थोडी हुशारी वापरून करायला हवं. तुझ्यासमोर सगळ्यांत मोठा धोका हा
आहे - - : मेंटल हॉस्पिटलमधे घेऊन जातील; तिथेसुद्धां लोक
राहतातंच. हे भयानक नाहीये.”
“मी वेडा नाहीये” (मी
म्हटलं).
“आणि मी तुला काय सांगितलं? आपण
स्वतःचीच पुनरावृत्ति करत आहोत.”
“जर तू पागल नाहीयेस
(बायको ओरडली),
तर लगेच बाथरूममधून बाहेर ये!”
मी ओरडलो - - :
“आत्तांच!”
“काही आत्तांच-बित्तांच
नाही! (संशोधकाने थांबवलं). आपलं संभाषण अजून पूर्ण झालेलं नाहीये!”
पण तेवढ्यांत दार भयंकर
चरमरू लागलं - - : तिने खालून काहीतरी घुसवलं होतं.
“न घाबरता! (संशोधक पट्कन
बोलला). टेलिफोनचा उपाय - - : चल! शंभर टक्के ग्यारंटी”.
मला समजलं, मी ओरडलो
- - :
“तुझं काय झाकंण-बिकणं
उडालंय का? तू काय दार तोडायला निघालीये? मी फोनवर
बोलतोय!...खूप ज़रूरी गोष्ट आहे, आणि तू आहे की सारखी
डिस्टर्ब करते आहेस!”
आणि आम्ही दोघं, आणि
दाराच्यामागे बायको - - : एकदम चूप, शांत आहोत, विचार करतो आहे; वाट बघतोय की शांततेला आधी कोण भंग
करेल. मला संशोधकाच्या विजयाचा अनुभव होत होता, निःशब्द,
शब्दांनी प्रकट न होणारा...मला हे बिल्कुल आवडंत नव्हतं. इथे मी
काहीही ओरडलो, तरी मी होतो तर बायकोच्याच बाजूने - - :
बायकोने नाही, तर ह्याने मला बाथरूममधे ढकललं होतं.
संशोधकाचा आवाज आधी निघाला, पण खूपंच
हळू. कदाचित, त्याने हे म्हटलं होतं - - :
“ठीक आहे” - - : जर
मी बरोबर ऐकलं असेल तर. पुढे - - : कुजबुज करंत - - : “तुझ्याबरोबर मूखिनच्या
खतरनाक सवयींबद्दल चर्चा करायचीय, आणि सगळ्यांत आधी...”
मरीना - - :
“खोटं बोलतो आहेस, कोस्त्या.
तुझा टेलिफोनतर टेबलावर पडलाय”.
तो रागाने गुरगुरला.
“ईडियट”. (मी आपला
दुर्भावनापूर्ण आनंद लपवायचा प्रयत्न नाही केला. हुशार आहे. चांगला धडा शिकवला
ह्याला. तेव्हांच पहिल्यांदा मी त्या ताकदींच्या अपूर्णतेवर विचार केला, ज्यांचं
प्रतिनिधित्व तो करंत होता. धनु-कोष्ठकांच्या संरक्षक गुणांना मी तोपर्यंत नीट
समजू शकलो नव्हतो, हे तर नंतर झालं, पण
तेव्हां - - : मीडियनला लगेच बाजूला करायचं होतं.) आता पुढाकार मला घ्यायचा होता;
मी आपला प्रस्ताव मांडला - - :
“मी सांगेन, की मी
आपलं भाषण तयार करतो आहे. शनिवारी मेर्द्याखिनची ‘जुबिली’
आहे - - :”
“कुठला मेर्द्याखिन?! कसली ‘जुबिली’?! (संशोधक खूपंच तापला होता). ठीक आहे,
बस! आजच्यासाठी इतकंच पुरे. मी मागणी करतोय - - : सिग्नल देशील”.
ह्या गोष्टीवर विश्वास
कमीच होत होता,
की मी त्याच्यांतील मागणीला अनुभवलं होतं, पण
तरीही विचारल्याशिवाय राहू शकलो नाही - - :
“सिग्नल - - : ते काय आहे?”
“तू आपलं डोकं लढंव. आठव, ह्या
शाल्यापिनला, रॉबिन्सन क्रूसोला - - : मग त्याला - - : ज्याने विमानाचा
आविष्कार केला होता - - :”
त्याचं, जणु काही,
स्विच-ऑफ झालं, पण ‘खट्’चा आवाज न करता. मी दीर्घ श्वास घेतला; हाताने स्विच
चाचपडलं; लाइट लागला. मी बाथरूममधून बाहेर आलो.
मरीना हुंदके देत-देत रडंत
होती, हातात हैमर पकडला होता.
“चोरटी-गोरटी” (मी आवाजांत
शक्यतितका नाजुकपणा आणंत म्हटलं).
तिच्याकडे गेलो, तिला
आपल्या बाहुपाशांत घेऊन गालांचा मुका घेतला.
तिचा गाल खूप गरम होता, जणु जळंत
होता. कदाचित, मी विचार केला, की माझे
हात भयंकर गार आहेत.}}}
{{{आज मला
खूप वाईट स्वप्न पडलं, ज्याचा संबंध माझ्याशी तेवढा नसून,
मूखिनशी होता. ही फार अप्रिय गोष्ट आहे – असे स्वप्न पाहणे, जे प्रकृतीने तुमचे नाहीत, आणि विशेषकरून, ज्यांचा संबंध तुमच्या स्वतःच्या भूतकाळाशी नसतो.
मी हे स्वप्न सांगणार नाही, फक्त
त्याच्या प्रकृतिबद्दल सांगतो - - : किंवा असं, की त्याच्या
प्रकाराबद्दल. जणु मूखिनच्या जीवनातील एका घटनेशी संबंधित परिकल्पनेशी माझा
साक्षात्कार झाला.
तिथे - - : स्वप्नांत - -
: ती परिकल्पना मला अत्यंत विश्वसनीय वाटली, अशी, जिच्याशी
मी कधीच सहमत नसतो झालो, जेव्हां जाग आली, सौभाग्याने, मी जागांच झालो. तर, सकाळी ‘ब्यूस्टे’त पोहोचून,
काही विशिष्ठ प्रमाण शोधताना, भाग्य माझ्यावर
मेहेरबान झालंच - - : प्रश्न हा आहे, कोणाचं भाग्य - - :
माझं की मूखिनचं?
हे असं झालं. लंच-ब्रेक
मधे, जेव्हां नेहमीसारखे आमचे सगळे लोक जवळच्या फास्ट-फूड सेन्टरमधे गेले,
तेव्हां मी अलीनाच्या टेबलचा चक्कर मारला आणि खिडकीच्या जवळच्या
तिच्या अलमारीत ठेवलेल्या फाइल्सचं निरीक्षण केलं. ज्या फाइल्सवर अलीना काम करंत
होती, त्यांच्यावर असं लिहिलं होतं - - : “अट्टल गुन्हेगार”,
“लैंगिक अपराधी”, “तीक्ष्ण-बुद्धि”, “बापाचे हत्यारे” इत्यादि. ह्या वर्गीकरणाने, सौम्य
शब्दांत सांगायचं तर, मला चकित केलं - - : एकंच चेहरा,
एकसारख्याच सफलतेने एकदम कित्येक फाइल्समधे असण्याची शक्यता असूं
शकते. मला माहीत होतं, की हे शीर्षक अलीनाने नाही लिहिले आणि
हेसुद्धां की त्या अशाच अवतारात संशोधन करणा-या क्लायन्टकडून आमच्या ‘ब्यूस्टे’मधे आलेल्या होत्या, ह्या
फालतू गोष्टींच्या वर्गीकरणाबद्दल असलं प्रेम समजणं माझ्यासाठी बरंच कठीण होतं.
बरं, ठीक आहे. मला “मायावी” शीर्षकाच्या फाइलने आकर्षित
केलं. मी पट्कन फाइल उघडली आणि, पानं उलटंत ‘त्याला’ शोधू लागलो. ‘त्याचाच
फोटो’. जो माझ्यासारखा आहे. माझ्या सारखा - - : तरुणपणी.
तोचतर ह्या रात्री माझ्या
स्वप्नांत आला होता,
नाहीतर मी त्या फाइलमधे नसतो घुसलो.
अलीनाने चेह-याच्या
मापदण्डांना,
अंशतः, लांबी मापण्यासाठी कम्पासचा उपयोग
केलेला होता, म्हणून चेह-याच्या विशिष्ठ बिंदूंवर
खुपसल्याच्या खुणा होत्या, आणि डोळ्यांबद्दलतर चक्क सांगता
येईल, की त्यांना काढून टाकलं होतं. मला हे आवडलं नाही.
मी लवकरंच त्याचा फोटो
शोधला.
हासुद्धां डोळे काढून
टाकलेला होता.
काढून टाकलेले डोळे असलेला, तरुणपणी
माझ्यासारखा, त्याच्याबद्दल विचार करणं खूपंच अप्रिय वाटंत
होतं.
पण तो काय माझ्यासारखा
होता, हासुद्धां एक प्रश्न आहे. ह्याचंच उत्तर देणार आहे. हीच
मुख्य गोष्ट होती.
जोपर्यंत टोचल्याच्या खुणा
आणि डोळे बाहेर काढण्याचा संबंध आहे, तर हा शेवटी एक टेक्निकल प्रश्न
आहे, हा सरळ-सरळ मोज-माप केल्याचा परिणाम आहे, ही गोष्ट मी समजंत होतो.
मी त्याच्याकडे पाहिलं - -
: जवळ-जवळ माझ्यासारखा,
पण, तो मी नव्हतो. मी असा नव्हतो. पण काहीतरी
साम्यसुद्धां होतं.
फोटोला उलटून बघितलं
(प्रत्येका फोटोमागे लिहिलं होतं, की कोण आहे, काय आहे) -
- : पेन्सिलीने - - : “ईगर अलेक्सेयेविच झीलिन”, जन्म तारीख,
जन्म स्थान - - : “अत्यंत क्रूरतेने आपल्या
सावत्र बापाला मारून टाकलं. वान्टेड.”
मी बराच वेळ ह्या नोंदीकडे
बघंत होतो, माझे विचार, जसं की ह्यावेळेस म्हणू शकतो, खूप गुंतागुंतीचे झाले होते; माझ्या बोटांच्या
थरथरण्यामुळे त्या ओळी एका तालांत थरथरंत होत्या.
मी झेरोक्स मशीनकडे गेलो
आणि दोन्हीं कडून प्रत काढली.
फोटो परंत फाइलमधे ठेवला.
फाइलला परंत जागेवर ठेवून दिलं. टेबलाशी बसलो - - : आपल्या टेबलाशी. माझं टेबल
काचेने झाकलेलं आहे,
जिच्याखाली बरेच फोटो आहेत, ज्यांचा
त्याच्याशी काहीही संबंध नाहीये, जो सध्या मला त्रस्त करतोय,
शिवाय, श्रमाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने
टेबलावर ठेवलेल्या काचेच्या धोक्याची मला पूर्ण जाणीव आहे - - : बोटंच वाकडे-तिकडे
व्हायचे.
मी, निश्चितंच,
काचेच्या खाली त्याला नाही ढकललं. काचेबद्दल मला स्वतःलाच माहिती
नाहीये, कशाला. मी टेबलाच्या खणांत ठेवून दिलं - - : माझ्या.
पण त्या आधी मी बराच वेळ
लक्ष देऊन त्याच्याकडे पाहिलं.
माझ्या सारखा आहे - - :
माझ्यासारखा नाहीये?
साम्य आहे, साम्य
आहे! - - :
सर्वप्रथम - - : जन्म
तारीख आणि जन्म-स्थान.
पण त्याचं आडनाव माझ्या
लक्षांत नाही राहिलं. फक्त येवढंच आठवतंय की ते दुर्मिळ होतं.
मला असं वाटलं, की
स्वप्नांत मला आठवलं होतं ( की मला स्वप्नांत काहीतरी तर आठवलं होतं), पण ह्या वेळेस आठवंत नाहीये. किंवा, फक्त, आठवायची भीति वाटत होती.
तर, परिस्थिति
अशी होती - - : मी घडी-घडी फोटो टेबलाच्या खणांतून काढंत होतो आणि लक्षपूर्वक बघंत
होतो, आणि त्याला पुन्हां परंत ठेवून देत होतो. पुन्हां
काढायचा आणि पुन्हां लक्षपूर्वक पहायचा. आणि पुन्हां परंत ठेवून द्यायचा.
शेवटी मी विचार केला - - :
स्टॉप! ह्या सगळ्याचा संबंध मूखिनशी आहे! मी – मूखिन नाहीये!
त्याच्यामुळे घाबरायची
गरंज नाहीये. मूखिनला,
जेवढं मला माहीत आहे, स्वतःलासुद्धां त्या
परिस्थितीची आठवण नाहीये, आणि, परिणामस्वरूप,
ही संभावनापण नाकारता येत नाही की तो त्यांना विसरून गेला असेल - -
: मी कां म्हणून मूखिनपेक्षा जास्त लक्षांत ठेवूं?”
खरोखरंच, जेव्हां
काही दिवसांपूर्वी अलीनाने त्याला फोटो दाखवला होता आणि म्हटलं होतं, की साम्य स्पष्ट आहे ( हा-हा : चेह-यांत?...), त्यावेळेसपण
त्याच्या
03.30
डोक्यांत
ही गोष्ट नाही आली, जी आत्ता माझ्या डोक्यांत आली आहे - - : आणि, हा काय पूर्वाभास होता किंवा आणखी काही आणि, काय-काय नाही होत? - - : तो त्याच वेळेस अदृश्य झाला, आणि मी प्रकट झालो! ...मला काय त्याच्या समस्यांचं समाधान शोधायचं आहे?
मी
मूखिन नाहीये, आणि ह्या गोष्टीने मला किंचित धीर आला, पण थोड्याचं वेळासाठी.
लवकरंच
सगळे लोक परंत आले. माझ्यासमोर बसून अलीनाने विचारलं - - :
“तुझी
तब्येततर बरी आहे ना? काही झालंय कां?”
“मी
बिल्कुल ठीक आहे. काहीही झालेलं नाहीये. हे काय प्रश्न आहेत, अलीना?”
तिने
म्हटलं की माझ्या चेह-याचा रंग उडालाय.
मी
म्हटलं की मी जेवलेलो नाहीये.}}}
{{{धनु-कोष्ठकांना
उघडण्याच्या दोन प्रयत्नांची नोंद करण्यांत आलीये. हल्ल्याचं स्त्रोत अजून स्पष्ट
झालं नाहीये. बुधवारपर्यंत शांत राहीन. कदाचित, बुधवारी एका एब्स्ट्रेक्ट थीमवर लेक्चर देईन.}}}
{{{तुम्हीं विचारतांय की
विसंगत्यांवर काबू करणं कठीण आहे का. तुम्हांला कसं सांगू. अंशतः, हो, पण अंशतः, नाहीसुद्धा आहे; जर सगळ्या गोष्टींना
त्यांच्या समग्रतेंत घेतलं, तर अंतिम परिणाम, नक्कीच, पूर्णांशच असेल. बरंच काही सहयोग्यांवर अवलंबून असतं; आणखीही जास्त - - :
त्यांच्या बायकांवर, आणि स्थूल प्रमाणांत बायकांवर, मग त्या कुणाच्याही असोत, कारण की पुरुषांपेक्षा बायकांना बरंच काही जास्त दिलेलं आहे, पण, हा एक नाजुक आणि बराच
वादग्रस्त प्रश्न आहे. बोटांवर समजावणं कठीण आहे, पण ह्याहीपेक्षा जास्त कठीण आहे दुस-यांच्या विचारांचं केंद्र असणं. वरून, प्रत्येक विचार तर साकार नाही करता
येत. प्रत्येक विचार नाही!
काल
मी असंभाव्य घटनांच्या संभावनांना सशक्त करण्यासंबंधी एका डॉक्यूमेन्टवर हस्ताक्षर
केले. नोंदणी सुरू झालेली आहे, पण सध्या अनौपचारिक रीत्याच होते आहे. जेव्हां फळं पिकतील, तेव्हां त्यांना तोडू.
फळा-फळांतही अंतर असतं, नाहीतर तेसुद्धां होऊन जातं, जे कधीच होऊं शकंत नाही.}}}
03.32
हस्तलिखित
संपलं. कपितोनवने नोटबुक बंद केली.
बाहेर
बर्फाचा हल्ला होत आहे, तो खडखड करंत पाण्याच्या पाइपमधून खाली जात आहे. जणु बर्फ वितळतोय. हेच आहे पीटरबुर्ग:
दिवसा माइनस अकरा डिग्री, रात्री – उष्णता, तपमान प्लसमधे. सकाळी पुन्हां बर्फ पडेल, आणि स्केटिंग रिंग(रिंक) तयार होऊन जाईल.
गच्चीवर
थेंबांचा कानांना बधिर करणारा आवाज होतोय.
हॉटेलमधे
सगळं केव्हांच शांत झालंय. एक्स्पर्ट-चीटर्स आणि अत्यंत सूक्ष्मधारीसुद्धा शांत
झाले होते. भिंतीच्यामागे काळ-भक्षक शांत झाला होता. काळ थांबलाय कां?
03.34
साइड
टेबलवर, रिकाम्या
‘मग’च्या शेजारी नोटबुक ठेवून कपितोनव
बिछान्यावर पडतो आणि डोक्यावरचा लैम्प ‘ऑफ’ करतो.
03.35
आणि
त्यानंतर? – त्याची
स्वतःलाच विचारायची इच्छा होते (आणि खरोखरंच कपितोनव स्वतःला विचारतो).
पण
पुढे काय झालं, ह्याबद्दल उत्सुकता कां असावी, जेव्हां जास्त जरूरी आहे हा प्रश्न : हे खरोखरंच झालं होतं कां?
कपितिनव
छताकडे बघतो.
पहिली
गोष्ट, शैली. जितपत कपितोनवला
आठवतं, मूखिनची भाषा साधारण
मानवीय भाषा होती, चक्क ‘मानवीय’ भाषा आणि जरासुद्धां ‘मानवांसारखी’ नाही. कपितोनवने कदाचित मूखिनचे लिहिलेले काही लेख वाचले होते, जसं की, उदाहरणार्थ, इतरांसारखाच मूखिनपण
इंटरनेटच्या सोशल साइट्सवर बरांच लोकप्रिय होता, पण, जर
कपितोनवला ते लेख आठवंत नाहीये, तर हे ह्या गोष्टीचं प्रमाण आहे की त्यांच्यात काहीही अतिशयोक्ति नव्हती.
ही
गोष्ट मान्य करता येईल, की मूखिनने एखाद्या साहित्यिक-फैण्टेसीची कल्पना केली असेल – प्रथम पुरुषांत, कां नाही? – पण, मग त्यांत आपल्या
जीवनातील वास्तविक घटना खुपसायची, वास्तविक नाव प्रकट करण्याची काय गरज होती? आपल्या वैयक्तिक जीवनाला अशा विचित्र आणि अवास्तविक रूपांत दाखवायची काय
गरंज होती? त्यांत
कपितोनवला खेचण्याची काय गरंज होती, तेसुद्धां उपहासात्मक संदर्भात? कपितोनवने त्याचं काय घोडं मारलं होतं?
आणि, सगळ्यांत प्रमुख गोष्ट
“कां” : त्याने नोटबुकमधेच कां लिहिलं – हाताने? मरीना बरोबर म्हणते – हेच सगळं कम्प्यूटरवर लिहिणं कित्ती सोपं झालं असतं!
हैण्डराइटिंगची
गोष्टतर सोडूनंच द्या. त्याने काय कुठे शुद्ध आणि सुलेखनाचा कोर्स केला होता?
तसंही, कुठेसुद्धां शाईचा एकही
डाग न सांडता लिहिलं आहे.
आणि
तसं पण, हे
सगळं लिहिलं कशासाठी आहे? मूखिनने कागदावर हा काय फालतूपणा लिहिला आहे? कशासाठी? कुणासाठी? काय स्वतःसाठी?
कपितोनवच्या
डोक्यांत दोनंच प्रकारचे उत्तरं येतात:
-एक
तर मूखिनची गाडी रुळावरून घसरली होती;
-
किंवा ...त्याला खरंच प्रतिस्थापित केलेलं होतं.
जर
त्याला प्रतिस्थापित केलं गेलं असतं, तर सगळं ठीक झालं असतं: हे मूखिनने लिहिलंय, त्या मूखिनने बिल्कुल नाही, ज्याला कपितोनव ओळखत होता.
पण
मग तेव्हां स्वरूपसुद्धां विषय-वस्तुच्या अनुरूप असतं. दुसरा माणूस – त्याला
काहीही विचारू शकंत नाही.
कपितोनव
बाथरूममधे जातो, शॉवर घेतो, दात ब्रश करतो, आणि शेव करूं लागतो ( लवकरंच सकाळ होण्यांत आहे – आत्ताच कां न उरकून घ्यावं?) हे सगळं करताना कपितोनव
सतत मूखिनबद्दलच विचार करतो आहे.
तो
विचार करतोय की उत्तराच्या दोन्हीं विकल्पांमधे जास्त अंतर नाहीये. मूखिन, नक्कीच रुळावरून घसरला
होता. आणि रुळावरून घसरलेला मूखिन – हा, नक्कीच, दुसरा मूखिन होता. म्हणूं शकतो, की दुसरं व्यक्तित्व.
कपितोनवला
आशा आहे, की
झोप लागेल. लागोपाठ झोप न झाल्यामुळे तीन तासांची झोपसुद्धां उपहारासारखीच वाटेल.
पण, त्याला ब्रेकफास्टला पण
फाटा द्यायचा नव्हता. त्याने मोबाइलवर 7.30चा अलार्म लावला.
पण
आता किती वाजलेयत?
4.07
तो
पडतो. डोळे बंद करतो आणि अचानक बघतो की खूप सारे धनु-कोष्ठक डोकावतांत आहेत.
त्याने
पुन्हां छताकडे एकटक बघितलं – बाहेरून येणा-या लाइटने प्रकाशित झालेल्या खिडकीच्या
अंधुकश्या प्रतिबिंबावर. की, हे बाहेरून प्रकाशित होत असलेल्या खिडकीचं प्रतिबिम्ब कपितोनवकडे टक लावून बघंत
होतं?
तसा
खिडकीचा पडदा छतावर पडंत असलेल्या चौकोनाला विझवतो आहे, पण तरीही तो वास्तविक खिडकीच्यामागे पडंत असलेल्या बर्फाला प्रतिबिंबित
होण्यापासून थांबवंत नाहीये. बर्फ तुटक-तुटक ठिपक्यांच्या रूपांत चौकोनाच्या एका
बाजूकडून दुस-या बाजूकडे घसरतो आहे – खिडकी लगतच्या भिंतीकडून दाराच्या
भिंतीपर्यंत. कपितोनव नजर नाही काढंत. छतावरचा चौकोन दुस-या आयामांत उघडंत
असलेल्या टेक्निकल ‘हैच’ सारखा
वाटतोय, ज्यांत
डावीकडून उजवीकडे सावल्या चालताहेत. अचानक असं वाटलं, की ह्या सावल्या नाही, तर त्यांच्या सापेक्ष खुद्द ‘हैच’च
चालतंय – खोलीबरोबर – उजवीकडून डावीकडे. आणि त्या स्थिर आहेत. आणि त्याला असं
वाटलं की पाठीवर झोपलेला कपितोनवसुद्धां पलंग आणि खोलीबरोबर, फिरतो आहे, उजवीकडून डावीकडे, आणि सावल्या स्थिर
ठिपक्यांच्या रूपांत, अश्याप्रकारे झपाट्याने फरपटंत आहेत, जसं टेक-ऑफ़ करंत असलेल्या विमानाच्या उघड्या ‘हैच’मधे
रेतीवर असलेले स्थिर खडे. असा विचार करतानासुद्धा भीति वाटते, की तुम्हीं कसे ह्या ‘हैच’मधे तोंडावर पडताहात, आणि तिथेच राहून जाता, अचल अवकाशांत, अचल सावल्यांच्यामधे, हे माहीत असूनही की मागचा ‘हैच’ कुठे
डावीकडे सरकलांय, रिकाम्या झालेल्या खोलीबरोबर आणि तुमच्या सम्पूर्ण विश्वाबरोबर, ज्याचा, आधीसारखीच, ही खोली एक अंश आहे, पण तुम्हीं आता नाहीये.
पलंगाचा कोपरा धरायचीही इच्छा झाली, ज्याने, जर अचानक आकर्षण-शक्ति प्रकट झाली, तर त्यापासून वेगळं नाही होणार आणि छतावरच्या अंधुक ‘हैच’मधे नाही पडणार. पण तो तसं नाही करंत, फक्त डोळे मिटून घेतो.
धनु-कोष्ठक
पुन्हां प्रकट झाले. तेव्हां तो स्वतःला असं समजावंत शांत करण्याचा प्रयत्न करतो, की हे त्याचे वैयक्तिक
नाहींत, तर
मूखिनचे फालतू नोट्समधले आहेत. असंच आहे – कोष्ठक किंचित एकीकडे झुकलेले आहेत, जी हाताने लिहिलेल्या
मजकुराची विशेषता आहे. तो ठरवतो, की त्यांचाशी उपभोक्त्यासारखा वागेल आणि तो त्यांना मोजणं सुरू करतो, जणु ते हत्ती असावेत. एक
कोष्ठक, दोन
कोष्ठक, तीन
कोष्ठक...अकरा कोष्ठक...नैचुरल सिक्वेन्स – गणिताच्या दृष्टीने खूप गणना, त्यांना ‘फिबोनाची सिक्वेन्स’26मधे ठेवणं जास्त चांगल
राहील कां? समस्या
ही आहे, की
धनु-कोष्ठक हत्ती नाहीत, आणि ते अप्रत्याशितपणे प्रकट होतात, कधी एकटे, कधी जोडीने, आणि समजंत राहा की कोण कुठे बघतंय. त्यांच्या अनधिकृत अवतरणापासून सुटका
करून घेण्यासाठी तो उपभोग्य पदार्थाच्या रूपांत त्यांचा उपयोग करायचा विचार करतो
आणि एक गणितीय फॉर्मूल्यावर विचार करू लागतो. पण ह्याच्यासाठी आधी गोल आणि मग
वर्गाकार कोष्ठकांना ठेवावं लागेल. ते, जे वर्गाकार कोष्ठकांमधे आहे, त्यांत आरामांत एकाचा अंक जोडतो आणि हे सगळं क्रमवार पद्धतीने सोडवण्याचा
निर्णय घेतो...सगळं त्याचं वर्गांत – ह्याप्रकारे धनु-कोष्ठकांची पहिली जोडी
संपली. त्याने पुन्हां एकाचा अंक जोडला आणि धनु-कोष्ठकांची दुसरी जोडी संपवून, ही सगळी सामग्री तिस-या पायरीवर
आणतो. त्यानंतर, एक जोडल्यावर धनु-कोष्ठकांच्या पुढच्या जोडीला संपवतो, हे सगळं चौथ्या पायरीवर
आणतो. पाय-यांच्या वाढत्या क्रमाबरोबरंच त्याच्या डोक्यांत धनु-कोष्ठकांची गर्दी
होऊं लागते. आता तो हत्यांसारख्या पाय-या मोजू लागतो, ज्यांच्यावर धनु-कोष्ठकांच्या आत जखडलेलं ठेवलं जातंय. झोप येतंच नाहीये. मग
त्याला पुन्हां आठवतं की हे त्याचे नसून परके कोष्ठक आहेत, आणि तो मूखिनबद्दल विचार
करंत राहतो. मूखिनबद्दल विचार न करण्यासाठी तो डाव्या कुशीवर वळतो.
तो
ऐकतो, की कसं घड्याळासारखं
05.15
उशीला
टेकलेल्या डाव्या कानशीलांत, रक्त टिक्-टिक् करतंय.
रक्त, रक्त, रक्त, रक्त.
रक्त
– रक्ताचा ग्रुप (ब्लड-ग्रुप) आणि Rh.
तेव्हां
त्याला तिचा ब्लड-ग्रुप माहीत नव्हता.
मूखिनने
फालतूचंच लिहिलंय. कोणीही बुडंत नव्हतं, नदीत नाही, आणि समुद्रांतही नाही, असं काहीही त्याप्रकारे झालेलं नव्हतं. दुस-याच प्रकाराने झालं होतं.
फुटका
काच होता, प्लेटफॉर्म
होता आणि सहा वर्षाच्या अन्यूताचं रक्त होतं. आणि डॉक्टर्स होते. तिच्या ग्रुपचं
ब्लड मागवायचं होतं. वेळ बिल्कुल नव्हता, एक मिनिटसुद्धां नाही. टेलिफोन होता, भाच्याचा नंबर होता शेवटच्या दोन अंकांशिवाय. त्याने नंबर दाबला – शेवटचे
दोन अंक अंदाजाने दाबले. आश्चर्यच झालं – नंबर लागला. पण तसं नाही : आधी त्याला एक
अंक दाबायचा होता, मग दुसरा, पण दाबला तिसराच – आणि बरोबर दाबला. “वान्या, नीना आण्टीला बोलाव, ती जवळंच आहे? लगेच.” (नीनाचा फोन त्या दिवशी हरवला होता.) “नीना, ह्यावेळेस काहीही विचारू
नकोस, अन्यूताचा ब्लड-ग्रुप
आणि Rh सांग”. तिने लगेच स्पष्ट
सांगितलं : “दुसरा, प्लस”.
कपितोनवला
आता काहीही आठवंत नाही, की त्यानंतर काय झालं होतं, आणि हेसुद्धां नीट आठवंत नाहीये की त्याच्या आधी काय झालं होतं. पण तो
फोन-कॉल त्याला न केवळ चांगलाच लक्षांत आहे, तर तो त्याच्या स्वामित्वांत आहे, जणु तो एखादी वस्तु असावा – एखादी ठोस वस्तु – जसं त्या ‘बीच’वर लागलेल्या कंकालासारख्या उपकरणाच्या दुहेरी हुक सारखा, ज्याचे पंख वा-याबरोबर
खाली-वर होतात.
कपितोनवला
तो अंक लक्षांत आहे, पण तो त्याच्याबद्दल विचार नाहीसुद्धां करूं शकंत. ही त्या तीन दुहेरी
अंकाच्या संख्येमधील एक संख्या आहे, जिच्याबद्दल कुणीही विचार नाही करंत. त्याला माहीत आहे, की ह्याबद्द्ल विचार
करण्यास मनाई आहे.
त्याच्याजवळ
ह्याबद्दल विचार न करण्याची योग्यता आहे.
वाट्टेल
त्या बद्दल विचार करा, पण कोण्या दुस-या वस्तुबद्दल विचार करा (आदर्श परिस्थितीत कशाबद्दलंच नाही), आणि हे ‘दुसरं” त्याला दिसतं एखाद्या
व्यक्तीच्या किंवा एखाद्या गुणाच्या स्वरूपांत – कधी जंगली उंदीर, तर कधी निकोल मैरी
किडमैन, तर
कधी एखाद्या घराच्या दर्शनीय भागावर बनलेलं शिल्प, तर कधी विनाशाचा सिद्धांत.
त्याला
खात्री आहे, की
कोणच्यातरी दुस-या वस्तुबद्दल विचार करतोय आणि हे, की जागाच आहे, झोपलेला नाहीये, आणि फक्त झोपायची इच्छा आहे, पण झोपेसारखी कोणचीतरी वस्तु येते तर खरं – सकाळी-सकाळी. तरीही त्याला कळतंय, की हे स्वप्न नाहीये, कारण की झोपला नाहीये, आणि, जेव्हां मोबाइलचा अलार्म
वाजूं लागतो,
07.30
तेव्हां
थकव्याने चूर-चूर झालेला, दुःखाने डोळे उघडतो, की उगीचंच बिछान्यांत पडून राहिला. पण ते, स्वप्नासारखं, विसरता नाही आलं, जसं की त्यांच्याबरोबर, स्वप्नांबरोबर (त्यांच्याबरोबर आणि आमच्याहीबरोबर) होतं, आणि ह्याच्या विरुद्ध, लक्षांत राहतं. आणि आठवण होते फक्त संक्षिप्त रूपांत. आणि जर ते आहे, तर तेसुद्धां
स्वप्नासारखं – स्वप्नंच होतं. कदाचित, स्वप्न, थोड्याच वेळासाठी होतं, पण तरीही स्वप्न तर होतंच.
अलार्म
बंद करून, कपितोनव
बिछान्यांतच राहिला – स्वप्नाचा सारांश पुनर्जीवित करावं लागेल.
07.31
जंगली
उंदीर. कपितोनवच्या बालपणातला. पिंजरा, त्यांत लाकडाचा भूसा, पाण्याचं भांड, खाण्याची वाटी आणि चिमुकलं घर.
विशेष
म्हणजे – रक्ताबद्दल नाही, फुटक्या काचेबद्दलही नाही...
चिमुकलं
घर, प्लास्टिकचं क्यूब आहे, मीठाच्या बरणीपेक्षाही
लहान. एक भोक, गोल – आत जायला आणि बाहेर यायला. साइज – मोठा आलुबुखारा जाऊ शकतो, पण कोंबडीचा अंडा –
मुश्किलीनेच जाईल. जंगली उंदीर अरुंद जागेंत राहाणंच पसंद करतो – बाहेरून
खेचंत-खेचंत लाकडाचे चिप्स घरांत आणतो, पूर्ण घर त्याने भरून टाकतो. आत येण्याचं दार लाकडाच्या चिपने बंद झालं. खरं
सांगायचं तर हे अजूनपर्यंत स्वप्न नव्हतं, पण स्वप्नाची सुरुवात होती. सगळ्या गोष्टींकडे बघतां असंच वाटतंय.
स्वप्नंचतर आहे हे. जर झोप आहे तर.
कपितोनव
बोटाने लाकडाची चिप बाहेर काढतो आहे, पण उंदीर माघार घ्यायला तयार नाहीये, पण तो कसा नाही हरणार? कपितोनवचं बोट चिपपर्यंत पोहोचतं. बघतो की तिला पुन्हां खेचलंय. तो तिला
पुन्हां बोटाने बाहेर काढतो. बघतो, पुन्हां परंत. पुन्हां बोटाने, पुन्हां.
हे
स्वप्न नसूपण शकतं, फक्त एखादी आठवण असेल (लहानपणी एकदा असं झालं होतं ; तो जंगली उंदराच्या
घरातून लाकडाची चिप काढंत होता), बस, आता
एक मुलगा नाही, तर मोठा माणूस – पूर्ण शुद्धीत चिप बाहेर काढतोय.
डॉक्टर
फ्रायड सगळ्यांत मोट्ठा मूर्ख ठरला असता जर तो जंगली उंदराच्या लगेच नंतर
कपितोनवच्या डोक्यांत आला नसता. जंगली उंदराची आठवण काढंत कपितोनव स्वतःला विचारतो
: ह्यांत कुठे सुप्त समलैंगिकतातर नाहीये? स्वतःच उत्तरसुद्धां देऊन टाकतो की असं नाहीये. तसं सांगायचं तर, त्याचं हे मत आहे, की सुप्त समलैंगिकतेचा
आविष्कार वास्तविक लोकांनी केला होता, सुप्त लोकांने नाही, पण ह्या आकलनातही सुप्त समलैंगिकता तर नाहीये? जर काही लोकांचं म्हणणं ऐकलं, तर ती सगळीकडे आहे, डॉन जुऑनमधे तर ती खूपंच जास्त आहे...आणि, मूखिन ह्या नोटबुकमधे कपितोनवबद्दल जे असामान्य आकर्षण दाखवतो आहे, कुठे त्यातही सुप्त
समलैंगिकता तर नाहीये? आणि, जे
‘तलावा’ने कपितोनवला कॉन्फ्रेन्सला आमंत्रित
केलं, कुठे त्यामागेसुद्धां
सुप्त समलैंगिकता तर नाहीये? आणि, तसंही, कॉन्फ्रेन्समधे महिला
इतक्या कमी कां आहेत?
उठला
आणि कपडे घातले. सकाळचे कार्यक्रम, जसे पाठ्य पुस्तकांत “My Morning” ह्या
धड्यांत असतात. ‘शेव’ करावीशी
वाटते, पण आश्चर्याने लक्षांत
येतं की, कदाचित, आधीच केली आहे, - तेव्हांच हेपण लक्षांत आलं की
तीन-चार तासांपूर्वी ‘शेव’ करून
झाली आहे.
आणि, काय सु...
पण
चेह-यावर पाणी मारून ह्या विचाराला दूर करतो. आह, ह्याने त्याला उत्साही नाही वाटलं.
स्वतःला
तुटका-फुटका (‘शेव’ केलेला)
अनुभव करंत, झोप
न झालेला (पण ‘शेव’ केलेला)
कपितोनव आपलं घरटं सोडून ब्रेकफास्टसाठी निघतो.
08.06
लिफ्टने
खाली जातानासुद्धा तो नोटबुकबद्दलंच विचार करतोय. सगळ्यांत कठीण प्रश्न : ती
त्याला कां दिली होती? कोणच्या उद्देश्याने?
कैफेच्या प्रवेश द्वारावर
उभी असलेली ड्यूटी-गर्ल आपल्या लिस्टमधे खरंच आलेल्या लोकांच्या नावांवर खूण करंत
होती.
“प्लीज़ – तुमच्या खोलीचा
नंबर.”
“32” – आपल्यांच विचारांत
गुंग कपितोनव यंत्रवत् विचार करतो.
“माफ करा, तुम्हीं
आपला नंबर नाही सांगितला.”
“32,” कपितोनव
शुद्धीवर आला.
08.11
हातांत
प्लेट घेऊन बुफेच्या टेबलाकडे बघतोय. “प्रत्येक वस्तु थोडी-थोडी” ह्या सिद्धांताचं
अनुसरण करतानापण तो चीज़च्या पैनकेक्सकडे दुर्लक्ष करतो, आणि फ्राइड-सॉसेजच्या ऐवजी कोबीचे कटलेट्स घेतो.
आतापर्यंत
न पेटवलेल्या ‘फायरप्लेस’च्या जवळच्या टेबलाशी बसून आरामांत खायला सुरुवात करतो.
ब्रेकफास्टसाठी
आलेल्या लोकांनी हॉल भरतोय. कपितोनव हे माहीत करायचा प्रयत्न करतो की आगंतुकांपैकी
कोण-कोण कॉन्फ्रेन्सचे डेलिगेट्स आहे, - पूर्ण हॉटेलतर त्यांच नाहीये.
हातांत
प्लेट्स घेतलेले दोन माणसं त्याच्या टेबलाशी बसायची परवानगी मागतात (रिकाम्या खुर्च्या आता दिसंत नाहीये).
त्यांच्या
बैजेस कडे बघून कळलं की त्यांच्यापैकी एक माइक्रोमैग (माइक्रोमैजिशियन – अनु.)
अलेक्सांद्र सीज़र आहे, दुसरा – हेरा-फेरी करणारा सिर्गइ वोरोब्योव. टेबलवर ते आपल संभाषण सुरू
ठेवतात.
“नाही, मला वाटतं की हे
वास्तविक नाहीये,” – सीज़र म्हणतो. “प्रमाणित करण्यासाठी इतर काही मानदण्ड ठरवावे लागतील. दक्षता-गुणांक
मोजण्याची कोणचीच पद्धत नाहीये.
“विशेषकरून तेव्हां, जेव्हां दक्षता-गुणांक
शंभर टक्क्यांपेक्षा जास्त आहे,” वोरोब्योव सहमति दाखवतो. “मी म्हणतो, की माझा दोनशे आहे. आणि तुम्हीं सिद्ध करा, की दीडशे आहे.”
“दोनशे
– जास्त नाहीये. मी खात्रीने सांगतो की माझा दोनशे वीस – दोनशे चाळीस आहे, ह्याच्यापेक्षा कमी
नाही.”
“माफ़
करा, तुम्हीं दक्षता-गुणांकाबद्दल
बोलता आहांत कां?” त्यांच्या गोष्टींने चकित होऊन कपितोनव आपलं नाक खुपसतो.
“बरोब्बर, दक्षता-गुणांकाबद्दलंच.”
“परिभाषेप्रमाणे दक्षता-गुणांक शंभर
टक्क्यांपेक्षा जास्त असूं शकत नाही.”
“कां?”
“’कां’ काय? कारण
की दक्षता-गुणांक – उपयोगी काम आणि नष्ट झालेल्या कामाचा प्रतिशत अनुपात असतो. आणि
उपयोगी काम नेहमी नष्ट झालेल्या कामापेक्षां कमी असतं.”
“सामान्य
भौतिक शास्त्रांत – निसःन्देह असं आहे,” घसरणा-या ऑलिवमधे काटा घुसवायचा प्रयत्न करंत सीज़र उत्तर देतो, “पण जेव्हां आपण भौतिक
जादूबद्दल बोलतो… जसं, हीच
धारणा घ्या – चमत्कार. जर प्रेक्षकाला बघंत असलेल्या चमत्काराचा दक्षता-गुणांक मोजण्याच्या
पद्धतीचं ज्ञान असेल, तर त्याला कसलीच शंका नाही होणार – चमत्काराचा दक्षता-गुणांक शंभर
टक्क्यापेक्षां जास्त असेल. उपयोगी काम नष्ट झालेल्या कामापेक्षा जास्त आहे.”
“अगदी
शंभर टक्के,” वोरोब्योव
सहमति दाखवतो. “नष्ट झालेलं काम, कदाचित तेवढंच असेल, जे जादूचे मंत्र म्हणण्याशी, भविष्य सांगण्यासाठी फासे तैयार करण्याशी, आणि काही आरंभिक तयारीशी संबद्ध असेल. एमिल्या27 आठवतो कां? त्यालापण दर वेळेस म्हणावं लागायचं “मासोळीच्या
आज्ञेने”, आपली
शक्ति खर्च करावी लागायची, आणि हे विसरतां कामा नये की ह्या मासोळीला पकडण्यांत पण त्याची काही ना काही
शक्ति खर्च झालीच होती. म्हणजेच, नष्ट झालेलं काम – हे कोणत्याही प्रकारच काम असू शकतं, असल्या टोकाच्या
परिस्थितीतसुद्धा, पण उपयोगी काम त्यापेक्षां कितीतरी जास्त आहे.”
“तुमचा
तर्क समजला,” कपितोनव
हसून म्हणतो, “पण जर असं आहे, तर हा चमत्कार नाही, तर दुसरंच काहीतरी आहे. चमत्कारासाठी काम नष्ट व्हायची आवश्यकताच नाहीये, तो होत असतो बाहेरून, तुमचं परिश्रम नष्ट
होण्याच्या पलीकडून.” त्याने चाकूने बन कापला, ज्याने त्यावर लोणी लावता येईल. “तुम्हीं ते म्हणताय, ज्याला म्हणतात...खरं
म्हणजे, काय
म्हणतात?…जादू, चमत्कार नाही. जादू फासे
नसल्याशिवाय होत नाही, हे खरं आहे, म्हणजे नष्ट झालेल्या कामाशिवाय जादू होऊं शकंत नाही. पण चमत्कार तेव्हां
होतो, जेव्हां नष्ट झालेलं काम
‘शून्य’ असतं. मी चूक म्हटलं कां?”
“तुम्हांला
हे म्हणायचंय, की चमत्काराच्या दक्षता-गुणांकाची गणना करायला उपयोगी कामाला शून्याने भाग
दिला पाहिजे?” चाकूच्या अचूक वाराने अंडे फोडंत वोरोब्योव विचारतो.
“तसं
तर शून्याने भाग देण्याची परवानगी नाहीये. पण जर शून्याच्या ऐवजी डिनॉमिनेटरमधे
(विभाजक) अत्यंत लहान संख्या ठेवली, जी जवळ-जवळ शून्याइतकी असेल, तरीसुद्धां परिणामस्वरूप तुम्हांला अशी संख्या प्राप्त होईल जी जवळ-जवळ
इन्फिनिटीयेवढी(अनंत) असेल.”
“चमत्काराचा
दक्षता-गुणांक – इन्फिनिट टक्के?”
“तसं, कदाचित, ‘इन्फिनिटी’ला प्रदर्शित करण्यांत काही अर्थ
नसावा.”
“आणि, जोपर्यंत जादूचा प्रश्न आहे, तर त्याच्या दक्षता-गुणांकाला टक्केवारीने प्रदर्शित करणं, हे काय, तुमच्या मते, बरोबर आहे?” आपल्याच नावाच्या
सैलेडकडे, जो
त्याच्या बाजूने काळ-भक्षक नेतोय, बघंत सीज़र विचारतो.
कपितोनव
जवळून जात असलेल्या शेजा-याकडून लगेच डोळे फिरवतो.
“हे
मी नाही म्हटलंय. हे तुम्हीं म्हणताय,” कपितोनव सीज़रला उत्तर देतो.
“माफ
करा, तुम्हीं कोण आहांत?”
“येव्गेनी
कपितोनव. मेंटलिस्ट, जर पाहिजे तर तसंही म्हणतां येईल.”
“आणि
जर नसेल तर? जर
कोणता चमत्कारंच नाही झाला तर? जर, साधारणपणे, काहीच नसलं तर – म्हणजे, जसं की आत्ता, तर आपल्या निष्क्रियतेचा
दक्षता-गुणांक काय असेल?” वोरोब्योव विचारतो.
“हे
कशाबद्दल?
“त्याबद्दल, की नष्ट झालेलं काम
शून्य असेल आणि उपयोगी काम सुद्धां शून्य असेल तर. दक्षता-गुणांक – काय शून्याला
शून्याने भाग द्यावा लागेल?”
“दक्षता-गुणांक
कशाचा?”
“कशाचा
नाहीं. काहीचं होत नसल्याचा.”
“जर
उपयोगी काम होतंच नाहीये, तर दक्षता-गुणांक कसा काढाल?” कपितोनवला कळंत नाहीये.
“असं
बघा – शून्य/शून्य. अश्या एखाद्या मशिनीची कल्पना करूं या, जिला मुद्दाम सैद्धांतिक
निष्क्रियतेसाठी बनवण्यांत आलंय.”
कपितोनव
उत्तर देतो.
“शून्य/शून्य
होईल अनिश्चितता .”
“ही
अनिश्चितता कुठून आली?” सीज़र बुचकळ्यांत पडतो. “कुठे अश्यासाठीतर नाही, की चमत्कारंच नाहीये?”
“नाही, अशासाठी, की डिनॉमिनेटरमधे नष्ट
झालेलं काम अनुपस्थित आहे.”
“पण
डिनोमिनेटरमधे शून्य नष्ट झालेल्या कामाच्या ऐवजी – चमत्काराच्या परिस्थितीत, जसं तुम्हीं आत्ता
सांगितलं, आपल्याला
न्यूमरेटरमधे काहीतरी परिणाम प्राप्त व्हायला पाहिजे, चमत्कारी परिणाम, एका शब्दांत, शून्य नाही. आणि तेव्हां आपला दक्षता-गुणांक – इन्फिनिटी (अनंत) होईल.”
“हो, पण हा आपला
दक्षता-गुणांक नाहीये.”
“दक्षता-गुणांक
चमत्काराचा.”
“स्टॉप,” वोरोब्योव म्हणतो, “तो कुठे आहे, चमत्कार? ह्याने हे सिद्ध झालं की
आपण नेहमी अनिश्चिततेच्या स्थितीत असतो. आशेच्या स्थितीत आणि चमत्काराच्या आशेत? मी, जणु, ह्या क्षणी कोणतंच काम
नष्ट नाही केलं, आणि मला काय प्राप्त झालं? शून्य/शून्य – अनिश्चितता . कळंत नाहीये. मला आपल्या निष्क्रियतेचा
दक्षता-गुणांक माहीत करायचाय. तो शून्य कां नाहीये? जर तो – अनिश्चितता आहे, म्हणजे, मला निश्चिततेची आशा करण्याचा अधिकार आहे? म्हणजे, ह्या गोष्टीची, की चमत्कार होईल?”
थोडा
वेळ शांत राहिले. काही विचार केला. कपितोनवला वाटलं की त्याची फिरकी घेताहेत.
“तसं, इथे दक्षता-गुणांकाची
गरज काय आहे?” कपितोनव विचारतो. “दक्षता-गुणांक – फक्त एक दुस-याच्या प्रतिशत संबंधाला
दर्शवतो. दक्षता-गुणांक ना तर देव आहे, ना विश्वकर्मा, ना एखादी काळी किंवा पांढरी शक्ति. तो फक्त दक्षता-गुणांकच आहे.”
“पण
सर्टिफिकेटसाठी आमच्याकडून तो मागण्यांत येतो.”
“आणि, ही अपेक्षा केली जाते की
तो शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असावा. ह्याचा प्रभाव आमच्या पगारावर, आमच्या श्रेणीवर पडतो.”
“छान
आहे,” कपितोनव म्हणतो.
“तुम्हीं
काय अशाप्रकारे नाही कमवंत?” वोरोब्योव विचारतो.
“मी
वेगळ्या प्रकारे कमावतो,” कपितोनव म्हणतो.
“लकी
आहांत.”
“थांबा, पण तुमच्याकडे अधिकार
आहे,” कपितोनव म्हणतो.
“कोणाला ना कोणाला तुमची सुरक्षा करावीच लागेल. तुमची काही यूनियन आहे कां?”
“कपितोनव, हे सांगा की तुम्हीं पाच
डबल रोट्यांनी पाच हजार माणसांचं पोट भरू शकता कां?” सीज़र विचारतो.
“हा
काय प्रश्न झाला? नक्कीच, नाही.”
“मीसुद्धा.”
तो
उठतो आणि जाऊ लागतो. वोरोब्योव म्हणतो:
“बिल्कुल
तर्क करता नाही येत. सिद्धांतवादी आहे. विशेषकरून, जिथे मूलभूत सिद्धांतांचा प्रश्न येतो. अरे, इथे माझं कटलेट होतं, कुठे गेलं?”
“माझ्याकडेपण
होतं – इथे प्लेटमधे.”
“मी
नाही खाल्लं.”
“आणि
मीसुद्धां नाही खाल्लं,” कपितोनवचा विश्वास नाही बसंत. “कुठेतरी गायब झालंय.”
“चला, चुलीत टाका कट्लेट्सला,” वोरोब्योव म्हणतो आणि, कपितोनवला चकित करंत, ह्या विचित्र
परिस्थितीशी जुळतं घेऊन, जसं काही झालंच नाहीये, अंजीर खाऊ लागतो.
“असं
कसं?” कपितोनव
विचित्रसा प्रश्न विचारतो.
कपितोनव
वैतागला. जेव्हां त्याच्यासोबत एखादी अविश्वसनीय गोष्ट होते, तेव्हां तो सगळ्यांत आधी
स्वतःला समजण्याचा प्रयत्न करतो : त्याला वस्तुस्थिति खरोखर समजली आहे कां?”
“कदाचित...आपण
विसरलो,” आणि
आपल्या कथनाच्या सत्यतेवर स्वतःच अविश्वास करंत तो वळून इतरांकडे बघू लागतो, ते सगळे आपल्या-आपल्या
टेबलाशी बसून बुफ़े-टेबलवरून घेतलेल्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा आनंद घेताहेत –
कोणी ऑमलेट घेतंय, कोणी बॉइल्ड-सॉसेजेस, कोणी सैलेड आणि हैरिंग-मासा, कोणी केक्स, फक्त काळ-भक्षक, टेबलाच्याखाली हात ठेवून निराशेने प्लेटकडे बघतोय, ‘सीज़र-सैलेड’कडे. निराशेने बघतोय आणि खराब दिसतो
आहे : काळ-भक्षकच्या चेह-याच्या रंगाला ‘सैलेडसारखा’ म्हणणं चांगल राहील. हिरवटपणा घेतलेल्या, वळ्या असलेला.
“माफ
करा. विसरलो – काय?” (वोरोब्योवला कळलं नाही की कपितोनवने काय म्हटलं होत.)
कपितोनव
अर्धवट विचार केलेल्या गोष्टीकडे परतला:
“काय, खाल्ले, विसरलो...कटलेट्स.”
“आपण
विसरलो? की
खाऊन टाकले? नाही, मी नाही विसरलो, मी नाही खाल्ले.”
काळ-भक्षकला
अंदाज येतो की ते दोघं त्याच्याकडे बघताहेत, त्याच्या रंग आणखी हिरवा होतो. त्याच्या चेह-यावर – जणु ओकारी थांबवतो आहे.
तो उठून जातो, तळहाताने तोंड बंद करतो आणि दाराकडे जातो, काहीही न खाता.
“आला
कां होता?” वोरोब्योव
कपितोनवला विचारतो. “आपलं जेवण त्याला झेपंत नाही.”
08.49
कपितोनव
फायरप्लेस असलेल्या हॉलमधून निघून जातो. लिफ्टमधे तो एका रूम-अटेण्डर मुलीबरोबर
चाललाय. तिची नजर कपितोनवला स्पर्श करंत ‘कॉल फॉर हेल्प’च्या बटनवर आहे, पण तो बघतो की तिचं स्मित त्याच्याचसाठी आहे. ह्या स्मितांत तो वाचतो, की मुलीला तो जादुगार
असल्याची माहिती आहे, आणि जर त्याला एखादा जादू दाखवायचा असेल, तर त्याला साभार स्वीकार करण्याची तत्परतापण आहे.
पण
त्याला आणखी एक मजला वर जायचं होतं.
आपल्या
खोलींत (अजून वेळ आहे)
08.55
तो
टी.वी. सुरू करतो आणि कपडे बदलतो.
तो
गिफ्ट मिळालेली ब्रीफकेस उघडतो आणि विचार करतो, की कॉन्फ्रेन्समधे महत्वाचे कागदपत्र आणि ‘जादुची छडी’ घेऊन जावी, किंवा नाही. तो ठरवतो की ब्रीफकेसमधून काहीही बाहेर नाही काढणार आणि त्यांतच
मूखिनची नोटबुक ठेऊन देईल – म्हणजे की कशी तरी मरीनाला परंत देता येईल.
तेवढ्यांत
मरीनाचा फोन आला. लवकरंच आहे. त्याने विचार केला, की गोष्टी नंतर होतील. ह्यावेळेस तो बोलायला तयार नाहीये. म्हणून लगेच
कनेक्ट नाही केला.
“वाचलं?”
“वाचलं.”
“काय
म्हणशील?”
“काय
म्हणेन... तुला काय ऐकायचंय?”
“हा
संशोधक कोण आहे?”
“मरीनोच्का, मला नाही माहीत. ते
नोट्स बघतां, तुला, कदाचित
माझ्यापेक्षां जास्त चांगलं माहीत आहे.”
“मला
माहीत नाही, की
संशोधक कोण आहे,” मरीनाने उत्तर दिलं. “पण हे सगळं भयानक होतं. मी खरंच दार तोडणार होते. सांग
तर, मी बरोबर केलं ना? मला ह्यांत गोवण्यांत
आलं, विचारपूस करण्यांत
आली...माझी आइडेन्टिटी माहीत असूनसुद्धां. माझ्यावर शंका घेण्यांत आली. तू कल्पना
करू शकतो कां? आणि मीपण नोटबुक नाही दाखवली. दाखवायला हवी होती कां? मी ठीक केलं ना, की नाही दाखवली?”
“मरीन, तू त्यांना दाखवलं जरी
असतंस, तरीही काही विशेष चांगल
झालं नसतं. तू प्रत्येका गोष्टीचा नुसता गुंता करून ठेवला असता, त्यांत बरेचसे अंधारे
कोपरे आहेत, ज्यांना
समजावणं शक्यच नाहीये. तू अगदी बरोबर केलंस.”
“तू, तरीही, काय म्हणतो, त्याने हे सगळं कां
लिहिलंय?”
“मरीनोच्का, मला नाही माहीत.”
“तो
काय वेडा झाला होता? तो वेडा नव्हता. की होता?”
“जर
तू समजतेस, की
नव्हता, म्हणजे
नव्हता. ह्या प्रश्नाचं उत्तर ह्यावेळेस तुझ्याशिवाय कुणी दुसरं नाही देऊं शकंत.
जसं तू समजतेस, तसंच आहे. जसं तू म्हणशील, तसंच होईल.”
“आणि, नोटबुक प्रमाण नाहीये
कां?”
“नोटबुक
- नोटबुक आहे.” त्याला पुढे हेसुद्धां म्हणायचंय की तो एक वाईट शेरलॉक होम्स आहे, पण मरीनाने मधेंच म्हटलं:
“नंतर
फोन करीन. गुड लक.”
कदाचित, नवरा आला होता.
कपितोनवला सिग्नल्स ऐकू येतात.
तो
नोटबुक ठेवलेली ब्रीफकेस बंद करतो.
कपितोनवचे
डोळे लाल आहेत (तो आरशांत बघतो). जर दुस-या कोणाचं असं थोबाड असतं, तर कपितोनवला वाटलं असतं, की त्या माणसाची आत्ताच
झिंग उतरली आहे. परिस्थिति विकट आहे. प्रत्येकाला तर तो समजावूं शकंत नाही, की अनिद्रेमुळे त्रस्त
आहे.
हॉटेलमधे
आग लागल्याची बातमी देताहेत – इण्डियात किंवा बांग्लादेशांत. 17 माणसं मेलेत. काय
बांग्लादेशांत की इण्डियात?
आणि
हे आहेत एक मुलगा आणि एक मुलगी, नवव्या वर्गाचे विद्यार्थी, एकमेकाचा हात धरून अकराव्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर उडी मारली.
भिंतीच्या
मागे काळ-भक्षक (कपितोनवचा शेजारी तोच आहे) गुरगुरतोय आणि ज़ोर लावतोय – तो ओकारी
करण्याचा प्रयत्न करतोय.
09.12
कपितोनव
खाली हॉलमधे आला. काळ्या ब्रीफकेसेस घेतलेले कॉन्फ्रेन्सचे डेलिगेट्स येऊं लागले आहे
– आतापर्यंत जवळ-जवळ दहा-पंधरा लोक आलेत: दीवानवर आणि खुर्च्यांवर बसले आहे. काही
लोक हिंडताहेत. ब्रोश्यूरमधे पाहिलेल्या फोटोने तो लगेच महाशय नेक्रोमैन्सरला(ओझा, मांत्रिक
- अनु. ) ओळखतो, ज्युपिटेर्स्कीला ओळखतो, इतरांमधे ‘तलाव’ला
बघतो...कालच्या घटनेनंतर हॉटेल प्रशासनने कॉन्फ्रेन्स हॉल मीटिंग्स आणि इतर
कार्यक्रमांसाठी बंद करून टाकला होता, म्हणून आज दुस-या बिल्डिंगमधे मीटिंग होणार आहे, जी इथून फार दूर नाहीये. सगळे लोक जमले की त्यांना तिथे घेऊन जातील.
कपितोनवच्या अंगावर आहे ओवरकोट आणि कैप.
त्याच्याजवळ
हस्तांदोलन करण्यासाठी उत्सुक ‘तलाव’ येतो, - अभिनंदन करतांना कपितोनवला
त्याच्या डोळ्यांमधे किंचित उत्सुकता दिसते आणि तो लगेच न विचारलेल्या प्रश्नाचं
उत्तर देतो:
“अनिद्रा.”
“ओह, तुम्हीं पण काय!
इथेसुद्धां? इथे
अशी कोणची वस्तु आहे, जी तुम्हांला आराम नाही करूं देत आहे?” ‘तलाव’ तक्रारीच्या
सुरांत म्हणतो. “तसं, बाइ द वे,” तो कपितोनवला एका माणसाकडे आणतो, जो कंटाळल्यासारखा बाहुल्यांच्या शो-केस जवळ उभा होता. “ह्यांना भेटा – इथे
फक्त तुम्हीं दोघंच ‘मेन्टलिस्ट्स’ आहांत.”
दुस-या
मेन्टलिस्टचं नाव आहे मिखाइल श्राम, त्याचं स्पेशलाइज़ेशन आहे – लपवलेल्या वस्तूंना शोधून काढणं. शिवाय त्याला ‘सम्मोहन’च्या प्रक्रियेचंसुद्धां ज्ञान आहे, आणि ‘तलाव’ची इच्छा आहे, की एखादा मिनट काढून
श्राम28ने कपितोनवला आपली झोप
पूर्ण करण्यास, किंवा कमीत कमी डुलकी घेण्यांतच मदत करावी.
दोघांच्या
खांद्यावर आत्मीयतेने थाप मारतो.
“आशा
करतो, की तुमचं छान जमेल,” असं म्हणंत, रस्त्यावरून येणा-या
टेलिविजन-टीम ला मित्रभावाने हाताने खूण करंत जाऊ लागतो.
श्राम
कपितोनवला विचारतो:
“संख्यांवर, कदाचित, दोन अंकांच्या? तर, मी एखादी संख्या मनांत
धरूं?”
“इच्छा
असेल तर,” कपितोनव
म्हणतो.
तो
बेरीज, वजाबाकी करायला सांगतो, मनांत धरलेली संख्या
सांगतो.
“समजलं,” श्रामला आश्चर्य नाही
होत. “माझं सम्मोहन तुमच्यावर परिणाम नाही करणार.”
“मी
सम्मोहनाच्या विरुद्ध आहे.”
“अस
कशाला”? घाबरताय
कां, की काहीतरी चोरून घेईन? मी मेंदू-चोर नाहीये.”
“
‘कोण’ नाहीये?”
“असं
बघा, उठाईगीर असतात, खिसेकापू असतात, आणि मेंदू-चोरसुद्धा
असतात. आशा आहे, की तुम्हीं मेंदू-चोर नाही.”
“नाही, हे काय म्हणताय, मी मेंदू-चोर नाहीये.”
“विकणार
तर नाही? आम्ही
विकतं घेतलं असतं. तुमचा ‘रेट’
काय आहे?”
“प्रोग्राम? मेंदू? कशाबद्दल बोलतांय?”
“स्पष्ट
आहे, प्रोग्रामबद्दल.”
“हे
व्यावसायिक सीक्रेट आहे,” कपितोनव उडवा-उडवी करतो. “तुम्हीं तर सांगणार नाही, की तुमच्यावाल्याचा ‘रेट’ काय आहे.”
“कां
नाही सांगणार? माझी प्राइस-लिस्ट सगळ्यांना ठाऊक आहे. प्रोगाम्स बरेचसे आहेत – कोणचा
पाहिजे? दाखवलेल्या
प्रोग्राम्सपैकी सर्वांत स्वस्त आहे – “कागद शोधा”, पाच हज़ार डॉलर्स, “लपवलेला गोल” – पन्नास. सम्पूर्ण निर्देशन-पत्रिकेसहित, गोलांच्या सेटसकट, ट्रेनिंग क्लासेस सहित.
तीन क्लासेस पुरेशे आहेत. तरी, तुमचावाला कितीचा आहे? भाव खाण्याची गरंज नाहीये.”
“माझा
– फक्त डोक्याने.”
“नम्रपणे
धन्यवाद देतो. एक्स्ट्रा लफडं नाही घेणार.”
हॉटेलमधे
राहणा-या सगळ्या लोकांना माहीत नाहीये, की मीटिंग इथेच कुठे नाही होणार आणि बर्फावर चालंत जावं लागेल. ब्रीफकेसेस
हॉलमधेच ठेवून, ते गरम कपडे घालायला आपापल्या खोल्यांमधे जातात. काळ्या ब्रीफकेसेस फरशीवर
उभ्या आहेत, आणि
रिसेप्शन-काउन्टरवाले त्यांच्याकडे अप्रसन्नतेने बघताहेत.
“कालच्या
घटनांच्या संदर्भात हे खरोखरंच चिंताजनक वाटतंय...विपत्तीच लक्षण नाही म्हटलं तर,” श्रामने जणु डोळ्यांने
ब्रीफकेसेसवर नेम धरंत म्हटलं.
“पण, जर काही असेल, तर तुम्हांला तर
बाहेरूनच बघून कल्पना येईल.”
“बाहेरून
बघून नाही, तर
साधारणपणे.”
“काळजीचं
कारण तर नाहीये ना?”
मिखाइल
श्राम चूप राहिला. जणु तो कपितोनवच्या कौशल्याचं उत्तर आपल्या एखाद्या विशिष्ठ
चमत्काराने द्यायच्या बेतात आहे. त्याची नजर ड्रैगनवाल्या चीनी मातीच्या
फ्लॉवरपॉटजवळ ठेवलेल्या ब्रीफकेसवर थांबते.
“ही
माझी आहे,” कपितोनवने
सावध केलं, ज्याने
चुकीचा समंज व्हायला नको.
“ह्यांत
कोणची तरी बाहेरची वस्तू आहे.”
“एका
माणसाची नोटबुक आहे,” कपितोनव आनंदाने स्वीकार करतो.
श्रामच्या
चेह-यावर लिहिलंय, “ मी तर नव्हतं विचारलं”; कपितोनवच्या सहमतिने दुःखी होऊन तो ह्या टिप्पणीकडे लक्ष नाही देत:
“नाही, तिथे आणखी काहीतरी आहे.”
आणि
तो शो-केसकडे वळतो, चेह-यावर असा भाव आहे, जसं जरा जास्तंच बोलून गेलाय.
आपलं
हसू आवरण्यास असमर्थ कपितोनवपण शो-केसकडे सरकतो – दुस-या : हिच्यांत पीटरबुर्गशी संबंधित
सगळ्या प्रकारचे स्मृति-चिन्ह ठेवले आहेत. त्याला खूप हास्यास्पद वाटतंय, तो खुर्चीवर बसून जातो.
जास्तीत
जास्त डेलिगेट्स येताहेत, आणि जवळ-जवळ सगळ्यांच्याच जवळ काळ्या ब्रीफकेसेस आहेत.
कपितोनवपासून
तीन पावलांवर ‘तलाव’ टेलिविजनवाल्यांना
इंटरव्यू देतो आहे.
09.25
“नॉनस्टेजर्स
म्हणजे कोण?” कपितोनव
रिपोर्टरचा खणखणीत आवाज ऐकतो (ज्या आत्मविश्वासाने ती कठीण शब्दांच उच्चारण करंत
होती, त्यावरून कळंत होतं की
मुलगी चांगली तयारी करून आली आहे).
“नॉनस्टेजर्स
– आम्ही आहोत,” ‘तलाव’ गर्वाने
म्हणतो. “जादुगार, जे प्रदर्शनासाठी प्रयुक्त केल्या जाणा-या जागांशी संबंधित नसतात, - मग तो सर्कसचा अरेना असो, रॉम्प असो, किंवा एखादा स्टेज असो, ह्या शब्दांत दडलेल्या
सगळ्यांच अर्थांच्या संदर्भात. आम्ही आपल्या कलेचं प्रदर्शन जगाच्या कोणच्याही
कोप-यांत, आणि
कोणत्याही परिस्थितीत करू शकतो. ऑफिसमधे लहानशी पार्टी आहे? प्लीज़. कुणी कॉर्पोरेट
आलाय? जितकं पाहिजे तितकं.
ट्रेनचे रेस्टॉरेन्ट? कां नाही? जहाज-दुर्घटनेला सामोरे गेलेल्या लोकांची नाव? तिथेसुद्धां आम्ही तुमची मदत करू. कारण की आमचं काम आहे – लोकांचं ‘मूड’ चांगलं करणं, त्यांना आनंदित करणं, सगळ्यांत जास्त आवश्यक आहे, त्यांना चकित करणं, चकित करणं आणि अनेक वेळा चकित करणं!”
“आजच्या माणसाला तुम्हीं कसं चकित
करूं शकता? जादूच्या
साधारण खेळांनी?”
“कौशल्याने!
नॉनस्टेजिंग – अत्यंत उच्चकोटीचं कौशल्य आहे. ते दर्शकापासून अत्यंत कमी अंतरावर
प्रदर्शित केलं जातं, जेव्हां तुमच्या आणि माझ्यामधलं अंतर फक्त वार्तालापाच्या माध्यमाने दर्शवलं
जाऊं शकतं. आमच्या असोसिएशनमधे उगीचंच अत्यंत भिन्न-भिन्न प्रकारचे लोक नाहीत – माइक्रो
मैजिशियन्स, हे
आजकाल प्रचलित नाव आहे, पण तुम्हीं, कदाचित, त्यांच्याबद्दल ऐकलेलं नाहीये?...तुम्हीं म्हणता ‘जादूचे साधारण खेळ’. पण माइक्रो मैजिशियन तुम्हांला असे-असे जादू दाखवेल...आगपेटीने किंवा साधारण
चश्म्याने...तुमची मतीचं गुंग होऊन जाईल! माइक्रो मैजिशियन – सुपर जादुगार आहे, साध्या-सरळ, ओळखीच्या वस्तूंनी
चमत्कार करतो. तो, उदाहरणार्थ, तुमचा माइक्रोफोन घेऊन बघता-बघता त्याला काकडीत बदलू शकतो, किंवा, जसं , मी तुमची अंगठी बघतो
आहे...”
“ओय, ओय, राहू द्या! इथे ‘पत्तेचोर’ आणि ‘ठग’सुद्धां आहेत...”
“मी
विरोध करतो! हाइपर-पत्तेचोर आणि हाइपर-ठग. कृपा करून साधारण पत्तेचोर आणि ठगांशी
ह्यांची तुलना नका करू. तसं तेसुद्धा काम करतातंच, अंगुश्तान आणि पत्त्यांने. पण आमचे, ते, जे
हाइपर आहेत, असे
आर्टिस्ट्स आहे, ज्यांचे साधारण पत्तेचोरांशी आणि ठगांशी अश्या प्रकारचे संबंध आहेत, जसे कायद्याचं पालन
करणा-या ऑस्ट्रेलियन्सचे – आपल्या पूर्वजांशी, प्रत्येका प्रकारच्या गुन्हेगाराशी, ज्यांना जगाच्या दुस-या टोकावर निष्कासित केलेलं आहे. आमच्या पत्तेचोर आणि
ठग उस्तादांसाठी अंगुश्तान आणि पत्ते – दर्शकांसाठी खेळाची महान सामग्री आहे, ह्या खेळांत जागरूक
दर्शक हिरीरीने भाग घेऊं शकतो, चांगल्या प्रकारे कळंत असूनही की त्याला...कसं म्हणूं...हरवतांत आहे. पण
त्याला कळतंच नाही – कश्या प्रकारे.”
“हाताची
सफाई आणि कोणत्याही प्रकारचा घोटाळा न करता.”
“बरोबर, कोणताही घोटाळा न करता.
आणि घोटाला करायचा तरी कशाला? हे तर आर्ट आहे. जर हाताच्या सफाईचा प्रश्न आहे, तर त्याच्याशिवाय काम कसं चालणार, पण इथे न केवळ हाताच्या सफाईचा प्रश्न आहे, तर मनोविज्ञानाची जाणीव असणंसुद्धां आवश्यक आहे, विश्लेषणात्मक बुद्धीचीपण गरज आहे. अश्या घटनासुद्धा होतात, जेव्हां हातांचा उपयोगंच
नाही होत. मेंटलिस्ट जादुगार, उदाहरणार्थ, हाताच्या सफाईचा प्रयोग नाही करंत, उलट ते असाधारण कौशल्याने, ह्या शब्दाच्या प्रयोगासाठी मला क्षमा करा, तुमच्या देहभानावर अधिकार करतात. आमच्यांत एक मेंटलिस्ट आहे, जो कोणतीही लपवलेली
वस्तू शोधून काढतो, तुम्हांला एकही प्रश्न न विचारतां, भले ही त्याला स्वतःलापण माहीत नसो की तुम्हीं कोणची वस्तू लपवली आहे. म्हणजे, त्याला तर माहीत आहे, प्रेज़ेन्टेशनच्या वेळांत
सगळं काही जाणून घेतो. हे आहेत आणखी एक मेंटलिस्ट. तुम्हीं एखादी संख्या मनांत धरा, ते ओळखतील. कपितोनव
महाशय, प्लीज़...”
खुर्चीत
खचलेला कपितोनव चेह-यावरून असं दाखवतो की हे आवश्यक नाहीये, पण मुलगी त्याच्याकडे न
बघतांच ‘तलाव’ला म्हणते:
“गरंज
नाहीय्र! मला प्रश्न विचारून-विचारून बेजार करून टाकतील, फ्रेममधे फक्त तुम्हीं
बोलाल, एकटे, म्हणून मला काही मनांत
धरायची गरज नाहीये, मी नंतर स्वतःच धरीन, चला, पुढे
चलूं. आणखी, काय
तुमच्याकडे अतिरिक्त-संवेदी आहेत?”
“अतिरिक्त-संवेदी
– ही वेगळी गोष्ट आहे. आम्हीं, मी पुन्हां सांगतो, एक्टर्स आहोत.”
“पण
तुमच्याकडे ईवेन्ट्स-आर्किटेक्ट्स, स्थान आणि काळ-भक्षक तर आहेत...”
“त्यांच्यासाठी
बहुवचनाची गरज नाहीये. त्यांच्यापैकी प्रत्येक अद्भुत आहे, अद्वितीय आहे. आमच्याकडे
एक काळ-भक्षक आहे, तो स्थान भक्षण नाही करंत...एक ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आहे...: - त्याला पुढे म्हणायचं
आहे “एक नेक्रोमैन्सर”, पण त्याला दाराजवळ उभा असलेला पाहून, त्याच्याकडे जास्त लक्ष आकर्षित न करण्याचे ठरवतो, नाहीतर रिपोर्टर लगेच
त्याचा इंटरव्यू घ्यायला निघून जाईल, आणि गडबडून पुन्हां आपल्या विचारांची जुळवा-जुळव करूं लागतो. – “दुस-या
शब्दांत,” ‘तलाव’ पुढे म्हणतो, “प्रकाराच्या दृष्टीने
आम्ही आपल्या समूहात विविधता आणायचा प्रयत्न केला आहे, म्हणून आम्ही तथाकथित रिमोटिस्ट्सला, नवीन, पण
प्राचीन परंपरेवर आधारित प्रणालीच्या प्रतिनिधींनासुद्धां आमंत्रित केलं आहे.
ह्यांच्याबद्दल दर्शकांचं आणि विशेषज्ञांचं मत नेहमीच एकसारखं नसतं. पण ह्या
विशिष्ट मास्टर्सशी सहयोग करण्यांत खूपंच मजा येते.”
“काय
नेक्रोमैन्सरसुद्धां त्यांच्यापैकीच एक आहे? तो मृतकांसोबत काम करतो कां?”
“मी
पुन्हां एकदा सांगतो, आम्ही आर्टिस्ट्स आहोत, आर्टिस्ट आपल्या पात्राबरोबर न्याय करंत असतो. आणि मग, स्वतःला बुल्गाकोवच्या
नायकाच्या जागेवर ठेवण्याची माझी इच्छा नाहीये, जो पब्लिकला समजावतो की काळ्या जादूचं अस्तित्व नसतं.”
“पण
त्याचं अस्तित्व असतं कां?”
“आधुनिक
मायावादात एका सुरेख प्रणालीचं अस्तित्व आहे, जिचं प्रतिनिधित्व – आम्हीं, जादुगार-नॉनस्टेजर्स करतो, आणि मी विनंती करतो, की ह्याच स्वरूपांत आमच्यावर प्रेम करावं, आणि आमची मदत करावी.”
09.31
“चला, मित्रांनो! वेळ झाली!
तुतारी मार्चसाठी बोलावतेय!”
काही
तुतारी-बितारी नव्हती, पण तुतारीशिवायंच – ऑर्गेनाइज़िंग कमिटीच्या निर्धारित कार्यक्रमानुसार –
माइक्रोमैजिशियन र्यूमिन
लीडरचं कर्तव्य पार पाडायला समोर आला.
दाराजवळ उभा राहून तो जोराने घोषणा करतो:
“आपल्याला दुस-या बिल्डिंगमधे
जायचंय, हे इथे जवळंच, ह्याच रस्त्यावर आहे.पण सावधगिरीचा
इशारा देतो, महाशय, विशेषकरून जे लोक बाहेरच्या
शहरांतून आले आहेत: रस्ता खूप निसरडा आहे!”
जादुगार हालचाल करूं लागतात
आणि एक-एक करून हॉटेल सोडूं लागतात.
“एक-एक करून,
एक-एक करून! षडयंत्राबद्दल विसरू
नका!”
ही गम्मत सगळ्यांना आवडते – काळ्या ब्रीफकेसेस हातांत असल्यामुळे
ह्यांना कुणीही सीक्रेट ऑर्गेनाइज़ेशनचा मेम्बर समजू शकंत होता, जो काळोख्या रात्रीत जागत्या पहा-यानंतर बाहेर
पडतांत (ह्या शहरांत श्वेत-रात्री असतात, पण हिवाळ्यांत नाही;
आणि हिवाळ्यांततर इथे काळोख्या रात्री सारखंच असतं – सकाळी
उशीरापर्यंतसुद्धा).
रस्त्यावर येऊन कपितोनव पहिलं ऋतुजैविकी अवलोकन करतो : बर्फ जमला होता. तो आपला स्कार्फ व्यवस्थित
करतो आणि, डाव्या पायाने धक्का देऊन, तळपायांवर
सुमारे दीड मीटर घसरतो. अश्या परिस्थितीत, नेहमीसारखं त्याला
आठवतं, की त्याला आठवण आहे, की लहानपणी
त्याला माहीत होतं – रस्त्याला झाकणा-या बर्फात आणि निसरड्या बर्फांत काय फरक
असतो.
फुटपाथचा भाग, जिथे
नरम आणि कडक बर्फ नव्हता, हॉटेलच्या प्रवेशद्वारापासून दहा
पावलांवर संपतो.
“संतुलन कायम ठेवण्यासाठी, प्लीज़ जोड्या बनवा!”
ह्यावेळेस माइक्रोमैजिशियन र्यूमिन गंमत करतोय का,
समजणं कठीण आहे – असं वाटतं, की हो : जोडीने जाणं खूपंच कठीण आहे. फक्त –
एकामागे एक, बर्फ स्वच्छ करायच्या फावड्या जितक्या चौडाईत
आणि समोरून चालंत येणा-या लोकांच्या चांगुलपणावरंच चालावं लागेल.
सगळ्यांत आधी र्यूमिनंच पडतो, लीडर – त्याला उचलतात आणि अंगावरून बर्फ झटकतात, तो चकित होऊन चारीकडे बघतो : अचानक कसा पडला.
“तलाव’
मागून येऊन कपितोनवला पकडतो, “थैन्क्यू” कुजबुजंत, कारण
की तो एकीकडे सरकून गेला होता. मग वळून म्हणतो:
“बाइ द वे! मला आत्तांच ‘श्याम-वन’ने फोन केला होता, ‘ऑडिट-कमिटी’चे बाइ-इलेक्शन्स होणार आहेत. आम्हीं – तुम्हांला.”
“मला?”
“तुम्हीं मैथेमेटिशियन आहांत,
आणि आमचा तुमच्यावर विश्वास आहे. दुस-या कुणावर विश्वास नाही ठेवता
येत. नाहीतर, तसले तर बोर्डांत भरमसाठ आहेत!...वाद तर घालूंच
नका, कोणताही आक्षेप नको!”
आणि तो तीरासारखा पुढे धावला,
आधी पोहोचण्यासाठी.
“काही हरकत नाही, काही हरकत नाही, लवकरंच हिवाळ्याचे दिवस संपताहेत,”
कपितोनवच्यामागे कोणी भिणभिणलं, पण कपितोनवला
कुणाशी बोलायची इच्छा नाहीये आणि तो असं दाखवतो, की त्याने
काळ-भक्षकाचं बोलणं ऐकलंच नाही.
समोर आइसिकल्स तुटून पडतात आहेत – जाण्यासाठी रस्ताच नाहीये.
सगळे लोक बर्फाचे जमलेले डोंगर सुखरूप पार करतात,
ज्याने की रस्त्याच्या फेन्सिंग लावलेल्या भागांतून दूर होऊन
वाहनांच्या रस्त्यावर जाता यावे. रस्त्याच्या दुस-या कडेला चीनी उभे आहे आणि
बघताहेत की आइसिकल्स कसे पडताहेत. कपितोनव चीन्यांकडे बघतो, आणि
तेव्हांच
09.37
त्याची पाळी येते – तो घसरून पडतो.
वाईट प्रकारे पडला – पाठीवर. डोकं बर्फावर आपटलं. विव्हळला.
ब्रीफकेस एकीकडे जाऊन पडली, हे तर बरं झालं,
की कारच्या खाली नाही आली.
आणि, लगेच उडी मारून
उठलासुद्धा, एखाद्या बॉक्सर सारखा, ज्याला
नॉकडाउन केलंय, आणि ज्याला असं दाखवायचंय की तो ठीक-ठाक आहे.
ओवरकोटच्या खिश्यांतून फोन काढतो, कारण की तेव्हांच कॉल आला होता.
“हो, मरीना?”
“तू ‘बिज़ी’तर नाहीयेस? बोलूं शकतोस कां?”
बहाद्दुरीने म्हणतो:
“हो, बिल्कुल बोलूं शकतो! (ह्याच
वेळेस त्याला ब्रीफकेस देतात.)
“काही झालं तर नाहीं, नं?”
“ओह, नाही, काही नाही, फक्त इथे बर्फ आहे...निसरडा बर्फ...(डोकं
वाकवून सहयोग्यांना धन्यवाद देतो आणि हसून ओठांना खेचंत OK व्यक्त
करतो.)
“तर, तू त्याबद्दल मला काय
सांगशील?”
“आठवण दे, कशाबद्दल...(कपितोनव
पुढे जातो.)
“तुला असं वाटतं का, की ते, जे त्याने तिथे लिहिलं, त्याचा, जे झालं त्याच्याशी काही संबंध नाहीये?”
“त्याच्याशी, जे
झालं?”
“त्याच्या मृत्युशी,” मरीनाने पुढे जोडलं.
तो पुन्हां वार्तालापासाठी तयार नाहीये. पण, जेव्हां वार्तालापांत भाग घेण्याची गरंज असते,
तेव्हां कपितोनव सहसा भाग घेतो.
“मरीन, प्लीज़, समजण्याचा प्रयत्न कर,” कपितोनव पायांच्याखाली बघंत
म्हणतो, “मी काही शेरलॉक होम्स नाहीये, मला माहीत नाहीये की काय विचार करायला हवा. आम्हीं इथे जवळच्याच क्लब ‘सी-9’कडे चाललोय, तिथेच मीटिंग
होईल.”
“तर ऐक. तेव्हां – मुख्य मुद्दा. तुला असं नाही वाटलं का की ते
सगळं, जे त्याने लिहिलं
होतं, खरं आहे? की तो – तो नाहीये?
आणि जर असं असेल, तर मग मी कुणाबरोबर राहात
होते? आणि तो कुठेय, माझा वाला?”
मैजिशियन्स दोन बाहेर निघालेल्या खिडक्या असलेल्या बिल्डिंगजवळ
आले, जुन्या काळांत ही
बिल्डिंग दिवाळं निघालेल्या लोकांच्या वेल्फेयर-सोसाइटीची होती (कपितोनवला हे कसं
ठाऊक आहे?), आणि आता सम्पूर्ण दुस-या मजल्यावर क्लब “सी-9”
आहे, पहिल्या मजल्यावर (कपितोनवला अजून माहीत नाही)
फोटो-गैलरी आणि वार्ड-रोब आहे.
“मरीनोच्का, मी
प्रत्यक्षवादी आहे.”
“तू कसा प्रत्यक्षवादी आहे!”
“कोणच्यातरी प्रकाराचा, पण माझं असं मत आहे, की प्रत्येका गोष्टीमागे काही न
काही तर्क ज़रूर असतो. आणि तो अनुभवावर आधारित असला पाहिजे. तुझे प्रश्न मला समजंत
नाहीये. हो, दुर्दैवी, दुःखद घटना आहे.
पण, जर तसं नसतं आणि त्याने तुला नोटबुक दाखवली असती आणि
म्हटलं असतं, मरीना, बघ, मी काहीतरी कल्पना केली आहे, वाच, मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तुझं काय
मत आहे, मी हे वैज्ञानिक फ़ैन्टेसीच्या प्रतियोगितेसाठी
पाठवावं कां, तर तू त्याला काय उत्तर दिलं असतं?”
मरीना म्हणते:
“मला वाटतं, की
फैन्टेसी-प्रतियोगितेसाठी रचना वेगळ्या प्रकारे लिहिल्या जातांत.”
“मला नाही माहीत, की कश्या लिहिल्या जातांत,” प्रवेशद्वाराजवळ
गर्दीतून बाहेर होत कपितोनव उत्तर देतो (फक्त दारांच्या जवळंच आंत जाणा-यांची
गर्दी वाढते). “आणि, काय तुला माहीत आहे? त्याला स्वतःलापण तर माहीत नव्हतं, तो कुणी लेखक
थोडांच होता, फैन्टेसी-लेखक नव्हता, तो
विचार करू शकंत होता, की अश्या प्रकारे लिहिणंसुद्धां शक्य
आहे, बरोबर आहे न, मरीना?”
त्याला वाटतं, की
तो तिला धीर देतोय.
मरीना विचारते:
“तू त्या तरुण गुन्हेगाराबद्दल काय म्हणशील? तोच, ज्याचा चेहरा
तुमच्या ‘ब्यूस्टे’त कम्पासने मापला
गेला होता?”
आत गेला. लॉबी. कपितोनव, एकीकडे सरकून, लोकांकडे पाठ करून उभा राहिला:
“मला असा कुणी आठवंत नाहीये. मी,
कदाचित, आधीच निघून गेलो होतो.”
“तर असं आहे. मला स्वप्न पडलं.
मला स्वप्न पडलं, की माझा मूखिन...अजूनही कन्स्ट्रक्शन-टीममधे
आहे...आणि तू तर त्याच्याबरोबर कन्स्ट्रक्शन टीममधे होता नं?”
“ठीक आहे, होतो
कधी, तर मग काय?”
“आणि, की मूखिन...तुलातर
आठवतंय, त्याचं कोणाशी?...हे तर तुला
माहिती असायला हवं होतं?”
“माहीत नाही, की
तुला कसे-कसे स्वप्न पडतात,” तो रुक्षतेने म्हणतो.
“त्या स्टोअर कीपरशी. मला तिचं नावपण माहीत आहे. माहितीये, काय आहे?”
“नाही.”
“तिचं नाव होतं याना.”
“तू काय हे सगळं स्वप्नांत पाहिलं?” कपितोनव भिंतीकडे सरकतो (पाठीमागे आहे गर्दी,
पायांचं पुसणं, क्लोक-रूम, रस्त्यावरून येत असलेली थंडी).
“हो, हे फार विचित्र
स्वप्न होतं, कोणत्याही फैन्टेसीशिवाय, जास्तंच विचित्र अश्यासाठी, की त्यांत काहीही अजब
गोष्ट नव्हती. तिचं नाव होतं याना. दारुडी होती, पीतंच
असयाची. सगळ्यांना द्यायची. सगळ्यांना. तुला नाही दिली?”
“मरीना, मी असल्या कोणत्यांच
यानांना ओळखंत नव्हतो, आणि जर मी तुझ्या स्वप्नांत आलो होतो,
तर तो मी नाही, जो तुझ्या स्वप्नांत आला होता,
तुला कळतंय कां?”
“नाही, तू माझ्या स्वप्नांत
नाही आला. माझ्या मूखिनने झिंगलेल्या अवस्थेत तिच्याशी संभोग केला, जेव्हां तीपण झिंगलेली होती. स्टोअरमधे, चौथ्या
सेक्शनमधे...”
“तू कोणत्या सेक्शन्सबद्दल बोलते आहेस? काही सेक्शन-बिक्शन नव्हते...”
“स्टोअरमधे, चौथ्या
सेक्शनच्या मागे. पडद्यामागे, जायच्या दिवशी. गैसचा वास येत
होता, ती पूर्णपणे झिंगलेली होती, जेव्हां
तो जात होता. गैस लीक होत होती...तिथे खूप सारे कापसाचे जैकेट्स होते, कापसाच्या जैकेट्सचा मोट्ठा ढीग होता...आणि रेल्वे स्टेशनवर त्याने ऐकलं,
कश्या उलट्या होत होत्या...तुम्हीं सगळे झिंगलेले होते, घाबरू नको...आणि मग, ती खरोखरंच चालली गेली, जाऊ शकली...आणि हा, तिचा मुलगा, मूखिनचा मुलगा मोठा झाला...सावत्र वडिलांना मारून टाकलं...आपल्या बापाचा
पत्ता लावला...आणि त्याला पण मारायचा निश्चय केला...पण तोपर्यंत तो त्या विषयावर
पोहोचला होता...तुम्हां लोकांच्या तपासाच्या क्षेत्रांत...त्याला शोधंत होते...आणि,
हे, त्यालाच कम्पासने...”
“मरीना, लगेच गप्प बस! अशी
स्वप्नं नसतात. तू म्हणतेस काय आहे! कुणी याना नव्हती, कोणचेच
स्टोअर्स नव्हते. आम्ही ‘लैण्ड-रिक्लेमेशन’वर (भूमिसुधारणा) काम करंत होतो...त्या काळांत
प्रत्येक ठिकाणी लैण्ड-रिक्लेमेशन चाललं होतं!...तुला झालं काय आहे? तू आहेस कुठे? आपल्या डोक्यांतून ही फालतू गोष्ट
काढून फेक! तुला ह्या नोटबुकबद्दल विसरायलांच हवं!”
“नाही! जशीचं मी तुला ती नोटबुक दिली, असं वाटलं की माझ्या आतला एखादा भाग तुटून
पडलाय. तिच्याशिवाय राहू नाही शकंत. मी तिला घ्यायला येतेय, ठीक
आहे? ती तुझ्याजवळ आहे कां?”
“माझ्याजवळंच आहे. पण तुला तिच्यापासून लक्ष दूर करायलांच पाहिजे.”
“क्लब ‘सी-9’…मला माहीत आहे, तिथे मास्क्सचं प्रदर्शन भरलं
होतं...आणि जेव्हां तू वाचंत होता, तर तुला असं नाही वाटलं
का की मूखिन...”
ती गप्प झाली.मोबाइल एका हातांतून दुस-या हातांत घेत तो ओवरकोट
काढतो.
“मूखिन काय?...”
“हे, की मूखिन तुझ्यासारखा
आहे?”
“नाही, मरीना, आम्हां दोघांत किंचितही साम्य नव्हतं.”
“मी ख-या मूखिनबद्दल बोलतेय,
मी त्याच्याबद्दल नाही सांगत आहे, ज्याने हे
सगळं लिहिलं होतं.”
कपितोनव दीर्घ श्वास घेऊन जणु थिजून जातो.
“मी त्याच्यावर खूप प्रेम करायचे.”
आता तो गप्प राहतो.
“मी येऊन घेऊन घेईन.”
“ठीक आहे,” कपितोनव म्हणतो.
09.49
त्याला कळतं की तो दुस-या मजल्यावर इन्स्टेंट कॉफीत उकळलेलं पाणी
ओततोय : मूखिनवर कोणी कसं प्रेम करू शकतं?...किटली परत जागेवर ठेऊन देतो. विचारांना झटकून, एक
चमचा साखर घेतो. ब्रीफकेस पायाजवळ ठेवली आहे, आणि पाय नोटबुक
असलेल्या ब्रीफकेसला स्वतःजवळ ठेवलेलं अनुभवतोय. कपितोनव बहुधा इन्स्टेंट कॉफी
टाळतो, बहुतकरून तो उकळलेली कॉफी पितो. त्याच्याकडे
तांब्याचं कॉफ़ीपॉट आहे – खरोखरचं, नीनानेच इस्ताम्बुलमधे
विकत घेतलं होतं. बिस्किट घेतलं, एक तुकडा तोंडात टाकला.
प्रवेशद्वाराजवळ टेबलाशी रजिस्ट्रेशन चाललंय, पण अगदी वेळेवर
त्याला लक्षांत आलं, की त्याने यंत्रवत् रजिस्ट्रेशन करवून
घेतलं आहे : जसांच तो लॉबीमधे आला, त्याला नाव विचारण्यांत
आल होतं. एक घोट घेऊन कपितोनव विचार करतो : मी काही ईवेन्ट्स-आर्किटेक्ट थोडाच आहे
( त्याची आठवण आली – हॉटेलमधे काउन्टरच्या जवळ असलेल्या).
डेलिगेट्स काळाच्या अंतराळांत वार्तालाप करताहेत
09.53
आणि स्थानाच्या अंतराळांत अगदीच हालचाल करंत नाहीयेत – आपल्या
जागेवरंच उभे आहेत, जास्तकरून – जोडीने,
आणि जिथे कुठे ग्रुप तयार झालेला आहे, तिथे
तेच आहेत – हाइपरचीट्स आणि हाइपर-खिसेवाले, हे माहीत नाही
कां ग्रुप्समधेच राहणं पसंत करतात.
टी.वी. वाले इथे आधीच पोहोचले आहेत. कॉरेस्पोंडेण्ट मुलगी
जुपिटेर्स्कीचा इंटरव्यू घेते आहे. आता कपितोनव तिचा चेहरा एका बाजूने नाही, जसा तेव्हां पाहिला होता, तर समोरून बघतो आहे, आणि तो तिच्या मोट्ठ्या-मोट्ठ्या
डोळ्यांनी चकित झाला आहे. मनांत येतं की जवळ जाऊन बघावं, कुठे
नजरेचा धोकातर नाहीये, किंवा मेक-अपचा कमाल तर नाहीये?
पण तेवढ्यांत ‘तलाव’ त्याच्याजवळ येतो:
“तुमच्या प्रोग्रामला एका डाइरेक्टरची गरज आहे. माझ्याकडे एक
आहे. पण, मला शंका आहे,
की त्याला उशीर होत आहे, म्हणून
नंतर...तुम्हांला भेटायचंय, खूप. बाइ दि वे, महाशय नेक्रोमैन्सर कुठे आहेत? ते हॉटेलमधून निघाले
होते कां?”
“नाही, मी फक्त काळ-भक्षकाला
बघितलं होतं. तसं, खरं म्हणजे, ऐकलं
होतं. तो माझ्या मागेच चालंत होता, आणि थंडीचे दिवस
संपण्याबद्दल काही तरी कुजबुजंत होता.”
“त्याच्याशी सहानुभूतीने वागूं या,” ‘तलाव’ हळूच म्हणाला. “आमचे छोकरे – रिमोटिस्ट्स
आहेत. समस्या एकंच आहे – एकमेकांना पसंत नाही करंत. तसं ह्या काळ-भक्षकाची मोठी
समस्या नाहीये, पण ते दोघं...”
आणि ‘तलाव’ ज्युपिटेर्स्कीबद्दल सांगतो:
“माहितीये, आत्ता
तो कशाबद्दल सांगतोय? हे, की
पीटरबुर्गचे नॉनस्टेजर्स मॉस्कोच्या नॉनस्टेजर्सशी कसे भिन्न आहेत. जसं की फक्त भिन्नतेबद्दलंच
बोलायला पाहिजे! आणि तुम्हीं ऐकलं न, की मी कसा इंटरव्यू देत
होतो? मी सगळ्यांबद्दल चांगलंच बोललो. सगळ्यांच्याचबद्दल.
कोणालाही वगळलं नाही, कोणालाही वेगळं केलं नाही. आता बघा,
किती फरक आहे आमच्या दोघांत?”
हॉलमधे येण्याबद्दल अनाउन्समेंट करतात.
कपितोनवला हे सांगून की, “डावीकडे बस”, ‘तलाव’ सगळ्यांत
आधी लॉबीतून जातो. ज्युपिटेर्स्की पण पिच्छा सोडवंत, ह्या
भीतिने की मागे न राहून जावो, त्याच्यामागे धावतो, पण आपल्या लोकांना बरोबर बोलावतो. कपितोनव कॉफी संपवतो, आणि तेवढ्यांत त्याची नजर कॉरेस्पोंडेंट मुलीवर पडते. ती हसते आणि
ऑपरेटरला काहीतरी सांगते.
ते त्याच्याजवळ येतात.
“आम्हीं तुमचापण वीडियो घेण्याचं ठरवलं आहे. काही हरकत तर नाही? तुम्हींतर संख्या ओळखता ना?”
“हो,” कपितोनव अत्यंत
संक्षिप्त उत्तर देतो.
“मी बाजूला उभी राहीन. तर, वितालिक?” ती ऑपरेटरला विचारते.
“थोडंसं आणखी डावीकडे...बस, बस, घेतो आहे.”
“तर, आम्हीं मनांतल्या
मनांत संख्या धरतो आणि ओळखतो,” ती कॅमे-यासमोर मुद्दाम
चिडवण्याच्या आविर्भावांत म्हणते. “काही तरी असंभवशी गोष्ट होणार आहे! आत्ता!
तुमच्या डोळ्यांसमोर...”
मोठ्या-मोठ्या डोळ्यांसमोर पापण्यासुद्धा आहेत...’माझे वीस वर्ष कुठेयंत?’ कपितोनवला
म्हणावसं वाटतं. ती त्याच्याकडे बघते. आणि – किंचित श्वास घेत म्हणते:
“मी तयार आहे.”
“दोन अंकांची संख्या मनांत धरा.”
“दोन अंकांची?” आणि तिच्या
आवाजांत कपितोनवला निराशा जाणवली. “मोठी संख्या धरू शकतो कां?”
“कोणतीही. बस, फक्त
दोन अंकांची.”
“धरली.”
तो तीन जोडायला आणि दोन वजा करायला सांगतो.
बेरीज आणि वजाबाकी करताना ती छताकडे डोळे फिरवते.
“झालं. सांगू?”
“कोणत्याही परिस्थितीत नाही! मी स्वतः सांगेन.”
इथे त्याला कळतं, की सांगण्यासारखं काहीच नाहीये. त्याला नाही माहीत, की
तिने कोणती संख्या धरली होती.
तो तिच्या अथांग डोळ्यांत बघतो आणि त्याला कळतं, की तिची इच्छा आहे, की
त्याचं उत्तर बरोबर निघावं. ती भुवया किंचित उंचावते. आपली लांब, पातळ मान बाहेर काढते, ओठांचं बिगुल बनवंत तोंड
किंचित उघडते, जणु ती कठिण प्रयत्न करण्यासाठी त्याची शेवटची
मदत करते आहे, आणि वाट पाहते, वाट
पाहते, पण तो – नाही सांगू शकंत.
“नाही.”
निःश्वास सोडतो.
ती सहानुभूतिने स्मित करते.
तो वैतागतो. ऑपरेटर कॅमेरा बंद करतो.
“तुम्हीं खरंच संख्या धरली होती?”
“नक्कीच, हो!”
दोन अंकांची संख्या?”
“स्पष्ट आहे. तुम्हींच सांगितलं होतं.”
“नाही सांगू शकलो. ओफ़.”
“सॉरी,” ती म्हणते, “बस, तुम्हीं काळजी करू नका, दुस-यांदा
जमेल. दर वेळेस तर नाही ना होऊं शकंत.”
“जर गुपित नसेल तर, तुम्हीं कोणची संख्या धरली होती?”
“222.”
“पण ही तर तीन अंकांची आहे!”
“नाही, काय म्हणतां! तीन
अंकांची होईल – 333.”
तेवढ्यांत कपितोनवला हॉलमधे बोलावतांत – तो शेवटचा डेलिगेट आहे, जो आत नव्हता गेला.
“माफ करा,” कपितोनव
म्हणतो.
10.05
हॉल. स्टेज. टेबल.
हात-सफ़ाईवाला मोर्शिन ए.वी. – मीटिंगचा अध्यक्ष.
“आदरणीय मित्रांनो! कॉन्फ्रेन्सच्या दुस-या दिवसाची कार्र्वाई
सुरू करताना, मला स्वागताशिवाय
पुढे जाण्याची परवानगी द्या. जर मी हे म्हटलं असतं, की ह्या
हॉलमधे आपलं स्वागत करताना मला आनंद होत आहे, तर मी खोट
बोललो असतो. नाही, नक्कीच, आपलं स्वागत
करताना मला आनंद होत आहे, पण तरीसुद्धां माझा, आणि त्याबरोबरंच तुमचाही आनंद, माझ्या मते, सम्पूर्ण आनंद असता, जर आपली मीटिंग इथे नाही,
तर, कालच्यासारखी – हॉटेलच्या मोठ्या हॉलमधे
झाली असती, पण, दुर्दैवाची गोष्ट आहे,
की आपल्यासाठी अज्ञात विध्वंसकाच्या त्या गुण्डगिरीच्या, स्पष्ट सांगायचं तर, गुन्हेगारीच्या युक्तीनंतर,
आपण सटीक शब्दांच्या प्रयोगाला घाबरणार नाही: विध्वंसक! – त्या
सगळ्या घोळानंतर हॉटेलच्या व्यवस्थापनाने, आपण त्यांची
परिस्थिति समजू शकतो, आपल्याला तुमची परिचित बिल्डिंग
भाड्यावर देण्यास नकार दिला, पण त्याने ह्या आर्ट क्लब
“सी-9”च्या प्रति आपल्या कृतज्ञतेंत काही फरक नाही पडंत, ज्याने
आपल्याला आसरा दिला. पुन्हां एकदा हार्दिक आभार.”
“आणि रात्रि-भोज?” हॉलमधून एक आवाज आला.
“काय रात्रि-भोज? रात्रि-भोजाच्या कार्यक्रमांत सध्यां काही परिवर्तन नाहीये. फायर-प्लेस
असलेला हॉल, आशा करतो, की आपल्याकडून
नाही हिसकावणार. पण फक्त ह्याच्यासाठी, की हे आयोजन नॉन-ऑफिशियल
आहे. व्यवस्थापनाची आपत्ति फक्त ऑफिशियल आयोजनांवर आहे. पण, मी
रात्रि-भोजाच्या ‘मूड’ला प्रोत्साहन
नाही देणार. आपल्या समोर कामाचा दिवस पडला आहे, आणि जर
कालच्या दिवसाबद्दल बोलायचं तर आपण संकटांत आहोत. आणखी एकदा – जोपर्यंत कालच्या
दिवसाचा प्रश्न आहे – ज्याने तो विषय संपवता येईल. कॉन्फ्रेन्सला ध्वस्त करण्याचा
दुर्भावनापूर्ण प्रयत्न करण्यात आला. कोणाच्यातरी डोळ्यांत आपण खुपंत होतो. मी
आठवण देईन की हॉलमधे बॉम्ब ठेवल्याबद्दलचा अज्ञात फोन पोलिसला अगदी त्याच वेळेस मिळाला,
जेव्हां आपल्या ‘गिल्डच्या चार्टर’बद्दल जोरदार वाद चालू होता. मी आशा करतो, की हा
शत्रू आपल्यापैकीच कुणी नसून कोणी बाहेरचा असावा. प्रत्येका परिस्थितीत, मी सांगेन, की असले बेकायदेशीर कृत्य, खरं म्हटलं तर अपराधाच्या, सरळ कायद्याच्या परिधीत
बसतात, आणि मला माहीत नाही, की पोलिस
काय कार्र्वाई करतील, पण, जर अचानक
आपल्याचमधे तो व्हिलन, विध्वंसक निघाला, भले ही मग तो मी का नसो, किंवा इथे हजर लोकांपैकी
आणखी कुणी असो, खरे शब्द वापरायला घाबरणार नाही : व्हिलन,
विध्वंसक...पुन्हां : विध्वंसक!...त्याच्याबद्दल कोणतीच दया-माया
दाखवली जाणार नाही, त्याच्या समर्थनांत कोणतेही संयुक्त पत्र
लिहिले जाणार नाही!...त्याने आमच्याकडून जराही दयेची आशा ठेवूं नये! स्वतःच्या
कृत्याची जवाबदारी स्वीकार करावीच लागेल! आणि फुल-स्टॉप लावूं या.”
टाळ्या.
“आणि, जर कुणाला आमच्या
समर्थनाची गरज आहे, तर तो आहे आमचा मित्र, उच्चकोटिचा जादुगार–हात-सफ़ाई, वदीम वदीमोविच पेरेदाश
ह्याला, मला हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे, पण त्याला काल दवाखान्यांत भर्ती करावं लागलं. जर कुणाला माहीत नसेल,
तर मी सांगतो : वदीम पेरेदाश काल संध्याकाळी रस्त्यावर घसरून पडला
होता आणि त्याचा पाय मोडला. तुम्हांला आठवंत असेल, की
कॉन्फ्रेन्सच्या ऑर्गेनाइज़िंग कमिटीने दुस-या शहरांतून आलेल्या पाहुण्यांना
सावधगिरीचा इशारा दिला होता, की सेंट-पीटरबुर्ग जमलेल्या कडक
बर्फाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठिकाण आहे. उन्हाळ्यांत सेंट-पीटरबुर्गमधे
श्वेत-रात्री असतात, पण हिवाळ्यांत कडक, खूपंच निसरडा बर्फ. आइसिकल्सबद्दल तर बोलूंच नका. कृपा करून सावध रहा,
लक्षांत ठेवा की तुम्हीं कुठे आहांत...मी संपादकीय समितीला विनंती
करतो, की कॉन्फ्रेन्सतर्फे पेरेदाशला नैतिक समर्थनाचं पत्र
पाठवण्यांत यावं, आपण मरीन्स्की हॉस्पिटलमधे, जिथे पेरेदाश पडलाय, आपल्या शुभेच्छा पाठवूं या,
त्याला बरं वाटेल. वदीम पेरेदाश लवकर बरा होवो. काही आपत्तीतर नाही
न?”
टाळ्यांनी उत्तर देतात.
“धन्यवाद,” प्रेसिडेंट
म्हणतो, “पण तरीही, आपण काल थोडं फार
काम तर केलंच आहे. आपल्याकडे आहे प्रेसिडियम, सेक्रेटरी,
कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष, हा मी. म्हणजे मी
अध्यक्ष आहे, वेळेवर निवडलेल्या काही कार्य-समिती आहेत –
संपादन समिति, मैंडेट कमिटी, ऑडिट
कमिटी, आणि – मला आशा आहे – आपल्याकडे प्रमुख गोष्ट आहे :
प्रॉडक्टिव कामासाठी ‘मूड’. आज इतर
गोष्टींबरोबर आपल्याला आपल्या चार्टरला मंजूरी द्यायची आहे, गिल्डच्या
बोर्डची आणि प्रेसिडेंटची निवड करायची आहे. पण आता...आता आपल्यापुढे एक टेक्निकल
प्रॉब्लेम आहे...मिखाइल विताल्येविच,” तो ऑडिट कमिटीच्या
अध्यक्षाकडे वळतो, “प्रॉब्लेम्सबद्दल सांगा.”
ऑडिट कमिटीचा अध्यक्ष माइकजवळ येतो.
“प्रॉब्लेम तीच आहे. कॉन्फ्रेन्सच्या निर्णयानुसार, ऑडिट कमिटीत तीन सदस्य असायला हवेत. पण वदीम वदीमोविचचा
पाय मोडलाय आणि ते ऑडिट कमिटीच्या सदस्याची जवाबदारी पूर्ण करू शकंत नाही. पुन्हां
मतदान करावं लागेल.”
“धन्यवाद,” कॉन्फ्रेन्सचा
अध्यक्ष म्हणतो. वदीम वदीमोविचच्या आजाराकडे बघता ऑडिट कमिटीच्या सदस्याची पुन्हां
निवडणूक करण्याच्या प्रस्तावाला मी मतदानासाठी प्रस्तुत करतो. कोण ह्याच्या
पक्षांत आहे? कोण विरुद्ध आहे? कोण
आपलं मत नाही देत आहे? प्रस्ताव सर्व सम्मतीने पास झाला कां?
नाही? माफ करा – फक्त एकाने मत नाही दिलं.
ह्या सकारात्मक दृष्टिकोणासाठी धन्यवाद. कृपा करून आपापल्या उमेदवारांची नावं
द्या.”
‘तलाव’ उठतो.
“ऑडिट कमिटीसाठी मी एव्गेनी गेनादेविच कपितोनवचं नाव प्रस्तुत
करतो. तो प्रोफेशनल मेथेमैटिशियन आहे, आणि मला वाटतं की त्याची उमेदवारी सर्वांत चांगली आहे.”
ज्युपिटेर्स्कीच्या गटांत लगेच हालचाल होऊं लागली : त्यांने
लगेच कपितोनवचेच नाव असलेल्या – जादुगार एव्गेनी अर्कादेविच बोझ्कोच्या नावाचा
प्रस्ताव ठेवला. कारण : बोझ्को ऑडिट कमिटीतून निघून गेलेल्या पेरेदाशसारखाच
डाइनिंग टेबलवर जादूचे प्रयोग दाखवण्यांत प्रवीण आहे. कधी ते बरोबर साल्ट-पेपर
शेकर्सचा खेळ दाखवायचे.
अध्यक्ष दोन्हीं उमेदवारांसाठी वोटिंग करण्याबद्दल सुचवणारंच
होता, की कॉन्फ्रेन्सने(विशेषकरून
ज्युपिटेर्स्कीच्या गटाच्या लोकांनी) प्रारंभिक चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला.
बोझ्कोच्या उमेदवारीबद्दल तर काही प्रश्नंच नाहीये, पण
कपितोनवच्या उमेदवारीवर जोरदार चर्चा होते.
चर्चेचा आरंभ करतो लिओनीदोव- ज़ापोल्स्की, जो खूप पोचलेला माइक्रोमैजिशियन आहे.
“ह्या तथ्याला, की माननीय कपितोनव महाशय एक प्रोफेशनल मेथेमैटिशियन आहेत, ऑडिट कमिटीच्या सदस्यतेसाठी त्यांच्या उमेदवारीच्या योग्यतेच्या स्वरूपांत
स्वीकार करता नाही येत. आम्ही आपल्या सम्माननीय सहयोग्याच्या दोन अंकांच्या संख्या
ओळखण्याच्या कलेचा अत्यंत सम्मान करतो, पण प्रस्तुत
परिस्थितीत मेथेमैटिक्सच्या मूलभूत मान्यतांबरोबर कमाल करण्याचं त्यांचं विशेष
कौशल्य आपल्यासाठी, जे मेथेमैटिशियन्स नाहीयेत, आणि ज्यांना फक्त कोणत्याही गोष्टीच्या साध्या-सुध्या गणनेतंच रुचि आहे,
एखादी गंभीर समस्या उभी करू शकते. कपितोनव
महाशयांचा मी अतिशय सम्मान करतो, पण तरीही मी आवाहन करतो,
की त्यांना वोट देऊ नये.”
‘तलाव’ ह्यावर आपत्ति
करतो.
“प्रिय मित्रांनो, हे व्यावसायिक गुण केव्हांपासून आपल्याला अडसर वाटू लागलेत? एका काळांत ऑडिट कमिटीत गणना–विशेषज्ञ, संख्यांशास्त्राचे
विशेषज्ञ, सांख्यिक सिद्धांताच्या प्रोफेशनल्सना प्राधान्य
दिलं जायचं, आणि इथे आम्ही त्याच विशेषतेमुळे भेदभाव करतो
आहे. आपल्यांत फक्त एक मेथेमैटिशियन आहे. ऑडिट कमिटीत तो नाही तर कुणी असायला
पाहिजे?”
लिओनीदोव-ज़ापोल्स्की ह्याचा विरोध करतो:
“माफ करा, जर
ही कॉन्फ्रेन्स जादुगार- नॉनस्टेजर्सची नसून दुसरी एखादी, जसं
जंगली जनावरांच्या ट्रेनर्सची, किंवा आणखी कोणती कॉन्फ्रेन्स
असती, किंवा मेथेमैटिशियन्सचीच असती, तर
मग कोणी वाद घातला असता? त्या परिस्थितीत आपण निश्चितंच मेथेमैटिक्सच्या
विद्वानाला ऑडिट कमिटीसाठी निवडले असते, पण आपण ना तर
ट्रेनर्स आहोत, ना ही कोणी दुसरे, आपण,
तुम्हांला माहीतंच आहे, जादुगार आहोत, आणि आपल्या विशेषज्ञाला आपण अवघड परिस्थितींत का टाकावे, जर त्याच्याबद्दल पूर्ण विश्वासाची भावना असूनही, आपण
कोणत्याही प्रकारे त्याच्याबद्दल अविश्वासाच्या भावनेला दूर नाही करूं शकंत?
कृपा करून ह्याला व्यावसायिक अविश्वास समजावं.”
हेरा-फेरी करणारा माखोव:
“मी आधीच्या वक्त्याशी सहमत आहे. कोणाचांच अपमान करू इच्छित
नाहीये, पण तुम्हांला माहीतंच
आहे, की बागेत, मी नाही सांगणार की
कोणाला सोडायला नको. मला, उदाहरणार्थ, मैण्डेट
कमिटीत ह्या उमेदवारीबद्दल काही आपत्ति नाहीये. पण, फक्त
ऑडिट-कमिटीत नाहीं!”
“ही सपशेल अवमानना आहे!” लोक आपापल्या जागेवरून ओरडतात.
“त्याने मनुष्याचा अपमान केला आहे! त्याने कॉन्फ्रेन्सचा अपमान केला आहे!”
“मी अपमान केलाय! कुठे अपमान केला आहे?”
“माखोव महाशय, आम्ही
बाग नाहीये!” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष म्हणतो. “सगळ्यांना आवाहन करतो की शांत रहावे.
चला, शेवटी मतदानंच करून घेऊ. हा सगळ्यांत महत्वपूर्ण प्रश्न
नाहीये. वलेन्तीन ल्वोविच, तुम्हीं तर आधीच बोललात...”
“एक सेकंड, एक
सेकंड!” ‘तलाव’ खूप वैतागलाय: त्याला
बोलायचंच आहे.
“वलेन्तीन ल्वोविच, कृपा करून काळावर मेहेरबानी करा!”
10.27
“जादुगार-मित्रांनों!” ‘तलाव’ माइक्रोफोनपासून दूर नाही जात, “प्रामाणिकपणे बोलूं या, इथे, आपण
सगळे जादुगार आहोत, आपण सगळे मैनिप्युलेटर्स आहोत, ही आपली कला आहे, आणि आपण त्यांत प्रवीण आहोत. पण,
तुम्हींच विचार करा, ह्या प्रश्नाचं उत्तर
द्या: मैनिप्युलेशनच्या विषयाच्या दृष्टीने ‘संख्या’ पत्त्यांहून, रुमालाहून, दोमिनोच्या
फास्यांहून आणि अशाच काही इतर आपल्या पसंतीच्या वस्तूंहून कोणत्या गोष्टींत
वेगळ्या आहे? जर आपण संख्यांच्या मैनिप्युलेटरला ऑडिट
कमिटीचा सदस्य निवडायला नकार देतो, तर त्याच आधारावर मैण्डेट
कमिटीतसुद्धां पत्त्यांच्या विशेषज्ञाला, आगपेटीच्या
काड्यांच्या माइक्रोमैजिशियनला, आणि स्लीव्ज़-जादुगाराला
घ्यायला नको. जर ते अचानक आपल्या वैधतेशी हेरा-फेरी करूं लागले, मैण्डेट्सवर जादू करू लागले तर? जर आपण कपितोनवला
ऑडिट कमिटीत ह्या आधारावर नाही निवडंत आहोत, की तो मेथेमैटिशियन
आहे, तर आपण एका भयानक परंपरेची सुरुवात करतो आहे, आपण स्वतःच आपल्या पायांखाली टाइम-बॉम्ब ठेवंतोय, स्वतःला
पंगुत्वाच्या दिशेने वळवतोय, समस्यांचं जेनेरेटर स्थापित करतोय,
ज्या कधी न कधी आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह लावतील! कमीत कमी
म्हणूनंच आपल्याला कपितोनवला मत दिलं पाहिजे!”
अनुभवी जादुगार म्शीन्स्की स्टेजवर येतो – तो शांत आहे, त्याच्या चेह-यावर – ज्ञानाचं तेज झळकतंय.
“तुम्हीं मला ओळखता, मी वरिष्ठ जादुगार आहे. मला सांगा, आपल्यामधे कुणी
असा आहे का, ज्याला शंभर पर्यंत मोजता नाही येत? आणि दीडशे पर्यंत? उत्तम! सगळ्यांना येतं. मी
तुमच्यासमोर प्रामाणिकपणे स्वीकार करतो, की
इंटीग्रल-कैल्कुलस काय असतं, मला माहीत नाही, पण मला हे माहीत आहे, की 62 आणि 67पैकी कोणची संख्या
मोठी आहे. माझी खात्री आहे, की तुम्हांलापण माहीत आहे,
की 62हून 67 किती जास्त आहे?”
“पाच!” सगळे आपापल्या जागेवरून ओरडले. “बरोब्बर पाच!”
“अगदी बरोबर! तर, मग प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम हा आहे की,
कपितोनवला, इंटीग्रल-कैल्कुलसच्या विद्वानाला, ऑडिट कमिटीत घेण्याचा अर्थ आहे – तार्किक बुद्धीचा उपहास करणे! हे म्हणजे,
चिमण्यांना मारण्यासाठी तोपेचा प्रयोग करण्यासारखं झालं!
हे...तथ्यांना अतिरंजित करणं झालं! आणि, ऑडिट कमिटीचं तथ्य
फक्त एक आहे – मोजण्याची योग्यता असणं! – एक, दोन, तीन!...शंभरपर्यंत मोजण्याची योग्यता असणं! जास्तीत जास्त दीडशेपर्यंत!”
वोटिंग होते, कपितोनव
ऑडिट कमिटीत नाही निवडून येत. बोझ्कोला निवडतांत.
“वाईट नका वाटून घेऊ,” उजवीकडे बसलेला माइक्रोमैजिशियन ज़ाद्नेप्रोव्स्की कुजबुजंत कपितोनवला
म्हणतो.
“काय म्हणता, मी
तर खूश आहे.”
“तरीपण, अपमान तर वाटतोच.”
“हूँ, ‘अपमान’. अपमान – जेव्हां अपमान होतो, तेव्हां, खरोखरंच – अपमान वाटतो!” कपितोनव सुरुवात करतो.
त्याला आवडंत नाही, की त्याचं सांत्वन करताहेत.
“माफ करा. बस, बराच
काळ मीटिंग्समधे गेलेलो नाहीये.”
“ ‘बोर’ होतां आहे का?”
“जास्त नाही.”
चर्चेत फक्त एकंच गोष्ट प्रमुख होती – कॉन्फ्रेन्सच्या
डेलिगेट्स द्वारे कपितोनववर जणु दोन बाजूंनी विचार केला जात होता : एकीकडे – फक्त
कपितोनव आणि दुसरीकडे – फक्त कपितोनवची उमेदवारी. समजणं कठीण आहे, की ह्यांत कोणच्या बाजूची हार झाली होती –
कदाचित दोघांचीही झाली असावी?”
हार ज्याची झाली, तो होता ‘तलाव’. तसं तो हे
दाखवंत नव्हता.
“मित्रांनो, आपल्यापुढे
बरंच काम आहे. तुमच्याकडून सक्रियतेची आशा करतो!”
अध्यक्षाने घड्याळाकडे बघितलं.
10.41
मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट बोलण्याची परवानगी मागतोय. प्लीज़.
मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट माइक्रोफोनजवळ येतो.
“मित्रांनो, दोन
गोष्टींकडे तुमचं लक्ष आकर्षित करू इच्छितो.”
“बोला,” कॉन्फ्रेन्सचा
अध्यक्ष म्हणतो आणि पुन्हां घड्याळाकडे पाहतो.
10.43
“पहिला मुद्दा. आपण आत्तांच
वदीम वदीमोविच पेरेदाशला ऑडिट कमिटीतून काढून टाकलं आहे,
प्रश्न हा आहे, की काय आपण, सर्वसाधारणपणे,
त्याला कॉन्फ्रेन्सचा डेलिगेट समजंत राहू, तो
गैरहजर आहे तरीही, आणि ब-याच प्रमाणांत कार्य सक्षम नाहीये
तरीही?”
“हा कसला प्रश्न आहे? स्पष्ट आहे, की समजंत राहू!” हॉलमधे
ज्युपिटेर्स्कीचे लोक ओरडतात.
“नाहीतर कसं?” कॉन्फ्रेन्सचा
अध्यक्ष म्हणतो. “ह्यांत पेरेदाशचातर काही दोष नाहीये की पीटरबुर्गच्या रस्त्यांवर
चालणं धोकादायक आहे. दुर्घटनातर आपल्यापैकी कोणाहीबरोबर होऊं शकली असती. मला वाटतं
की वोटिंगच्या वेळेस पेरेदाशच्या परिस्थितिबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची काही गरज
नाहीये. हो, तो गैरहजर आहे. त्याच्या गैरहाजरीने कोरमवर काही
परिणाम होणार नाही. कोरम पूर्ण न होण्याची काही भीति नाहीये. आणि शिवाय, तुम्हीं स्वतःचं त्याला कॉन्फ्रेन्सच्या डेलिगेटचा अधिकार दिलेला आहे!”
“तर, त्या परिस्थितीत,”
मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट म्हणतो, “जेव्हां
गुप्त मतदान होईल, तेव्हां आपल्याला त्याच्यासाठी
हॉस्पिटलमधे बैलेट-बॉक्स पाठवावा लागेल.”
“पाठवू! काही हरकत नाही!” ज्युपिटेर्स्कीच्या गटातील लोक
ओरडतात.
“त्या परिस्थितीत आपण कधीच संपवू शकणार नाही! कधीच इथून जाऊ
शकणार नाही!” ‘श्याम-वन’च्या गटाचे लोक ओरडतात.
“हो, हा प्रश्न सोपा
नाहीये,” अध्यक्ष पुन्हां घडाळ्यावर नजर टाकतो.
10.45
“चला, वोटींगच्या आधी
त्याला सोडवायचा प्रयत्न करू. मित्रांनो, मैण्डेट कमिटी आणि
ऑडिट-कमिटीला निवेदन करतो की ह्या प्रश्नावर त्यांनी एकत्र विचार करावा आणि बोर्ड
आणि प्रेसिडेंटच्या मतदानापूर्वी आपला सल्ला द्यावा.”
“तर, मी कॉन्फ्रेन्सला
सूचित करतो, की कालच्या तुलनेंत कॉन्फ्रेन्सच्या
डेलिगेट्सच्या संख्येत अश्याप्रकारे परिवर्तन झालेलं आहे. ‘आउट’ – पेरेदाशच्या संदर्भात काही निर्णय होईपर्यंत हा प्रश्न अनुत्तरित
राहील. ‘इन’ – पहिला – आपला परिचित
कपितोनव, जोपर्यंत दुस-याचा संबंध आहे, तर माझ्या भाषणाचा संबंध ह्याच गोष्टीशी आहे.”
“प्लीज़, शक्य असल्यास
थोडक्यांत सांगा,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष विनंती करतो.
“थोडक्यांत सांगेन. तुम्हांला माहीतंच आहे, की आपल्यामधे तथाकथित रिमोटिस्ट्ससुद्धां
आहेत...”
“हे ‘तथाकथित’ कशाला?!” ‘तलाव’ उत्तेजित
होतो.
“माफ करा, फक्त
‘रिमोटिस्ट्स. तसं त्यांच्या संदर्भांत सगळंच इतकं सोपं
नाहीये. एका रिमोटिस्टने, जो ईवेन्ट्स-आर्किटेक्ट म्हणून
ओळखला जातो, काल आपल्याकडे आला होता आणि आज आपल्यामधे आहे,
आमच्यावर प्रतिबंध लावलांय की त्याला न केवळ त्याच्या नावाने,
वडिलांचा नावाने आणि आडनावाने संबोधित करू नये, तर कोणत्याही ऑफिशियल डॉक्यूमेन्ट्समधे सुद्धा त्याच्या नावाचा, वडिलांच्या नावाचा आणि आडनावाचा उल्लेख करू नये, आणि
विशेषकरून मैण्डेट कमिटीच्या मिनिट्समधे. तसंच हे पण सूचित करतो, की दोन इतर रिमोटिस्ट्स, महाशय नेक्रोमैन्सर (ओझा)
आणि काळ-भक्षक, बराच वेळ समजावल्यावर ह्या गोष्टीसाठी तयार
झाले की ऑफिशियल डॉक्युमेन्ट्समधे त्यांचं आडनाव, नाव आणि
वडिलांच नाव पासपोर्टमधे दिलेल्या माहितीप्रमाणे लिहिण्यांत यावं. फक्त
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आपल्याचं म्हणण्यावर अडून आहे. मी कॉन्फ्रेन्सला विनंती करतो
की इथे हजर असलेल्या ईवेन्ट्स-आर्किटेक्टवर वजन टाकावं.”
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट दिसायला कसा आहे आणि तो कुठे बसला आहे हे
सगळ्यांनाच माहीत नाहीये. जर काळ-भक्षक दुर्बोध असूनही लोकांच्या नजरेंत आलेला आहे, आणि नेक्रोमैन्सर महाशय सगळ्यांच्या डोळ्यांत
काट्यासारखा खुपतोय, तर कॉन्फ्रेन्समधे उशीरा पोचल्यामुळे
ईवेन्ट्स-आर्किटेक्टचा अजूनपर्यंत कोणाशीही परिचय झालेला नव्हता. लोक डोके फिरवून
एकमेकाला विचारतांत की तो कुठे आहे.
पण तो ओठंगून खुर्चीत लपून गेला.
पण मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट त्याला लपून नाही राहू देत.
“हा आहे!” त्याच्याकडे बोटाने खूण करतो.
“तुम्हीं हे काय करतांय, डियर? असं कां करता आहांत? हा
फालतूपणा आहे!” त्याच्या बाजूला बसलेले कॉन्फ्रेन्सचे डेलिगेट्स त्याला टोमणे
देतात.
कपितोनव आपल्या रांगेतून लक्ष देतो की ह्यावेळेस ईवेन्ट्स-आर्किटेक्ट
कालसारखा नाही दिसंत आहे, जसं त्याला रिसेप्शन
डेस्क जवळ बघितलं होतं – आज तो अगदी उत्साही वाटतोय आणि आज त्याने अगदी
माणसांसारखे कपडे घातले आहेत, तसे हे ही विचित्रंच होते –
एखाद्या सहायक कामगाराच्या ‘ओवर-आल’
सारखं, स्वच्छ, निळ्या रंगाचं, पण, असं वाटतंय की दुस-या कोणाचं उतरवलेलंच आहे.
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट उसळतो आणि म्हणतो:
“मी ‘कोणी’ नाहीये! मी काही नाव-बीव नाहीये! मी ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आहे! मी काल
हॉटेलमधेसुद्धां आपलं नाव नव्हतं सांगितलं!”
“हो, खरं सांगतोय,”
‘तलाव’ म्हणतो. “खरंच त्याने हॉटेलमधे
राहण्यास नकार दिला होता.”
“कारण की ते रजिस्ट्रेशनसाठी माझ्यावर जोर टाकंत होते – माझ्या
ख-या नावासह! पण मी – ना तर सीदोरोव आहे, ना पेत्रोव! ना माइकल जैक्सन, आणि ना राबिनोविच! मी –
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आहे!”
“तुम्हीं रात्री कुठे होता?” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष विचारतो.
“बाकुनिन एवेन्यूवर बाथ-हाउसमधे!” ईवेन्ट्स-आर्किटेक्ट गर्वाने
उत्तर देतो.
हॉलमधे कोणीतरी शिट्टी वाजवली,
कोणी ‘आह!’ म्हणालं,
कोणी जोराने हसलं.
“तिथे काय एखाद हॉटेल आहे?”
“तिथे जेटी-कामगारांचा मुशाफिरखाना आहे, ते माझे शिष्य आहेत!”
अध्यक्षाच्या चेह-यावर चरम विस्मयाचा भाव आला.
“तुमच्या सिद्धांतांच्या प्रति सम्मानाचा भाव राखंत आम्ही
तुम्हांला एखादा फ्लैट देऊं शकलो असतो! तुम्हीं ऑर्गेनाइज़िंग कमिटीला कां नाही भेटलांत?”
“विचित्रंच गोष्ट आहे, की
ह्याला पासपोर्ट नसतांना तिकिट कोणी दिलं असेल?” पिवळ्या
सूटातला माइक्रोमैजिशियन ओरडतो. “काय तेपण शिष्य आहेत? हा
पीटरपर्यंत आला कसा?”
“’लिफ्ट’ घेऊन-घेऊन!”
“ ‘लिफ्ट’ घेऊन-घेऊन?...हिवाळ्यांत?...”
हॉलमधे हल्ला-गुल्ला होऊं लागला. वेगवेगळ्या प्रकारच्या
प्रतिक्रिया ऐकूं येतात :
“शाबास!”, “क्लीनिक!”
“पण, तरीही मैण्डेट
कमिटीतर्फे,” कमिटीचा प्रेसिडेंट घोषणा करतो, “मी इथे हजर असलेल्या रिमोटिस्ट्सला निवेदन करतो. काळ-भक्षक, महाशय नेक्रोमैन्सर! आपल्या कॉम्रेडला समजावून सांगा!”
“नेक्रोमैन्सर नाहीये! तो कॉन्फ्रेन्सला डावलतोय!”
लोक आपापल्या जागेवरून ओरडतात. “नेक्रोमैन्सर कां नाहीये?”
मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट विनंती करतो:
“काळ-भक्षक, कमीतकमी
तुम्हीं तरी आपल्या कॉम्रेडला समजवा!”
तो मोठ्या मुश्किलीने उठला. चेह-यावर हिरवळ, पापण्या सुजलेल्या. कपितोनवने आपल्या
अनिद्रेबद्दल विचार केला, की ह्याच्या आजारांपुढे तर ती
काहीच नाहीये.
“आम्हीं कॉम्रेड्स नाही,” काळ-भक्षक हळूच म्हणतो. “आमच्यापैकी प्रत्येकजण स्वतःत सम्पूर्ण आहे.”
“एक विशेष सूचना,” ‘तलाव’ने हात उचलला. “सगळ्या कार्यकारी कागद-पत्रांत त्याचं
नाव तसंच ठेवावं, जशी त्याची इच्छा आहे, पण काही विशेष रिपोर्ट्सचा संदर्भ देत, ज्यांत आडनाव,
नाव आणि वडिलांच नाव दर्शवलेलं आहे.”
“ह्या आणखी कोणत्या सीक्रेट रिपोर्ट्स आहेत?” मैण्डेट कमिटीच्या प्रेसिडेंटला ‘तलाव’च्या म्हणण्याचा अर्थ नाही कळंत.
“म्हणजे, ज्या
सीक्रेट आहे!” ‘तलाव’ म्हणतो.
“मी विरोध करतो,” ईवेन्ट्स-आर्किटेक्टचा आवाज निघतो.
“तुम्हांलातर त्यांच्याबद्दल कधीच माहीत नाही होणार!”
“ह्यांत काही तथ्य आहे, काहीतरी सकारात्मक,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष ‘तलाव’चं समर्थन करतो. “मैण्डेट कमिटीने ह्याबद्दल
व्यवस्थितपणे विचार करावा. आणि एडिटोरियल बोर्डनेसुद्धां विचार करावा. हा विषय
संपला. खूप झालं. अशाने तर आपण कधीही,” त्याने घड्याळीकडे
पाहिलं, -
11.02
मुख्य गोष्टीपर्यंत पोहोचू नाही शकणार.”
माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी, मोट्ठा बो-टाय लावलेला, आणि एकंदर सम्माननीय
व्यक्तिमत्व असलेला, माइक्रोफोन काबीज करतो.
“मी बहुमताच्या विचारांनी अंशतः आणि पूर्णतः सहमत आहे, पण, आपल्याला ह्या
अत्यंत वैयक्तिक प्रकाराच्या समस्या कां उद्विग्न करतात आहेत? जरा बघा, की देशांत काय चाललंय. आणि ग्रहावर? आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या
अंतरात्म्यांत. काल
तुम्हीं मला आपली गोष्ट पूर्ण करू दिली नाही, म्हणून मी आज
म्हणतोय. तुम्हांला प्रचलित वैधानिकतेच्या बारकाव्यांची फिकर आहे, जेव्हां मानवता आपल्याच प्रकारचं जीवन जगते आहे! असं कसं शक्य आहे?
जर समस्येकडे व्यवस्थेच्या उंचीवरून बघितलं, तर
आपल्याला कळतं की आपल्या व्यवस्थेला, मग ती कितीही
प्रभावशाली कां न असो, एक वस्तू जगू नाही देत आहे :
कागदपत्रांचा अनियंत्रित प्रवाह. आणि निरंतरतेसाठी आपल्याला ह्याच्याशी लढा द्यावा
लागेल!”
“ठीक आहे,”
अध्यक्ष सहमति दाखवतो, पण, बोललेल्या प्रत्येक
मुद्द्यावर नाही.
“कागदपत्रांचा प्रवाह, आपल्या कार्यक्षेत्रांत नाहीये. बसून जा.”
“मी बसतो!” माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी म्हणतो आणि आपल्या
जागेवर बसतो. “मी बसलो. पण तरीही आपलं! आपलं कार्यक्षेत्र! आपलं!”
“मित्रांनो, चार्टरच्या
ड्राफ्टकडे वळू या,” अध्यक्ष व्यस्ततेच्या भावाने
कागदपत्रांची उलटापुलट करंत म्हणतो. “ह्याचा मजकूर तुमच्या हातांत आहे, तुम्हीं त्याच्याशी परिचित आहांत. आपल्या गिल्डच्या चार्टरला मंजूर करायचा
प्रस्ताव ठेवतोय. कोण ह्याच्या पक्षांत आहे? कोण विरोधांत?
कोण गैरहजर आहे? एकमताने.”
काही क्षण हॉलमधे शांतता राहिले,
मग एक दोन टाळ्या ऐकू आल्या, बस, ह्याच्यापेक्षां जास्त काहीच नाही.
अचानक कोणीतरी ओरडतं:
“ही जादूची ट्रिक आहे!”
“काही ट्रिक-ब्रिक नाहीये!” अध्यक्ष गरिमापूर्वक म्हणतो, त्याला स्वतःलापण विश्वास नव्हता, की हे इतक्या सहजपणे होईल.
“ही ट्रिक आहे! कृपा करून ह्याची मिनिट्समधे नोंद करण्यांत
यावी!”
अध्यक्ष आपल्या बाह्या दाखवंत हात वर उचलतो. त्याच्यासाठी
टाळ्या वाजतांत.
“आणि आता – बोर्डाची निवडणूक!” अध्यक्ष घोषणा करतो. चार्टर
प्रमाणे बोर्डांत सात सदस्य असतील. कृपा करून गुप्त रेटिंगच्या वोटिंगसाठी नामांकन
प्रस्तुत करावे.”
मीटिंगमधे उत्तेजना पसरली. काही लोक हल्ला करतात आहेत, काही नामांकन देताहेत, मग
तेसुद्धा हल्ला बंद न करता नामांकन प्रस्तुत करू लागतात. बोर्डाच्या सदस्यतेच्या
गुप्त रेटिंगच्या वोटिंगसाठी नामांकन प्रस्तुत करण्याच्या प्रक्रियेला थांबवणं आता
अशक्य आहे. कॉन्फ्रेन्सद्वारे एकानंतर एक बारा नामांकन प्रस्तुत करण्यांत आले,
आणि तेराव्या नामांकनासाठी ‘तलाव’ कपितोनवच्या उमेदवारीचा प्रस्ताव प्रस्तुत करतो.
“व्हाट द हेल!” कपितोनव वळतो,
पण ‘तलाव’ हाताने
खुणावून सांगतो की सगळं ठीक आहे, तापण्याची गरज नाहीये.
“फक्त आपलं नाव परंत नका घेऊ,”
डावीकडे बसलेला शेजारी कपितोनवच्या कानांत कुजबुजतो. “ ‘तलाव’ला माहीत आहे की तो काय करतोय.”
“अरे, मला बोर्डांत काम
करायचं नाहीये!”
“तुम्हांला कोणी निवडणार नाहीये,
काळजी नका करू. हा अत्यंत हुशारीने खेळलेला डाव आहे.”
अध्यक्ष उमेदवारांच्या नावांची सूची वाचू लागतो, पण एका मोट्ठ्या किंचाळीमुळे पूर्ण न वाचतांच
थांबतो :
“माझं घड्याळ! माझं घड्याळ हरवलंय!”
तो दुर्दैवी कुणीही असला, तरी सगळ्यांत आधी लोकांना त्याचा नाही, तर वेळेचा
विचार येतो: किती वाजलेत? डेलिगेट्स कुपचाप आपल्या डाव्या
हाताच्या मनगटाकडे बघू लागतात.
11.29
“माझं
घड्याळ कुठे आहे?”
“माझंपण!”
कॉन्फ्रेन्सचा
अध्यक्ष मुठींनी टेबलाचा आधार घेत हळूंच उठतो, आपल्या शरीराला पुढे वाकवून म्हणतो:
“ह्या
काय ट्रिक्स आहे, मित्रांनो? काल जेव्हां मी प्रसन्न वातावरण राखण्याची विनंती केली होती, तेव्हां माझं तात्पर्य
अगदी वेगळंच होतं. ते, जे तुम्हीं आता करता आहांत, हे आपल्या कौशल्याला कलंकित करतंय!”...
“हा
डिवचतोय!” लोक आपापल्या जागेवरून ओरडतात.
“कॉन्फ्रेन्सला
वाया जाऊ देणार नाही!”
कपितोनव
घड्याळ नाही बांधंत, त्याच्यासाठी मोबाइल फोनंच पुरेसा आहे, पण सौभाग्याने मोबाइल आपल्या जागेवरंच आहे.
“ज्याचं
घड्याळ हरवलंय, त्याने कृपा करून आपला हात उंच करावा,” अध्यक्ष कॉन्फ्रेन्सला संबोधित करतो.
“कृपा
करून लक्ष द्या,” माइक्रोमैजिशियन झ्दानोव म्हणतो, “फक्त त्यांचंच नुक्सान झालेलं आहे, ज्यांना उमेदवार म्हणून पुढे केलं होतं! – गिल्डच्या बोर्डासाठी!...सिद्ध
करा की मी चुकतोय! पण, जर माझ्या कयास बरोबर असेल, तर ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे!”
“ही
राहिली घड्याळं!” वस्तू शोधणारा मिखाइल श्राम ओरडतो, आणि सगळे तिकडे बघतात, जिकडे श्राम खूण करतोय: खिडकीच्या चौकटीवर पाच लिटर्सचा ‘पवित्र झरा’ पाण्याचा कैन ठेवलेला
आहे, आणि त्याच्या तळाशी –
घड्याळं.
त्यांचे
संभावित मालक लगेच खिडकीकडे धावतात.
“चला, शाबास!” हॉलमधून एक आवाज.
“शाबास, शाबास!”
“काही
‘शाबास-बीबास’ नाही! शेम!”
“कोणी
तरी खूप तीव्रतेने,” अध्यक्ष दुःखाने म्हणतो, “आपल्या मीटिंगला बर्बाद करायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो मी तुम्हांला शांत
राहण्याची आणि व्यवस्था ठेवण्याची विनंती करतो! आपली एकता कायम ठेवा! वास्तवाची
जाणीव असूं द्या!”
‘पवित्र झ-याच्या’ तळातून निघालेली घड्याळं
पुन्हां आपापल्या मालकांकडे पोहोचतांत.
हॉलमधून
ऐकू येतं “सैबटाझ”.
कपितोनवच्या
कानांत जणुं कोणीतरी कुजबुजतंय : ब्रीफकेस उघड.
तो
उघडतो.
त्यांत
कैबेजचे कटलेट्स आहेत. पॉलिथीनच्या पारदर्शक पाकिटांत.
“हे
माझे नाहीये!! कोणीतरी बदलली आहे!” कपितोनव उडीच मारतो.
“तुमच्याकडे
काय आहे? तुमच्या
ब्रीफकेसमधे काय घुसवलंय?”
“कटलेट्स!
कैबेजचे!”
सगळे
आपापल्या ब्रीफकेसेस उघडून बघतांत. पण कोणीच वैतागंत नाही, इतरांच्या ब्रीफकेसेसमधे
सगळं ठीक आहे.
“माझ्या
ब्रीफकेसमधून एक अत्यंत महत्वपूर्ण वस्तू चोरी गेलेली आहे,” कपितोनव सम्पूर्ण हॉलमधे
घोषणा करतो, “अत्यंत
महत्वपूर्ण वस्तू!”
“जर
महत्वपूर्ण वस्तू आहे तर तिला शोधलं पाहिजे! माइक्रोमैजिशियन मक्रानोगव (‘ओले-पाय’ – अनु.) घोषणा करतो.
“महाशय!”
श्याम-वन उठतो. “गिल्डच्या कौन्सिलच्या निवडणुकीच्या परिणामांनी कोणीतरी आधीच
नाखुश आहे. त्या निवडणुकीच्या – जी अजून झालेलीच नाहीये, पण जी नक्कीच होईल!”
खुर्च्यांच्या
मधल्या कॉरीडोरमधे एक ससा उड्या मारंत होता.
“माफ
करा, हा माझा आहे!”
“कतोव्स्की, आपला फालतूपणा बंद कर!”
कतोव्स्कीच्या
हातांत एक काळी चपटी वस्तू दिसते, जळक्या पैनकेकसारखी.
“आर्थर, माझ्याकडे!” पैनकेकला
फरशीवर ठेऊन कतोव्स्की ओरडतो : ससा वळतो, आणि लगेच उड्या मारंत मागे येऊं लागतो.
बघतां-बघता
पैनकेकची ‘उंची’ वाढू लागते आणि
दर्शकांच्या डोळ्यांसमोरंच (सगळे लोक कतोव्स्कीकडेच बघताहेत) ते डोक्यावर घालण्याच्या
वस्तूंत बदलतं, ज्याला बोलचालीच्या भाषेंत ‘सिलिण्डर’ म्हणूं शकतो.
कतोव्स्की
सस्यासमोर सिलिण्डर ठेवतो, आणि तो फार काही विचार न करता, सिलिंडरमधे गायब होऊन जातो.
“माफ
करा, माफ करा, असं करायचं नव्हतं,” कतोव्स्की वाकून वाकून
म्हणतो.
सिलिण्डर
जादुगाराच्या डोक्यावर दिसतोय, काही टाळ्या आणि हशा ऐकूं येतात. काही लोक उद्विग्न आहेत:
“कतोव्स्की, आपल्या फालतू ट्रिक्स
बंद कर!”
“स्टाइल-बदलू!”
“आपला
आयटम नाहीये!”
“मला
लॉबींत करायचं होतं,” कतोव्स्की स्पष्टीकरण देतो. “संधि हुकली. मोठ्या मनाने माफ करून टाका.”
“इंटरवल
होतोय,” अध्यक्ष घोषणा
करतो. “अशाने काम नाही चालणार. नंतर बघून घेऊं. कॉफी-ब्रेक.”
11.51
कॉफी-ब्रेक.
प्रवेश-हॉल.
कपितोनव
ब्रीफकेस घेऊन उभा आहे आणि कॉफी पीत नाहीये. तो रागाने डेलिगेट्सकडे बघतो आहे. त्याला
प्रत्येकांत शत्रू दिसतो आहे. लोक त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करताहेत. ‘श्याम-वन’ स्वतः त्याच्याजवळ येऊन सांत्वना देत म्हणतो:
“तुम्हांला
टार्गेट करण्यांत येत आहे, कारण की आम्हीं गिल्ड-कौंसिलसाठी तुमची उमेदवारी प्रस्तुत केली होती.
तुम्हीं धीर धरा, आपण सगळं व्यवस्थित करूं, असं नाही सोडणार!”
“ह्यासाठी
थोडा वेळ लागू शकतो,” जादुगार झारापेन्किन म्हणतो, “तुम्हीं फक्त येवढं लक्षांत ठेवा “प्रत्येका ट्रिकची एक काउन्टर-ट्रिक अवश्य
असते.”
“माझ्या
उमेदवारीमागे काय उद्देश्य आहे?” कपितोनव सर्द आवाजांत ‘तलाव’ला
विचारतो.
“साइकोलोजिकल
अटैक,” ‘तलाव’ त्याला उत्तर देतो, “लहानसा – तुमच्या-आमच्या
विरोधकांवर. आम्हीं अगदी वेळेवर त्यांच्या खेळीचा बट्ट्याबोळ करून टाकला. तुम्हीं
बघितलं नाही का, की जेव्हां मी तुमचं नाव प्रस्तुत करंत होतो, तेव्हां ते किती वैतागले होते? तुम्हांला त्रास होतोय? वर्तमान परिस्थितीत तुमच्या जिंकण्याचा काही चान्स नाहीये, आणि तुम्हांला
स्वतःलासुद्धां बोर्डांत जायची इच्छा नाहीये, मी बरोबर म्हणतोय न? पण इफेक्ट...जबर्दस्त झाला, इफेक्ट.”
मिखाइल
श्राम, वस्तू शोधणारा जादुगार
जवळ आला:
“तेव्हां, हॉटेलमधे, तुम्हांला माझं म्हणणं
ऐकायची इच्छा नव्हती, पण ब्रीफकेसतर उघडायला पाहिजे होती...”
आता
कपितोनव ब्रीफकेसपासून दूर नाही होत आहे, तिला हातांत धरून ठेवलंय. ब्रीफकेस – कमीतकमी एक तरी प्रमाण आहे. कपितोनवची
संदिग्ध नजर सगळ्या चेह-यांवरून घसरते, ह्या आशेंत की कोणत्यातरी गुन्हेगाराला शोधेल. पकडा-तर, प्रयत्न तर करा. नाही
पकडूं शकणार.
कॉन्फ्रेन्सच्या
डेलिगेट्सचा मूड गेलेला आहे.
साधारण
शिष्ठाचाराने, सीमेत राहूनंच बोलतात आहेत.
अधिका-यांमुळे, हवामानामुळे, जिगरी दोस्त आणि
कॉम्रेडचा मुखवटा लावलेल्या माणुसकीच्या चलाख्यांनी वैतागून कोणी आपल्या कपांत
चहाचं पैकेट टाकतोय, तर कोणी इन्स्टेन्ट कॉफीचा एखादा चमचा. बॉयलरमधून उकळतं पाणी कपांत टाकतो आहे.
प्लेट्समधून
कोणी रस्क, कोणी
वेफर्स, कोणी
क्रीम-जैम बिस्किट्स उचलतोय.
काही
लोक कपितोनवला ते दुर्दैवी कटलेट्स दाखवण्याचा आग्रह करतात, आणि जेव्हां पब्लिकचं
मूड बघून तो पट्कन ब्रीफकेसमधे ठेवलेले कटलेट्स दाखवतो, तेव्हां लोकांना आठवतं की, असेच कटलेट्सतर बुफेच्या टेबलावर होते, आणि अनेक लोकांच्या प्लेट्समधून ते गायब झाले होते.
वोरोब्योव
म्हणतो:
“आम्हीं
तुमच्याबरोबर एकाच टेबलाशी बसलो होतो, आणि तुम्हांला, नक्कीच, ह्याबद्दल आठवतंय...मी समजतोय की तुम्हांला माझ्या प्रतिष्ठेबद्दल मनांतल्या
मनांत शंका आहे, आणि मी ही घोषणा करतो, की एक तर माझा ह्या भानगडीशी काहीही संबंध नाहीये, उलंट, मी स्वतःसुद्धां
कटलेट्सनी वंचित झाल्यामुळे, ह्या ट्रिकची निंदा करायला तयार आहे.”
“आणि
मी आधीचं तिथून उठून गेलो होतो,” सीज़रने आठवण दिली. “तुम्हांला प्रामाणिकपणे सांगतो, मी माझं कटलेट खाऊन
टाकलं होतं, पण
त्याने काही फरक पडंत नाही. टेक्निकल पॉइंट ऑफ व्यूने बघतां, हे अगदी कठीण नाहीये –
एकदम, म्हणजे, एकाच वेळेस, पब्लिकची एखादी लहानशी
वस्तू खेचून घेणं. एखाद्या वेगळ्या परिस्थितीत मीपण हे करूं शकलो असतो, पण मी कधीच सगळेच्या
सगळे कटलेट्स तुमच्या माथी मारले नसते.”
‘तलाव’ पुन्हां प्रकट होतो:
“चेहरा
नको लटकवूं, लाडक्या!
मी तुम्हांला खूष करतो. भेटा. नीनेल.
तुमच्या प्रोग्रामची डाइरेक्टर. जसं मी प्रॉमिस केलं होतं. ही तुमच्या प्रोग्रामचं
प्लानिंग करेल. मस्त राहील!”
“फार
आनंद झाला, नीनेल,” कपितोनव सुमारे चाळीस
वर्षाच्या महिलेला म्हणतो. “आणि तुम्हीं,” (‘तलाव’ला)
म्हणतो, “दुस-या
कुणाला कां नाही शोधंत, जो हा प्रोग्राम प्रोफेशनल पद्धतीने प्रस्तुत करूं शकेल?”
“तुमच्या
शिवाय?” नीनेलला उपरोध
कळला नाही.
“माफ
करा, मला फोन करायचांय,” कपितोनव जिन्याने वर
जातो.
तिथे
तो खिडकीजवळ थांबतो, ब्रीफकेस खिडकीवर ठेवतो आणि विचार करूं लागतो की मरीनाला काय सांगेल. हिमकण पडतांत आहे, पण ते इतके कमी आहेत, की बर्फा सारखे वाटंत
नाहीये. आणि, तेपण थांबून जातांत. कपितोनव ह्या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी तयार नाहीये, की त्याला फक्त भास झाला
होता, किंवा ते खरोखरंच पडंत
होते. रस्त्याच्या दुसरीकडे त्याला कैफे दिसतो – लवकरंच त्यांना लंचसाठी तेथे घेऊन
जातील.
त्याने
ठरवलं की फोन नाही करणार – मैसेज पाठवून देतो:
“लहानशी
समस्या. नोटबुक नंतर परंत करीन. सगळं ठीक आहे.”
12.05
खालच्या
मजल्याच्या टॉयलेटमधून निघून निळ्या चोग्यांत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट जडशीळ पावलांनी
वर येतो आहे. कपितोनवला त्याची एकटक नजर बोचूं लागते, तो स्वतःसुद्धां ताठरतो, जणु त्याच्यांत आणि पाय-यांने वर येणा-याच्या मधे एखादी दोरी खेचली आहे.
ईवेन्ट्स-आर्किटेक्टने जवळ येऊन म्हटलं:
“एड्स, भ्रष्ठाचार, आतंकवाद, ओळख विसरणं, युद्ध, आणि तुम्हांला, बघताय ना, कोण्या कटलेट्सच्या
हरवण्याचं दुःख. मानवशास्त्र विषयक स्थिरांक धोक्यांत आहेत, आणि तुम्हीं
कटलेट्सबद्दल काळजी करताय. तुमचा काही दृष्टिकोण आहे का? तुमचा काय दृष्टिकोण आहे, मला कळेल कां?”
तो
वर येऊन धापा टाकू लागला.
“आत्ता
तुम्हीं काहीतरी म्हणंत होते,” कपितोनवने फोन दूर केला. “पण तुम्हांला विश्वास आहे कां, की जे म्हटलं होतं, ते तुम्हांला समजतंय?”
एकमेकांच्या
डोळ्यांत पाहतात.
“आणि
तुम्हीं...तुम्हीं जे करतांहात, त्यांत तुमचा विश्वास आहे?” सूँ-सूँ करंत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट म्हणतो.
“त्यांत
एक नोटबुक होती,” कपितोनव नजर न काढतां म्हणतो, “एका माणसाची मैन्युस्क्रिप्ट, जो आतां ह्या जगांत नाहीये. तिची मला नाही, पण कोण्या दुस-या माणसाला गरंज आहे. ती त्याला फार प्रिय आहे. आणि अत्यंत
विश्वासाने ती मला देण्यांत आली होती. आणि माझ्याकडून तिला कटलेट्समधे बदलून
देण्यांत आलंय! पण ते तुम्हांला नाही कळणार, तुम्हीं फक्त ब्ला-ब्ला-ब्लाच करूं शकता! जरा सांगा तर, तुम्हीं कोणच्या
ईवेन्ट्सचे आर्किटेक्ट आहांत?”
“तुम्हांला
काय हे म्हणायचंय की ह्या भानगडीत माझा हात आहे?” कपितोनवपासून तोंड वळवंत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट म्हणतो. “माझ्यासाठी हे
क्षुल्लक आहे, अगदीच क्षुल्लक,” आणि जातां-जातां टोमणा मारून गेला: “विचार नका करू.”
12.12
पण
कपितोनव विचार करतोच आहे. हॉलमधे आपल्या जुन्या जागेवर बसल्या-बसल्या, तो ह्याबद्दल विचार
नाहीं करंत, की
वक्ता काय बोलतोय, तो आपल्याच कोणच्यातरी गोष्टीबद्दल विचार करतोय, ज्याच्याबद्दल दुसरे लोक विचार करंत नाहीये. अध्यक्षाच्या डोक्यावर – छताला
चिकटलेल्या फुग्ग्याकडे बघंत कपितोनव आपल्याच विचारांत मग्न आहे. फुग्गा प्रकट
झाल्याने कोणालाच आश्चर्य झालेलं नाहीये. कपितोनवला सोडून कोणीच फुग्ग्याकडे लक्ष
देत नाहीये, फुग्ग्याकडे
बघायची कोणाची इच्छाच नाहीये, पण त्याला, कपितोनवला, कसं माहीत, की कोणीच नाही? हे खरं नाहीये की कपितोनव इतरांच्या कवट्यांच्या डब्यांमधे डोकावूं शकतो, - ह्या अवयवाच्या संदर्भात
तो फक्त येवढंच करू शकतो, की मनांत धरलेली संख्या ओळखायची, आणि तीपण फक्त दोनंच अंकांची. आणि, तो निस्संदेह, कोणी डोक्यांत घुसणारा चोर नाहीये – तसंच, जसा तो खिडकींत घुसणारा, पोटमाळ्यांत घुसणारा चोर नाहीये; खिसेकापूसुद्धा नाहीये, घरांत घुसणारापण नाही आणि सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे, ब्रीफकेसमधे घुसणारा
चोरपण नाहीये. आणि आपल्या ब्रीफकेसप्रमाणेच, भले ही मग त्यांत काहीही कां नसो, तो कुणालाही आपल्या कवटीच्या डब्यांत घुसूं नाही देणार, त्याच्याबद्दल कुणी
काहीही विचार केला तरी. म्हणून प्रस्तुत परिस्थितीत कपितोनव कसला विचार करतोय, तो त्याच्या स्वतःचा
प्रश्न आहे, आणि
दुस-या कुणी कपितोनवच्या विचारांबद्दल काहीही विचार केला तरी, तो, दुसरा, प्रस्तुत परिस्थितीत
चूकंच असेल.
मध्यांतरांत
वेण्टिलेटर्स उघडून ताजी हवा हॉलमधे येऊं दिली, आता टवटवीत आणि गार वाटूं लागलं. लोकांचे डोकेपण गार झाले, किंवा मुख्य वक्ता, नेमेत्किनच्या भाषणाने
त्यांना शांत केलं होतं?...(नेमेत्किन?...पद्मेत्किन?...अत्मेत्किन?...कपितोनव आता आपल्या आजूबाजूला होत असलेल्या घटनांपासून अलिप्त होता.)
कपितोनवला हेसुद्धा नाही माहीत की हा मरगळलेला नामेत्किन, ह्याचं नाव गिल्डच्या
प्रेसिडेण्टच्या पदासाठी कोणी प्रस्तावित केलं होतं – ज्युपिटेर्स्कीच्या पार्टीने, की ‘श्याम-वन’च्या पार्टीने. कपितोनवला आश्चर्य होतंय (तसं, आश्चर्याने ह्याबद्दल विचार नाही करंत आहे), की ना तर ज्युपिटेर्स्की, न ‘श्याम-वन’(पण तो ह्याबद्दल विचार
नाही करंत आहे), ना अध्यक्ष मोर्शिन, आणि ना ‘तलाव’, प्रसिद्ध
व्यक्तींपैकी कोणीच माहीत नाही कां प्रेसिडेण्टच्या पदाचा प्रत्याशी नाहीये.
वेड्या-वाकड्या लोकांनाच पाठवतांत आहे. (आणि ह्याबद्दलही नाही.) ज़ामेत्किनच्या
विरुद्ध उभं केलंय रेचूगिनला (...लाचूगिन?...पिचूगिन?...), त्याचं भाषण आता होणार आहे.
आश्चर्यकारकरीत्या
कपितोनव दुस-याच कोणत्या गोष्टीबद्दल विचार करतो आहे.
“तुम्हीं
झोपले आहांत कां?”
“नाही.”
काही
वेळ शांत राहून:
“आणि
जर ‘हो’ तर? उठवणं जरूरी आहे कां?”
“मी
बस, असंच बघितलं, की तुम्हीं झोपलेले
नाहीये.”
कपितोनवने
स्वतःवर ताबा ठेवला, म्हणजे डावीकडच्या शेजा-याला अपमानास्पद उत्तर द्यायला नको. वयस्कर माणूस
आहे आणि त्याला माहीत असायला हवं, की काही लोक उघड्या डोळ्यांनी झोपूं शकतात, असं बरेचदां होतं, विशेषकरून आजकाल. पण कपितोनव आपलं लक्ष वक्त्याकडे वळवतो: तो
योग्यता-सूचकांकबद्दल बोलतोय. जादूच्या प्रभावांच्या योग्यता-सूचकांकची गणना
करण्याच्या प्रभावहीन पद्धतिबद्दल. असं वाटतंय की ही आंतरिक समस्या तिथे उपस्थित
लोकांना फार तापदायक आहे. गिल्ड-प्रेसिडेण्टशिपचा उमेदवार वचन देतो की जादुगारांना सर्टिफिकेट देण्यासाठी 100%पेक्षां जास्त
वांछित योग्यता-सूचकांक पद्धति बंद करेल. प्रोग्रामच्या ह्या मुद्द्याचं हॉलमधे
गरमजोशीने स्वागत करतात.
“बस, आता वेळ आलीये, आपलं कौशल्य मापण्याची
स्केल बदलण्याची! वेळ आलीये संदिग्ध योग्यता-सूचकांकाच्या दुरुपयोगाला “नको”
म्हणायची!
दोनदा
बीप-बीप झालं.
कपितोनवला
मैसेज आला:
{{{ती माझ्याकडे आहे}}}
कपितोनव
प्रयत्नपूर्वक डोळ्यांची उघडझाप करतो, जणु ह्या टेक्स्टवर डोळे मिचकावले जाऊ शकतात. पहिल्यांदातर तो टेक्स्टच नाही
वाटला, असं वाटलं की जबर्दस्ती
घुसून आलेला एखादा फोटो आहे, आणि एक अप्रियशी गोष्ट होती त्या धनुकोष्ठकांमधे, जे ओढून-ताणून आणलेल्या मंद हास्यामुळे पसरलेल्या तोंडाच्या कोप-यांसारखे
वाटंत होते. त्याने अक्षर ओळखले आणि आता भावहीन नजरेने ‘ती माझ्याजवळ आहे’कडे बघतोय, जे माहीत नाही कां
दोन्हीं कडून स्मित करणा-या धनु-कोष्ठकांच्यामधे आहे.
एक
भीतिदायक विचार मनांत येतो की त्याला मूखिनकडून मैसेज आलाय, पण हा मरीनाने पाठवला
होता, आणि आता प्रश्न असा आहे –
काय त्याला पाठवला आहे?
ही
– “ती” – कोण आहे – तिच्याकडे?
कपितोनव
लिहितो:
कोण?
पण
पाठवंत नाही. काहीतरी त्याला लगेच विचारण्यापासून परावृत्त करते. तो संकोचतो, अस्पष्टतेने अनुभव करंत, की त्याला आणखीही
काहीतरी करायचं आहे. हे करण्याआधी, तो मागे वळतो, कुठे लोक त्याच्याकडे बघंततर नाहीये. आणि जरी बघंत असले, तरी त्यांना काय पत्ता
लागणार आहे? तो
ते करतो आहे, जे स्वतःलापण समजावूं शकंत नाही: प्रश्नार्थक चिन्हानंतर धनु-कोष्ठक काढतो –
पहिला, दुसरा आणि तिसरा. मग तो
कर्सरला डावीकडे नेतो आणि सुरुवातीला तीन धनु-कोष्ठक बनवून टाकतो.
तो
त्याच्याकडे बघतो, जे बनलंय, आणि त्याला वाटतं, की त्याने कोणचीतरी सीमा-रेषा पार केली आहे.
पाठवून
दिला:
{{{कोण?}}}
उत्तर
लगेच येतं:
{{{इन्नोकेन्ती पेत्रोविच}}}
चला, गंमत सोडा (जर ही गंमत
असती, तर सगळं काही समजलं
असतं), पण मरीना गंमत नाही
करणार. पण, काय
ही मरीना आहे? नाहीतर, अचानक कळेल की मरीना नाहीये?
पण
प्रेषक नक्कीच “मरीना”च आहे.
पण, असंही असूं शकतं, की तिच्या मोबाइलवरून
त्याला ती लिहीत नसावी?
त्याला
धनु-कोष्टकांबद्दल आणि नोटबुकबद्दल झालेला कालचा वार्तालाप आठवतो, जिच्याबद्दल, जर तिच्या म्हणण्यावर
विश्वास ठेवला, तर कोणालाच माहीत नव्हतं.
मरीना.
फक्त मरीना.
आणि, तिचाच एक आणखी मैसेज:
{{{थैंक्यू}}}
तिला
नक्की फोन केला पाहिजे. तो उठतो, आणि ब्रीफकेस घेऊन दाराकडे जातो.
“आता ‘माइक्रोमैजिशियन’ नावाबद्दल. माझ्या मते, ते चांगलं नाही वाटंत, मला माहितीये की ब-याच लोकांना हा विचित्रसा ‘माइक्रो’ अपमानजनक वाटतो, पण प्रिय मित्रांनो...” त्याला आपल्यामागे ऐकूं येतं.
कदाचित
त्याच्या चेह-यावर काहीसा बावरल्याचा भाव आहे, कारण की फॉयरमधे टेबल्स स्वच्छ करणा-या दोन्हीं असिस्टेंट्स कप-प्लेट्स
सोडून काहीशा भीतीने त्याच्याकडे बघतात. तो त्यांच्यासमोरून जिन्याच्या लैण्डिंगवर
जातो, आणि तिथे, आधीसारखाच, खिडकीतून बाहेर बघंत
मरीनाला फोन करतो. खाली एक कार येऊन थांबली, दोन लोक डिक्कीमधून बैलेट-बॉक्सेस काढतात, ते घाईंत आहे, इथे कार थांबवण्याची परवानगी नाहीये, बर्फाचे ढीग त्यांच्या कामांत अडथळा घालतात आहे. तो बराच वेळ वाट पाहतो –
बीप्स, पुन्हां बीप्स, - कदाचित मरीनाला सिग्नल
ऐकूं नसेल जात, तसं, हे
कठीणंच वाटतं, आत्ताच तर तिने कोष्ठकांनी बांधलेलं “थैंक्यू” पाठवलं होतं. त्याच्याशी बोलायचं
नाहीये कां?
तो
पुन्हां फोन करतो, पण तिचा फोन स्विच-ऑफ आहे.
कपितोनव
त्यांचे सगळे मैसेजेस बघतो, सुरुवातीपासून, आणि, जसं
थोडं-थोडं कळंत जातं – कमीत कमी मैसेजेसच्या अर्थाच्या संदर्भात. “ती माझ्याकडे
आहे” कोण्या व्यक्तीशी संबंधित नाहीये, जसा त्याने विचार केला होता, तर त्याच्या संबंध नोटबुकशी होता, त्यानेच तर ह्याच्याआधी नोटबुकबद्दल लिहिलं होतं – की नंतर परंत करेल. त्या
परिस्थितीत त्याच्या प्रश्न “कोण”ला, ज्याचं सर्वनाम ‘ती’शी
संबंध होता, मरीना
असं समजली की “कोण परत करून गेलं?” आणि ती त्या माणसाचं नाव सांगतेय “इन्नोकेन्ती पेत्रोविच”.
ह्याच्यापुढे
कपितोनवचं डोकं ते समजण्यास नकार देतं, जे, असं
वाटतं की समजायच्या पलिकडे आहे (पण, असं नाहीये कि कपितोनवने विचार करण्यास नकार दिला असेल).
12.55
तो
बघतो की त्याच्याकडे हेरा-फेरीचा जादुगार किनीकिन येतो आहे (तोसुद्धां हॉलमधून
बाहेर निघून आला होता).
“मी
तुमच्या मागे-मागेच आलोय. तुम्हांला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो. फक्त, इथे आपण एकटे आहोत, मला सगळ्यांच्या समोर
तुम्हांला भेटायचं नव्हतं.”
“काय
झालंय?” कपितोनव विचारतो.
“मला
आधीच कबूल करायला पाहिजे होतं,” किनीकिन म्हणतो. “पण, मी घाबरलो, की उपहासाचं पात्र होईन. आपला गुन्हा कबूल करायचाय.”
“तुम्हीं
कशाबद्दल बोलतांय?” कपितोनव विचारतो.
“तेच, सगळं ह्या कटलेट्समुळेच
झालंय. हे मांजरींसाठी आहे, पाळीव मांजरींसाठी. दचकूं नका, त्या कैबेजचेपण खातात. आपण तर जुन्या परंपरेनुसार चालतो, पण खास पीटरबुर्गमधे
पाळीव मांजरींना कैबेजचे कटलेट्स खूप आवडतांत, ते पण मीट आणि फिशच्या कटलेट्सपेक्षा जास्त. ह्यावर खूप आधीच लोकांचं लक्ष
गेलं होतं, ह्याबद्दल
काही लेखसुद्धा प्रकाशित झालेले आहेत, मी ह्या विषयाकडे लक्ष ठेवतो. दुसरी गोष्ट, आता तर मांजरीपण जवळ जवळ नाहींच आहे. प्रत्येक ठिकाणी गोडाउन बंद करून
टाकतात, थण्डी
कडाक्याची, उंदरांचा
शिकार...तुम्हीं मला माफ करा, पण मांजरी माझा ‘वीक-पॉइन्ट’ आहे, मी
मांजरींचा फैन आहे...आणि इथे अंगणांत...बॉयलर रूमच्या मागे...फक्त, प्लीज़, ह्याचा गवगवा नका करू.
मला, म्हणजे, काय म्हणायचंय? मी हेरा-फेरी करणारा, उठाईगीर जादुगार आहे, मला अंतर्राष्ट्रीय
पुरस्कारदेखील मिळाले आहेत. मी कटलेट्स मांजरींसाठी. तुम्हांला कोणीही लुबाडलेलं
नाहीये. ब्रीफकेसच्या संदर्भात. आपण, बस, गडबडून
गेलो. हॉटेलमधेच, हॉलमधे. तुमच्याकडे माझी आहे.”
“आणि
काय तुमच्याकडे माझी आहे?” कपितोनवच्या जीवांत जीव आला.
“अगदीच
तुमची नाही. तुम्हांला विश्वास नाही होणार, पण माझ्याकडे तुमची नाहीये. तुमची – माझ्याकडे नाहीये. डबल गडबड झाली आहे.”
“असं
कसं? काय असंही होतं?”
“नक्की
होतं! जसं, डबल
मर्डरपण होतो, तर मग डबल गडबड कां नाही होऊं शकंत?”
“माझी
– कोणाकडे आहे?”
“माझ्या
जवळच्या ब्रीफकेसमधल्या वस्तू बघतां, जी, तुम्हांला
कळतंय ना, की
माझी नाहीये, तुमची ब्रीफकेस दाबून बसला आहे, महाशय नेक्रोमैन्सर.”
“आणि
तुमच्याकडे – नेक्रोमैन्सरची आहे?”
“अगदी
बरोब्बर बोललांत.”
“आणि
नेक्रोमैन्सर स्वतः कुठे आहे?”
“हे
कोण सांगू शकतं! जर इथे असता, तर मी लगेच त्याच्याशी बोललो असतो. आणि नंतर तुमच्याशी. पण तो इथे नाहीये.
सकाळी बघितलं होतं, पण त्यानंतर तो कुठेतरी गायब झाला. तुम्हीं घाबरूं नका. घाबरण्यासारखं काही नाहीये.
तो येईल.”
दोन
माणसं जिन्याने वर जातांत, प्रत्येकाकडे एक-एक मतपेटी आहे.
“असं
कसं ‘घाबरण्यासारखं काही
नाहीये’? आणि
जर माझ्या ब्रीफकेसमधे अशी एखादी वस्तू असेल, जी मला कुणालांच दाखवायची नसेल तर?”
“सगळं
ठीक होईल, विश्वास
ठेवा. तुम्हीं मला माझी परंत द्याल?”
“तुमचीवाली
द्या. म्हणजे त्याची.”
“नाही
देऊं शकंत.”
“कां
नाही देऊं शकंत?” फॉयरमधे दोन्हीं मतपेट्या नेत असलेल्या ऑडिट-कमिटीच्या सदस्यांकडे बघंत
कपितोनव आश्चर्याने विचारतो.
“नाही
देऊं शकंत. ही
परकी ब्रीफकेस आहे. तुमचीही नाही, आणि माझीही नाही.”
“ह्याने
काय फरक पडणार आहे की ती कोणाकडे आहे – तुमच्याकडे किंवा माझ्याकडे?” कपितोनव उठाईगीर
जादुगारावर दृष्टी रोखंत म्हणतो.
“आणि
जर काही फरक नाही पडंत, तर मग प्रश्नंच काय आहे? चला, नेक्रोमैन्सर
परंत येईपर्यंत सगळं असंच राहू देऊ. तो येईल, मी त्याच्याशी बोलेन. त्याला त्याची ब्रीफकेस देऊन देईन, तुमची घेऊन घेईन आणि
लगेच तुमची ब्रीफकेस तुम्हांला सुरक्षित परंत करेन, आणि आपण गैरसमज दूर करून घेऊं. तुम्हीं फक्त मला माझीवाली देऊन टाका, कटलेट्सवाली,तुम्हींतर ते खाणार नाहीये?...”
“तुमच्याकडे
दोन-दोन होतील, आणि माझ्याकडे एकही नाही,” कपितोनव कल्पना करतो. “खूप मजेदार तर्क आहे.”
“तुम्हांला
माझ्यावर विश्वास नाहीये?”
“मला
फक्त येवढं कळंत नाहीये, की आत्ता माझ्याशी ब्रीफकेसची अदला-बदली करण्यांत तुमचं काय जातंय. आणि खेळातून बाहेर होण्यांत.
नेक्रोमैन्सरला तर मी तुमच्याशिवायसुद्धां बघून घेईन. तुमच्यासाठी ते जास्त सोपं
राहील.”
“ठीक
आहे, मी उत्तर देईन. हा
अत्यंत नाजुक प्रश्न आहे. आत्ता, ह्या क्षणाला, नेक्रोमैन्सरच्या ब्रीफकेसमधे काय आहे, ह्याबद्दल खुद्द नेक्रोमैन्सर शिवाय, फक्त एका माणसाला माहीत आहे, तो आहे मी, आणि जर आपण ब्रीफकेसेसची अदला-बदल केली, तर दोन लोकांना माहीत होईल.”
“मी
नेक्रोमैन्सरच्या ब्रीफकेसमधल्या वस्तूंवर थुंकतो! मला जाणूनसुद्धां घ्यायचं
नाहीये, की
त्यांत काय आहे.”
“अगदी
बरोब्बर! पण तुम्हीं स्वतःला माझ्या जागेवर ठेवून बघा, मलातर माहितीये न, बस, हीच
प्रॉब्लेम आहे! जर मला ह्या ब्रीफकेसमधल्या वस्तूंबद्दल माहीत नसतं तर मी काहीही
विचार न करता, तुमच्या ब्रीफकेसशी ती बदलली असती. पण, आता, जेव्हां
मला माहीत आहे की ह्यांत काय आहे – असं करूं शकंत नाही, मला नैतिक अधिकार नाहीये.”
“त्यांत
असं आहे तरी काय? कोणाची हाडं आहेत कां?”
“नो
कमेन्ट्स, प्लीज़.”
“फार
छान,” कपितोनव म्हणाला, “तुमच्या मांजरींना उपाशी
राहावं लागेल.”
कठोरतेने.
क्रूरतेने. पण हाच एकमेव मार्ग आहे. कपितोनव स्वतःशीच म्हणतो.
13.07
घोडेस्वार.
मॉनेस्ट्रीज़. नदीचं कोरडं ठणठणीत पात्र. लाकडी खांब, एकसारखे एकीकडे झुकलेले, स्तेपीवर अनंतापर्यंत विजेच्या तारांना खेचताहेत...
किनीकिनच्या
मागे मागे हॉलमधे परंत जायला नको, म्हणून कपितोनव कॉरीडोरमधे प्रदर्शित चित्र बघतोय. कोणाच्यातरी मंगोलिया
यात्रेचं वर्णन होतं ह्या चित्रांमधे. कपितोनवला पर्यटनाचा फारसा शौक नव्हता. तो
अगदी खास घरकोंबडा आहे.
प्रत्येक
पर्यटक दोन चाकांच्या गाडीवर सामान नेतो आहे – हे शिंग असलेले याक आहेत: मंगोल एका
ठिकाणावरून दुस-या ठिकाणावर जातो आहे. गुंडाळलेला तंबू, घरगुती सामान, गाठोडी, सोलर-बैटरीज़ आणि डिश एन्टेना.
त्याला
माहीत होतं, की
तिथे खूप तलाव आहेत, पण कल्पना नव्हती की ते इतके मोट्ठे-मोट्ठे असतील. जणु एखादा समुद्र असावा –
लाटा खडकांवर आदळतात आहेत. कुठे तरी वाचलं होतं की मंगोल लोक मासे नाही खात. मासा –
आपल्या जगाचा प्राणी नाहीये, दुस-या जगाचा आहे.
सकाळची
इंटरव्यू-सुंदरी, “तीन अंकांची संख्या”, कपितोनवला विचारते की मैथेमेटिक्सच्या सगळ्या शाखांतून त्याने कॉन्फॉर्मल
ट्रान्सफॉर्मेशन्सलाच कां निवडलं. येव्गेनी गेनादेविच, ते जादूची आठवण तर नाही ना देत? तुम्हीं वास्तविक वैल्यूज़शी संबंधित आमच्या क्षेत्राला काल्पनिक वैल्यूज़च्या
दुस-या जगांत घेऊन जाता, कारण की लाप्लास ऑपरेटर अपरिवर्तनीय आहे, आणि तिथे ते सगळं सोडवतां, जे करण्याची येथे परवानगी नाहीये. ह्यांत कुठे शैमानिज़्मतर नाहीये?
“वीका
(माहीत नाही कां, त्याने ठरवलं की तिचं नाव वीका आहे), तू प्रतिकूल सिद्धांतांचं प्रतिपादन करते आहेस.”
“एव्गेनी
गेनादेविच, प्लीज़, लाप्लास ऑपरेटरबद्दल
सांगा आणि हेपण सांगा, की त्या जागांवर असाधारण असं काय आहे...तिथे मासे असतात कां?”
“मी
अगदीच घरकोंबडा आहे.”
तो
एका पायावरून दुस-या पायावर उभा राहिला, पडता-पडता वाचला. डोळे विस्फारून बघितलं. नाही, पायांवर घट्ट उभा आहे.
हा
आहे शमान आपल्या लाम्ब ढोलकीबरोबर. दुस-या चित्रांत – मुलं आणि एक मोट्ठा कुत्रा.
घरून, बाइ द वे, काहीच आलेलं नव्हतं –
कपितोनवने बघितलं की एखादा मैसेज तर नाहीये. माफ करण्याची विनंतीची, नक्कीच, तो आशा नाही करंत, आणि त्याला क्षमा –
याचनेच्या शब्दांची गरजसुद्धां नाहीये. पण जितकं तो आन्ना एव्गेनेव्नाला ओळखंत
होता, मुलीचं कर्तव्य आहे की
ह्या परिस्थितीत स्वतःची आठवण द्यावी. तठस्थपणे. कमीत कमी तटस्थपणेच. पण मक्ख
बसलीये. कुठे काही झालं तर नाही?
येवढ्यांत
आपल्या वेळेवर
13.18
मीटिंग
संपली, आणि कॉन्फ्रेन्सचे
डेलिगेट्स, उपाशी
आणि वैतागलेले, पुन्हां हॉलमधून बाहेर येतात.
आता
ते बोलतात आहे, इकडे-तिकडे डोलंत – कॉरीडोरमधे, जिन्यावर, हॉलमधे (जे तिथे राहिले होते), पण फॉयरमधे नाही, कारण की फॉयर – आता मतदानाशी संबंधित गतिविधीचं क्षेत्र झालेलं आहे आणि चतुर
जादुगारांना वेळेच्या आधी मतदान-पेट्यांच्या जवळ यायची परवानगी नाहीये. दोन घट्ट
सील केलेल्या मतदान पेट्या टेबलांवर ठेवल्या आहेत: एक गिल्डच्या बोर्डाच्या
निवडणुकीसाठी, दुसरी तिच्या प्रेसिडेंटच्या निवडणुकीसाठी. पहिल्या पेटीसाठी मत-पत्र छापले
गेले आहेत आणि सेक्रेटरीने त्यांच्यावर सहीपण केलेली आहे, आणि दुसरीसाठी –
इतक्यांतंच संपलेल्या मीटिंगच्या परिणामानुसार – प्रिंटर मत-पत्र छापंत आहे.
प्रेसिडेन्ट
सहयोग्यांना उत्साहित करतोय:
“महाशय, बस आणखी थोडी वाट बघा.
आत्ता वोट देऊं आणि मग लंचसाठी जाऊं!”
डेलिगेट्स
संशयाने मत पेट्यांकडे बघताहेत: त्या स्टेज-जादुगारांच्या पारंपरिक डब्यांसारख्याच
दिसंत आहेत. आणि ऑडिट-कमिटीचे सदस्यसुद्धां डेलिगेट्सकडे संशयानेच बघंत आहेत, जे मतदान-पेट्यांमधे
रुचि दाखवतात आहे.
“चला, चला. रिबनच्या आंत नका
येऊं!”
ही
रिबन येण्या-जाण्याच्या रस्त्याला फॉयर – भावी मतदान-ज़ोन – पासून पृथक करते आहे.
“प्लीज़, मतदान पेट्यांना
सम्मोहित नका करूं. पुढे चला, प्लीज़.”
पण
प्रत्येक व्यक्ति पुढे जायच्या आधी मतदान-पेट्यांबद्दल काही न काही ज़रूर म्हणतो, - विचारतो, की त्यांच्यात दुहेरी तळ
तर नाहीये, आणि
कुठे त्यांत एखादी मुलगी तर नाही लपलीये, उदाहरणार्थ, झगझगीत स्विमिंग सूटमधे.
‘तलाव’ कपितोनवला सोफ्याच्या एका कोप-यांत गोबीच्या वाळवंटाच्या चित्राखाली बसलेला
बघतो.
“तुम्हीं
चालले गेले, मी
घाबरलोच होतो.”
“मी
कुठे जाऊं शकतो?” कपितोनव म्हणतो.
“मी
तुमची प्रोग्राम-डाइरेक्टरशी ओळख करून दिली होती, पण असं वाटतंय की तो तुमच्या डोक्यांत ‘नोट’ नाही
झाला.”
“कां
नाही? बिल्कुल ‘नोट’ झालांय. आणि ‘तो’ नाही, ‘ती’ आहे.”
“तर, मस्त आहे. माहितीये, मला ह्यांत काही शंका
नाहीये की तुम्हीं आपल्या अंतरात्म्याच्या सांगण्यावरंच मत द्याल, पण, माझी अंतरात्मा मला दोष
देता कामा नये, म्हणूनंच, मी तुम्हांला सांगेन, की तुमचे मित्र, ज्यांत, आशा आहे, की मी पहिला आहे, कशी वोटिंग करतात.”
किनीकिनशी
बोलणं झाल्यावर कपितोनवचं मन थोडं शांत झालं होतं, म्हणून कशी वोटिंग करावी ह्याने त्याला काही फरक पडंत नव्हता. पण, नाही, तो इतक्या खालच्या
पातळीवरपण नाही उतरणार की पत्तेबाज आणि हाइपरचीटर्सशी झालेल्या कालच्या भांडणानंतर
त्यांना मत देईल, आणि इथे तो ‘तलाव’च्या
संपर्कांत आहे. तो शब्द देतो, की अगदी बरोबर मत देईल.
“तुमच्याकडे
नेक्रोमैन्सरचा नंबर आहे कां?” कपितोनव विचारतो.
“तुम्हांला
कशासाठी हवाय?” ‘तलाव’ सतर्क
होतो.
“त्याच्याजवळ
माझी ब्रीफकेस आहे. परंत घ्यायची होती.”
“फोन
नंबर नाही देऊं शकंत. पण तुम्हीं घाबरू नका, तो इतक्यांत येईलंच. एकही मत गमवायला नको. त्याने आत्ताच मला फोन केला आहे.”
“आणि
तो गेला कुठे होता, त्याने काही सांगितलं कां?”
“मी
विचारलंच नाही.”
“खरंच? दिवसभर तो सेशन्समधे
नव्हता, आणि
तुम्हीं विचारलं नाही?”
“जेव्हां
तो येईल, तेव्हां
स्वतःच विचारून घ्या. पण हा वाईट सल्ला आहे. चांगला हा आहे: चांगल हे आहे, की कशाहीबद्दल नका
विचारू. जसा मी. तुमच्यासाठी हे आवश्यक आहे कां?”
“मला
कमीत कमी येवढं कळेल का, की नेक्रोमैन्सर महाशयांच नाव काय आहे. मैण्डेट कमिटीच्या प्रेसिडेण्टने
सांगितलंय की ते काही सीक्रेट नाहीये.”
“तर
तुम्हीं मैण्डेट कमिटीच्या प्रेसिडेण्टलाच विचारलं असतं.”
“इन्नोकेन्ती
पेत्रोविच आहे न?”
“मी
मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेण्ट नाहीये. बाइ द वे, तुम्हीं कबूल केलं होतं की पार्टीशनच्यामागे मला आपला प्रोग्राम दाखवाल.”
“
‘बाइ द वे’?” कपितोनव पुनरावृत्ति
करतो. “काही संबंध आहे कां?”
“कसा
नसणार? आपल्या जगांत प्रत्येक
वस्तू संबंधित आहे, प्रत्येक वस्तूशी.”
कपितोनवला
प्रतिवाद करायचांय: त्याचं मत आहे की आपल्या जगांत रैण्डम-फैक्टर खूप मोठा आहे, पण तेवढ्यांत घोषणा होते
की सगळं तयार आहे आणि सुरू करायची वेळ आलेली आहे.
13.25
मतदान
व्यवस्थितपणे सम्पन्न होतं, कोणत्याही गडबडीशिवाय.
मत
देऊन झालेले लोक रस्त्याच्या पलिकडच्या कैफेत लंचसाठी जातात.
कपितोनव
आपल्या वचनाप्रमाणे जी नावं खोडायची आहेत, ती खोडून टाकतो, आणि स्वतःचपण (तो विसरूनंच गेला होता, की तो पण एक उमेदवार आहे, आणि त्याला बुलेटिनमधे स्वतःचं नाव बघून फार आश्चर्य झालं होतं).
13.58
कैफे
रस्त्याच्या पलिकडे आहे. जेवण तसंच आहे.
आणि
हे ‘जेवण’ काय असतं? नाही, हे तर कळतं की ‘जेवण’ काय असतं, हे कळंत नाही की ‘जेवणा’चं काय करतात – कोणत्या क्रियेला तो स्वतःवर होऊ देतो?
‘जेवण’ खातांत, - आणि ‘जेवणा’बद्दल सगळं अगदी बरोब्बर सांगता येतं, पण तरीही, जास्त एब्स्ट्रेक्ट
रूपांत सांगितलं तर, ‘जेवणा’चं काय होतं, जर ‘जेवण शब्दाने टेबलवर होत असलेल्या लांब लचक
प्रक्रियेबद्दल विचार केला तर, ज्यांत अन्नाची नितांत आवश्यकता असते?”
‘जेवण’ लांबतंय? ‘जेवण’ होतंय? काय ‘जेवण’ होण्याची कोणची जागा असते?
साधारणपणे
‘जेवण’ ज्यांत कपितोनव भाग घेतो
आहे, त्याची एक जागा आहे, नक्कीच, त्याचं अस्तित्व आहे, ते लांबतं, होत असतं, पूर्ण होतं –‘मित्रांच्या जेवणाच्या’ मैत्रीपूर्ण आणि
शांततेच्या वातावरणांत.
‘जेवण’ चांगलं खाल्लं जातं.
कपितोनवला
आठवलं की ‘जेवणा’बद्दल काय म्हणतात: ‘जेवण’ चाललंय.
ह्या
दृष्टीने ‘जेवण’ जीवनाची आठवण करून देतं.
की
जीवन ‘जेवणाची’ आठवण देतं.
14.00
हा
आहे कपितोनव, तो गार वेजिटेबल सूप खातो आहे. डेलिगेट्सला लंचसाठी दोन पर्याय दिलेले होते –
पहिल्यांत साधारण सूप, दुस-यांत गार सूप. काल प्रत्येकाने आपल्या व्यक्तिगत मेन्यूमधे ✔, चिन्ह बनवलं होतं. थण्डीमुळे बहुतांश लोक गरम सूप घेत होते. ह्या
कॉन्फ्रेन्समधे उशीरा आल्यामुळे कपितोनवकडे सीमित पर्याय आहे. वरून त्याला गार सूप
आवडतं. हिवाळ्यांतसुद्धां.
जेवण, किंवा डिनर म्हणा –
टेबल्सवर होत आहे : इथे सहा-सहा सीट्सवाले टेबल्स आहेत. निळ्या चोग्यांत
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आणि कपितोनवला, कॉन्फ्रेन्सला उशीरा आल्यामुळे, शेवटच्या, लांब टेबलाशी बसावं लागलं. ह्या लांबोळ्या टेबलाशी त्यांच्याबरोबर बसले होते
– हेरा-फेरीवाला पेत्रोव आणि माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी. दोन खुर्च्या रिकाम्या
होत्या.
हेरा-फेरीवाल्या
पेत्रोवने सूपचा एक चमचा चाखून नेक्रोमैन्सरबद्दल विचारपूस सुरू केली.
“नेक्रोमैन्सर
महाशय,” ईवेन्ट्स-आर्किटेक्ट
उत्तर देतो, “क्वचितंच
येईल.”
“असं
कां?” कपितोनव सतर्क
झाला.
“कारण
की मी इथे आहे,” ईवेन्ट्स-आर्किटेक्ट उत्तर देतो.
“आणि
काळ-भक्षक?” अदिनोच्नी
विचारतो.
“काळ-भक्षक
अन्य कारणाने नाही येणार.”
ते
खात आहेत.
जेवताना
चारीकडे लोक बोलतांत आहे. वेगवेगळे आवाज येत आहेत:
“अरे, जर तुम्हांला माहीत असतं, की इंडियामधे आम्हांला
कसं खाऊ घातलं होतं – फकीरांच्या उत्सवांत!”
“कोणी
फिश-मीटबॉल्सला चॉकलेट-ट्रफल्समधे बदलूं शकतो कां?”
“हा
प्रश्न श्रामसाठी आहे, त्याला ‘सम्मोहन-क्रिया’ येते.”
“मीशा, तू तर पार गेलास!”
“ट्रफल्स, ट्रफल्स!”
“पण, सगळ्यांच्याचसाठी!”
“मित्रांनो
जे तुम्हांला देतात आहेत, खा,” श्राम
उत्तर देतो. “तुम्हीं तर समजूं शकता, की फिश-मीटबॉल्स आणि ट्रफल्सच्या किंमतीत किती अंतर असतं? ही फार महागडी वस्तू
आहे.”
जेवण्याने
सगळ्यांना शांत केलं आहे – जेवणाच्या दरम्यान सगळ्यांकडे एकंच काम आहे : जेवणावर
काम करणं.
“मित्रांनो, अटेन्शन! मैक्सिम
नेगराज़्दक आपला जादू दाखवतात आहेत!”
“हा
‘नट’ बघताय ना?” मैक्सिम नेगराज़्दक उठून
उभा राहिला. “मोट्ठा, वजनदार. आता मी ह्याला गिळून टाकेन.”
‘नट’ तर्जनीवर चढवलेला होता. हेराफेरीवाला – गिळंकृत करणारा मैक्सिम नेगराज़्दक
फोर्कने ‘नट’वर मारतो, धातूचा आवाज प्रदर्शित करण्यासाठी. ‘नट’ने
टेबलवर ठकठक करत, लाकडाचा आवाज प्रदर्शित करायला. तोंड उघडतो, तिथे ‘नट’ घुसवतो, आणि थोडं थांबून गिळून टाकतो.
त्याचे
डोळे सामान्य स्वरूपांत बाहेर निघतात, आणि कपितोनवला समजंत नाही, की ही आर्टिस्टिक ट्रिक होती की शरीराची स्वाभाविक प्रतिक्रिया.
मैक्सिम
नेगराज़्दक कैनबेरी-जूस पिऊन ‘नट’ला
आत ढकलतो.
लोक
टाळ्या वाजवतांत, पण सगळे नाही.
“तो काय खरंच गिळून गेला?” कपितोनव आपल्याबरोबर
जेवंत असलेल्या लोकांना विचारतो.
“जोकरंच
जाणे,” माइक्रोमैजिशियन
अदिनोच्नी म्हणतो. “माझ्या हातांत असतं तर मी अखाद्य वस्तूंच्या कार्यक्रमावर बंदी
घातली असती.”
“असं
शक्य नाहीये,” हेरा-फेरीवाला पेत्रोव म्हणतो. “ह्याच्यामागे एक मोठी परंपरा आहे. तलवारी
खाणारे, काच
खाणारे...”
फिश-मीटबाल्सच्या
ऐवजी फिशचा आणखी एक प्रकार देण्यांत येतो, ‘कॉड’भरलेले
आलू वडे.
“मित्रांनो,” मोबाइल दूर करंत ‘तलाव’ उठून म्हणतो. “गुड एपेटाइट, पण माझ्याकडे दोन बातम्या आहेत, दोन्हीं चांगल्या आहेत. पहिली : ऑडिट कमिटी साडे तीन वाजेपर्यंत काम पूर्ण
करेल. आणि दुसरी: इतक्यातंच पक्की बातमी आलीये, की हॉटेलचा फायरप्लेसवाला हॉल आपल्याकडेच राहील. ग्राण्ड-डिनर बरोब्बर
वेळेवर आणि निश्चित ठिकाणीच होईल!”
डेलिगेट्स
यंत्रवत् टाळ्या वाजवतांत, आणि त्यांच्या तोंडातून ‘हुर्रे’ सुद्धां येतं. आणि एक व्यक्ति ओरडतो:
“माफ
केलं!”
जेवणाच्या
दरम्यान हेराफेरीवाला पेत्रोव ईवेन्ट्स-आर्किटेक्टकडे तिरप्या नजरेने बघंत होता, शेवटी त्याने विचारूनंच
घेतलं:
“मला
कळलं नाही की तुम्हीं करता काय, पण मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, की आपल्या कलेबद्दल तुमचं स्वतःचं काय मत आहे? तुम्हांला वाटतं का की तिचा जादूगरीशी काही संबंध आहे?”
“म्हणजे, तुम्हांला म्हणायचं आहे, की जादूच्या खेळांशी?” आपल्या ओवरॉलचा पट्टा ठीक
करंत ईवेन्ट्स-आर्किटेक्ट त्याला नीट करतो.
“हो, तुमच्या कलेसाठी ह्या
शब्दाचा उपयोग करायला मी घाबरंत होतो.”
“
‘जादू’ ह्या शब्दाने मी घाबरंत
नाही. प्रोफेशनल क्षेत्रांत तसा तो खूपंच गुळगुळीत झालेला आहे. पण जेव्हां आपण ‘जादू’ ह्या शब्दाचा प्रयोग करतो, तेव्हां आपल्याला ह्या महान शब्दाच्या सगळ्याच अर्थांकडे लक्ष द्यावे
लागेल.”
“विशेषकरून
तुमच्या तोंडून हे ऐकून आनंद झाला.”
“आणि
मग, अशी वस्तू घ्या, जसं युनिवर्स.
युनिवर्सचा प्रादुर्भाव, हा मोट्ठा जादू नाही तर काय आहे. ते, ज्याला आपण ‘मोठा-विस्फोट’ म्हणतो, त्याला ‘मोठा-जादू’ म्हणायला हवं.”
“आणि
काय खरोखर विस्फोट झाला होता? काही लोकांचं मत आहे की काही विस्फोट-बिस्फोट नव्हता झाला.”
“कदाचित
ही लक्ष वळवण्याची पद्धत असेल?” माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी नाक खुपसतो.
“युनिवर्सच्या
संदर्भांत ‘लक्ष
वळवण्याची पद्धत’ म्हणणं, निःसंदेह अपमानजनक आहे. पण पहिल्यांदा असंही म्हणता येईल. तुम्हीं बरोबर
म्हणताय, सगळ्यांना
‘असाधारणतेचं’ आकर्षण असतं. पण त्याची
काही ग्यारंटी नाहीये, मुख्य मुद्दा – आणखीनंच काही आहे.”
15.05
जेवण
झाल्यावर कपितोनव शो-केसकडे येतो. जॅमचे डबे ठेवलेले आहेत – रास्पबेरी, स्ट्राबेरी, ब्लूबेरीचे. आन्कासाठी
घेऊं का – पीटरहून गिफ्ट? आठवला तिचा पुरळ आलेला, ब्लूबेरीचे डाग पडलेला चेहरा, जेव्हां ते तिघं जंगलांत बेरीज़ गोळा करंत होते – तेव्हां नीन्काचा चेहरापण
जांभळा झाला होता, आणि संध्याकाळी, जेव्हां ते व्हरांड्यात बसून बाऊलमधून खात होते, तेव्हां नीनाचे ओठ आणखी गडद काळे पडले होते, जसे सुरेख डाकिणीचे असतांत, आणि, आन्काला
झोपवल्यानंतरसुद्धां तिने त्यांना धुतलं नव्हतं...पण, कपितोनव स्वतःशीच म्हणतो, हा डबा ब्रीफकेसमधे नाही घुसणार, सध्यां ह्याला ठेवायला कुठे जागापण नाहीये. विकत तर घ्यायचा आहे, पण नंतर.
किनीकिन
त्याच्याजवळ येतो:
“तो
वाट बघतोय.”
15.07
“आणि
तुम्हीं इतके घाबरंत होते. चला.”
हे
फार बेफिकिरीने म्हटलं होतं. आपल्या सगळ्या हाव-भावाने किनीकिन कपितोनवला हे
समजावण्याचा प्रयत्न करतो आहे की ब्रीफकेसेसच्या अदला-बदलीची गरंज त्याच्या
तुलनेंत कपितोनवला जास्त आहे, आणि ह्यामुद्द्यावर कपितोनव सहमति दाखवायला तयार आहे – त्याला समजंत नाहीये, की ह्या हेरा-फेरीवाल्या
– उठाइगीर जादुगाराला कैबेजच्या कटलेट्समधे काय विशेष आढळलंय.
बर्फाच्या
ढिगांपासून स्वतःला वाचवंत ते रस्ता पार करतात, भूतपूर्व दिवाळखोर लोकांची मदत करणा-या सोसाइटीच्या बिल्डिंगमधे जातात.
“सी-9”च्या कॉरीडोरमधे येतात.
“नाही, नक्कीच, मला कळतंय,” किनीकिनच्या मागे-मागे
चालंत कपितोनव म्हणतो, “मांजरींना खायचे आहेत, तुम्हांला मांजरी आवडतात...पण तुम्हीं ह्या कटलेट्सच्यामागे इतके कां लागले
आहांत? कदाचित, तुम्हीं त्यांना काही
केलंय? कदाचित, ते विषारी असतील?”
“मला
तुमचं बोलणं ऐकूं येत नाहीये,” किनीकिन न वळतां म्हणतो.
“असं? आणि, मी म्हणतोय, की पैसा कमावण्याचे
शेकडों जास्त चांगले मार्ग आहेत...तुमच्यासारखी योग्यता असताना...जसं लंचमधे मासे दिले
होते...ह्या कटलेट्समधे असं काय विशेष आहे?”
“मला
शंका आहे, की
तुम्हांला कळणार नाही,” आपला वेग कमी करंत किनीकिन उत्तर देतो, “प्रत्येकाचा आपापला एजेण्डा असतो. माझा – कटलेट्स आहे. आणि मी त्याला
एखाद्या फालतू गैरसमजामुळे बदलायचा इच्छुक नाहीये. जास्त गोष्टींवर लक्ष केंद्रित
करायला नको, बिल्कुल
नाही.”
‘खरंच, मला काय फरक पडतोय’ – बेकारच्या उत्सुकतेसाठी स्वतःला दोष देत कपितोनव विचार करतो. आणि खरंच, ह्या गोष्टीने त्याला
काय फरक पडतो, की आपल्या कार्यकलापांसाठी किनीकिनला कुठून प्रेरणा मिळते. आणि किनीकिनच्या
डोक्यांत एक नवा विचार येतो – अचानक तो थांबतो आणि कपितोनवकडे एकटक बघतो.
“मला
असं वाटतं, की
तुम्हीं मला कोणी छोटा-मोठा बदमाश, चोरटा समजतां आहांत. तुम्हांला कळतंय कां, की तुम्हीं मला काय म्हणता आहांत? तुम्हांला माहीत आहे का, की ‘बुफे’ आणि ‘ला कार्ते’मधे काय फरक असतो? त्यावेळेस ‘बुफे’ चालला होता. प्रत्येक माणूस, ज्याचे कटलेट्स गायब झाले होते, पुन्हां जाऊन तसंच एक किंवा जास्तसुद्धां, कटलेट्स घेऊं शकंत होता. आश्चर्याची गोष्ट आहे, आणि जर आता तुमच्या प्लेटमधला मासा गायब झाला असत, तर काय – तुम्हीं दुस-यांदा
देण्याची मागणी केली असती, हँ? जर
मी तसं केलं असतं, जसं तुम्हीं म्हणताय, तर मी तुमचं जेवणंच गायब करून टाकलं असतं. पण, मी चोर नाहीये. तुम्हीं ही गोष्ट समजून घ्या, चांगलं राहील.”
“पण,” पण ह्या ‘पण’च्या नंतर काय म्हणावं, कपितोनवला माहीत नाही.
“माझ्या
मागे-मागे या,” किनीकिन म्हणतो.
नेक्रोमैन्सर
कॉरीडोरमधे उभा आहे आणि भिंतीवर लावलेले मंगोलियन चित्र बघतोय. त्याचे हात
पाठीच्या मागे आहेत, आणि दोन्हीं हातांनी त्याने हैण्डलने ब्रीफकेस पकडली आहे.
“तर,” किनीकिन म्हणतो, “नेक्रोमैन्सर महाशय, कृपाकरून प्रेमाने
मेहेरबानी करा.”
“चांगली
एक्ज़िबीशन आहे,” नेक्रोमैन्सर कपितोनवला म्हणतो. “गोबीचं वाळवन्ट, स्तेपी, तलाव. म्हणतात की तिथे मेंढ्यांची संख्या तिथल्या निवासांच्या दहापट आहे.
तुम्हीं मंगोलियाला गेला आहांत कां?”
कपितोनवने
थोडक्यांत उत्तर देण्याचा निश्चय केला.
“नाही.”
“मी
पण,” किनीकिनने उत्तर
दिलं, तसं त्याला कुणीही
विचारलं नव्हतं. “तुम्हीं जेवले नाहीत ना?”
“मी
कुणाच्यातरी घरी खाल्लं,” नेक्रोमैन्सर महाशय बेफिकीरपणे म्हणतो.
“चला, तर बदलून घेऊं. तुमच्याकडे
कपितोनव महाशयांची ब्रीफकेस आहे, माझ्याकडे – तुमची आणि कपितोनव महाशयाकडे – माझी. प्रत्येकाने खिडकीवर
ब्रीफकेस ठेवावी आणि प्रत्येकजण आपापली घेऊन घेईल.”
ठेवल्या
– घेऊन घेतल्या.
किनीकिन
लगेच आपली ब्रीफकेस घेतो, उघडतो आणि, कटलेट्स बघून निःश्वास सोडतो.
कपितोनव
किनीकिनच्या दूर जाण्याची वाट बघतो, आणि मग आपली ब्रीफकेस उघडतो.
“मला
हेंच वाटलं होतं!” कपितोनव उद्गारतो. “आणि, माझी नोटबुक कुठे आहे?”
“ती
तुमची नोटबुक नाहीये,” नेक्रोमैन्सर महाशय उत्तर देतात. “ती मरीना वालेरेव्ना मूखिनाची प्रॉपर्टी
आहे.”
“तुम्हांला
कसं माहीत?”
“त्यांत
तिचं विज़िटिंग कार्ड पडलं होतं. स्वाभाविकंच आहे, की मी ती नोटबुक तिला परत केली, मरीना वालेरेव्नाला फोन करून, तिच्याशी मीटिंग फिक्स करून. तुम्हांला हे माहीत आहे.”
“तुम्हांला
कसं माहीत की मला माहीत आहे?”
“तुम्हांला
मरीना वालेरेव्नाचा मैसेज आला होता, तिने तुम्हांला सूचित केलं होतं की नोटबुक तिच्याकडे आहे, आणि हे पण लिहिलं होतं
की कुणी तिला दिली होती.”
“इन्नोकेन्ती
पेत्रोविच.”
“हो, तिच्यासाठी,” नेक्रोमैन्सर म्हणतो, “मी इन्नोकेन्ती
पेत्रोविच आहे. मित्रांमधे मला माझ्या विशिष्ठ नावाने बोलावतांत – नेक्रोमैन्सर
महाशय. जगासाठी मी – इन्नोकेन्ती पेत्रोविच आहे.”
सगळं
ठीक आहे, तो
खरंच सांगतोय : कपितोनव तेव्हांच, लंचच्या आधीच समजून गेला होता, की इन्नोकेन्ती पेत्रोविच – हे नेक्रोमैन्सर महाशयंच आहेत.
पण.
“थांबा.
तुम्हांला कसं माहीत, की मला मैसेज मिळालाय?”
“मरीना
वालेरेव्नाने माझासमोरंच लिहिला होता. आणि, काही प्रमाणांत माझ्याच सल्ल्यावरून.”
“तुम्हीं
तिला सल्ला दिला – मला मैसेज पाठवण्याचा?! तुम्हीं – तिला?!”
“तिला
तुम्हांला धीर द्यायचा होता. तिला माहीत होतं, की नोटबुकमुळे तुम्हीं घाबरून जाल आणि तुम्हांला कल्पनासुद्धां करता येणार
नाही, की नोटबुक परत केलेली
आहे. तुम्हांला तर माहीतंच आहे, की नोटबुकसाठी ती कॉन्फ्रेन्समधे येण्याची तयारी करंत होती – तुमच्याकडे, इथे, पण परिस्थिति बदलली. मला
कळंत नाहीये की तुम्हीं इतके कां वैतागंत आहांत. सगळं ठीक-ठाक झालं. आम्हीं काही
वेळ बसलो, गोष्टी
केल्या. तिचं किचन खूप छान आहे. ती, बाइ द वे, माझ्याबरोबर तुमचं झोपेचं औषध पाठवणार होती, जे तुम्हीं तिच्या घरी विसरले होते. पण मी, सैद्धांतिक रूपाने वालोकोर्दीनच्या विरुद्ध आहे. माफ करा, मी नाही घेतलं.”
“हे
सगळं, माहीत नाही कां, माझ्या डोक्यांत उतरंत
नाहीये...ऐका. पण ही माझी ब्रीफकेस आहे, नोटबुक माझ्या ब्रीफकेसमधे पडली होती!...हे माझं काम आहे, तुमचं नाही, की त्यांत ठेवलेल्या
वस्तूंचं काय करायचं!...नोटबुक मी परंत करायला पाहिजे होती, तुम्हीं नाही.”
“सॉरी, ब्रीफकेसवर हे लिहिलेलं
नव्हतं की ती कुणाची आहे. पण विज़िटिंग कार्डने मला अचूक निर्णय घेण्यास मदत केली:
मी त्या पत्त्यावर गेलो. मरीना वालेरेव्ना आणि कन्स्तान्तिन अन्द्रेयेविच फार
भाग्यवान आहेत, की नोटबुक माझ्या हातांत पडली.”
“कन्स्तान्तिन
अन्द्रेयेविच ह्या जगांत नाहीये.”
“मला
माहीत आहे.”
“तर
मग असं नका म्हणूं की तो भाग्यवान आहे. मी नोटबुकच्या मालकिणीला शब्द दिला होता, की माझ्याशिवाय कुणी
दुसरं हे नोट्स बघणार नाही. आणि तुम्हीं, कबूल करताय, की तुम्हीं नोटबुकमधे डोकावले आहांत, हो न?”
“डोकावलो
आहे? मी पूर्ण वाचलीपण आहे –
अथपासून इतिपर्यंत. लगेच – नोटबुक उघडताक्षणीच. तिनेच मला लगेच हालचाल करायची
प्रेरणा दिली.”
“तुम्हीं
परवानगीशिवाय दुस-याचे नोट्स वाचलेत.”
“मरीना
वालेरेव्नाने न केवळ मला माफ केलं, तर मोठ्या उत्सुकतेने तिच्याबद्दल माझं मतसुद्धां ऐकलं. आधीतर ती सतर्कतेने
वागत होती, पण, जेव्हां तिला समजलं, की कोणाशी बोलते आहे, तर तिने ब-याचश्या
गोष्टी मला सांगितल्या. तिला बरेचसे प्रश्न विचारायचे होते.”
“असं
कसं?... आणि तुम्हीं
सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत?”
“अनेक
प्रश्नांची उत्तर माहीत नसणं तिच्यासाठी जास्त चांगलं आहे. असल्या प्रश्नांची, साहजिक आहे, मी उत्तरं नाही दिली.”
“हो, खरंय...आणखीही...”
कपितोनव स्वतःशी पुटपुटतो, हे बघून की नेक्रोमैन्सरला आपली ब्रीफकेस उघडायची काहीच घाई नाहीये.
“आणि
मग,” नेक्रोमैन्सर महाशय, तोच इन्नोकेन्ती
पेत्रोविच आहे, म्हणतात, “चला, प्रामाणिकपणे
बोलूं या. “ह्या बाबतीत तुम्हांला मरीना वालेरेव्नाला काहीही सांगायचं नव्हतं. आणि
मला बरंच काही सांगायचं होतं.”
“ह्याच्यावर
तुमचा विश्वास आहे?”
“पूर्णपणे.”
“आणि
नवरा?”
“काय
नवरा?” नेक्रोमैन्सरने
प्रतिप्रश्न केला.
“तुम्हीं
बोलंत असताना तो तिथे होता कां?”
“सुदैवाने, नवरा घरी नव्हता. नाहीतर बोलतांच आलं
नसतं. त्यालातर नोटबुकबद्दल काहीच माहीत नाहीये.”
“तुम्हांला
हेसुद्धां माहीत आहे...तर, हा ‘डेवेलपर’ कोण आहे?”
“संशोधक,” नेक्रोमैन्सर महाशय चूक
दुरुस्त करतो. “तुम्हांला त्याबद्दल विचार करायची काय गरंज आहे? तुम्हीं संख्या ओळखंत
राहा. आणि त्या भानगडीपासून तुम्हांला दूर राहायला पाहिजे. मी स्वतःचं सोडवीन.
तुम्हीं झोपायचा प्रयत्न करा, तुम्हांला झोपलं पाहिजे. टैब्लेट्स आणि वालोकार्दिन न घेतां.”
“माहीत
आहे, मला वाटतं की तुम्हीं
स्वतःवर फार मोठी जवाबदारी घेत आहांत!”
“ओह, हो,” नेक्रोमैन्सर महाशय
सहमति दर्शवतो. “मी खरंच स्वतःवर फार मोठी जवाबदारी घेतो आहे.”
कपितोनव
ब्रीफकेस बंद करणारंच होता, की तेवढ्यांत त्याला वाटलं की कोणचीतरी वस्तू कमी आहे. डेलिगेट्सच्या नावांच
ब्रोश्यूर, नोटपैड, पेन्स, पीटरबुर्गच्या रहस्यमय
स्मारकांबद्दल पुस्तक-सुवेनीर – हे सगळंतर आहे, पण ‘जादूची
छडी’ नव्हती. ह्या ‘जादूच्या छडी’ची खरं म्हणजे त्याला बिल्कुल गरज
नव्हती, पण
नेक्रोमैन्सर इन्नोकेन्ती पेत्रोविचबद्दल त्याच्या मनांत इतकी घृणा भरून गेली आहे, की जर मौका मिळालाय तर
तिला प्रकट न करणं पाप ठरलं असतं.
“माझ्यामते
ह्यांत आणखी एक वस्तू होती,” खुनशीपणाने स्मित करंत कपितोनव म्हणतो.
“आह, हो,” थोडा वेळ विचार केल्यावर
नेक्रोमैन्सरला आठवण येते. “ती मी ठेवून घेतलीये. माफी मागतो.”
तो
कोटाच्या आतल्या खिशांतून एक चामड्याची ‘केस’ काढतो, अशी जशी किल्ल्यांसाठी
असते, पण त्यांत ना तर
किल्ल्या होत्या, ना कैची, जर, उदाहरणार्थ
ती चाकूची ‘केस’ असती, उलट तिच्यातून दोन छड्या
बाहेर डोकावंत होत्या. कपितोनवच्या पुढे करतो, आणि जेव्हां कपितोनव पहिल्या छडीकडे हात करतो, तेव्हां त्याला दुरुस्त करतो:
“ही
माझी आहे. तुमची दुसरी आहे.”
कपितोनव
जी स्वतःची नाहीये, ती छडी परंत करतो आणि आपली, दुसरीवाली, अगदी तश्शीच छडी घेतो. छड्यांमधे जराही फरक नाहीये. त्याला वाईट वाटलं, की त्याने कां हा खेळ
सुरू केला – स्वतःला मूर्ख समजण्यांत आनंद नाही वाटंत.
15.21
इंटरवल
संपला. हॉलमधे लोक खुर्च्यांवर बसूं लागले आहेत. कपितोनवपण एका रिकाम्या खुर्चीकडे
जातंच होता की ‘तलाव’ने
त्याला थांबवलं:
“तुम्हीं
काल पार्टीशन बरोबर आपल्या कार्यक्रम दाखवायचं कबूल केलं होतं. चला, होऊन जाईल. अजून पाच
मिनिट आहेत.”
‘तलाव’बरोबर हॉलच्या शेवटापर्यंत जावंच लागतं. एक दार प्रकाश व्यवस्था करायच्या
खोलीकडे जात आहे, आणि दुसरं त्या खोलींत जिथे माइक्रोफोन्स, फालतूच्या खुर्च्या आणि सगळ्या प्रकारचं भंगार पडून आहे, - दार उघडून ‘तलाव’ कपितोनवला इथेच आणतो.
“तुम्हीं थोडे नाराज दिसताय.
तुम्हांला खूश करूं का? तर ऐका, जशी तुमची इच्छा होती, बोर्डसाठी तुमची निवड झालेली नाहीये. आत्ताच रिजल्ट्स ऐकून आलोय. पण, हे सीक्रेट आहे. चला, आत्ता घोषणा करतीलंच.”
“खरंच, ही गुड-न्यूज़ आहे,” कपितोनव सहमति दाखवतो.
भिंतीपासून
थोडी दूर, दोन
पायांवर आणि क्रॉसच्या आधारावर प्लायवुडची एक फ्रेम उभी आहे – त्यावर नवीन
वर्षाच्या क्रिसमस ट्रीची जाहिरात चिटकली आहे: सांता क्लॉज़, डावा हात छडीवर टेकवून
आणि उजवा हात लेनिनच्या स्टाइलमधे पसरून उभा आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे
विचित्र वाटतं.
“हे
पार्टीशन नाहीये, पण चालेल,” ‘तलाव’ म्हणतो
आणि त्या फ्रेमचा पाय उचलतो.
कपितोनव
दुसरा पाय उचलतो.
तुमच्या
पक्षांत फक्त दोन मत होते. एक माझं होतं.”
दोघं
मिळून पार्टीशन सरकावतात.
“पण, तुम्हांला, आशा आहे, की निवडलंय?”
“प्रश्नंच
नाही. प्लीज़ परवानगी द्या, मी हे नाही सांगणार की माझ्या पक्षांत किती मतं पडले. लवकरंच माहीत होईल.
तुम्हीं इथे उभे राहा, आणि मी तिकडे राहीन – ‘तलाव’ निर्देश
देतो आणि पार्टीशनच्या पलिकडे कपितोनवपासून लपून जातो.
“मला
अजूनही समजंत नाहीये, की माझं नाव कशाला द्यायचं होतं,” कपितोनव म्हणतो.
“आम्हीं
सगळं बरोबरंच केलं होतं. आणि तुम्हीं आमची मदद अश्याप्रकारे केली, की आपल्या उमेदवारीचा
विरोध नाही केला. समजावण्याला खूप वेळ लागेल. पण तुम्हांला – थैन्क्स.”
दार
किंचित उघडून कोणीतरी हॉलमधून डोकावलं.
“प्लीज़, डिस्टर्ब नका करू!
आमच्यांत पुरुषांची गोष्ट चालली आहे!” पार्टीशनच्या मागून ‘तलाव’ ओरडतो, आणि लगेच दार बंद होतं.
“तुम्हीं
तयार आहांत?” कपितोनव
विचारतो.
“मी
नेहमीच तयार असतो. मला काय करायचंय. पण तुम्हीं तयार आहांत कां? लक्ष केंद्रित कराल कां?”
“नाही
करणार.”
कपितोनव
दीर्घ श्वास घेतो.
“दोन
अंकांची संख्या मनांत धरा,” कपितोनव नेहमीसारखं म्हणतो.
“धरली.”
“त्यांत
13 जोडा.”
“जोडले.”
“अकरा
वजा करा.”
“तुम्हीं
21 धरले होते.”
“ब्लैक
जैक.” (पत्त्यांचा एक खेळ – अनु.)
“काय
ब्लैक जैक?”
“पुन्हां
पत्ते.”
“तुम्हीं
समजतांय की माझ्याकडे सुपर-इन्ट्यूशन आहे.”
“ठीक
आहे. धरली.”
“त्यांत
8 जोडा.”
“आणि
जर नाही जोडले तर?”
“तुम्हीं
जोडा नं!”
“ठीक
आहे, जोडले.”
“4
वजा करा.”
“हेंच
तर, कशाला, कशाला? ठीक आहे, वजा केले.”
“73”.
‘तलाव’ अर्धा मिनट चुप राहतो, मग निर्णयात्मक घोषणा करतो:
“सगळं
स्पष्ट आहे. तुम्हीं चेहरा नाही बघंत, पण आवाज ऐकता. हे, आवाजाने. पुन्हां, पण ह्यावेळेस मी चूप राहीन.”
“संख्या
धरा,” कपितोनव म्हणतो, “दोन अंकांची.”
‘तलाव’ उत्तर नाही देत. मग कपितोनव म्हणतो:
“त्यांत
5 जोडा.”
‘तलाव’ चूपंच राहतो.
“3
वजा करा,”
त्याला
उत्तर नाही मिळंत.
“तुम्हीं
धरली होती 99.”
त्याबाजूने
पार्टीशनवर प्रचण्ड धक्का बसला. हा ‘तलाव’ खाली
पडतोय. कमकुवंत आधारामुळे एका कोप-याने कपितोनवच्या चेह-याला स्पर्श करंत पार्टीशन
उसळतंय.
पार्टीशनसोबत
‘तलाव’पण धप्पकन फरशीवर पडतो.
कपितोनव
तिकडे धावतो, आणि भीतीने थिजून जातो. ‘तलाव’ पाठीवर
पडला आहे. त्याचा चेहरा विकृत होत आहे. त्याचे डोळे उघडे आहेत. तो अजूनही श्वास
घेतो आहे (की कपितोनवला असं वाटतं की तो अजूनही श्वास घेतोय).
“एम्बुलेन्स!
एम्बुलेन्स!” कपितोनव ओरडतो, आणि हाताच्या झटक्यामुळे खिशांत ठेवलेला मोबाइल छताकडे उसळतो.
दार
धाडकन् उघडतं, आणि कोणीतरी फरशीवरून मोबाइल उचलणा-या कपितोनवला टक्कर मारतो. आणखी दोन
जादुगार धावतंच खोलीत येतात.
आणि, कपितोनवच्या हातांतून
मोबाइल पुन्हां बेडका सारखा उडी मारतो.
“त्याने
संख्या धरली होती...99...मला वाटलं नव्हतं...मला असं वाटंत नव्हतं...कोणीतरी
एम्बुलेन्स बोलवा.”
तिला
बोलावलेलं होतं.
आवाज
ऐकू येतात:
“त्याने
त्याला काय केलं?”
“तुम्हीं
त्याला काय केलं?”
“हा
तर मेलाय.”
“कोणी
हृदयाची ‘मसाज’ करू शकतं कां?”
“नेक्रोमैन्सरला
बोलवा!”
“तो
नेक्रोमैन्सर (ओझा) आहे, जीवनरक्षक नाही!”
“बघा, इथे रक्त आहे!”
रक्त
कपितोनवच्या चेह-यावर आहे – पार्टीशनच्या कोप-यामुळे त्याची हनुवटी खरचटली होती.
अंधार
होऊं लागला, धुकं
दाट झालं, धुंध
पसरली, प्रत्येक गोष्ट तरंगत
असलेली वाटू लागली – हे सगळं त्याच्या डोळ्यांत आहे, तो ग्लासेससारख्या, एकांत एक ठेवलेल्या
प्लास्टिकच्या खुर्च्यांच्या टॉवरचा आधार घेऊन उभा आहे. ‘तलाव’च्या उघड्या डोळ्यांबद्दल फक्त येवढंच सांगता येतं: डोळ्यांची बुब्बुळं
स्थिर आहेत.
खोलींत
लोकांची गर्दी वाढू लागलीय. सगळ्यांना एकच काळजी आहे कि कपितोनव कसा वागतो आहे, ‘तलाव’ कसा पडला आहे.
आपसांत
विचार-विमर्श करतात:
“काय
भांडण झालं होतं?”
“
‘तलाव’ ने म्हटलं होतं की
त्यांच्यांत पुरुषांच्या गोष्टी होणार आहेत!”
ज्युपिटेर्स्की
सगळ्यांना बाहेर काढण्याची जवाबदारी घेतो.
एडमिनिस्ट्रेटर
येतो, तो पुनरावृत्ति करतो:
“हे भयंकर आहे! हे भयंकर आहे!”
ही
गोष्ट सगळ्यांना कळलीये की ‘तलाव’ने
99 संख्या धरली होती.
15.42
लिओन्ती
करास, ड्राइंगरूम-मैजिक मास्टर, ज्याने अंगणांत
एम्बुलेन्सच्या टीमचं स्वागत केलं होतं, तिला घेऊन मृत देहाजवळ येतो: एक महिला डॉक्टर आणि दोन उत्साही सहायक झर्रकन
खोलींत येतात, त्यांना अजूनही काही आशा आहे.
“खोली
रिकामी करा,” डॉक्टरने
हुकुम सोडला.
खोली
फक्त दोनंच लोक रिकामी करूं शकतात (बाकी लोक निघून गेले होते) – कपितोनव, जो जसा उभा होता, तसांच उभा आहे, आणि जादुगार-माइक्रोमैजिशियन
झ्दानोव, ज्याला
चौकस ज्युपिटेर्स्कीने स्वतः कपितोनवकडे लक्ष ठेवण्याचा निर्देश दिला होता.
दोघं
दाराकडे जातंच होते, की त्यांच्यामागे डॉक्टर ओरडली. मागे वळले.
“हे
काय आहे???”
‘तलाव’च्या कोटाच्या बाहीतून पांढरा उंदीर बाहेर निघाला. तो ‘तलाव’च्या गार पडलेल्या हातावर नाकाने टक-टक करतोय.
‘तलाव’ फक्त पत्त्यांच्या जादूचाच स्पेशलिस्ट नव्हता, त्याला आणखीही अनेक प्रकारचे जादू येत होते.
“ज़्यूज़्या,” झ्दानोव म्हणतो.
झ्दानोव
ज़्यूज़्याला उचतो आणि आपल्या रेघांच्या कोटाच्या चौड्या खिशांत ठेऊन घेतो, कपितोनवला रस्ता देऊन
स्वतः त्याच्या मागे-मागे बाहेर निघतो.
15.47
हॉलमधे
जादुगार उगीचंच इकडे-तिकडे फिरंत आहेत. काही लोक खुर्च्यांवर बसलेय. आणि, कारण की ते त्या दाराकडे
पाठ करून बसले आहेत, ज्यांतून कपितोनव आणि झ्दानोव बाहेर निघाले होते, म्हणून कपितोनव हॉलमधे परत आलाय, हे त्यांना फक्त तेव्हांच कळतं, जेव्हां हॉलमधे हिंडत असलेले लोक आपापाल्या जागेवर थिजून जातात. ते, जे बसलेले आहेत, वळले आणि चुपचाप
कपितोनवकडे बघूं लागले.
“मी
पुन्हां कधीच नाही...कधीच नाही...” कपितोनव जणु स्वतःच्या आवाजांत नाही बोलंत, “कधीच...कोणालाही...नाही
म्हणणार...मनांत संख्या धरायला.”
जेवढं
त्याला सांगायचं होतं, त्यापेक्षां जास्तच बोलून गेला, आणि जोर देऊन:
“कधीच
नाही...” कपितोनव म्हणाला.
पण:
“शांत
व्हा, शांत व्हा!” आपल्या समोर
नीनेलला बघतो.
त्याने
आठ्या चढवल्या – ती हनुवटीच्या जखमेखाली रुमाल ठेवते.
“एकही
शब्द नका बोलूं. जे पण तुम्हीं बोलाल, त्याचा तुमच्या विरुद्ध उपयोग होऊ शकतो.”
दोघापैकी
एक सहायक – कपितोनवला दोघांमधे फरक करणं जरूरी नाही वाटलं – खोलीतून बाहेर निघून
त्याच्याजवळ येतो:
“तुम्हीं
साक्षीदार आहांत कां? मला काही प्रश्न विचारायचेत.”
“कशाला?” नीनेल कडकपणे विचारते.
“कॉल-चार्ट
भरतो आहे. मृत्युची वेळ, तुमच्या हिशोबाने, पंधरा मिनिटांपूर्वी? नोट केलं होतं कां?”
“हे
बरोबर आहे, मी
त्याला फक्त संख्या धरायला सांगितलं होतं!”
“हे काय साधारणपणे आहे?”
15.51
मृतकाला
खोलींत त्याच्याच भरवशावर सोडलेलं आहे. एम्बुलेन्सची पूर्ण टीम (ड्राइवरला सोडून)
हॉलमधे बसली आहे. कुठे जायची घाई नाहीच आहे. कागद-पत्र भरतांत आहे. डॉक्टर
कॉल-कार्डवर नजर टाकते, जे सहायकाच्या हातांत आहे.
“ठीक
आहे, सेन्या, स्टेटमेन्टमधे तीन मिनिट
आधीची वेळ टाक...तसं, नाही, थांब, आपण केव्हां पोहोचलो होतो?...आणि तुझ्याकडे मृत्यु
किती वाजता झाला?…सध्या जे आहे, तेच लिही. आता किती वाजलेत?”
15.57
मेडिकल
टीम आता कपितोनवमधे उत्सुकता नाही दाखवंत आहे. इथे इतर लोकपण आहेत, जे कपितोनवपेक्षा जास्त
चांगल्या प्रकारे सांगू शकतात. जादुगार-माइक्रोमैजिशियन डॉक्टरला सूचित करतो की
“त्यांच्यांत पुरुषांच्या गोष्टी होत होत्या”, आणि फक्त आतांच कपितिनवला कल्पना येते, की तो झ्दानोव होता, जो त्या वेळेस खोलींत डोकावला होता. जर कपितोनवला सोडलं, तर
जादुगार-माइक्रोमैजिशियन झ्दानोव शेवटचा होता, ज्याने मृत ‘तलाव’ला
शेवटचं ऐकलं होतं (पण सान्ताक्लॉज़वाल्या पार्टीशनमुळे बघितलं नव्हतं!).
डॉक्टरला
दुस-याच एका गोष्टीबद्दल माहिती हवी होती. कुणी अशी व्यक्ति आहे का, जी अगदी बरोब्बर सांगू
शकेल, की ‘तलाव’ एथेरोस्क्लेरोसिसची ट्रीटमेन्ट घेत होता कां. प्रमाण विरोधाभासी आहेत.
“बाइ
चान्स, इथे कुणी नातेवाईक आहेत?”
इथे
कुठून आले नातेवाईक?
पण
त्यांना सूचना दिलेली आहे. भाऊ लवकरंच पोहोचतोय.
ही
विनंती करण्यांत येते – आणि ह्या शब्दसमूहाचा सगळ्यांवर फार मोठा प्रभाव पडतो –
सर्जिकल-इन्वेस्टिगेशन ग्रुप येईपर्यंत कुणीही खोलींत येऊं नये.
“कुणावर
संदेह आहे का? मुद्दा, शेवटी काय आहे?” नीनेल उठून विचारते.
“आकस्मिक
मृत्यु, आम्हांला
त्यांना बोलवावंच लागेल.”
कपितोनव
खिडकीजवळ बसलाय. नीनेल त्याच्याजवळ आली.
“घाबरूं
नका, त्यांना बोलवावंच
लागतं.”
16.04
डॉक्टर:
“तुमची
हनुवटी.”
“हनुवटी
– खड्ड्यांत जाऊं द्या, पण झोपेचं औषध आहे कां?”
“तुम्हांला
सेडेटिवची गरज आहे.”
नीनेल:
“त्यांना
सेडेटिवची काही गरज नाहीये. मी स्वतःच त्यांना शांत करेन.”
त्याच्याजवळ
बसून, त्याच्या हातावर हात
ठेवते.
“कपितोनव
शांत राहा, मी
इथे आहे.”
तो
उठून पैसेजमधे मागे-पुढे हिंडू लागतो.
16.06
डॉक्टर
आणि सहायक जात आहेत. पोडियमच्या जवळ महाशय नेक्रोमैन्सर उभा आहे, रिमोटिस्टला चुकवून जाणं
अशक्य आहे. डॉक्टर आणि सहायक थांबले.
“मित्रांनो,” नेक्रोमैन्सर म्हणतो.
“होमिओस्टेसिस (समस्थापन – अनु.). फीडबैक. नाज़ुक, सगळंच अगदी नाज़ुक, मित्रांनो”
डॉक्टर:
“तुम्हीं
डॉक्टर आहांत कां?”
“मी
नेक्रोमैन्सर आहे.”
ते
कडेकडेने त्याच्याजवळून जातात, जातां-जातां त्याला बघंत राहतात.
16.13
“महाशय, असं वाटतंय, की सगळं काही अगदी
स्पष्ट आहे. आपण वलेन्तीन ल्वोविचच्या स्मृतींत एका मिनिटाचं मौन ठेऊन मग
ऑडिट-कमिटीची रिपोर्ट ऐकूं शकतो कां?”
कपितोनवला
हेपण ऐकूं येतं:
“थांबा, शरीर अजून गार नाही
झालंय.”
“कमींत
कमी शरीर गार होईपर्यंत तरी थांबू या.”
“शरीर
– शरीर आहे, आणि
काम – काम.”
“सर्जिकल-इन्वेस्टिगेशन ग्रुप
येईपर्यंत तरी थांबलंच पाहिजे आणि ते गेल्यावरंच सेशनचं काम पुढे नेऊं या.”
“वाट
बघू. घाई करण्याची गरंज नाहीये.”
16.38
“कपितोनव, ओळखतांय न? मी नीनेल पिरोगोवा आहे.
घाबरूं नका, सगळं
ठीक आहे. तुम्हांला तुमच्या योग्यतेबद्दल सांगावसं वाटतंय. तुम्हांला वाटतंय की
तुम्हीं बस, असेच
आहांत. विचार करा, संख्या! आणि कदाचित, संख्या – त्या फक्त आइसबर्गचा तो भाग असतील, जो दिसतो, तोसुद्धां तुम्हांला सगळ्यांत जास्त दिसणारा. कदाचित, तुम्हांला...माहीत
आहे...जसे प्राचीन हीरो...पर्सियस किंवा हर्क्युलस...किंवा त्यांच्याहीपेक्षा
उत्तम! तुम्हीं प्राचीन देवता आहांत, फक्त तुम्हांला स्वतःलाच ह्याबद्दल माहीत नाहीये. कपितोनव, मी गंमत नाही करंत, तुम्हीं देव आहांत. नाहीतर संख्या...विचार
करा, संख्या!”
“नीनेल, मी थोडा थकलोय. तुम्हीं
मला एकटं सोडूं शकता कां?”
“हो, नक्की, फक्त आपला आत्मविश्वास
नका गमावूं.”
16.51
हॉलमधे
‘तलाव’चा भाऊ प्रवेश करतो, जणु खूद्द ‘तलावं’च आहे, पण मोठा.
काढलेला
ओवरकोट खुर्चीवर फेकतो, ओवरकोटच्या खांद्यांवर बर्फाच्या विरघळलेल्या कणांचे डाग आहेत.
विणलेली
टोपी तो नाही काढंत.
माहीत
नाही कां, सगळेंच, जे त्याच्याकडे बघंत
आहेत, अंदाज़ लावतात आहे, की तो नातेवाइक आहे, भाऊंच आहे, जणु ‘तलावं’च आहे, पण – मोठा.
“जर
थोडा वेळ इथे थांबायचं असेल,” मृत्यु झालेल्या खोलीचं दार उघडंत ज्युपिटेर्स्की म्हणतो, “तर, प्लीज़, या, पण अगदी थोडांच वेळ इथे
थांबा, बघून घ्या, म्हणजे, हात नका लावूं. आम्हीं इन्वेस्टिगेशन
टीमची वाट बघतोय.”
‘तलाव’चा भाऊ चुपचाप आत जातो.
एक-दोन
मिनिट तिथे थांबून बाहेर येऊन जातो.
हेरा-फेरीवाला
जादुगार चुबार त्याच्या बाजूलांच होता, तो त्याला काही म्हणतो, हळूंच, डोळ्यांनी इकडे-तिकडे खुणा करंत. ‘तलाव’चा
भाऊ तीक्ष्ण नजरेने हॉलकडे बघतो, आणि कपितोनवला वाटतं की त्यालांच शोधताहेत.
जादुगार-माइक्रोमैजिशियन
पहिल्या सारखांच कपितोनवपासून दूर नाही होत, म्हणून ‘तलाव’चा
भाऊ, जेव्हां जवळ आला, तर त्या दोघांच्याही जवळ
आला. कपितोनव ह्या गोष्टीसाठी तयार होता, की त्याला काहीतरी विचारतील, पण तो चुकला – ‘तलाव’चा
भाऊ झ्दानोवकडे वळतो.
“मला
सांगण्यांत आलंय, की तुम्हीं ते शेवटचे व्यक्ति आहांत, ज्याने माझ्या भावाचा आवाज ऐकला होता.”
“शेवटच्या
आधीचा,” झ्दानोव उत्तर
देतो. “मी दार उघडलं, आणि तुमच्या भावाने मला सांगितलं, की त्यांच्यांत ‘पुरुषांची गोष्ट’ होते आहे – ह्याच्यासोबत. मला माहीत नाही की नंतर त्यांने कशाबद्दल गोष्टी
केल्या.”
“कशाबद्दल?” ‘तलाव’चा भाऊ कपितोनवच्या डोळ्यांत बघतो.
“जितकं
मला आठवतंय,” कपितोनव
म्हणतो, “तो
चूप होता, आम्ही
ठरवलं होतं की बोलेन फक्त मी. आणि ‘पुरुषांची गोष्ट’ – हा फक्त अलंकार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, त्याहून जास्त काही नाही. त्याने फक्त संख्या मनांत धरली, मी ओळखली, आणि...माझ्या संवेदना स्वीकार
करा. मला खरंच अत्यंत दुःख आहे.”
“कोणची
संख्या?”
“99.”
“माझ्या
भावाने कोणची संख्या मनांत धरली होती?”
कपितोनवने
पुन्हां सगळ्याची पुनरावृत्ति नाही केली.
“आणखी
कोणची ‘पुरुषांची
गोष्ट’ असू शकते? ज़्यूज़्या कुठेय?”
झ्दानोवने
असं दाखवलं, जणु
ऐकलंच नाहीये.
“ज़्यूज़्या
कुठेय?” ‘तलाव’च्या भावाने पुन्हां विचारलं.
झ्दानोव
जायला बघतो, पण
तेवढ्यांत कपितोनव म्हणतो:
“झ्दानोव, थांबा!”
झ्दानोव
अनिच्छेनेच पांढरा उंदीर खिशांतून बाहेर काढतो, ‘तलाव’चा
भाऊ डाव्या हाताने त्याला घेतो, उजव्या हाताने डोक्यावरची विणलेली टोपी काढतो आणि त्यांत उंदराला ठेवून
देतो. राहिला टोपीचा प्रश्न, तर त्याने आता तिला पिशवीसारखं धरलंय. ज़्यूज़्या आता पिशवीत आहे.
‘तलाव’चा भाऊ शेवटच्या रांगेपर्यंत जातो, खुर्चीवर बसतो आणि हातांत टोपी-पिशवी धरून बसून राहतो.
17.22
“तो
म्हणायचा की एका जिप्सी बाईने त्याला सांगितलं होतं की तो 99 वर्ष जगेल.”
“पण
जगला फक्त 58.”
तेव्हां
काळ-भक्षक म्हणातो:
“त्याचे
हे 41 वर्ष मी खाऊन टाकले.”
अर्धा
मिनिट सगळे गप्प राहतात. शेवटी माइक्रोमैजिशियन आस्त्रोव उठतो.
“मी
नाही राहूं शकंत ह्याच्या बरोबर...ह्याच्या बरोबर...एकाच ठिकाणी!”
त्याच्या
पाठोपाठ गिळणारा-जादुगार मैक्सिम नेगराज़्दक आणि दोन अन्य माइक्रोमैजिशियन्सही
निघून जातांत.
कपितोनव
आणि काळ-भक्षक एकटे राहतात.
कपितोनव
ऐकतो:
“स्वतःला
दोष नका देऊ. मला अनुभव होतो आहे, की मी त्याला, न की तुम्हीं.”
“ऐका, तुम्हीं इथे कसे आलांत?”
“
‘तलाव’च्या मध्यस्थीने, तसांच जसे तुम्हींपण आला
आहांत.”
“हो, त्याने सांगितलं होतं.”
“मला
‘पागल’ समजलं जाण्याची सवय नाही
झालीये. मला माहीत आहे, ते सगळे म्हणतात:
“चार
पागल! बघा – हे आहेत चार पागल! पण चार कुठे? चला, असं
समजूं या, ईवेन्ट्स
आर्किटेक्ट आणि महाशय नेक्रोमैन्सर, ते खरोखरंच सामान्य नाहीयेत. पण ते दोनंच झाले, आणि ते? ते म्हणतात : हे आहेत चार!”
“माफ
करा, आणि चौथा कोण आहे?”
“तुम्हीं.”
“मी?”
“तुम्हांला
माहीत नाही कां, की तुम्हांला चौथा पागल म्हणतात?”
17.30
“हो, मला नेहमी मळमळ होत
असते. आधी असं नव्हतं. पण, काळंच असा आहे, ह्यांत माझा काही दोष आहे कां? हे भयंकर आहे. काळ खराब झालाय. हा काळ नाहीये. सैतानंच जाणे हे काय आहे.”
17.35
“झोपूं
नका.”
“तुम्हांला
असं वाटतंय का, की मी झोपलोय?’
“मी
असं तर नाही म्हटलं.”
“तुम्हीं
असंच म्हटलं: झोपूं नका.”
“कपितोनव, तुमच्या लक्षांत आलं का, की माझ्या उपस्थितीत
तुमचा वेळ आणखी वेगळ्या प्रकाराने चाललाय?”
17.39
“तुला
तर मारून टाकणंपण कमी आहे.” कुणी तरी म्हणतंय.
17.40
कपितोनव
अंदाज़ लावतो की हे काळ-भक्षकासाठी म्हटलंय आणि म्हणणारा नेक्रोमैन्सर आहे.
17.45
काल-भक्षक
गायब झाला, आणि
महाशय नेक्रोमैन्सर कपितोनवच्या बाजूला बसला.
17.47
काळ
पुढे-पुढे चालला आहे.
ह्या
दृष्टीने सगळं ठीक आहे.
नीनेल
पुन्हां आली.
“तुम्हीं
इथे काय करतांय?” ती नेक्रोमैन्सरला विचारते.
17.54
महाशय
नेक्रोमैन्सर:
“मी
फक्त दिवंगत आणि मृतकांबरोबरंच काम करतो, आणि तेसुद्धां रशियन बोलणा-या, पण प्रेतांबरोबर कधीच नाही.”
“ही
काय बडबड आहे?” नीनेल वैतागते. “कसले रशियन बोलणारे? प्रेत, दिवंगत आणि मृतकाहून प्रेत कसं वेगळं आहे?”
“फक्त
रशियन भाषेंतच दिवंगत आणि मृतक – सजीव वस्तू आहेत, पण प्रेत – निर्जीव वस्तू आहे.”
“काय
बकवास आहे!”
“बिल्कुल
बकवास नाहीये. पुल्लिंगी शब्द, ज्यांच्या शेवटी स्वर असतात, कर्मकारकांत शेवटी ‘आ’ लावतात
(हा रशियन व्याकरणाचा नियम आहे – अनु.), जर ते सजीव असले तर; आणि त्याच कर्मकारकांत शेवटी काहीच नाही लावंत, जर ते निर्जीव असले तर. कोणाला बघतो? जसं बैल, जंगली उंदीर, पायलट. सजीव आहेत. कोणाला बघतो? बैला-ला, उंदरा-ला, पायलेटा-ला, आणि हे बघा : खांब, मशरूम, छिद्रक - निर्जीव आहेत. काय बघतो? खांब, मशरूम, छिद्रक. शेवटी काही
व्यंजन नाहीये.”
“तुम्हांला
दिसंत नाहीये का, की कपितोनवची तब्येत तुमच्याशिवायसुद्धां खराब आहे? हे सगळं कशासाठी?”
“म्हणूनंच.
काय बघतो? प्रेत
बघतो. पण हे नाही म्हणू शकंत, की ‘प्रेता-ला’ बघतो. म्हणजे, निर्जीव. दुसरीकडे:
कोणाला बघतो? मृतका-ला, दिवंगता-ला बघतो. पण असं नाही म्हणू शकंत की ‘मृतक बघतो’, ‘दिवंगत बघतो’. म्हणजे सजीव वस्तू आहेत. कळतंय ना तुम्हांला? प्रेत – जसं टेबल आणि वीट, निर्जीव वस्तू आहे. पण दिवंगत आणि मृतक – जसं बढई आणि गरुड, सजीव वस्तू आहेत. दिवंगत
आणि मृतकाबरोबर तरीही काम करता येतं.”
“दिवंगत
आणि मृतकांत काय फरक आहे?”
“सूक्ष्म
अंतर आहे. पण जास्त महत्वपूर्ण ते आहे, जे ह्यांना एका श्रेणीत ठेवतं. सजीवता. हो, ते सगळे निष्प्राण आहेत – प्रेतपण, दिवंगतपण, मृतकपण; तरीही दिवंगत आणि मृतक सजीव आहेत. प्रेत – निर्जीव आहे. आणि ही मुख्य गोष्ट
आहे. निर्जीवाला जिवन्त करता येत नाही, कारण की ती अपरिहार्यपणे निर्जीव आहे. आणि निष्प्राणाला, जर तो सजीव आहे, तर जिवन्त करता येतं.
प्रेताला – नाही, आणि दिवंगत आणि मृतकाला – शक्य आहे.”
“बकवास.”
“लक्ष
द्या, की हे रशियन भाषेच्या
प्रकृतिला अनुसरून आहे, म्हणूनंच मी विशेषकरून फक्त रशियन-भाषिकांसोबतंच काम करतो...फक्त ह्याचसाठी, राष्ट्रभक्तिच्या
भावनेने नाही, कोणीही असा विचार करूं शकतो, आणि महत्वपूर्ण गोष्ट: पुनर्जीवित, म्हणजे जे आता मृतक किंवा दिवंगत नाहीत, त्यांना रशियन भाषा विस्मृतीत ढकलते आणि तो दुस-या एखाद्या भाषेंत चालला
जातो. जर तो रशियन-भाषिकंच राहिला, आणि जर तो पुन्हां कधी मृतक किंवा दिवंगत झाला तर त्याला पुन्हां जिवन्त
करणं शक्य आहे,, आणि असं अगणित वेळा होऊं शकतं. पण, दुर्दैवाने, असं शक्य नाहीये. दिवंगत आणि मृतकाला फक्त एकदांच जिवन्त करणं शक्य आहे, आणि मग तो पुन्हां कधीही
रशियन नाही बोलणार.”
“बकवास, बकवास, बकवास.”
“तर, मूखिनचा प्रॉब्लेम मी
जवळ-जवळ सोडवला आहे.”
“मूखिन
– तो कोण आहे?” नीनेल सतर्क झाली.
“हा
तो आहे, ज्याच्यापुढे
आता काहीही प्रॉब्लेम नाहीये,” कपितोनव म्हणतो, जो आतापर्यंत संभाषणांत भाग घेत नव्हता.
“वाद
नाही घालणार,” महाशय नेक्रोमैन्सर म्हणतो. “पण ‘तलाव’चा
प्रॉब्लेमपण अशाच प्रकारे सोडवला जात आहे.”
“तुम्हीं
खरोखरंच वाद घालतांय,” कपितोनव तोंड फिरवतो.
“मी
आणखी काय म्हणतेय!” नीनेल उद्गारली.
“नाही, मित्रांनो, बकवास तुम्ही लोक करताय, मी नाही, आणि तुम्ही, कपितोनव, दुस-यांपेक्षा जास्त.”
18.09
डोळे
आपणहून बंद होताहेत, आणि नजरेसमोर येतो आहे मूखिन, जसा की, कदाचित, अठरा मजल्याच्या बिल्डिंगच्या टैरेसवर सापडला होता. हिंसक मृत्यचं कोणतंच
लक्षण नाहीये. त्याच्या अंगावर नवीन सूट आहे, ज्याच्या अस्तित्वाबद्दल मरीनाला पत्ताचं नव्हता. कपितोनवला दिसतंय, की मूखिन पाठीवर पडलाय
आणि त्याचे हात पसरलेले आहेत.
‘बोलेरो’ गरजंत होता.
“पापा, नमस्ते. सगळं ठीक आहे नं? व्यवस्थित एडजस्ट झाले
कां?”
“हो, सगळं ठीक आहे. काही
सांगायचंय कां?”
“पहिली
गोष्ट, तुम्हीं किल्ल्या
विसरले.”
“आशा
करतो, की मला कोणीतरी फ्लैटमधे
येऊं देईल...”
“अफ़कोर्स, कोणीतरी नक्कीच. पण
तुम्हीं किल्ल्या बाहेरून की-होलमधे सोडल्यांत. मला आंतून दारंच उघडतां आलं नाही.
शेजा-यांच्या चांगुलपणामुळे...”
त्याला
मोठा धक्काच बसला. तो म्हणतो:
“चूक
झाली.”
फोन
‘कट’ झाला.
18.17
“इन्वेस्टिगेशन
टीम,” – ‘तलाव’चं मृत शरीर असलेल्या खोलीकड जात
असलेल्या लोकांना बघून माइक्रोमैजिशियन आस्त्रोव म्हणतो. “म्हणजे ही काही साधारण
बाब नाहीये.”
“काव-काव
नका करू,” नीनेल
म्हणते. “ह्याचा काही अर्थ नाहीये.”
“तुम्हांला
असं वाटतं? काल
काल्पनिक बॉम्ब, आज वास्तविक मृत्यु.”
18.20
“लक्ष
द्या, कपितोनव, आता तुम्हांला प्रश्न
विचारतील...लक्षांत ठेवा...” नीनेल आपलं म्हणणं पूर्ण करूं शकंत नाही – तो
आलासुद्धा:
“तुम्हीं
प्रत्यक्षदर्शी आहांत कां?”
“हो, मी साक्षीदार आहे.”
“सध्यां
प्रत्यक्षदर्शी.”
“काही
फरक आहे कां?” माहीत नाही कां, कपितोनव विचारतो.
“फार
मोठा.”
“आणि
तुम्हीं?” नीनेल
आपलं नाक खुपसते. “तुम्हीं काय इन्वेस्टिगेटर आहांत?”
“ऑपरेशन्स
ऑफिसर.”
“माफ
करा, कळलं नाही.”
“ऑपर...”
ऑपरेशन्स ऑफिसर म्हणतो.
“आणि
इन्वेस्टिगेटर कुठे आहे? इन्वेस्टिगेटर असायला पाहिजे. मला इन्वेस्टिगेटर दाखवा.”
“मी
इन्वेस्टिगेटरच्या ऐवजी आलो आहे.”
“आह, तर असं आहे, पूर्ण ग्रुप नाही आला!
चला, हो, आज तर रविवार आहे.”
“ते
आम्हीं स्वतःच बघून घेऊं.”
“हो, खरंच, मी विसरलेच होते, की रविवारच्या दिवशी
मरण्याची सिफारिश करण्यांत येत नाही.”
“कोण
नाही करंत सिफारिश? कुणीही अशी सिफारिश केलेली नाहीये!”
“आणि, हे बरोबर आहे कां, की इन्वेस्टिगेटरच्या
अभावांत ऑपरेशन्स ऑफिसरने क्रिमिनल केसची सुरुवार करावी?”
“माफ
करा, मी क्रिमिनल केस सुरू
करंत नाहीये. आणि क्रिमिनल केस सुरू मी नाही करंत.”
“चला, विचारा...”
“मी
विचारंत नाहीये, पण तुम्हीं मला खूप डिस्टर्ब करता आहांत.”
“आपलं
काम चालू ठेवा. पण मी बरोबर राहीन. कपितोनव, मी इथेच आहे!”
“तुम्हीं
एडव्होकेट आहांत कां?”
“मी
ट्रिक्स-डाइरेक्टर आहे!”
“नीनेल,” कपितोनव म्हणतो, “प्लीज़, मी स्वतःच सांभाळून
घेईन.”
“ठीक
आहे. फक्त मी काय म्हटलं ते लक्षांत राहू द्या.”
ती
दूर जाते.
18.25
लहान
खोलीत.
“मी
इथे उभा होतो, तो – इथे. पार्टीशनच्या मागे. मी त्याला बघंत नव्हतो, आणि आम्हीं ठरवलं होतं
की तो चूप राहील. त्याने संख्या मनांत धरली, मी त्याला म्हटलं...काही करायला. मग मी म्हटलं: 99. तो पडायला लागला, पार्टीशन माझ्या अंगावर पाडलं, आणि स्वतः मरून गेला.”
“काही
करायला – म्हणजे काय करायला?”
“पाच
जोडायला, तीन
वजा करायला...अगदी बरोब्बर संख्यातर लक्षांत नाहीये, विसरलो.”
“हा
जादू आहे कां?”
“माहीत
नाही. कदाचित, जादू आहे. इथे सगळेच जादुगार आहेत.”
“सगळ्यांच्याबद्दल
जाणून घेणं जरूरी नाहीये. आता आम्हीं तुमच्याबद्दल आणि त्याच्याबद्दल बोलतो आहे.
ठीक आहे, सामान्यपणे
समजलंय.”
18.29
तो
बराच वेळ कुणाशीतरी फोनवर बोलंत होता.
18.35
“राहिला
इन्वेस्टिगेटरचा प्रश्न...मी लिहून देतो की काय नाव आहे,” ऑपरेशन्स ऑफिसर
फाइलींतून नोट-पैड काढतो. “तुम्हांला उद्या यावं लागेल.”
“उद्या
माझी फ्लाइट आहे...जवळ जवळ दोन वाजून काही मिनिटांनी.”
ऑपरेशन्स
ऑफिसर वरच्या कागदावर नाव आणि पत्ता लिहितो. पैडमधून तो कागद फाडतो.
“तर, अकरा वाजतां या,” नीनेलकडे नजर टाकंत कागद
कपितोनवला देतो.
“हे
काय नोटिसच्या ऐवजी आहे? लक्षांत ठेवा, कपितोनव, तुमच्यासाठी तिथे जाणं जरूरी नाहीये!”
“माझा
प्रामाणिक सल्ला. येऊन जा, इन्वेस्टिगेटर चोर्नोव तुमची वाट बघतील, मी इतक्यांतंच त्यांच्याशी बोललोय. हे तुमच्यासाठी चांगलं राहील.”
कपितोनव
विचारतो:
“सम्मनवर?”
“तुम्हांला
काय सम्मन लावून पाहिजे?”
“नाही, सम्मन लावाल, तर नाही येणार,” कपितोनव ठामपणे उत्तर
देतो.
“ठीक
आहे, तुम्हीं फक्त तसेच या.”
18.40
ऑपरेशन्स
ऑफिसर्सच्या जाण्याने कॉन्फ्रेन्समधे चैतन्य पसरलं. ‘तलाव’चं
प्रेत अजून खोलीतंच पडलं आहे, आणि त्याच्यासाठी शवागारातून कर्मचारी येणार आहेत, आणि डेलिगेट्स काहीही न
सांगता हॉलमधे आपापल्या खुर्च्यांवर बसूं लागतात. कपितोनव ह्यातलं काहीही बघंत
नाहीये. तो, जसा बसला होता, तसांच बसलाय. तो फक्त
तेव्हांच लक्ष देतो, जेव्हां त्याला उठायला सांगतात.
अध्यक्ष
‘तलाव’च्या सम्मानाप्रीत्यर्थ एका मिनिटाचं
मौन पाळायचा प्रस्ताव ठेवतो. सगळे उभे राहतात, आणि एक मिनिट मौन राहून ‘तलाव’ला
श्रद्धांजली वाहतात.
“कृपया
बसा,” अध्यक्ष म्हणतो.
सगळे
लोक बसलेसुद्धां नव्हते की माइक्रोफोनजवळ महाशय नेक्रोमैन्सर येतो.
“काही
लोक माझ्या प्रोफेशनल योग्यतेवर बोट ठेवतांत. तर, मी तयार आहे. मी आत्ता, ह्याच क्षणी सिद्ध करायला तयार आहे...”
“बसून
जा, प्लीज़, मी तुम्हांला बोलायला
नाही सांगितलं...”
“मित्रांनो, मी तुमच्या हृदयाला आणि
डोक्याला सांगतोय, मृत्यु – ही नेहमी एक अप्रत्याशित घटना असते, आणि तिच्यासाठी कोणतांच नियम नसतो...”
“बसून
जा!...पुरे झालं!...आपल्या जागेवर!” हॉलमधून आवाज येतात.
“तर
मग, एक ऐतिहासिक
त्रुटि-संशोधन!” आरडा-ओरड्याला, टाळ्यांना, हूटिंगला न जुमानतां महाशय नेक्रोमैन्सर आवाज मोठा करतो. “सहाव्या
विश्व-परिषदेत...माझ्या पूर्वजांपैकी एकाला...परवानगी दिली होती...एका मृत व्यक्तिला
पुनर्जीवित करण्याची...ही पुनर्जन्माची प्रक्रिया कितपत यशस्वी झाली, मला मान्य आहे, की ह्याबद्दल कोणतंही
प्रमाण नाहीये...काही स्त्रोतांप्रमाणे, प्रयोग यशस्वी नाही झाला...पण मुद्दा वेगळांच आहे...सहाव्या
विश्व-परिषदेने...जी आपल्या नियमांच्या कठोरतेसाठी प्रसिद्ध आहे...पुनर्जीवनाच्या
प्रक्रियेला परवानगी देण्याच्या शक्यतेला मान्यता दिली...पण आपण...”
हॉलमधे
भयंकर गदारोळ होऊ लागतो, त्यासोबतंच अनेक जादुगार भयानक उद्देश्याने नेक्रोमैन्सरकडे धावतांत – एकाने
माइक्रोफोनचा स्टैण्ड पकडला आणि त्याला वक्त्याच्या हातांतून खेचू लागला, दुसरे दोन जादुगार
नेक्रोमैन्सरला हातांने थोपवायचा प्रयत्न करतात, आणखी एक जादुगारतर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न प्रयत्न करंत असलेल्या
नेक्रोमैन्सरची मान धरून त्याच्या पाठीला लटकला. नेक्रोमैन्सरचा हातांतून
माइक्रोफोन सुटून गेला, पण थोडा वेळतर तो आपल्यावर चालून आलेल्या जादुगारांचा प्रतिकार करंत राहिला.
पण असमान ताकत असल्यामुळे, आणि हॉलमधे त्याला काहीही समर्थन नसल्यामुळे, आणि, जरी
तो दमनकारी लोकांपासून स्वतःला मुक्त करण्यांत सफल झाला, तरी आपलं भाषण चालू
ठेवायची त्याची इच्छा नाहीये – तो गर्वाने स्टेजवरून उतरतो आणि हॉलमधे आपल्या
खुर्चीकडे जातो.
“मित्रांनो, मला कळतंय की आपला
मानसिक ताण पराकाष्ठेला पोहोचलाय, पण चला, आपण सगळे गिल्डच्या बोर्डाच्या निवडणुकांवर आपलं मत देऊन त्यांचं अनुमोदन
करूं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे! मी ऑडिट कमिटीच्या प्रेसिडेंटला निवेदन करतो की
निवडणुकीच्या परिणामांचे निष्कर्ष सांगावे.
“परिणाम
खूप मजेदार आहेत,” ऑडिट कमिटीचा प्रेसिडेण्ट रिपोर्ट प्रस्तुत करतो, “अनेक बाबतींत असाधारण. मला काळजी आहे, की तुम्हीं माझ्यावर विश्वास नाहीं ठेवणार, पण आकड्यांच्या दृष्टीने निष्कर्ष ह्या प्रमाणे आहेत: तेरा उमेदवारांपैकी
सात उमेदवारांना एकसारखे मतं मिळाले आहेत, प्रत्येकाला बरोब्बर 51 (त्याने नावं सांगितली).
हॉलमधे
खळबळ सुरूं झाली.
“असं
थोडीच होतं!”
“मेन्टलिस्ट
कपितोनवला दोन मतं मिळाली आहेत. आणि इतर पाच उमेदवारांना प्रत्येकी एक-एक मत
मिळालंय.”
“जादू, जादू!” हॉलमधे लोक
ओरडतात.
ऑडिट
कमिटीचा प्रेसिडेण्ट घोषणा करतो की हा जादू नाहीये, तर संभावना-सिद्धांतावर आधारित आहे, पण कोणीच त्याच्यावर विश्वास नाही ठेवंत.
“चला, हरणा-यांबद्दल कळतंय,” माइक्रोमैजिशियन पेत्रोव
कपितोनवला म्हणतो. “त्यांच्यापैकी प्रत्येकाने स्वतःलाच मत दिलेलं आहे. पण
तुमच्यासाठी दुसरं मत होतं ‘तलाव’चं.
म्हणून दोन मतांबरोबर तुमचं रेकॉर्ड चांगलं आहे.”
“तुम्हांला
काय खरंच असं वाटतं, की मी स्वतःला वोट द्यायच्या लायकीचा आहे?” कपितोनव विश्लेषण करणा-या शेजा-याकडे पाहतो.
“असं
आहे कां? म्हणजे, आणखी कुणी तरी. कुणी
आणखीही तुम्हांला मत दिलंय, अभिनन्दन.”
“मी!
मी,” नीनेल म्हणते, “कपितोनवला मत दिलंय.
कपितोनव, धीर
धरा, ह्याच्यासाठी तुम्हांला
क्षमा नाही करणार...”
ह्या
दरम्यान कॉन्फ्रेन्समधे ऑडिट कमिटीच्या प्रेसिडेण्टबद्दल तीव्र अप्रसन्नता दिसून
येते. असं कळतं, की मतांच्या संख्येचा मतदारांच्या संख्येशी मेळ बसंत नाहीये.
“इथे
कुणी गुन्हेगार नाहीये, असं होतं कधी-कधी,” ऑडिट कमिटीचा प्रेसिडेन्ट स्पष्टीकरण देतो. “आमच्याकडे एक मतपत्र कमी पडंत होतं.
ही साधारण बाब आहे.”
“कदाचित
तुम्हीं दवाखान्यांत पेरेदाशसाठी बैलेट-बॉक्स नसेल पाठवला,” हॉलमधून काही आवाज
येतात.
“दवाखान्यांत
आम्हीं त्याच्यासाठी एक जास्तीचा बैलेट-बॉक्स पाठवला होता, आणि त्याने पाय मोडलेला
असतानासुद्धां निवडुणकीत भाग घेतला. पण, मला वाटतंय की त्याने मतदानांत भाग नाही घेतला. कारण की, जेव्हां ऑडिट-कमिटीने
परंत येऊन जास्तीचा बैलेट-बॉक्स उघडला, तेव्हां तो रिकामा होता...”
“पण, त्याने तर
बैलेट-बॉक्समधे मतपत्र टाकलं होतं नं?”
“कदाचित, हो.”
“ह्या
‘कदाचित’चा काय अर्थ आहे?”
“बैलेट-बॉक्समधे
कोण, काय टाकतं ही ऑडिट कमिटीच्या सदस्यांची जवाबदारी
नाही.”
“चला, पेरेदाशला दवाखान्यांत
फोन करू – आणि त्याला विचारूं की त्याने बैलेट-बॉक्समधे मतपत्र टाकलं होतं किंवा
नाही.”
“नाही, ह्याची परवानगी नाहीये,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष
म्हणतो. “हे गुप्त-मतदान आहे. आपल्याला ह्या बाबतीत उत्सुकता दाखवायला नको, की पेरेदाशने कुणाला मत
दिलं.”
“आम्हांला
ह्याचाशी काही घेणं देणं नाहीये, की त्याने कुणाला मत दिलं. आम्हांला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, की मतपत्र कुठे गेलं.”
“जादू, जादू!” हॉलमधे लोक
पुन्हां ओरडतात.
“नाही, थांबा,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष
प्रतिवाद करतो. “पेरेदाशला मतदानांत भाग न घेण्याचा पूर्ण अधिकार होता. तो मतपत्र
बैलेट-बॉक्समधे न टाकायलासुद्धां स्वतंत्र होता. तो असं दाखवू शकला असता, की टाकतोय, जेव्हां की स्वतः मतपत्र
टाकण्याबद्दल विचारपण करंत नव्हता. हो, जादू. पण त्याला अधिकार आहे जादू दाखवायचा.”
“ही
जादू नाहीये. ही फसवणुक आहे!”
“थांबा, थांबा. पेरेदाशने
मतदानांत भाग घेतला, म्हणजे, जर तुम्हांला वाटलं तर असं समजूं शकता, की त्याने सामान्य संख्या पूर्ण केली. मतदानांत भाग घेत असलेल्या लोकांची
संख्या – 100%. त्यासाठी पेरेदाशला धन्यवाद. पण काही व्यक्तिगत कारणांमुळे, मतपत्र मिळाल्यानंतर, त्याने ते
बैलेट-बॉक्समधे टाकण्यास नकार दिला, म्हणजे, त्याने मतदानांत भाग नाही घेतला. बाइ द वे, असं काही लोक करतांत मोठ्या, सरकारी मतदानांत – असं बहुतकरून मतपत्रांचे संग्रहकर्ता करतात...”
“तुम्हांला
असं म्हणायचंय का, की पेरेदाशने मतपत्र आठवण म्हणून ठेवून घेतलंय?”
“कां
नाही? पीटरबुर्गच्या
आठवणीबद्दल, आपल्या
कॉन्फ्रेन्सच्या आठवणी प्रीत्यर्थ, त्याच्या दवाखान्यांत भरती होण्याबद्दल, पाय मोडल्याबद्दल...”
हे
तर्क कॉन्फ्रेन्सला विश्वास ठेवण्यासारखे नाही वाटंत.
“पण, शक्य आहे, की कारण काही दुसरंच
असेल,” कॉन्फ्रेन्सचा
अध्यक्ष विश्लेषण चालू ठेवतो. “शक्य आहे, की सामान्य वाद-विवादापासून बलात् दूर झालेल्या पेरेदाशला असं वाटलं, की त्याला ह्या
प्रक्रियेवर प्रभाव टाकायचा काही अधिकार नाहीये, आणि परिणाम काहीही असेल, तरी त्याने ह्या आगामी निवडणुकीला मान्यता दिली – प्रत्यक्ष रूपाने मतदान
नाही केलं, म्हणजे, मतपत्र बैलेट-बॉक्समधे
नाही टाकलं, पण
मतदानांतभाग घेऊन आपल्या सगळ्यांच्याप्रति स्वतःचा सम्मान प्रदर्शित केला.”
हा
तर्क ब-याच लोकांना पटला.
“कृपा
करून ऑडिट-कमिटीच्या रिपोर्टची पुष्टी करा. कोण- पक्षांत आहे? कोण – विरोधांत? कोणी - भाग नाही घेतला? ऑडिट-कमिटीच्या
रिपोर्टची पुष्टी करण्यांत आली. कृपा करून ऑडिट-कमिटीच्या निष्कर्षांना अनुसरून
सात सदस्यांच्या बोर्डाच्या कार्यकारिणीचं गठन झाल्याची पुष्टी करा. कोण – पक्षांत
आहे?”
“स्टॉप, स्टॉप!...आणि ‘तलाव’?” हॉलमधून लोक ओरडले. “तो बाहेर झाला कां? तो आता बोर्डमधे नाहीये कां?”
“ ‘तलाव’च्या जागेवर ऑटोमेटिकली हरलेल्या
उमेदवारांपैकी तो येईल, ज्याला सगळ्यांत जास्त मतं प्राप्त झाले आहेत. आणि असा आहे – कपितोनव.”
कपितोनवने
थकव्याने हात वर केला.
“मी
आपली उमेदवारी परंत घेतो,” तो म्हणतो.
“काही
परंत-बिरंत नाही होणार!” श्याम-वन उद्गारतो. “उमेदवारी परंत घ्यायला फार उशीर
झालेला आहे.”
“हो, असंच आहे,” अध्यक्ष म्हणतो.
“उमेदवारी परंत घेण्याचं प्रावधान गुप्त मतदान होईपर्यंतंच होतं, आता आपल्याला मतदानाच्या
परिणामांना मतांचे गणितीय वितरण आणि ‘तलाव’शी
संबंधित घातक घटनांच्या संदर्भात एक तथ्य म्हणून स्वीकार करावं लागणार आहे.”
माइक्रोमैजिशियन
अपेकूनी धावंत माइक्रोफोनजवळ येतो:
“मी
विरोध करतो! असल्या ‘घटनां’मुळे कपितोनवला बोर्डांत जागा मिळायला नको! तो ‘तलाव’ला
जादू दाखवंत होता. जादू करताना दर्शकाचा मृत्यु होतो – हे अगदी नॉन-प्रोफेशनल आहे!
हे तसंच आहे, जसं आपण एका महिलेला आरीने घासतोय, आणि घासतां-घासतां तिचे दोन तुकडे करून टाकतो!”
“इथे
कोणी कुण्या महिलेला घासंत नाहीये! आम्ही माइक्रोमैजिकचे उस्ताद आहोत!” हॉलमधे लोक
ओरडतात.
“सगळेच
माइक्रोमैजिशियन्स नाहीयेत! मी मेक्रोमैजिशियन आहे!” ईवेन्ट्स-आर्किटेक्ट खणखणीत
आवाजांत म्हणतो.
“दि
ग्रेट मैन्याक!” महाशय नेक्रोमैन्सर, ज्याने आता स्वतःला सावरलं होतं आणि दीर्घ श्वास घेत होता, ओरडून त्याला उत्तर
देतो.
“ठीक
आहे, ठीक आहे,” अध्यक्ष म्हणतो, “आपण सगळे वेगवेगळे आहोंत, हो, आपल्यांत
मेक्रोमैजिशियन्सपण आहेत, आणि, कोण
नाहीये आपल्यांत, पण, जर
आपल्याला मुश्किलीने पूर्ण केलेल्या – गुप्त! – मतदानाच्या प्रक्रियेला, नव्या उमेदवार
इत्यादीमुळे पुन्हां करायचं नसेल, तर माझं म्हणणं ऐका – आपल्याला निवडून आलेल्या, पुन्हां सांगतो, निवडून आलेल्या कार्यकारिणीच्या सदस्यांची पुष्टी करावी लागेल, काही लहान-सहान गोष्टी
लक्षांत घेऊन, ज्यांच्याबद्दल मी आधीच सांगितलंय, आणि त्यानंतरंच, जर तुमची इच्छा असेल तर कपितोनवच्या कार्यकलापांबद्दल आपण आपलं मत प्रदर्शित
करूं शकतो, पण
वैधानिक नाही, तर व्यावसायिक, आणि पूर्णपणे प्रारंभिक, ह्या निष्कर्षांसह की तो त्या कार्यकारिणीचा सदस्य आहे, जिची पुष्टी आपण करंत
आहोत, पण हे नका विसरूं की
ह्या कार्यकलापांना त्याने, ऐकतांय नं – आधी! – आपल्या कार्यकारिणीचं अनुमोदन करण्यापूर्वी केलेलं होतं.
थोडक्यांत – वोटिंगसाठी प्रस्तुत करतो: कोण - पक्षांत आहे, की बोर्डाच्या
कार्यकारिणीची पुष्टी करावी? कृपा करून हात उंच करा. कोण – विरोध करतंय? कोण – काहींच म्हणंत नाहीये?”
अध्यक्षने
स्वतः वर केलेले हात मोजले.
बहुमताने
बोर्डच्या कार्यकारिणीची पुष्टि झाली आहे. सगळ्यांचं अभिनंदन करतो.”
माइक्रोफोनजवळ
माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी प्रकट होतो.
“मला
वाटतं, की आपली कॉन्फ्रेन्स
संपंत आलीये, आपण आपल्या वैयक्तिक समस्यांवर फारंच जास्त वेळ दिला. पण आपण राष्ट्रीय
स्तरावर कागदपत्रांच्या अत्यधिक प्रवाहाची/ नासाडीची निंदा करण्याचा प्रस्ताव
पारित नाही केला...”
हॉलमधे
टाळ्या वाजू लागल्या, आणि त्याच्यासाठीसुद्धां टाळ्या वाजूं लागल्या. माइक्रोमैजिशियन रीख्लीला
माइक्रोमैजिशियन अदिनोच्नीला माइक्रोफोनपासून दूर करण्यास जराही प्रयत्न नाही करावा
लागला.
“आपल्या
मेंढ्यांकडे वळतो...हे काय चाललंय, महाशयांनो? तुम्हांला हे विचित्र
नाही वाटंत कां? तपास अजून सुरू झालेला नाहीये, आणि आपल्या कार्यकारिणीत असा सदस्य आहे, जो तपासाच्या वर्तुळांत येणार आहे! मी प्रस्ताव ठेवतो, की ही भयानक चूक
सुधारण्यांत यावी, आणि कपितोनवला आपल्या कार्यकारिणीचा सदस्य मानूं नये. कमींत कमी तपासाचं काम
पूर्ण होईपर्यंत!”
“मानूं
नये – म्हणजे काय? काढून टाकावें?”
“काढून
टाकावें! काढून टाकावें!” ज्युपिटेर्स्कीच्या ग्रुपचे लोक ओरडतांत.
श्याम-वनच्या
ग्रुपचे लोकं उत्तरादाखल शिट्ट्या वाजवतांत आणि ‘हूट’ करतात.
“प्लीज़, मला माझी उमेदवारी परंत
घ्यायची परवानगी द्या,” कपितोनव उठतो.
“अरे, तुम्हीं बसून जा नं, हा तुमचा प्रश्न नाही राहिलाय, इथे सिद्धांताचा प्रश्न आहे!”
“शांति!
शांति!” अध्यक्ष व्यवस्था राखण्याची अपील करतो. “मलापण समजंत नाहीये, की आपण ‘निर्दोषितेचा अनुमान’ ह्या सिद्धांताकडे कां
दुर्लक्ष करतो आहे. त्या खोलींत कपितोनव आणि ‘तलाव’च्या
मधे काहीही झालं असो, अजूनपर्यंत कोर्ट-केस झालेली नाहीये आणि आपल्याला फक्त अविश्वासाच्या
आधारावर कपितोनवबद्दल मत बनवण्याचा हक्क नाहीये.”
आता
माइक्रोफोनजवळ व्लादिस्लाव हेर्त्स येतो, हा जादुगारांच्या त्या ग्रुपचा लीडर आहे, ज्याला ‘तलाव’ प्राइवेट
वार्तालापांत जुगारी म्हणायचा.
“हे
बरोबर आहे, आपल्याला
कायद्याचा सम्मान करायला हवा. ‘निर्दोषितेचा अनुमान – ही पवित्र गोष्ट आहे. पण ह्या समस्येकडे वेगळ्या
दृष्टीनेपण पाहूं या. आपल्या सहयोग्याने सुमारे दोनंच तासांपूर्वी” त्याने
घड्याळाकडे नजर टाकली.
19.25
“...ओके, कदाचित तीन...सगळ्या
लोकांच्या उपस्थितीत एक गंभीर घोषणा केली होती. त्याने म्हटलं होतं: मी पुन्हां कधीही हा जादू नाही दाखवणार.
आणि, जर परिस्थिति अशी आहे, तर काय हे ‘नॉनसेन्स’ नाहीये, की तो माणूस, ज्याने आपलं प्रोफेशन सोडून दिलंय, बोर्डाच्या कार्यकारिणीचा सदस्य आहे?”
ह्या
तर्काचा ऑडिटोरियमवर प्रभाव पडतो – काही लोक उत्तेजित होतात आणि ओरडूं लागतात : ‘नॉनसेन्स! नॉनसेन्स!’, काही लोक हताश होतात आणि त्यांचे विरोधात्मक ‘नो! नो!’ आधीच्या लोकांच्या आरड्या-ओरड्यांत दबून जातांत. माइक्रोमैजिशियन
ज़्वेनिगरोद्स्की माइक्रोफोन काबीज करतो:
“इथे
कायदेशीर तपासाचं आणि त्याच्या परिणामाचं गाणं गात आहेत, पण, प्लीज़, हे सांगा, सिद्धांततः परिणाम, मग तो कसाही परिणाम कां
न असो, आपल्या कॉन्फ्रेसच्या
शिवाय तेवढ्यांच स्पष्टतेने ह्या गोष्टीवर प्रकाश टाकू शकतो का, जिला आपल्या
कॉन्फ्रेन्सने...आपल्या कार्यकलापाच्या दरम्यान...इतक्यांतंच इतकं स्पष्ट केलेलं
आहे? मी कशाबद्दल बोलतोय? ह्याबद्दल! कपितोनवकडे
कारण होतं!...हो, हो, आपल्या
सगळ्यांच्या डोक्यांत तो भयंकर शब्द घुमंत होता, पण कोणालातरी त्याचा फक्त उच्चारंच करायचा होता!”
इतक्यांत
माइक्रोफोनजवळ हेरा-फेरी करणारा जादुगार पेत्रोव दिसतो:
“शुद्धीवर
या, मित्रांनो! अमानुष नका
होऊं! आपण इतक्यांतच ‘तलाव’च्या
स्मृतीत एका मिनिटाचं मौन पाळलं होतं. कार्यकारिणीसाठी कपितोनवच्या नावाचा
प्रस्ताव कुणी आणखी नाही, तर ‘तलाव’नेच ठेवला होता. ‘तलाव’च्या आठवणीखातर, तुम्हांला विनंती करतो, की हा विषय इथेंच संपवावा! कपितोनव तसला माणूस नाहीये, जो कार्यकारिणींत
जाण्यासाठी ‘तलाव’चं
प्रेत ओलांडून जाईल!”
माइक्रोमैजिशियन
पाव्लेन्कोने लगेच ह्याचा विरोध केला:
“मीपण
‘निर्दोषितेचा अनुमान”
ह्या सिद्धांताचा सम्मान करतो, पण त्याबद्दल माझ्या मनांत प्रेम असूनही, मला वाटतंय की तुम्हीं आतां जे म्हटलंय, ते फक्त चिथवणारं आहे, आणि असं सांगून तुम्हीं ‘तलाव’च्या
स्मृतिचा अपमान करतांय!”
कुठूनतरी
एक पांढरं कबुतर प्रकट होतं, ते एका भिंतीकडून दुस-या भिंतीकडे उडतंय.
अध्यक्ष
उठून उभा राहतो:
“आता
जर एकही ससा, मिट्ठू किंवा आणखी असलीच वस्तू दिसली, तर मी कॉन्फ्रेन्स संपवून टाकेन!”
कबुतर
उडून त्याच्याकडे जातो आणि खांद्यावर बसतो. अध्यक्षाला कबुतराला पळवायचं नाहीये, तो त्याच्यासकट
सावधानीने आपल्या खुर्चीवर बसतो.
“त्याचा
बहिष्कार करण्याच्या प्रस्तावावर मतदान केलं पाहिजे!” हॉलमधून लोक ओरडून म्हणतात.
“नाही, नका करूं!”
“बहिष्कार!
बहिष्कार!”
खांद्यावर
कबुतर घेऊन अध्यक्ष म्हणतो:
“कार्यकारिणीतूंन
कपितोनवच्या बहिष्काराच्या प्रस्तावावर मतदान करण्यास माझं काहीच जात नाही, पण मला पूर्ण विश्वास
आहे, की कार्यकारिणीतूंन –
जिचं अनुमोदन आपण इतक्यांतच झालेल्या निवडणुकीच्या परिणामांच्या आधारावर केलेलं
आहे – कुणाच्याही बहिष्काराचा प्रस्ताव आपल्या राजनैतिक अपरिपक्वतेचं प्रमाण आहे.
चला, आधी एक कमिटी बनवूं या, आचार संहितेवर, हे कठीण नाहीये आणि हे
आवश्यक आहे, तिलाचं...”
त्याला
आपलं म्हणणं पूर्ण करूं देत नाही:
“कमिटीची
काही गरज नाहीये!”
“चांगलं
ओळखतो आम्ही ह्या कमिटींना!”
कबुतर
अध्यक्षाच्या खांद्यावरून फडफडंत उडालं, आणि दोनदा हॉलचा चक्कर मारून कपितोनवपासून दोनशे मीटर्सदूर खिडकीच्या
चौकटीवर बसलं.
कपितोनव
गहि-या नजरेने कबुतराच्या नजरेंत अडकला. ते कपितोनवकडे तिरपं उभं राहून एका
डोळ्याने बघतंय. कपितोनव बरांच वेळापासून कॉन्फ्रेन्सच्या कारभारावर लक्ष नाही देत
आहे. जर कबुतराच्या ऐवजी तिथे प्लैपिटस कबुतर जरी आलं असतं, तरी कपितोनवला आश्चर्य
झालं नसतं.
ह्या
वेळेस
19.48
दोन
माइक्रोमैजिशियन्स माइक्रोफोनजवळ जागा धरण्यासाठी भांडताहेत.
खिडकीच्या
चौकटीवर कबुतर जणु डान्स करतोय: कधी एक पंजा उचलतो, तर कधी दुसरा – जणु त्याला काहीतरी म्हणायचंय.
“त्याला
काहीतरी म्हणायचंय,” कपितोनव म्हणतो, पण त्याचं म्हणणं कुणीच ऐकंत नाही.
आणि
तोसुद्धां ऐकंत नाहीये (हो, त्या दोन माइक्रोमैजिशियन्समुळे काही ऐकणं शक्य नव्हतं) इतक्यांत अध्यक्ष भुंकतो:
“तुम्हीं कोण?” – त्याच्याकडे बघंत, जो तीरासारखा हॉलमधे घुसला होता. आणि तो होता – एक लिलिपुट. त्याच्या अप्रत्याशित आगमनाला काही लोक बघतांत, तेव्हां पण, जेव्हां खुर्च्यांच्या
मधली वाट पार करून, तो रांगांच्या मधून खिडकीकडे जाऊं लागतो. कपितोनवचं लक्ष लिलिपुटकडे
तेव्हांच जातं, जेव्हां तो आपल्या मुठीने कपितोनवचा गुडघा दूर करतो आणि खिडकीच्या चौकटीजवळ
दिसतो. पायांच्या बोटांवर उभा राहून, लिलिपुट कबुतर हातात घेतो, म्हणतो : “हे माझं आहे,” आणि परंत जायला लागतो.
आता
तर सगळ्यांनीच त्याला बघितलं. धावंत जाणा-याला बघण्यासाठी कॉन्फ्रेन्सचे डेलिगेट्स
किंचित उचकतांत. माइक्रोफोनच्या जवळचे दोघंपण आपलं भांडण सोडून खालच्या बाजूला
बघूं लागतात.
“तुम्हांला
विश्वास आहे कां, की हे तुमचं आहे?” अध्यक्ष विचारतो.
“नक्कीच!”
जाता-जाता लिलिपुट उत्तर देतो आणि दाराच्या मागे गायब होतो.
“हा
कोण आहे? हे
काय आहे?” हॉलमधे
लोक चिव-चिव करूं लागतात. “तो आपल्याबरोबर कां नाहीये?”
“बसून
जा!” अध्यक्ष दोन्हीं माइक्रोमैजिशियन्सला हुकूम देतो, आणि ते, ‘सॉरी’ म्हणंत
स्टेजवरून चालले जातांत. “मी चर्चा थांबवतोय. बस, पुरे झालं. अजून आपल्या समोर अनौपचारिक कामं सुद्धां पडली आहेत. शांति! कृपा
करून शांत राहा!”
तो
स्वतःसुद्धां चूप होतो – उभा आहे आणि चूप आहे, जणु उदाहरण प्रस्तुत करतो आहे. ह्या कृतीचा लोकांवर असर झाला: मौनाची शक्ति
हळूहळू गदारोळाच्या राक्षसाला काबीज करते.
जेव्हां
पर्याप्त शांतता पसरली, तेव्हां एक नम्र पण धीट आवाज ऐकूं येतो:
“डॉक्यूमेन्ट्सचा
प्रवाह...”
“चूप
राहा!” अध्यक्ष टेबलवर हात मारंत म्हणतो.
आणि
पूर्ण शांतता पसरते.
“एक
पर्याय आहे,” अध्यक्ष
म्हणतो. “कपितोनवला कार्यकारिणीतून बाहेर न काढतां, कार्यकारिणीची त्याची सदस्यता तोपर्यंत निलम्बित ठेवावी, जोपर्यंत ह्या दुर्दैवी
घटनेचा तपास सगळ्याच दृष्टिकोनांतून पूर्ण नाही होत, ज्यांत हेपण निहित आहे, की आपल्या सहयोग्याने ह्या प्रोफेशनमधून निघून जाण्याची घोषणा केलेली होती, त्याबद्दल योग्य वेळेवर
आपण आपलं मत प्रदर्शित करूं शकू. माझ्यामते हा फारंच चांगला पर्याय आहे. आपण
ह्यावर लगेच मतदान करून घेऊं. जणु, आपण आपल्या सहयोग्याला कोष्ठकांच्या बाहेर काढून आणू.”
“असं
नाही, तर ह्याचा उलंट,” आपल्या जागेवरून कोणीतरी
दुरुस्त करतो, “कोष्ठकांमधे बंद करून टाकूं.”
“पण
आपण त्याला बाहेर नाही काढणार!” अध्यक्ष आपल्या आवाजांत जास्तीत जास्त गांभीर्य
आणंत विवाद आटोपायचा प्रयत्न करतो.
पण
नेक्रोमैन्सर मधेच टपकतो:
“कोष्ठकांमधे
तर ह्याला ठेवायला पाहिजे!” तो ईवेन्ट्स-आर्किटेक्टकडे तर्जनीने खूण करंत म्हणतो.
“की तो काही कामाचा नाहीये? आणि, जर
तो काही कामाचा नाहीये, तर तो इथे काय करतोय?”
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट
लाल होऊन ताणलेल्या तर्जनीच्या दिशेने फुफकारतो:
“आणि
तू स्वतः तर...आणि तू त्याला जिवंत कर...कर जिवंत!...आम्हीं पण बघूं की कसा जिवंत
करतोस.”
“मी
तर तयार आहे! मला करूंच नाही देत आहेत!”
“ह्या
पागलांना इथून काढून टाका!” शेवटच्या रांगांमधून लोक ओरडले.
“इथे
कुणी पागल नाहीये!”
“प्लीज़, अपमान नका करूं!”
“बस!
बस! बस! मी प्रस्ताव मतदानासाठी ठेवतोय! कोण ह्याच्या पक्षांत आहे, की कोष्ठकांतून बाहेर
काढावं? कोण
विरोधांत आहे? कोण काहीच नाही म्हणंत आहे?”
अधिकांश
लोकांनी ‘ह्याच्या’ – “कोष्ठकांतून बाहेर”च्या –
पक्षांत मत दिलं.
अध्यक्षाने
सगळ्यांचं अभिनंदन केलं. सगळे लोक उठतात आणि बाहेर जातात. कारण की त्यांना माहीत
आहे, की कुठे जायचंय.
20.01
कपितोनव
सगळ्यांच्या निघायची वाट पाहतो, - क्लोकरूममधे त्यांच्या डोळ्यांत खुपायची इच्छा नाहीये. भर्त्सनेच्या आणि
सहानुभूतिच्या नजरांकडे दुर्लक्ष करंत आपल्या समोर बघतोय. ह्यापण, आणि त्यापण – आहेत तर
खरं, पण त्यांना कितपत महत्व
द्यायचंय, हा
एक मोठा प्रश्न आहे, कारण की ज्याच्यावर त्या रोखल्या आहेत, तो त्यांच्याकडे लक्षंच नाही देत आहे, तसं जवळून जाताना काहीतरी बडबडून तर जातंच आहेत: ज्युपिटेर्स्कीच्या
पार्टीचे अशुभचिंतक लोक त्याच्यावर कठोर दृष्टि टाकतांत, किंवा फक्त तोंड फिरवून
घेतांत; आणि
‘श्याम-वन’च्या पार्टीचे सहयोगी, त्यांना सोडून, जे कपितोनवला ‘तलाव’च्या मृत्युसाठी जवाबदार ठरवतांत आहेत (आपल्यांमधे सुद्धां असे काही लोक
आहेत), जे जर कपितोनवशी
दृष्टिभेट झाली असती, तर त्याच्याकडे मान हालवून अभिवादन करायला किंवा बोटांने ‘विक्टरी’ची खूण करायला तत्पर आहेत.
थोडक्यांत, तो वाट बघतो, ते निघून जातांत.
फक्त
नीनेल त्याच्याजवळ आली:
“तुम्हीं
फार संयम दाखवला.”
हो, आणि कॉन्फ्रेन्सचा
अध्यक्षपण, जो
कामाचे कागदपत्र संभाळण्यांत इतरांपेक्षा मागे राहिला होता, आपली ब्रीफकेस घेऊन
त्याच्याजवळ येतो. हो, महाशय नेक्रोमैन्सरलापण यावसं वाटंत होतं, कारण की तो आपल्या जागेवर उभा आहे, आणि हॉलमधून बाहेर नाही जात आहे.
“माझ्या
सामर्थ्यांत जेवढं होतं, ते सगळं मी केलं,” अध्यक्ष म्हणतो. “परिस्थिति अत्यंत वाईटपण होऊं शकली असती. पुन्हां कधीही
घाईगर्दींत कोणची घोषणा नका करूं.”
कदाचित
त्याला आभार प्रदर्शन करणा-या शब्दांची अपेक्षा होती. कपितोनव चूप राहातो.
“आणि, जे मी तेव्हां
कोष्ठकांबद्दल बोललो होतो, त्याच्यावर लक्ष देऊं नका,” अध्यक्ष सल्ला देतो आणि, आपल्या पाठीच्यामागे, जवळ येत असलेल्या नेक्रोमैन्सरला अनुभवंत, तो आपल्या जागेवरंच इकडे-तिकडे हलूं लागतो, ज्याने नेक्रोमैन्सर पाठीच्या मागे नाही राहाणार. “कोष्ठक – एक प्रतीक
आहे...”
“पण
धनु-कोष्ठक नाही!” पुढे येताना नेक्रोमैन्सर म्हणतो.
आता
20.07
कपितोनव
बसला नाहीये, तर उठून उभा राहिला आहे. त्याला, किंवा आणखी कुणालाही नेक्रोमैन्सरकडून कोणत्याही चांगल्या गोष्टीची अपेक्षा
नव्हती. पण, ते
जे नेक्रोमैन्सरने केलं, त्याने कोणालाही धक्काच बसला असता.
त्याने
कपितोनवच्या खांद्याचा मुका घेतला, वळला आणि शीघ्रतेने हॉलच्या बाहेर निघून गेला.
कपितोनवचा
जणु जीव गुदमरू लागला, पण अध्यक्ष आणि नीनेलने असं दाखवलं, की नेक्रोमैन्सरच्या वागण्याकडे त्यांचं लक्षंच नव्हतं.
“तुम्हीं
फार धीराने वागलांत,” अजूनपर्यंत दाराकडे बघंत नीनेलने त्याची तारीफ करंत म्हटलं, “ठाम राहिले आणि ठाम
राहा. मी तुमची प्रशंसक आहे.”
ती
त्याचा हात धरते.
“बैन्क्वेटला
(भोज) जायची वेळ झाली आहे.”
“मी? बैन्क्वेटला?” कपितोनवच्या तोंडातून
उद्गार निघतो.
“नाही, हे बैन्क्वेट नसणार,” नेक्रोमैन्सरच्या
अनुपस्थितीने प्रसन्न होऊन अध्यक्ष म्हणतो. “हे आणखी काही असेल. मेमोरियल-ईवनिंग असेल.
फ्यूनरल-फीस्ट.”
“चला, कपितोनव.”
“प्लीज़, मला सोडून द्या.” तो
तिच्या हातांतून हात परंत खेचतो. “प्रेत अजून उचललेलं नाहीये, आणि तुम्हीं लोक
बैन्क्वेटला जाण्यासाठी तयार झालेत.”
“जर
‘तलाव’ जिवन्त असता, तर तोसुद्धां आपल्या
बरोबर आला असता,” अध्यक्ष म्हणतो. “तर, अशा प्रकारे आपण त्याला श्रद्धांजलि वाहंत आहो – सगळे मिळून, माणसांसारखे. सम्पूर्ण
इन्डस्ट्री. प्रेत...प्रेतांत काय आहे? प्रेत आपल्या शिवाय घेऊन जातील.”
“तुम्हीं
माझ्याशी असं कां वागताय?” नीनेलला कळंत नाही. “तुम्हीं बिल्कुल असे नाहीये, तुम्हीं फार सभ्य, फार चांगले आहांत.”
“तुम्हांला
खरंच असं वाटतंय का, की मी मेमोरियल ईवनिंगमधे येईन?” कपितोनव त्यांच्यापासून दूर सरकतो.
“म्हणतांय
काय?” अध्यक्ष त्याला
थांबवतो, “उलंट
तुमच्या शिवाय तर ह्या मेमोरियल-ईवनिंगची कल्पनाच नाही करूं शकंत! कुणा
दुस-याशिवाय तर समजूं शकतो, पण तुमच्या शिवाय नाही. शेवटी, तुम्हीं इथे ‘तलाव’मुळेच
आहांत ना? त्यानेचं
तुम्हांला नव्हतं का शोधलं? जायला हवं. जर नाही जाणार, तर चांगलं नाही दिसणार, चूकंच होईल. लोकांना वाटेल की तुम्हीं गुन्ह्याच्या ओझ्याखाली वैतागले आहांत, म्हणजे, तुम्हीं गुन्हेगार
आहांत. किंवा, ह्याच्यापेक्षांही वाईट असं वाटेल, की तुम्हीं ह्या फुकटच्या गोंधळामुळे रुसले आहांत, आणि खरंच हा फुकटचांच
आहे!...पण तुम्हीं तर ह्या गोंधळापासून वर आहांत? आमच्या षडयंत्रांहून वर. आणि महत्वाचा सल्ला, स्वतःला मारेकरी नका समजू. तुम्हीं मारेकरी नाहीं, नाहीये ना?”
“ऐका, मी काहीही नव्हतं केलं.
मला माहीत नव्हतं, की त्याने 99 ही संख्या धरली आहे. आणि जर माहीत असतं तर? त्यांत असं काय आहे? नाही. मी तुम्हांला
सांगेन. मला आठवतंय. कुणीही आजपर्यंत...ऐकतांय न?...आज पर्यंत कुणीही, कधीही 99ची संख्या मनांत धरली नव्हती. आश्चर्याची गोष्ट आहे. पण आहे असंच!”
“मीपण
त्याबद्दलंच म्हणतोय, थोडाच वेळ थांबा, आणि मग निघून या. बस, फक्त गेलं आणि आलंच पाहिजे. वरून हे आयोजन तुमच्या हॉटेलमधेचतर होतंय.
तुम्हीं तसेही तिथेच चाललांय ना? फायरप्लेस असलेल्या हॉलमधे पोहोचा, काही वेळ थांबा आणि निघून जा.”
“पोहोचू
आणि निघून येऊं, कपितोनव,” नीनेल म्हणते. “पोहोचूं आणि निघून येऊं.”
20.21
“कपितिनव, मूर्खपणा करूं नकोस,” क्लोक-रूममधे त्याला
म्हणते.
त्याच्या
आधीच कोटाची बटन्स बंद केली, हातमोजे चढवले, आणि तो आठवूंच नाही शकला, की दुसरा हातमोजा कुठे आहे: दोन्हीं डाव्या खिशांतंच होते.
‘सी-9’पासून हॉटेल पर्यंत, कपितोनव अजून विसरला नव्हता, खूपंच जवळ आहे. अध्यक्षतर बाहेर निघाल्याबरोबर सरळ धावला, ज्याने की, जसं त्याने सांगितलं
होतं, परिस्थितीवर नजर ठेवता
येईल, - सगळे लोक
रेस्टॉरेन्टमधे जमलेयंत, फक्त ह्या दोघांना सोडून: कपितोनवला तिथे जायचं नाहीये आणि तिथे तो ह्यासाठी
खेचला जातोय, कारण की नीनेल त्याला खेचून नेत आहे.
त्याचा
हात धरून आत्मविश्वासाने नेतेय.
कपितोनवच्या
डोक्यांत शेवटचा श्वास सोडंत असलेला फ़ेरो ख़ुफू29 झळकला.
पीटरबुर्गचा
हिवाळा आइसिकल्स आणि कडक जमलेल्या बर्फामुळे मस्त वाटतो. ह्या रस्त्यावर कडक, जमलेला बर्फ
आइसिकल्सपेक्षां जास्त भयानक आहे.
जराही
वाकडा-तिकडा पाय पडला – आणि एकतर मान मोडेल, किंवा कम्बरेचं हाड मोडेल.
“बायका, कपितोनव, फार मोठ्या चेटकिणी
असतांत,” नीनेल
म्हणते. “स्टेजवर नाही, तिथेतर पुरुषांचं राज्य चालतं, तर जीवनांत, दैनंदिन जीवनांत...हो आणि स्वप्नांतसुद्धां!...जीवन आम्हालां भाग पाडते
लबाडी करायला, संख्या बनवण्याला, साध्या-सरळ लोकांना रहस्यमय बनवायला. आता वयाचंच घ्या नं. तुम्हांला काय
वाटतं, माझं वय किती असेल?”
“मी
ह्याबद्दल विचार नाही करंत आहे,” चालताना – पुढे जाताना (कधी इकडे, कधी तिकडे पाई चालणारे पडतांत आहे) कपितोनव उत्तर देतो.
“कां
नाहीं विचार करंत? तुम्हीं विचार करा! विचार करायला त्रास होतोय कां? चला, विचार करा, विचार करा, माझं वय किती आहे?”
कपितोनवच्या
डोक्यांत, अचानक, आपणहूनंच, डोक्याच्या मालकाच्या
इच्छेवर अवलम्बून न राहून, 36चा अंक येतो. पण जिथे स्वतः कपितोनवचा प्रश्न आहे, तो चूपंच राहतो.
“तुम्हीं
विचार केला : 36! फैन्टास्टिक, कपितोनव, मी तुमच्या प्रेमांत पडायला तयार आहे, पण, नाही, घाबरूं नका, कोणत्याही परिस्थितीत मी
असं करणार नाही!”
“तुम्हांला
कसं माहीत, की
मी काय विचार केला होता?”
“मी
तुमचा विचार ओळखला! विश्वास करा, हे कठिण नाहीये! तुम्हांला माझा जादू आवडला कां? जर तुमची इच्छा असेल, तर तुम्हांला त्याचं रहस्य सांगून टाकू?”
कपितोनव
उत्तर नाही देत.
“कपितोनव, हे अगदी एलिमेन्ट्री
आहे! मी अगदी आपल्या वयाचीच दिसते.”
आणि
तिला जणु संक्रामक हास्याने पछाडलं, पण इतकं संक्रामक सुद्धां नाही, की कपितोनवला संक्रमित करेल. तो चूपंच आहे. तसेच चालतात.
“कपितोनव, तुम्हांला काय झालंय? शुद्धीवर या! मी नीनेल
पिरोगोवा आहे. आठवलं? मी ट्रिक्स-डाइरेक्टर आहे. आणि तुम्हीं खूब वीर आहांत. तुम्हीं अत्यंत
संयमाने वागलांत. पण, जर तुम्हीं ट्रिकला नकार दिला, तर मी तुमच्यासाठी ट्रिकचं आयोजन कसं करेन?”
“नीनेल,” कपितोनव म्हणतो, “पण हे खरंच असंच आहे: तो
पहिला होता, ज्याने
99चा अंक मनांत धरला होता. आशा करतो, की तो शेवटचापण असेल.”
“आह!”
ती घसरते, पण
त्याच्या आधाराने, आपल्या जागेवर जमून राहते.
“बघा,” कपितोनव म्हणतो. “तिकडे
नेक्रोमैन्सर जातो आहे. तो जवळ-जवळ पडलांच होता.”
“म्हणजे, असं करायला हवं. चालंत
राहा, चालंत राहा. जर पाय
नेताहेत, तर
ह्याचा अर्थ असा आहे, की चालायला पाहिजे.”
“पाय
पण नेत नाहीयेत, आणि डोक्याची पण इच्छा नाहीये!: कपितोनव तक्रारीच्या सुरांत म्हणतो.
“आणि, काय त्याची इच्छा होती? त्याला मरायचं होतं कां? तुम्हीं त्याला विचारलं
नाही?”
20.38
“तुम्हीं
आत जा, मी नाही जाणार.”
“पुन्हां
तेच? लगेच थांबवा! तुम्हीं
मला चीड आणतांय.”
हॉलमधे
– चौकीदार आहे, त्याला बघून सांगणं कठीण होतं की तो खरोखरचा सिक्यूरिटी-ऑफिसर आहे, की फक्त दाखवण्यासाठी
कोणालाही तिथे उभं केलं होतं.
“शोक-सभेचे
आपले-आपले आयोजन असतात,” नीनेल समजावते, “परिस्थितीकडे बघता, इथे आपला माणूस असायला हवा होता. कदाचित, माझ्या पर्समधे एखादा ग्रेनेड असेल, तुमच्या बाहींत – हेरोइनचं पाकिट असेल. पण ही गम्मत करायची वेळ नाहीये.”
रेस्टॉरेन्टच्या
क्लोक-रूमचा कर्मचारी इतर सफाई
कर्मचा-यांसारखा वाटतोय. कदाचित, त्याला निर्देश दिलेला होता, की शोक-सभा होणार आहे.
हॉलच्या
काचेच्या दारापुढे थांबतात.
“बरोबरंच
आत जाऊ. लोकांना दिसू दे, की तुम्हीं एकटे नाहीये.”
आंत
आले. U-आकाराचं टेबल. बाटल्या, खाण्या-पिण्याची
सामग्री. खुर्च्या बाहेर ओढलेल्या. फायरप्लेसमधे आग जळतेय. सगळे लोक भिंतीला लागून
उभे आहेत, आपला
चुपचाप चाललेला कार्यकलाप सोडून नीनेल पिरोगोवा आणि कपितोनवकडे वळून बघतांत.
कपितोनव
आणि नीनेल पिरोगोवा थांबतात, कारण की आत शिरल्यावर थोडा वेळ थांबायचंच असतं. त्यांना दुस-यांशी काही घेणं-देणं
नाहीये, आणि
दुसरेपण, नीनेल
पिरोगोवा आणि कपितोनवकडे नजर टाकून आपापल्या गुपचुप कारभाराला लागले, खरंतर, हे एकंच काम होतं : अपरिहार्याची
वाट बघणं.
आतां
काही लोक, जसं, कदाचित, आधीपासूनंच करंत होते, दोन-दोन किंवा
तीन-तीनच्या गटांमधे आरामांत गोष्टी करू लागतात. बाकीचे लोक एक-एकटे उभे आहेत.
माइक्रोमैजिशियन झ्दानोव, हॉलमधे फिरंत आगपेटीच्या काड्यांची जादू दाखवतो (‘तलाव’ने नक्कीच तारीफ केली असती). महाशय नेक्रोमैन्सर पाठीच्यामागे हात बांधून
बोत्तिचेल्ली30-शैलींत बनवलेलं मोट्ठं पैनल बघतो आहे.
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट
– बाजू-बाजूने – चुपचाप इतक्यांतच आलेल्या माणसांजवळ पोहोचतो. नजरेनेच नीनेलला
साक्षीदार व्हायची विनंती करतो, कपितोनवला जोरांत कुजबुजंत विचारतो:
“माझी
इच्छा आहे, की
तुम्हांला हे कळावं. नेक्रोमैन्सरने सगळ्यांच्या समोर माझ्यावर आरोप लावला आहे, आणि माझी अशी इच्छा आहे
की तुम्हीं मला समजून घ्यावे आणि माझ्यावर दोषारोपण करूं नये. सैद्धांतिक रूपांत, मी जवळच्या ठिकाणांवर
काम नाही करंत. तुम्हीं मैथेमेटिशियन आहांत, तुम्हांला कदाचित आईन्स्टीनचं समीकरण लक्षांत असेल - e=mc2 नाही, दुसरं –
कॉस्मोलॉजिकल स्थिरांकाचं. त्यांत त्याचा रिक्की टेन्सरशी (गणिताशी संबंधित -
अनु.) गुणाकार करण्यांत येतो, तुम्हांला माहीतंच आहे,
अत्यंत लहान संख्या, जवळ-जवळ – शून्यंच,
पण जास्त अंतरावर असे परिणाम देते!...पण, फक्त
फार-फार दूरच्या अंतरावरंच! कमी अंतरावर बिल्कुलंच नाही!...माझ्याशी सम्पूर्ण
साम्य आहे. मी एखाद्या काळ्या ऊर्जेसारखा आहे, समजतांय नं?
मी माइक्रोइफेक्ट देऊं शकतो. ...तो सुद्धां अत्यंत दूर
असलेला...सेन्ट्रल अफ्रीकेत होत असलेल्या घटनांवर प्रभाव टाकूं शकतो...आणि न केवळ ‘शकतो’ – तर प्रभाव टाकतो!...आणि भयंकर प्रभाव टाकतो –
अमेरिकेत होत असलेल्या निवडणुकांवर, पण ‘तलाव’वर मी, सिद्धांततः, प्रभाव टाकण्यास समर्थ नव्हतो, जरी माझी इच्छा असती,
तरीही – तो – जवळ होता, तो इथे होता. आणि
एखादी वस्तू जितकी दूर असेल, तिच्यावर माझा प्रभाव तितकांच
गंभीर होतो...”
नीनेलने तेवढ्यांत जोराने
कुजबुजंत तर्क केला:
“तुमचं म्हणणं समजलंय. आता
गप्प व्हा.”
थोडा वेळ गप्प राहून ईवेन्ट्स-आर्किटेक्ट
पुन्हां आपलं म्हणणं चालू ठेवतो:
“आणि हा माझ्याशी नेहमी
खार कां खातो?
त्यालातर चांगलंच माहीत आहे, की मी फक्त
दुरूनंच काम करतो... त्याला फक्त माझ्या आयामाचा, विस्ताराचा
हेवा वाटतो...तो स्वतःपण, माझ्याचसारखा, फक्त फार लांबून...तुम्हांला वाटतं, की तो सरळ इथेंच
करूं शकतो...आपल्या जागेवरून न हालतां? कां नाहीं! हा फक्त
बढाईखोरपणा आहे!...मला तर त्याची सीमारेषा आणि योग्यता माहीत आहे, मला सांगायची गरज नाही...हे, त्या ग्रोबोवोयने
त्याला डोक्यावर बसवलंय...ग्रोबोवोय आठवतो? तीच सिस्टम,
तीच पद्धंत...जसे तुम्हीं मॉस्कोत कुणी ऑफिसर आहांत आणि तुम्हीं
मेले आहांत, आणि तुम्हांला दूर कुठे फिलीपीन्समधे प्रमाणित
करण्यांत येतं – एका स्थानीय भटक्याच्या रूपांत...तुम्हांला कधीही आठवणार नाही,
की तुम्हीं मॉस्कोमधे ऑफिसर होते...”
“कृपा करून, लगेच
थांबवा,” नीनेल फुफकारते. “कपितोनव तुमचं म्हणणं ऐकंत
नाहीये.”
“हो, हो,
इथे तुम्हीं प्राचीन, दुर्लभ वस्तूंचा व्यापार
करंत होता, पण आता कुठे बांग्लादेशांत कासव पकडता...आणि,
लक्षांत ठेवा, त्याचा दर्जा नेहमीच कमी असतो.
मला कळतं, की प्रत्येकाला जगावसं वाटतं. पण मी असं नाही
करंत. मी उद्देश्यपूर्वक, सम्पूर्ण एकाग्रतेने करतो.
ब्राजीलमधे अकरा लोक कारागृहातून पळून गेले...त्याच्यासाठी काय तुम्हीं मला
कोर्टांत खेचाल? पण, माझे स्वतःचे
सिद्धांत, स्वतःच्या काही मान्यता आहेत...न्यायाबद्दल
स्वतःच्या कल्पना आहे...”
नीनेल एक-एक शब्द सांभाळून
उच्चारते:
“निघून जा. पीछे मुड – एक
पाऊल पुढे – मार्च.”
तो चालला जातो, पण लगेच
परंत येतो.
“मी, निःसंदेह,
अद्वितीय आहे, कुणीही असं नाही करूं शकंत,
जसं मी करतो, पण मला प्रोफेशनल म्हणणं बरोबर
आहे कां? आपल्या कामासाठी मी कुणाकडूनही एकसुद्धां कोपेक
नाही घेतला. मी इथे कशाला आहे? तुमच्यांत उपरा आहे. पण,
जर मी नसतो, तर जगांत सगळंच आणखी वेगळ्या
प्रकाराने झालं असतं.”
वळतो आणि हॉलच्या शेवटच्या
टोकाकडे जातो.
“ ‘तलाव’चा भाऊ इथे आहे,” नीनेल पिरोगोवा म्हणते, “आणि तुम्हांला ते नको होतं.”
‘तलाव’च्या भावाच्या हातांत कैप-पिशवी आहे.
हेरा-फेरी, उठाइगिरी
करणारा किनीकिन लक्षपूर्वक टेबलाकडे बघतो आहे.
फ्रेममधे ठेवलेल्या ‘तलाव’बरोबर दोन माइक्रोमैजिशियन्स आत येतांत. फोटो आजंच काढला होता. जेव्हां ‘तलाव’ भाषण देत होता.
श्याम-वन आणि
ज्युपिटेर्स्की आणणा-यांच्या हातांतून पोर्ट्रेट घेतांत आणि फायरप्लेसच्या वरच्या
शेल्फवर ठेवतांत.
ह्या कृतीला सगळे
सलोख्याचा संकेत समजले.
ह्याचीच वाट बघंत होते.
“कृपा करून टेबलाशी या, महाशय,
उभं राहण्यांत काही अर्थ नाहीये,” अध्यक्ष
म्हणतो.
सगळे बसतांत.
“तुम्हांला तिकडे,” माइक्रोमैजिशियन
बिल्देर्लिंग कपितोनवला म्हणतो. “तिथे कार्यकारिणीचे सदस्य आहेत.”
“तो कोष्ठकांच्या बाहेर
आहे,” त्याचा शेजारी, हेरा-फेरीवाला इवानेन्को मधेंच
टपकतो. “जर हे खरं नसेल, तर माफ करा,” तो
कपितोनवला म्हणतो.
कुठेतरी बसले.
अध्यक्ष उठला.
21.06
“महाशय. सहकारीगण.
मित्रांनो. माणूस बरंच काही ठरवतो, पण होतं तेच, जे देवाला मंजूर आहे. काही वेळा पूर्वी मी विचार करंत होतो, की काहीतरी बोलेन, अजूनही बोलेन, दुस-याच कशाबद्दल, ना की त्याबद्दल. मी विचार केला
होता, की आपल्या, कदाचित अत्यंत लहान
भासणा-या, पण, खरं म्हणजे, आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या, विजयाबद्दल,
आणि स्वतःवर मिळवलेल्या विजयाबद्दल बोलेन, त्याबद्दल
की शत्रूंनी कितीही अडथळे आणले, तरी आपल्या ‘गिल्ड’ची कॉन्फ़्रेन्स सम्पन्न झाली, आणि त्याबद्दल, की हे अशक्यंच होतं, की तिची मीटिंग होणार नाही, तिची स्थापना होणार नाही,
तिची रचना होणार नाही...ती अस्तित्वात न यावी!...कारण की हीच इच्छा
होती, आपली स्वतःची. मी विचार केला होता, की त्याबद्दल बोलेन, की आपला प्रमुख शत्रू आपल्यांतच
आहे आणि त्याचं नाव आहे – आपल्याच शक्तीवर आणि आपल्याच शक्यतेवर अविश्वास.
गिल्डच्या स्थापनेच्या मुहूर्तावर तुमचं अभिनंदन करताना, मी
विचार केला होता, की ह्याबद्दलसुद्धां बोलेन, की आज, जेव्हां शेवटी आपल्याला संगठित होण्याची संधी
मिळाली आहे, आपल्या विचारधारा आणि मान्यता विभिन्न असूनही,
कोणालाही, कोणालाही आपल्या एकटेपणाला, निराधारपणाला घाबरण्याची गरंज नाहीये, कारण की आता
आपण सगळे एकत्र आहोंत, जसे पूर्वी कधीही नव्हतो, - बस, ह्याबद्दलंच मी बोलणार होतो, आणि, कदाचित, थोड्या वेळाने, वेगळ्या शब्दांत, आणखी काहीपण म्हणेन. पण सध्यां,
मला हे म्हणायला नको. वलेन्तीन ल्वोविच ‘तलाव’
आज स्वर्गवासी झालेत, जसं तुम्हांला माहीत आहे,
आणि, त्याने स्वतःने नाही, तर त्याच्यासाठी लोकांनी म्हटलं, शेवटच्या
क्षणापर्यंत तो आपलं कर्तव्य करंत होता, चिर स्मृति.
जोराने
खुर्च्या सरकवंत सगळे लोक उठले, आणि सगळ्यांबरोबर – कपितोनवसुद्धां. पितांत आणि,
एकही शब्द न बोलता, डोळे झुकवून, टेबलाच्या चारीकडे आपापल्या जागेवर बसतात. सैलेडकडे, खाण्या-पिण्याच्या व्यंजनांकडे हात वाढले. कपितोनव अर्धा मिनिट रिकाम्या
प्लेटकडे बघंत राहिला, मग, मांसाच्या
थण्डगार स्लाइसेसच्या प्लेटकडे नजर टाकंत, जणु तिलाच काही
सांगायचंय, शांतता भंग करतो: “त्याच्या आत्म्याला शांति मिळो.
वेळ झाली. गुड बाय.”
तो हॉलमधून बाहेर निघतो.
जिन्यावर नीनेल त्याला
पकडते.
“तुम्हांला असं वाटलं कां, की मी
तुम्हांला एकटं जाऊं देईन?”
“माफ करा,” कपितोनव
म्हणतो, “मला टॉयलेटला जायचंय.”
21.27
त्याला टॉयलेटला नाही
जायचंय, पण जेव्हां आत घुसलाच, तर तो यूरिनल्सकडे जातो.
आता स्वतःला परिस्थितीजन्य
प्रक्रियेच्या स्वाधीन करायचंय.
तो करतो.
यूरिनल्सच्यावर टांगलेल्या
दोन तक्त्यांकडे न बघणं अशक्य आहे. एकावर जाहिरात आहे आरशांची, दुसरीवर
प्रोस्टेटाइटिससाठी औषधाचं नाव लिहिलंय,
नेहमीसारखा सिंककडे जातो, पाणी चालू
करतो आणि आरशांत स्वतःला बघतो.
गोंधळतो.
त्याच्याकडे बघतोय – नाही, हा परका
चेहरा नाहीये.
असं नाहीये. तर असंच आहे. –
जर ह्या गोंधळाकडे त्याला बनवणा-या तिन्हीं घटकांना जोडून बघता आलं असतं, तर ते
काळाच्या क्रमबद्ध अंतराळाच्या अनुरूपंच प्रतीत झाले असते, - पहिल्या क्षणाला तो स्वतःला बघतो. दुस-यांत, हृदयाच्या
धडधडीच्या समानुपातांत, - समजतोय, की
तो – तो नाहीये. तिस-या क्षणांत – की तो (कारण की, निःसंदेह,
तोच आहे), पण ह्या क्षणी त्याला ते कळलंय,
ज्याने त्याला गोंधळांत टाकलं होतं.
चष्मा!
त्याने कधीही चष्मा लावला
नव्हता.
त्याच्या चेह-यावर चष्मा
होता, आणि चष्मा बिनकाचांचा.
तो आपल्या नाकावरून त्याला
खेचतो आणि फरशीवर आपटतो.
चष्मा उसळतो आणि निळ्या
टाईल्सवरून घसरंत – थांबतो आणि रिकाम्या दृष्टीने त्याच्या गुडघ्यांकडे बघूं
लागतो.
तो पायांनी तिला – बिनकाचांच्या
फ्रेमला – चिरडतो. आणि जेव्हां तो नाकाच्या दांडीवर तुटतो, तेव्हां
पायाच्या धक्क्याने पहिल्या अर्ध्या भागाला क्यूबिकलमधे ढकलतो – आणि दृष्टीआड करतो
आणि दुस-याला – दुस-या क्यूबिकलमधे.
अचानक असा भास होतो, की
क्यूबिकल्समधे कोणीतरी आहे आणि त्याच्यावर नजर ठेवून आहे.
फक्त उपस्थितंच नाहीये, तर
त्याच्यावर नजरसुद्धां ठेवून आहे.
सगळे मिळून चार क्यूबिकल्स
आहेत, आणि तो प्रत्येकाला उघडतो.
कोणी नाहीये. कोणीच नाही.
कपितोनवला मूखिनची भीति
आठवते (पण काय, ती भीति होती?). म्हणजे, तेव्हां,
जेव्हां त्याला पहिल्यांदा लक्षांत आलं की त्याच्या प्रत्येक
हालचालीवर निरंतर तीक्ष्ण नजर ठेवली जात आहे.
तो चेहरा धुतो.
आणि बाहेर निघतो.
“मी काय चष्मा लावला होता? माझ्या
चेह-यावर चष्मा होता कां?”
“माय गॉड, काय झालं?”
“मी विचारतोय, माझ्या
चेह-यावर चष्मा होता कां?”
“बिल्कुल होता – चष्मा.”
“बिन काचांचा?”
“बिन काचांचा कां?”
“कारण की माझी नजर चांगली
आहे. मी चष्मा लावतंच नाही!”
“तू दिवसभर चष्म्यांत
होता.”
“दिवसभर चष्म्यांत? तू मला
सकाळी बघितलं होतं?”
“मी तुला लंचच्या आधी
पाहिलं होतं. तू चष्मा लावला होता. आणि त्यानंतर, जेव्हां तुझ्या हनुवटीची
जखम पुसंत होते. माझ्या मनांत विचारसुद्धां आला: चेह-याला स्पर्श करंत पार्टीशन
पडलं होतं, पण चष्म्याला काहीही झालं नाही. घाबरूं नकोस,
तू चांगलाच दिसतो – चष्म्यांतपण आणि बिनचष्म्याचापण. ऐक, तुझे ओठ निर्जीव वाटतांत आहेत...हे सगळं थांबव, शुद्धीवर
ये, कपितोनव.”
21.43
“”स्वर्गातील क्षेत्रांनो, तो किती
गोड ‘किस’ करतो, कपितोनव!”
“कोण?”
“तू, कपितोनव!
मी तुझ्याबद्दल बोलतेय!”
त्याने तिच्या ‘किस’ला बस, झिडकारलंच नव्हतं – जेव्हां ती लिफ्टमधे
त्याला बिलगली होती – ओठांसकट सम्पूर्ण अंगानिशी. त्याला वाटलं की तो तिला प्रतिसाद
देतोय.
आणि पुन्हां प्रतिसाद
देतो.
लिफ्टची दारं आपली कसरत
करंत राहतात ‘उघडले – बंद झाले’. तिस-या प्रयत्नांत दोघं बाहेर
निघतात.
21.48
“…कपितोनव,
तुला खरंच असं वाटतंय का, की अश्या वेळेस मी
तुला सोडून देईन?...तेव्हां, जेव्हां
सगळ्यांनी तुला वाळींत टाकलं आहे?...मी तशी नाहीये...मी
बघतेय की तुला कशाची गरंज आहे...तुला ‘बाई’ची गरंज आहे, तुला उष्णतेची गरंज आहे, तुला आपल्या विलक्षण जादूसाठी डाइरेक्टरची गरंज आहे!...मी ठरवलंय : तू
चांदीसारख्या चमचमत्या सूटमधे आपला कार्यक्रम प्रस्तुत करशील...नाही? कां?...तुला आपली किंमत कळतंच नाहीये...तुझा
स्वाभिमान ढासळलाय...कपितोनव, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास
आहे, तू एकदम दोन-दोन दोन अंकांच्या संख्या ओळखूं
शकतो!...आणि चारसुद्धा!...आणि आठसुद्धां!...
“...आणि फक्त एका नजरेने
कुलूप उघडणं?...खोटं, तू करू शकतोस! चल, प्लीज़
– नजरेने! फक्त नजरेने...चल, त्याच्याकडे बघ, चल ना, प्लीज़...इथे पाठीवर...
“...व्वा! उघडला!...तू!
फक्त तू!...नाही,
ते स्वतः नाही उघडलं!...’स्वतः’चा काय अर्थ आहे? आणि मीपण नाही!...कपितोनव, पुरे कर, माझा अपमान करायची गरंज नाहीये! तू नजरेनेच
उघडूं शकतो!...ही तुझी जादू आहे! माझी नाही!...सीक्रेट जाणून घ्यायचं नाहीये...
“...स्वर्गीय क्षेत्रांनो, आह,
शांत-प्रकृतिचे लोक मला कित्ती आवडतांत! मला तुझ्यासमोर कबूल करावं
लागेल, कपितोनव...मी कधीही, कुणालाही
ह्याबद्दल सांगितलेलं नाहीये...माझा कधीही तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या
पुरुषांशी संबंध नाही आला...प्रामाणिकपणे!...मी नेहमी, अशा,
तुझ्यासारख्या पुरुषाचं स्वप्न बघंत होते, कपितोनव!...
“...कपितोनव! तू – बुद्धि
आहे, तू – शक्ति आहे. तू – सामर्थ्य आहे. तू – पायथन (अजगर-अनु.)आहे.
“...कपितोनव, आपण कुठे
आहोत?...मला कळंत नाहीये, तू मला
आपल्या हॉटेलच्या खोलींत घेऊन आलास?
“...कपितोनव, मी,
फक्त, तुला आधीच सांगून ठेवते...मी ओरडेन...परवानगी
आहे?...तू घाबरंततर नाहीयेस ना की मी तुला लफड्यांत ओढेन?”
..... ...... ......
जेव्हां ती आपल्या पायांचा
त्याच्याभोवती वेढा घालते,
जवळ-जवळ त्याला आपल्या आत दाबंत, आणि आधी
गुरगुरते, मग ओरडते : “कपितोनव!”,
तो आपल्या विचारांवर परंत येतो. तो कपितोनवंच आहे कां, की दुसरा कुणी आहे, ज्याने कपितोनवला प्रतिस्थापित
केलंय?
ह्याच्या आधी इतक्या
कळकळीने त्याला कुणीही ठासून नव्हतं सांगितलं, की तो कपितोनव आहे, आणि ह्याच्या आधी, त्याच्या मनांत ही शंकापण कधीही
उद्भवली नव्हती.
काळे केस एखाद्या
डागासारखे विखुरले होते. कुठे ही मेदूसा31 गॉर्गोन तर नाही? ‘गॉड्स,
सेव मी, - मेदूसा गॉर्गोनच्या सुंदरतेचा
आकस्मिक विचार कपितोनवच्या मनांत रुतला! तिच्या सौंदर्याची कुणी ग्वाही दिली असती,
जर सगळ्या पाहणा-यांचा मृत्यु होत होता, आणि,
तो, जो सुखरूप वाचला होता, बिनाकिल्ल्याचा, काय नाव होतं त्याचं...हर्क्युलस, नाही...पेर्सेई...तोपण दयनीय प्रतिबिम्बाशिवाय काय बघूं शकला होता?...
[बस, तो त्याला
आधीच हरवून बसला होता (कपितोनव- आकस्मिक विचाराला).]
तिच्या कानांत मोठे-मोठे
इयर-रिंग्स आहेत – पातळ,
चौडे, लेससारख्या प्लेट्स असलेले, अल्टारच्या दाराची आठवण देणारे. हे इयर-रिंग्स आहेत कां? कवचाचे उरले-सुरले तुकडे – पोषाकाची शेवटची वस्तू, जी
तिच्या शरीरावर शिल्लक होती.
“क-पि-तो-नव!...क-पि-तो-नव!...”
जणु ती घाबरतेय की पूर्ण नाही तरी कपितोनवच्या अस्तित्वाचा एक भाग हरवून जाईल – का, किंवा,
पि, किंवा तो, किंवा
नव.
कपितोनव, फक्त असंच,
दुस-या प्रकाराने नाही.
........ .........
.......
ह्यानंतर त्याला असं वाटतं, की हीच
शांतता आहे – ती, जिला ऐकावं, ती खरं
म्हणजे साधारण प्रकारच्या बारीक आवाजांनी ओथंबलेली आहे – खिडकीच्या पलिकडची,
दाराच्या पलिकडची आणि बस, ह्यांच खोल्यांची :
कुठे श्च्श्च्श्श्च, कुठे प्त्स्क, कुठे करकर, कुठे ब्रूम, कुठे
टाक-टिक-टाक-टिक, कुठे “तिसरा, तुला सांगतेय” (कॉरीडोरच्या शेवटी).
एक दुस-याच्या बाजूला
झोपायला पुरेशी जागा आहे. तो, तिच्याकडे तोंड वळवून, थोडा
दूर सरकतो, ज्याने एका बाजूने तिला व्यवस्थित बघूं शकेल.
तिचं तोंड किंचित उघडं आहे, पापण्या झुकल्या आहेत. त्याने
उशी घेतली नाहीये, आणि नीनेलचं डोकं उशीत खुपसलं आहे,
ज्याने तिची टोकदार हनुवटी, छताकडे झाली आहे,
आणि अल्टारचं दार न्यून कोण बनवंत कपितोनवकडे आहे. चांदी? पण ती तर वजनदार असते...म्हणजे हे कवच नाहीये, तर –
साखळ्यासुद्धां नाहीये.
कपितोनव धातुच्या ह्या
दागिन्याला बोटाने स्पर्श करतो – सावधपणे, ज्याने तिची झोपमोड होऊं नये,
कारण की त्याला खात्री आहे, की ही बाई दूर,
एखाद्या दुस-या जगांत पोहोचली आहे: ती इथे नाहीये, ती काळ आणि स्थानाच्या वेगळ्याच परिधीत आहे.
तो तिच्या श्वासाची लय
न्याहाळतो, जी तिच्या पोटाच्या माध्यमाने प्रकट होत आहे आणि वक्षस्थळ अगदी स्थिर आहे.
एका बाजूने बघितल्याने
तिचं वक्षस्थळ धनु-कोष्ठकांसारख दिसतंय,
कपितोनव दुसरीकडे तोंड
फिरवतो – त्याच्यापासून दोन मीटर्सच्या अंतरावर भिंतीत आरसा लावलेला आहे. तर्कसंगत
आहे : निर्वस्त्र,
हाडं निघालेला, आणि त्याच्यामागे ती, धनु-कोष्ठकवाली.
ते चौघं आहेत.
जर दोन्हीं कपितोनवांना एक
समजलं, तर कपितोनव धनु-कोष्ठकांच्यामधे दबलाय.
तो – जणू घरट्यांत आहे.
तो उठतो आणि स्वतःला कोष्ठकांमधून
काढून मिनिबारकडे जातो.
ती लगेच शुद्धीवर येते, आणि जणु
काही झालंच नाही, खांद्यापर्यंत ब्लैन्केटखाली लपून जाते –
आता कोणतेच कोष्ठक नाहीयेत.
“कपितोनव, तुला मुलं-बाळं आहेत का?”
“मुलगी. एकोणीसची.”
“आणि मला एक मुलगा आहे.
अकराचा. तुला काय झालंय कपितोनव?”
“इथे...माशी आहे,” कपितोनव
म्हणतो.
“फ्रिजमधे?”
“हो.”
“मेलेली?”
“नाही.”
“तू उभा होतास आणि तू लक्ष
नाही दिलंस, कपितोनव?” कोपरांवर थोडंसं उठते. “तू इतका घाबरलास
कां? असं काय झालंय?...हिवाळ्याची
माशी. हॉटेलच्या मिनिबारमधून...अरे, तुला झालं काय आहे,
कपितोनव? तू माशांना भितोस कां? ही काही झुरळ नाहीये.”
“सगळं ठीक आहे,” कपितोनव
स्वतःवर ताबा ठेवतो. “वाइन घेशील कां? की, इथे आणखी काय आहे? श्नेप्स – दोन घोट...वोद्का ‘रशियन स्टैण्डर्ड’…ओहो, पूर्ण
शंभर ग्राम्स!”
“चला, अर्धी
अर्धी. नाही, बाटलीनेच पिउया. म्हणजे ग्लास भिडवायला नकोत.”
आधी ती घोट घेते, पण
बाटलीतून पूर्ण घोट तिच्या तोंडांत नाही जात – बाटलीचं तोंड खूप अरुंद आहे. तो
आपला घोट घेतो.
“आणि, तुझे
तिच्याशी संबंध कसे आहेत, सगळं ठीक आहे?”
“कोणाबरोबर ठीक आहे?”
“मुलीबरोबर – सगळं ठीक आहे
ना?”
“हो, ठीक आहे.
वाईट कां असेल?”
“नाही, बस,
असंच विचारलं. प्रेमाने राहता न?”
“नकीच, प्रेमाने.”
“हे, ‘नक्कीच’
पण? हो, नक्कीच – ती
मोठी आहे...अजून लग्न नाही झालं?”
“एंगेजमेन्ट झालीय.”
“काय मजा आहे! व्हायलाच
पाहिजे...आणि तू?
तुझं तर लग्न झालेलं आहे?”
“सध्यां आम्ही,” कपितोनव
म्हणतो – “बिल्कुल बरोबर नाहीये. तुझ्या कानांत हे काय आहे – चांदीचं आहे?”
“इयर-रिंग्स आवडतांत?”
“कदाचित, वजनदार
आहेत?”
“मला वाटतं, माझ्यावर
चांगले दिसतात.”
“हो, नक्कीच,
छानंच दिसतात.”
ती वस्तू, जिच्याशिवाय
आजचा माणसाची, कुठेही असला तरी, फार
गैरसोय होते, तिच्या हातांत दिसली. ती लहानश्या स्क्रीनवर
बघते:
“विचारतांत आहे, की मी
कोणाच्या पक्षांत आहे – स्मेत्किनच्या की चिचूगिनच्या? टु
हेल!... वॉव!...गिल्डच्या प्रेसिडेंटबद्दल विसरले. हे सगळं तुझ्यामुळे झालं,
कपितोनव! बोर्डची तर पुष्टी केली, पण
प्रेसिडेन्टंच नाहीये. आत्ता तिथे, रेस्टॉरेन्टमधे मतदान
करतात आहेत...आणि, तुला मैसेज नाही आला कां? तू काय फोन बंद करून ठेवलाय?”
“ते कुणालाही निवडोत – मला
काही फरक पडंत नाही.”
“जर तुला निवडलं असतं, तर मस्त
झालं असतं.”
“उहूँ,” कपितोनव
म्हणाला.
“काय ‘उहूँ’,
कपितोनव? तू एक सर्वोत्तम प्रेसिडेन्ट झाला
असतास.”
“पण, काय मतदान
गुप्त नाहीये?”
“बघितलंस, तुला फरक
पडतोय!”
“आज कोणची तारीख आहे?” कपितोनवने
विचारलं.
“ओह, ही आहे न
गम्मत! ओळख.”
“ठीक आहे, जरूरी
नाहीये.”
“नाही ओळखू शकंत? कारण की
ती दोन अंकांची नाहीये, म्हणूनंच तू नाही ओळखू शकंत!...पण,
मी माझी ओळखली, तू माझी ओळख...हूँ? गप्प कां आहेस? मी दोन अंकांची मनांत धरली.”
“पुरे कर, मी हे
नाही करणार.”
“ओह, प्लीज़,
मी धरली आहे.”
“सांगितलं न, की नाही
करणार.”
“बरं, मी त्यांत
काही तरी जोडू...किती जोडू?...चार?”
“मला काही फरक नाही पडंत.”
“आणि किती वजा करूं…दोन?”
“मला काही फरक नाही पडंत.”
“तर? मी जोडले
आणि वजासुद्धां केले. बोल ना रे!...गप्प आहेस?...चोवीस!”
“खोटं बोलतोयस! तू ओळखलीस!
चोवीस!”
“मी काहीही ओळखलं नाहीये.
हे तू मला उत्तेजित करते आहेस. मला नाही माहीत, की तू काय धरलं होतं.”
“कपितोनव, तू वाईट
आहेस. आणि, तुला काय वाटतं, मी रोज हे
घालते?...बरं सांग, कपितोनव, मी तुला कां ‘कपितोनव, कपितोनव!’
म्हणून बोलावते, पण तू एकदाही मला माझ्या
नावाने नाही बोलावलं? तू काय बिछान्यांत सगळ्यांसोबत असांच
असतोस? हा तुझा सिद्धांत आहे कां?”
“नाही, कां...”
“पूर्ण कपडे काढायला हवे
होते, म्हणजे तू माझ्यावर इयर रिंग्स बघितले असते.”
“मी ते आधीही बघितले आहेत.”
“केव्हां? आपण तर
काही तासांपूर्वीच भेटलो आहोत.”
“बस, बघितलेंत.”
“हो, तू
स्वतःवर चष्मा नाही बघूं शकलास? तू माझे इयर-रिंग्स कसे
बघितले? कपितोनव, ब्लैन्केटखाली ये,
प्लीज़, वोद्का गर्मी नाही देत आहे. मला थंडी
वाजतेय.”
23.16
ह्याच्यानंतर ती
“कपितोनव!” म्हणून नाही ओरडली, आणि ओरडतंच नाही.
आणि मग
23.28
ती म्हणते (कारण की
कॉरीडोरमधे काही लोक हल्ला करतात आहेत:
“हे आपले लोक, बैन्क्वेटहून.”
‘आपले लोक,
बैन्क्वेटहून’ चालताना कोणच्यातरी मह्त्वपूर्ण
विषयावर बोलंत आहेत – कोणाला निवडलंय आणि जेवणाबद्दल...
ती टैक्सी बोलावते.
“आर यू श्यूअर?”
“अगदी. मी रात्री घरींच
झोपते.”
तेवढ्यांत
23.32
भिंतीच्या पलिकडचा शेजारी –
तोपण बैन्क्वेटहून परतलांय.
“काळ-भक्षक, तो सारखा
ओका-या काढंत असतो,” कपितोनव म्हणतो.
“माहितीये, माहितीये...अरे,
माझे टाइट्स फाटले आहेत.”
कपितोनवनेपण कपडे घातले, कपितोनवला
तिला सोडायला जायचंय.
“मला
इथे कोणीतरी थर्मल्स विकलेत, बेलारशियन
प्रॉडक्शन. ग्यारंटी देतात की चालतांना हे घर्षण कमी करतांत. मी तर तपासून नाही
बघितलं.”
“आठवणीसाठी देशील?”
“ओके,
गुड लक. चालतांना घर्षण कमी करतात – ही तर चांगली गोष्ट आहे.”
“पुरुषांचे. म्हणजे, आठवणीखातर...दे.”
23.56
जिना उतरताना ती त्याला म्हणते:
“तुला कधी असं नाही वाटंत का, की खरोखरंच त्याला कुणी
खातंय, किंवा, माहीत नाही, पूर्ण खाऊन टाकेल कां?”
“तू काळाबद्दल म्हणते आहेस कां?”
“हो,
वैयक्तिक काळाबद्दल, जो आपल्या सागळ्यांना
दिलेला आहे. कोणी त्याचा सपूर्ण गर खातोय, रसाळ गर, आणि शिल्लक उरतो भुसा. फक्त भुसा, घटनांचा भुसा. आणि
बस.”
“जर तू त्याच्याबद्दल बोलते आहेस, जो माझ्या भिंतीच्या पलिकडे
आहे, तर मला वाटतं की त्याचं असं नाहीये. असं नाही वाटंत की
तो चविष्ठ वस्तू खात असेल. तू तर ऐकलंस की तो कसा ओका-या काढतो...”
“नाहीं,
मी सामान्यपणे बोलंत होते.”
“आणि माझ्यासाठी हे दोन दिवस अंतहीन होते. ते कदाचित अश्यासाठी, की,
कदाचित, मी झोपंत नाही. किंवा, कुणास ठाऊक, कदाचित, हे त्याने
माझ्या आतड्यांना इतकं पिळून टाकलं असावं...”
“माफ कर,
कपितोनव, पण तुझ्या चेह-यावर फार थकवा
दिसतोय.”
“दिवस संपता संपत नाहीये.”
“सगळं संपेल, घाबरू नको.”
आणि खरोखरंच हे त्यादिवसाचे शेवटचे शब्द होते.
आगमन झालं
सोमवारचं.
00.00
बर्फ पडूं लागला होता. टैक्सीवाला वाट बघतोय, इंजिन बंद
न करतां, आणि विंडस्क्रीनवर वाइपर्स फिरतात आहे.
“तुझ्यासमोर कबूल करतेय, मी, कदाचित,
तुझ्यांत अशी बुडाले नसते, जर तू हे नसतं
केलं. फक्त मी तुला नीट बघूं शकले नाही. तसा, हा तुझा ‘गेम’ नव्हता, पण त्याच्या
नियमांवरपण तू मस्त खेळलास. तू ‘तलाव’ला
अजूनही ओळखलं नाहीस? हे सगळं त्याचंच केलेलं होतं. ‘तलाव’ फक्त मिलनसार दिसण्याचा प्रयत्न करंत होता,
खरं म्हणजे तो फार वाईट माणूस होता, एकदम पोकळ,
दुष्ट, असहनीय. मला ही गोष्ट दुस-यांपेक्षां
जास्त चांगली माहीत आहे. त्याने तुझापण उपयोग केला. तुझा पत्ता लावला, मॉस्कोहून इथे खेचून आणलं, त्या स्टोर-रूममधे ओढून
घेऊन गेला. तुला काय खरंच काही कळंत नाहीये? ही आत्महत्या
होती! तू, त्याच्यासाठी होता...एखाद्या सोन्याच्या पिस्तौल
सारखा! तू स्वतःला बिल्कुल दोष नको देऊंस. तू कोणत्याही सोन्याच्या पिस्तौलपेक्षा
जास्त चांगला आहेस! तू अतुलनीय होतास, फक्त अतुलनीय!
मानवतेच्या दृष्टीने मला ‘तलाव’बद्दल
दुःख आहे, पण एका महिलेच्या दृष्टीने – बिल्कुल नाही. आपली
काळजी घे, कपितोनव. नीनेलची आठवण ठेव. बाय, कॉम्रेड! मी कधीही मारेक-यासोबत झोपले नव्हते.”
कपितोनव नजरेने जाणा-या कारला बघंत राहिला. हॉटेलमधे
परत जाण्याची इच्छा नाहीये. तो बेचैन आहे, जणु त्याने एखादा
वजनदार स्क्रू गिळला असावा. तो लैम्पच्याखाली बेंचवर बसून राहिला असता, पण तो भुरभुरणा-या बर्फाने झाकला गेलाय.
त्याच्यावर नजर ठेवली जात आहे.
तो झर्रकन् वळतो – हळू-हळू येत असलेल्या कारकडे: ही जुनी ‘झिगूली’
होती, हेडलैम्प फुटला होता. त्याने तिला
तेव्हांच बघितलं होतं, जेव्हां नीनेल जाताना ‘तलाव’च्या नीचतेबद्दल आपलं स्वगत भाषण देत होती,
- तेव्हां कार इथून अशीच हळू-हळू जात होती, जशी
आता जाते आहे, पण विरुद्ध दिशेंत, आणि
चौरस्त्यावर ‘झिगूली’ परंत वळते.
कपितोनवच्या जवळ येऊन कार थांबते, आणि ड्राइवर वाकून
कपितोनवसाठी दार उघडतो.
“मालक,
चलायचं! कुठे?”
हे आहे उदाहरण असंगठित कैब्सवर टैक्सी नावाच्या संस्थेच्या
विजयाचं.
कपितोनवला फक्त बसायचं आहे.
दार पहिल्या प्रयत्नांत बंद नाही होत – आणखी जोराने बंद करावं
लागतं.
पूर्वेकडील माणूस कपितोनवकडे बघून स्मित करतोय, वाट
बघतोय.
“एक मिनिट,” कपितोनव म्हणतो. “विचार करून सांगतो,” काही विचार करतो, विचारतो:
“तुझं नाव काय आहे?”
“तुर्गून.”
“तुर्गून, तू काय ब-याच दिवसांपासून आहे पीटरमधे?”
“एक वर्ष आणि पाच महिने झालेंत.”
“कन्स्ट्रक्शन साइटवर काम करायचा कां?”
“नाही,
भावाकडे.”
“पहाडांची आठवण येते कां?”
“कुटुम्बाची आठवण येते. बहिणींची. आमच्या तिकडे पहाड नाहीयेत.”
“तुला पीटरबुर्ग आवडतं कां?”
“चांगलं शहर आहे, मोट्ठं. खूप थण्डं. कुठे जायचंय?”
“कुठेच नाही,” कपितोनव दोन नोट काढतो. “तू मला बस, असंच घुमवून आण.”
“नाही,
मी नाही! मी दारुड्यांना नाही!”
कपितोनव त्याच्या खिशांत नोट कोंबतो.
“तुर्गून, मी तुझ्याशी माणसासारखा वागतोय. तू माझी गोष्ट
ऐकतोयंस कां? मला पीटरबुर्ग बघायचंय. ब-याच काळापासून मी इथे
नाही आलो. आठवण यायची. तुला सेन्ट इसाकोव्स्की-कैथेड्रल माहीत आहे? एडमिरैल्टी – चिमुकल्या जहाजासकट? मला फक्त नेशील?
नेवा, मोयका, ग्रिबोयेदोव-कनाल...जर
तुझी एखादी आवडीची जागा असेल, तर तिथेपण घेऊन चल. जिथे वाटेल,
तिथे घेऊन चल. माझी फ्लाइट उद्या आहे, माहीत
नाही, पुन्हां केव्हां येणं होईल?”
“दूर जातांय कां? अमेरिकेला चालले आहांत?”
“कुठली अमेरिका?” कपितोनव पुटपुटतो, असा अनुभव करंत की त्याने तुर्गूनशी जागा बदलली आहे, आता प्रश्न तो विचारतोय. “जवळंच जायचंय. अमेरिकेलाच कशाला जायला पाहिजे?”
“काय सकाळ पर्यंत जात राहायचंय?”
“जो पर्यंत कंटाळा नाही येत.”
निघाले. तुर्गूनला अजूनपर्यंत आपल्या सफलतेचा विश्वास नव्हता
झाला – तो पैसेंजरकडे बघतो: त्याचं मत बदललं तर, पैसे परंत मागू लागला तर...
इथे किंचित ऊब आहे. कपितोनव ओवरकोटाचे बटन काढतो आणि स्कार्फ काढतो.
हिवाळ्याच्या बर्फाळ रात्री पीटरबुर्ग बघणं – कपितोनवची हीच सर्वांत मोठी इच्छा
होती. कोणच्यातरी गोष्टीची आठवण येऊन, किंवा कशातरीबद्दल कल्पना करून,
तो डोळे बंद करतो, आणि लगेच झोपून जातो.
0.41
“मालक,
पोहोचलो.”
“आँ?
काय?”
“इसाकोव्स्की-कैथेड्रल.”
“कुठे?”
“हे राहिलं. इसाकोव्स्की-कैथेड्रल.”
“तुर्गून, तू – तुर्गून?… तुर्गून,
हे इसाकोव्स्की-कैथेड्रल नाहीये, हे
ट्रिनिटी-कैथेड्रल आहे, ह्यालांच इज़माइलोव्स्की
म्हणतात...आणि मी काय झोपलो होतो?”
“झोपले होते, आपण जात होतो तेव्हां.”
“तू मला कां उठवलंस?”
“इसाकोव्स्की-कैथेड्रल, स्वतःच तर सांगितलं होतं न,
दाखवायला.”
“ट्रिनिटी, मी तुला समजावतो. हे पण मोठं आहे, पण इसाकोव्स्कीपेक्षां किंचित कमी. इसाकोव्स्कीच घुमंट सोन्याचं आहे. तू
पण काय...जर मला इसाकोव्स्की दाखवायचं आहे, तर
लेर्मोंतोव्स्कीवर वळून जा, आणि तिथे रीम्स्की-कोर्साकोववर,
आणि मग ग्लिन्का स्ट्रीटवर बल्शाया-मोर्स्काया स्ट्रीटपर्यंत...काही
असंच, किंवा इज़माइलोव्स्की वर, पण तिथे
वज़्नेसेन्स्की प्रॉस्पेक्टवर ट्रैफिन वन-वे आहे, सादोवायावर
बल्शाया पोद्याचेस्कायावर निघावं लागेल, आणि फनार्नीपर्यंत...पण
जर मी झोपलो, तर मला उठवायची गरंज नाहीये.”
“झोपणार आहेस कां?”
“नाही,
तुर्गून, माझ्याकडे झोपायला जागा आहे. मी तुला
ह्यासाठी नाही घेतलं. मी तीन रात्री झोपलेलो नाहीये, मी थोडा
वेळ झोपूं नाही शकंत कां? कळलं? मी एका
माणसाला, म्हणू शकतो, की त्या जगांत
पाठवून आलोय. सकाळी इन्वेस्टिगेटर मला वैताग आणेल. कदाचित, मला
कुठेही जातांच येणार नाही, कळलं? आणि
तू म्हणतो ‘झोपणार आहेस कां’. तू मला
ओळखंत नाहीस, तुर्गून,, मला जादू नाही
आवडंत. पण फक्त येवढं समजून घे, की जर अचानक मी झोपून गेलो,
तर लक्षांत ठेव, की मी सगळं बघतो आहे, मला स्वतःलाच माहीत आहे, की मला कुठे उठायचंय.”
कपितोनव एखाद्या नेविगेटरसारखा लक्षपूर्वक पाहतो, की
तुर्गून लेर्मोन्तोव्स्कीवर वळला की नाही. जेव्हां ते पुलावरून जातांत, तेव्हां तो उत्साहाने तुर्गूनला म्हणतो : “कारंज, बघतोय,
पूर्णपणे बर्फाखाली आहे...” पण सादोवायाच्या आधी, जेव्हां सिग्नलजवळ थांबतात, तेव्हां कपितोनवचे डोळे
पुन्हां बंद होतांत, आणि तो रीम्स्की-कर्साकोव प्रॉस्पेक्टचं
वळण नाही बघूं शकंत.
क्यूकोव कैनालच्या वरचा पुल तुर्गून खूप हळू-हळू पार करतो –
त्याला वाटतं की पैसेन्जरने उंच घण्टा बघावी, पण त्याला उठवायची हिम्मत नव्हती.
हे राहिलं घुमटांचं मंदिर, आणि सगळं झगमगत्या प्रकाशाने
आलोकित आहे, पण तुर्गूनला माहीत आहे की हेसुद्धां
इसाकोव्स्की-कैथेड्रल नाहीये, - कैथेड्रलबद्दल त्याला सगळं
पाठ होतं, पण ट्रिनिटी-कैथेड्रलला इसाकोव्स्की-कैथेड्रल
अश्यासाठी समजला की ट्रिनिटी-कैथेड्रलच्या जवळ ट्रिनिटी-मार्केट आहे, जिथे तुर्गून आपल्या भावाची मदत करायचा.
डावीकडे वळून तुर्गून ट्रामचे रूळ पार करतो – कदाचित पैसेंजरला
दोन स्मारकं बघायला आवडेल – एक उभं आहे, आणि दुसरं बसलं आहे, विशेषकरून बसलेलं जास्त चांगलं आहे – त्याच्या डोक्यावर मोट्ठी बर्फाची
टोपी होती. पण, पुढे आणखी ही मनोरंजक गोष्टी असतील, आणि ह्या रस्त्याला तुर्गून भर्रकन् पार करतो – विरघळंत असलेला बर्फ जितकी
परवानगी देईल तितक्या वेगाने.
बल्शाया-मोर्स्कायावर बर्फ तोडणारे काम करंत होते. पण इथे
समुद्र कुठे आहे,
हे तुर्गूनला नाही माहीत. पीटरबुर्गमधे दीड वर्षापासून राहतोय,
पण आज पर्यंत समुद्र नाहीं पाहिला.
हे राहिलं ते – इसाकोव्स्की-कैथेड्रल, आणि
त्याच्यापुढे घोड्यावर स्वार स्मारक, आणि त्याच्यामागे दुसरं
स्मारक – घोड्यावर : तुर्गून हळू-हळू जातोय, जणु पैसेंजरला दाखवतोय
ती वस्तू, जी त्याला बघायची होती – पीटरबुर्गचे हे महान
दर्शनीय स्थळं. मोठ्या मुश्किलीने तुर्गून स्वतःला थांबवतो, ज्याने
कपितोनवची झोप मोडणार नाही. आता त्याच्या समोर आहे नेवा. आकाशाच्या अंधारांत
त्याबाजूची मीनार चमचमतेय.
तुर्गून स्वतः थोडा-थोडा कपितोनव झाला आहे – ह्या दृष्टीने नाही, की
त्यालाही झोपायचं आहे, तर असा, की हे
सगळं त्याच्या नजरेने बघायचा प्रयत्न करतोय, जो बराच काळ
ह्या सगळ्यासाठी तडफडला होता. आणि, जेव्हां तो
ब्लागोवेश्शेन्स्की ब्रिज पार करतो, तर नेवाकडे अशी दृष्टी
टाकतो, जणु झोपलेल्या कपितोनवसाठी तिला बघतोय.
तुर्गून खूपंच सुरेख ठिकाणांवर गाडी नेतो, आणि जेवढं
सुरेख ते ठिकाण असेल, तितकीच हळूं गाडी चालवतो. बुरूज आहे
उजवीकडे, आणि डावीकडे – म्यूजियम, आणि
इथे, तोपेच्या फेन्सिंगच्यामागे, आणि,
आणखीही इतर काही ठिकाणांवर तो जवळ-जवळ थांबूनंच जातो. विश्वास करणं
कठीण आहे, की ह्या पैसेंजरने कुणाला तरी मारून टाकलं आहे,
- तुर्गूनला, कदाचित, पैसेंजरचे
शब्द बरोबर कळले नसावेत. कदाचित कोणीतरी ह्याच्याच जीवावर
टपलं होतं, ह्याने कुणाला नव्हतं मारलं. हे बघा, तो आत्ता झोपलांय.
ह्यानंतर ते मशिदीकडे येतात. तुर्गून थांबतो, आणि
दुर्घटनेच्या दिव्यांना ऑन करतो, कारण की इथे पार्किंगची
परवानगी नाहीये, आणखी एका मिनिटासाठी इंजनसुद्धां बंद करतो
ह्या अपेक्षेने की पैसेंजर जागा होईल, आणि स्वतःच
त्याच्यासाठी सम्मानपूर्वक मशिद बघूं लागतो.
बर्फाने झाकलेल्या गल्ल्यांमधून होत तो जुन्या युद्धपोताकडे
जातो, जिथून इथे क्रांतीचा प्रारंभ झाला होता. आणि पुन्हां, पुल पार केल्यावर, ज जाणे कुणीकडे जाऊं लागला.
पैसेंजरला इथे आवडलं नसतं, आणि तुर्गून पटकन ह्या
इण्डस्ट्रियल एरियातून निघून जातो.
पैसेंजर तरीही नाही उठंत, जेव्हां पेट्रोल पम्पाजवळ तुर्गून
गाडी थांबवतो, आणि, जरी कारच्या
शैफ्टमधे काही खराबी आहे, तुर्गून पैसेंजरला नेवाच्या
किना-यावर घुमवणं आपलं कर्तव्य समजतो. आधी ते नेवाच्या काठाकाठाने पूर्वेकडून
पश्चिमेकडे जातात (ह्या वेळेस
03.10
नेव्स्की प्रॉस्पेक्टवर फारंच कमी गाड्या जाताहेत आणि पाई
जाणारे तर बिल्कूलंच नाहीयेत), आणि मग तो पैसेंजरला नेवाच्या काठा-काठाने
पश्चिमेकडून पूर्वेकडे घेऊन जातो. पूर्वी टोकावर त्याला आठवतं, की ह्या रस्त्यावर, ज्याला कोन्नाया स्ट्रीट म्हणतात,
एक प्रसिद्ध इमारत आहे. तशी तर ही एखाद्या साधारण इमारतीसारखीच आहे,
असल्या इमारती पीटरबुर्गमधे अगणित आहेत, पण
त्याच्यासाठी ही खास आहे. तिच्या भिंतीवर ‘स्ट्रा’ने साबणाचे बुडबुडे उडवंत असलेल्या मुलाचं चित्र आहे. पीटरबुर्गमधे तर
सगळंच खूप कठोर आहे, पण तुर्गूनला हे चित्र गुदगुल्या करून
गेलं आणि आता तो
04.02
हळूच हसतो.
कपितोनव डोळे उघडतो.
तुर्गून बोटाने नक्काशीकडे खूण करतो, पण
शब्दांने समजावू शकंत नाही. तो फक्त एकंच शब्द म्हणतो:
“चित्र.”
कपितोनव नजर उचलतो – बघतो – डोकं हालवतो.
आणि म्हणतो:
“चल,
घरी घेऊन चल.”
“समर-गार्डन दाखवूं कां?”
“ठीक आहे,” कपितोनव म्हणतो, आणि
डोळे बंद करतो.
04.51
“तुर्गून, मी तुला पैसे दिलेत कां?”
“हो,
हो, चांगलेच पैसे दिलेत.”
“तुझं नाव खूप भक्कम आहे – तुर्गून. तुला माहीत आहे कां, की ह्याचा
काय अर्थ आहे?”
“माहीत आहे,” तुर्गून उत्तर देतो. “जो जिवन्त आहे.”
“फक्त जिवन्त आहे?”
“जो जिवन्त आहे, जमिनीवर चालतो.”
“असंच असायला पाहिजे. आणि मला वाटलं, कुणी लीडर
असेल. विजेता.”
“नाही. जो जिवन्त आहे.”
“बरंय,
असाच राहा, जो जिवन्त आहे. थैंक्यू.”
कपितोनवला आठवंत नाही की तो आपल्या खोलीपर्यंत कसा पोहोचला आणि, फक्त
ओवरकोट काढून बिछान्यांत लपून गेला.
10.00
ब्रेकफास्ट झोपेमुळे गेला. बाकीच्या गोष्टीपण त्याने झोपेमुळे
गमावल्या असत्या.
11.09
कागदावर नजर टाकून कपितोनव खिडकीकडे येतो:
“मला इन्वेस्टिगेटर च्योर्नोवला भेटायचंय.”
“काय सम्मनवर?”
“नाही,
इन्वेस्टिगेशन आहे.”
कपितोनवचं पासपोर्ट बघितल्यावर ड्यूटी-ऑफिसर रिसीवर उचलतो, थोडा वेळ
कुणाशीतरी बोलतो.
“रूम नंबर 11.”
इन्वेस्टिगेटर च्योर्नोव, मेयर ऑफ जस्टिस, ऑफिसच्या टेबलाशी बसला आहे, त्याच्यासमोर कम्प्यूटर
ठेवलेला आहे. इन्वेस्टिगेटरच्या पाठीमागे, खोलीच्या कोप-यांत घाणेरड्या-हिरव्या रंगाची भली मोट्ठी
सेफ ठेवलेली आहे, तिच्यावर माइक्रोवेव आणि इलेक्ट्रिक-केटल
आहे. इन्वेस्टिगेटरचा चेहरा हायपर टेंशनच्या पेशन्टसारखा सुजलेला आहे.
“बसा,
येव्गेनी गेनाद्येविच. हे तर चांगलं झालं की तुम्हीं पळून नाही गेलेत.
पण उशीर करणं – चांगलं नाहीये.”
कपितोनव रिकामी खुर्ची टेबलापासून दूर सरकवून तिच्यावर बसून
जातो. खोलीत आणखी एक खुर्ची आहे, पण तिच्यावर बैग ठेवली आहे.
“तुम्हीं तर उद्या जाणार आहे नं, टिकिट विकंत घेतलंय कां?”
“उद्या कां? आजंच.”
“आज,”
इन्वेस्टिगेटरने निःसंकोच म्हटलं. “हे काही कळंत नाहीये...”
कपितोनव चूप राहतो. हे सांगणं ठीक नाहीये, की फ्लाइट
अडीच तासानी आहे, खतरनाक झालं असतं, त्याला
धरून बंदसुद्धा करूं शकंत होते.
“आधी मला ह्या गोष्टीचं उत्तर द्या. काय ‘तलाव’शी तुमचे संबंध अप्रिय होते?”
“नाही,
आमचे संबंध अप्रिय नव्हते.”
“तर मग सांगा, तुम्हां दोघांमधे तिथे काय चाललं होतं. आणि
हेपण, थोडक्यांत, की तुम्हीं दोघंच
तिथे, स्टोर-रूममधे, कसे पोहोचले,
कोणी प्रत्यक्षदर्शी असल्याशिवाय.”
“माहीत आहे, मी दोन अंकांच्या संख्या ओळखतो.”
“हो,
मला त्याबद्दल सांगितलंय.”
“कॉन्फ्रेन्स होती. इंटरवल होता. इंटरवल संपंत आला होता, सेशन सुरू
व्हायला फक्त पाच मिनिट शिल्लक होते. ‘तलाव’ माझ्याकडे आला आणि म्हणाला, की अजून बरांच वेळ आहे
दाखवण्यासाठी...म्हणजे, ते, ज्याचं मी
प्रॉमिस केलं होतं...ह्याआधी...स्क्रीन ठेवून. आणि त्या खोलींत होतं एक पार्टीशन,
एक बुलेटिन-बोर्ड, ज्याच्यावर नवीन वर्षाची
जाहिरात लटकंत होती...”
“नवीन वर्षाची?”
“हो,
जुनी. आणि हे पार्टीशन, ‘तलाव’च्या मते, आमच्यासाठी स्क्रीनचं काम करूं शकंत होतं.
‘तलाव’ला असं वाटायचं, की त्याच्या चेह-यावर, जणु काही, लिहिलेलं असतं, की तो काय विचार करतो आहे...आणि मला
हे वाचतां येतं, की त्याने कोणची संख्या मनांत धरलीये.
म्हणून स्क्रीनची गरंज होती. म्हणजे, त्या परिस्थितीत,
ते पार्टीशन...आम्हीं त्याला सरकवून खोलीच्या मधोमध आणलं. ‘तलाव’ त्याच्या मागे गेला, मी
ह्या बाजूला राहिलो. मी त्याला दोन अंकांची संख्या मनांत धरायला सांगितलं, नेहमीसारखीच. त्याने धरली 21. मग त्याने आणखी एक संख्या धरली, आणि मी तीपण ओळखली, आता लक्षांत नाहीये, की ती कोणची होती.”
“आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्हांला लक्षांत नाहीये.”
“पण मी कशाला लक्षांत ठेवूं? 21सुद्धां मला अश्यासाठी लक्षांत
राहिली, की ती ‘ब्लैकजैक’32
आहे. आम्हीं त्याबद्दल वाद सुद्धां केला, तो
पत्त्यांची जादू करायचा, आणि त्याच्यासाठी ह्या संख्येचं
महत्व होतं. पण, त्याला असं वाटंत होतं की तो कोणत्या ना
कोणत्या प्रकाराने आपलं गुपित उघड करतो आहे. काही संदर्भांनी, जसं नजरेने, आवाजाने...तिस-यांदा आम्हीं हे ठरवलं,
की तो पार्टीशनच्या मागे गप्प राहील, आणि मी
बोलंत राहीन, जसं नेहमी करतो. मी त्याला बघंत नाहीये,
किंवा ऐकंत नाहीये, असा प्रयोग, समजतां आहांत नं? आणि त्याने धरली : 99.”
“इथे विस्ताराने सांगा,”
“मी पार्टीशनच्या मागून त्याला एखादी संख्या मनांत धरायला
सांगतो, दोन अंकांची. तो गप्प राहातो. मग मी त्यांत पाच
जोडायला सांगतो. तो गप्पंच आहे, मी थोडा वेळ वाट पाहातो आणि
ह्या बेरिजेतून तीन वजा करायला सांगतो. मग मी चूप राहातो आणि म्हणतो : तुम्हीं
धरली होती 99. आणि तेवढ्यांत फरशीवर धम्म् असा आवाज ऐकतो.”
“समजलं. एक गोष्ट लक्षांत नाही आली. तुम्हांला कसं माहीत की
त्याने 99च धरली होती?”
“माहितीये, बस, येवढंच.”
“म्हणजे,
तुम्हांला हे म्हणायचं आहे की त्याला तुमच्या दोन 9ने मारून टाकलं?”
“पहिली गोष्ट, माझे नाही, तर त्याचे,
आणि दुसरं, अशी कोणतीही गोष्ट मला म्हणायची
नाहीये. तुम्हीं माझ्यावर ते विचार थोपतांय, जे माझे नाहीयेत.”
“ठीक आहे. आणि तुम्हीं कां त्याला आधी पाच जोडायचा आणि मग तीन
वजा करायचा हुकूम दिला?”
“हुकूम नाही दिला, तर विनंती केली.”
“हो,
कां?”
“मी ह्याचं उत्तर नाही देऊं शकंत.”
“कां नाही देऊं शकंत?”
“ऊफ़,
चला, असंच समजा. हा माझा प्रोग्राम आहे. फक्त
माझा, लेखकाचा. तो कॉपीराइटच्या नियमाने सुरक्षित आहे. प्लीज़,
माझ्यावर हे समजावण्यासाठी दडपण नका आणूं की कां आणि किती जोडायला
सांगतो, आणि कां आणि किती वजा करायला सांगतो.”
“तुमचं सीक्रेट आहे.”
“जवळ-जवळ असंच समजा.”
“मलापण एक जादू येते. बघा.”
मेयर पेन्सिल उचलतो आणि दोन्हीं तळहातांना एक एकावर एक ठेवून
तिला अंगठ्यांनी दाबतो. नंतर तळहातांना अश्या प्रकारे फिरवतो की एक अंगठा दुस-याचा
चक्कर लावतो – ह्या प्रक्रियेंत पेन्सिल 180 डिग्री फिरते आणि ती खालून दोन्हीं
अंगठ्यांनी तळहातांच्या मधे दबलेली भासते – टेबलाच्या समांतर पातळीवर आणि
कपितोनवकडे ताणलेली.
“तुम्हीं करा.”
कपितोनव इन्वेस्टिगेटरच्या हातांतून पेन्सिल घेतो आणि तीच ट्रिक
करूं नाही शकंत. त्याची मनगट वेडे-वाकडे फिरतात.
“ह्याच कारण फक्त हे, की तुमच्या हातांची मूवमेन्ट
कोण्या दुस-या तळावर होते आहे,” मेयर आपला आनन्द लपवूं शकत
नाही. “तुमची गतिविधि डावीकडे होते, तर माझी – उजवीकडे. हो
ना?”
कपितोनवने चुपचाप पेन्सिल टेबलवर ठेवून दिली.
“बघा,
तुम्हांला विश्वास नव्हता की आपल्या हातांची गतिविधि वेगवेगळ्या स्तरांवर
होत असते, तर मी कां विश्वास करू, की
त्याने 99हीच संख्या मनांत धरली होती.”
“त्याने काय फरक पडतो, की त्याने कोणची संख्या धरली होती.
भली ही 27 कां नसो.”
“आता तुम्हीं विषयापासून दूर जात आहांत.”
कपितोनव गप्प राहतो, पण इन्वेस्टिगेटरला एखाद्या जोरदार
प्रतिक्रियेची अपेक्षा होती.
“दाखवा,
प्लीज़.”
“काय दाखवूं?”
“तुमची ट्रिक. तुम्हीं आणखी काय दाखवूं शकता?”
“मी वचन दिलंय, की आता कधीही ती दाखवणार नाही.”
“तुम्हीं मला कोणतंही वचन नाही दिलं. ह्याला इन्वेस्टिगेटिंग
एक्सपेरिमेन्ट समजा.”
“मी दाखवण्यासाठी बाध्य आहे कां?”
“ओह,
अचानक हे ‘बाध्य’ कशाला?
असं केलं तर आपल्या दोघांसाठी जास्त चांगलं होईल. तुमच्यासाठी –
विशेषकरून.”
“प्रामाणिकपणे सांगायचं, तर इच्छा नाहीये.”
“समजायचा प्रयत्न करा. ‘इच्छा नाहीये’ला
सोडा. आपण काही मुलांचे खेळ तर नाही खेळंत आहोत.”
“कोणतीही संख्या मनांत धरा,” थकलेल्या आवाजांत कपितोनव म्हणतो,
“दोन अंकांची.”
“आणि?”
“त्यांत सात जोडा.”
“पाच कां नाही?”
“कारण की सातंच जोडायचे आहेत.”
“जोडले.”
“दोन वजा करा.”
“समजूं या.”
“काय ‘समजूं या? तुम्हीं 99 ही संख्या धरली होती.”
“ह्यांत काय जादू आहे?”
“तुम्हीं 99 धरली होती,” कपितोनव पुन्हां म्हणाला.
“हे तर एक साळूसुद्धां समजूं शकतो. जे काही
झालंय, त्यानंतर मी दुसरी कोणची संख्या मनांत धरली असती.”
“जे काही झालं, त्यानंतर तुम्हीं 99चा अंक मनांत धरला, ह्यांत माझा काही दोष नाहीये.”
“मी तुम्हांला दोषी म्हणंतसुद्धां नाहीये.”
हे शेवटचं वाक्य थोडं जास्त कठोरपणे म्हटलं होतं – त्याचा स्वर
अर्थाशी विसंगत होता.
“आधी कुणीही 99चा अंक नव्हता धरला. तो पहिला
होता.”
पण हे स्वीकारोक्तीसारखंच भासलं. कपितोनवला स्वतःच अश्या
स्वराची अपेक्षा नव्हती.
“मी दुसरा आहे,” इन्वेस्टिगेटर म्हणतो. “तर एक लहानशी
प्रॉब्लेम आहे. त्याने धरला 99 – आणि तो शवागारांत आहे, आणि
मी धरला – 99 – आणि तुम्हीं बघतांय, की मी जिवन्त आहे,
धडधाकट आहे, टेबलाशी बसलोय आणि ह्यापुढेही
जगायची इच्छा आहे. हे तुम्हांला विचित्र नाही वाटंत?”
“तुम्हांला माझ्या तोंडून काय ऐकायचंय? तुम्हांला
काय पाहिजे? तुम्हांला माझ्याकडून काय काढायचंय?”
“नाही,
काहीही काढायचं नाहीये. फक्त, ह्याच गोष्टीवर
जोर देणं, की त्याने 99च धरला होता – वेडेपणा होईल. तुम्हीं
ह्याबद्दल फारंच विचार करतांय.”
“आशा करतो, की तपास पूर्ण झाला असेल. मृत्युच्या कारणाचा
पत्ता लागला?”
“मृत्युच्या कारणाचं इथे काय काम आहे? त्याबद्दल
तर तुमच्याशिवाय ही निर्णय घेऊं.”
इन्वेस्टिगेटर टेबलाचा खण बाहेर काढतो, तिथून
हाइजिनिक नैपकिन्सचा एक पैक काढतो, एक नैपकिन काढून त्यांत
नाक शिंकरतो, डस्ट-बिनमधे फेकतो.
“आयडिया असा आहे की तुमच्याकडून ग्यारंटी घ्यायची, की
तुम्हीं शहर सोडून नाही जाणार. पण, तुम्हीं इथे, माझ्यासमोर, आलेच कशाला? जा
आपल्या...माहीत नाही, कुठे. पण आधी लिहून – सगळं, जसं झालं होतं.”
कपितोनवसमोर कोरा कागद पडला आहे.
“थांबा. मला समजतंय, की तुम्हीं काय लिहिणार आहे. नंतर
प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. तुम्हीं लिहा – थोडक्यांत, ठळकपणे.
बोलंत होतो. आणि अचानक त्याची तब्येत बिघडली, तो
मेला.”
“बिना जादूचं?”
“अगदी बिना जादूचं,” इन्वेस्टिगेटर म्हणतो.
कपितोनव चार वाक्यांत घटनेचं स्पष्टीकरण देतो – थोडक्यांत, स्पष्टपणे.
“आणि हे कशाला? हे कोष्ठक?” – इन्वेस्टिगेटरने
मजकुराच्या आधी आणि मग शेवटीही धनु-कोष्ठक पाहिले. सहीचं काय झालं? तुम्हीं काय नेहमी धनु-कोष्ठकांच्यामधे सही करता? कां?”
“चालतं,”
कपितोनव म्हणतो.
13.45
आश्चर्याची गोष्ट ही नव्हती की तो विमानतळावर वेळेच्या आधी
पोहोचला, आश्चर्याची गोष्ट ही होती की मेटल-डिटेक्टरच्या स्प्रिंगच्या पलिकडे जाणं
शक्य होत नाहीये. त्याने मोबाइल फोन बाहेर काढून ठेवला आहे, आणि
खिशांतून सगळी चिल्लरसुद्धां बाहेर काढली आहे, आणि बेल्टपण
काढला आहे, पण ही मूर्ख स्प्रिंग वाजतंच आहे, वाजतंच आहे.
“कदाचित तुमच्या शरीरांत एखादा धातु फिक्स केलेला असेल?”
आणि इथे कपितोनव क्षणभरासाठी घाबरला – त्याला शंका वाटली की कुठे
हे वेषांतर केलेले माइक्रोमैजिशियन्स त्याला फेस-, मेटल- वगैरे तपासांतून
जायला सांगतील: आणि, खरंच, पोटांत
वजनदार ‘नट’ शोधून काढतील, ज्याच्याबद्दल एक वाईट विचार त्याला त्रस्त करंत होता.
हातातल्या मेटल-डिटेक्टरमधून जाताना कपितोनवच्या शरीराच्या एकही
भाग झणझण नाही करंत – जणु कपितोनवच्या आंत कोणचीतरी प्रतिक्रिया प्रारंभ झाली आहे, जी
संदेहास्पद कारणांना निष्क्रिय करंत आहे.
पण सगळ्याच कारणांना नाही.
इन्ट्रोस्कोपतून जातांना पर्स उघडायला
सांगण्यांत आलं. त्यांत लहानशी ब्रीफकेस कां ठेवली आहे? कारण,
की पूर्णपणे आत आली, आणि कपितोनवने एक लगेज
कमी करण्याचा निर्णय घेतला.
हे तर बरं झालं, की
ब्रीफकेसमधे अशी काही वस्तू नाहीये – कैबेजचे कटलेट्ससुद्धां नाहीयेत.
कपितोनवला स्वतःलापण माहीत नाहीये, की ही
ब्रीफकेस तो मॉस्कोला कां घेऊन जातो आहे. त्याला ह्या ब्रीफकेसची गरंज आहे कां?
पण आता हिला विमानतळाच्या बिल्डिंगमधेपण तर नाही सोडता येत.
तो तिथून दूर नाही जाऊ शकला – विचित्रसा
यूनिफॉर्म घातलेल्या गस्त घालंत असलेल्या दोघांनी त्याला पासपोर्ट दाखवायला
सांगितलं. त्यापैकी एकाच्या हातांत साखळीने बांधलेला कुत्रा होता, जो
काहीतरी करूं शकंत होता – कमीतकमी असंख्य पैसेंजर्सचं लक्ष आपल्याकडे नाही खेचलं,
तरी पुष्कळ आहे.
“माझ्यांत काही विचित्र दिसतंय का?” कपितोनव
स्वतःकडे लक्ष न देण्याचा, आणि आपणहून कुत्र्याचं लक्ष
आकर्षित न करण्याच्या प्रयत्नांत विचारतो.
“तुम्हांला खात्री आहे कां, की हा
पासपोर्ट तुमचांच आहे?”
“तिथे माझा फोटो आहे!”
“फक्त ह्याच कारणामुळे?”
हे तर बरं आहे, की कुत्रा
त्याच्याकडे लक्ष नाही देत आहे.
“आणि सही!”
धारकाला पासपोर्ट परंत करतांत:
“हैप्पी जर्नी, येव्गेनी
गेनादेविच.”
रजिस्ट्रेशन काही भानगड न होतां पूर्ण झालं.
कॉफी पिण्याइतका वेळ आहे,
पण एका फेस-टू-फेस मीटिंगने ह्यापासूनही परावृत्त केलं:
“वॉव! काय योग आहे?”
ज़िनाइदा आणि झेन्या, तिचा ‘डाउन’ मुलगा.
“तुमची मैथेमैटिक्सची कॉन्फ्रेन्स कशी झाली?” ज़िनाइदा
उत्सुकता दाखवते.
“चांगली झाली. आणि तुम्हीं इथे काय करतांय?”
“हो, बघा, सगळी
गडबड झाली, बहिणीला स्ट्रोक आला, लगेच
वोरोनेझची फ्लाइट पकडायची आहे. आणि तिथून घरी, जसं शक्य होईल
तसं.”
“काय म्हणता! थांबा, तुमची
बहीण तर पीटरबुर्गमधे आहे.”
“ही दुसरी आहे.”
“दिलगीर आहे,” कपितोनव म्हणतो. “असं
वाटतं की तुम्हीं फक्त एकंच दिवस पीटरबुर्गमधे होत्या?”
“कआब्लिक, कआब्लिक!” त्याच्याच नावाचा
येव्गेनी उद्गारतो.
कपितोनव त्याला विचारतो:
“कआब्लिक बघितलं?”
“तू कआब्लिक पाहिलं?” प्रश्न
कपितोनवकडे वळतो.
“कसा नाही पाहणार,” कपितोनव
म्हणतो.
आठवतंय.
“ही घे. आता ही तुझी झाली.”
छडी घेऊन, लहानगा झेन्या तिला असं
झटकतो, जणु ती थर्मामीटर आहे, आणि काही
स्वतःचंच, न कळण्यासारखं बडबडूं लागतो.
कपितोनव ज़िनाइदाला सांगतो:
“लिहिलं आहे, की जादूची आहे.”
“मला कळतंय, - ज़िनाइदा हरवल्यासारखी
स्मित करते. “पण तुम्हीं ‘फक्त एक दिवस’ कां म्हटलं? आम्हीं तर इथे एका आठवड्यापेक्षां थोडं
जास्तंच राहिलो.”
“मी तुमच्या बरोबर इथे परवांच नाही आलो कां –
ह्या शनिवारी?”
“ह्या शनिवारी कसे?...ह्या
शनिवारी नाही, तर त्या शनिवारी...तुम्हीं गम्मत करतांय कां?”
कपितोनव गंमत नाही करंत. जेव्हां बाकीचे लोक
गंमत करतात, त्याने, कदाचित, समजणं बंद
केलंय. तो निरोप घेऊन तिथून निघतो.
14.18
कपितोनव डिपार्चर हॉलमधे बसला आहे, मुलीला
मैसेज पाठवायचा आहे. माहीत नाही कां, त्याला वाटतं की
पोहोचंत असल्याबद्दल तिला कळवायला पाहिजे, काही तरी असं:
“फ्लाइटने येत आहे.: किंवा असं: “डिपार्चर हॉल. लवकरंच.”
लवकरंच सगळे इलेक्ट्रिक उपकरण बंद
करण्यासंबंधी घोषणा केली जाईल.
डिपार्चर हॉलमधे काही लोकांना लवकर-लवकर, समाधान
होईपर्यंत, गोष्टी करायच्या आहे. फुकट वर्तमानपत्राजवळच्या
स्टैण्डच्या जवळ मुलं धावाताहेत. काचेच्या पलिकडे काळं आकाश आहे. विमान प्रत्येक
ऋतूंत टेक-ऑफ करतात.
{{{‘तलाव’ कोण
आहे?}}}
ही मरीना आहे.
हिला माहीत आहे की तुमची विकेट कशी डाउन
करायची असते. कपितोनव लगेच उत्तर नाही देत.
{{{ तो मेला. तू कां विचारते आहेस?}}}
मरीना – त्याला:
{{{ तो जिवंत आहे.}}}
त्याला पुन्हां असा भास होतो, की पोटांत
एक वजनदार ‘नट’ आहे.
{{{ तुला खात्री आहे कां?}}}
वाट बघतो. उत्तर येतं.
{{{तो माझ्या मूखिनचा भाऊ आहे आणि ते
दोघं मंगोलियांत राहतांत, खाणीत काम करतांत.}}}
“दैवी क्षेत्र,” कपितोनव
जोराने परक्या आवाजांत म्हणतो.
मैसेज येतो:
{{{ थैन्क्यू.}}}
{{{ कशासाठी?}}}
उत्तर येतं:
{{{प्रत्येक गोष्टीसाठी.}}}
कपितोनव मोबाइल स्विच ऑफ करतो. काही तरी
करायला बघतो. पुन्हां ‘ऑन’ करतो.
आन्काला लिहितो:
{{{तुझ्यावर खूप प्रेम करतो}}}
काय ‘पापा’ शब्द
लिहायचा? पण विचार करतो, की तिला कळेल.
फ्लाइट तीस मिनिट उशीराने जाण्याची घोषणा
होते.
आता हे आणखी कशाला? काय झालं?
काय होतंय?
“आणि मी पण तुझ्यावर खूप खूप.”
फक्त टेक्स्ट – कोष्ठकांशिवाय.
तो उठून हॉलमधे हिंडू लागतो – ह्या डिपार्चर
हॉलमधे, वाट पाहतोय. घड्याळीकडे बघतो.
******
संदर्भ
1.सप्सान – मॉस्को ते पीटर्सबर्ग जाणारी फ़ास्ट ट्रेन.
2. एडमिरैल्टी – पीटर महान द्वारा निर्मित एक बिल्डिंग, जिच्या सोनेरी घुमटावर एक लहानसं जहाज़ आहे.
3.ईवेंट्स-आर्किटेक्ट – ह्या व्यक्तिने आपलं आडनाव हेच सांगितलं आहे.
4.तलाव – रशियनमधे हे नाव आहे वोदोयोमोव, ज्याचा अर्थ आहे तलाव.
कादम्बरींत असे अनेक आडनावं आहेत, ज्यांचा त्या
वस्तूचा गुणांशी संबंध आहे,
म्हणून भाषांतरकाराने नावांचंपण भाषांतर केलं आहे.
5. नेक्रोमैन्सर - ओझा
6.काळ-भक्षक – हा
खरोखरंच काळ भक्षण करंत होता.
7.श्याम-वन – ह्या जादुगाराचंपण खरं नाव दिलेलं नाहीये.
8.कार्ड – रशियन शब्द आहे ‘कार्ता’ ज्याचा आणखी एक अर्थ असतो
– नकाशा. जेव्हां ह्याच्याबरोबर ‘खेळायचे’ जोड़तात तेव्हां हा ‘खेळायचा पत्ता’ होतो.
9. पीटरबुर्गला सहसा रोजच्या भाषेंत पीटर म्हणतात.
10. एव्गेनीला प्रेमाने संक्षिप्तपणे ‘झेन्या’,
‘झेनेच्का’पण म्हणतात.
11. योगूर्त
– इथे संदर्भ तोडोरच्या अस्खलित उच्चारणाचा आहे, म्हणून ह्या शब्दाला तसंच राहू दिलेलं आहे, जसं
मूळ पाठांत आहे. ‘दही’ शब्दाच्या प्रयोगाने स्वराघाता मुद्दा स्पष्ट
नसता झाला.
12.आइसिकल्स
- क्रमशः टपकणारे पाण्याचे थेंब जमल्याने बनलेली बर्फाची छड़ी.
13.लैब्नित्ज़ (6146-1716) – प्रसिद्ध जर्मन
दार्शनिक आणि गणितज्ञ, मैथेमेटिक्सच्या इतिहासांत ह्याला महत्वपूर्ण स्थान आहे.
14.रीगेंट - एक रासायनिक पदार्थ
15.सार्डीन – एक प्रकारचा लहान मासा, जो साधारणतः
डबा-बंद केला जातो.
16. ‘सेका’
– पत्त्यांचा एक खेळ
जो सोवियत संघात लोकप्रिय होता.
17. “फूल” – हासुद्धां पत्त्यांचा एक सोपा खेळ आहे.
18.एक हाताचा डाकू – कैसीनोत खेळला जाणारा जुगाराचा. ह्याला ऑनलाइनपण खेळतात.
19.माशी – रशियनमधे माशीसाठी शब्द आहे – मूख़ा. मूखिनची उत्पत्ति ह्याच
शब्दाने झाली आहे.
20.लूडोमैनिया – लूडो खेळण्याची सणक
21.रूलेट – जुगाराचा का एक खेळ-विशेष
22.ज़्याब्लिक – चैफ़िन्च ( ब्रिटेन) मधे
आढळणारा छोटीसा गाणारा पक्षी.
23.नार्सिसिस्ट – स्वतःवरंच मोहित होणारा.
24.कपितोन – इथे कपितोनवशी तात्पर्य आहे.
25.आर्टिस्ट-पेरेद्विझ्निक
– एकोणीसाव्या शतकातील रशियन वास्तववादी स्कूलचे पेंटर, ज्यांच्यांत लोकतंत्रिक कल
पण होता.
26.फ़िबोनाची क्रम - लिओनार्दो फिबोनाची द्वारा आविष्कृत संख्यांच्या निम्नलिखित
अनुक्रमाला फिबोनाची श्रेणी (Fibonacci number) म्हणतात:
![]()
परिभाषेनुसार, पहल्या दोन फिबोनाची संख्या 0 आणि 1 आहेत. ह्यानंतर येणारी प्रत्येक संख्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज आहे. काही लोक
आरंभिक 0 सोडून देतात, ज्याच्या ऐवजी दोन 1 पासून अनुक्रमाची सुरूवात केली जाते.
27.एमिल्या
- ‘मूर्ख एमिल्या और मासा’ नामक रूसी लोककथेचं पात्र.
28.श्राम – ह्या शब्दाचा अर्थ आहे – जखमेची
खूण
29.फ़ेरो ख़ुफ़ू – प्राचीन इजिप्टचा शासक, ज्याला
पिरामिड्स निर्मितीचं श्रेय दिलं जातं.
30.बोत्तिचेल्ली (1445-1510) – रेनासां कालखण्डाचा
प्रसिद्ध इटालियन चित्रकार.
31.मेदूसा गॉर्गोन – ग्रीक पौराणिक कथांची एक पात्र,
जी सैतान होती. तिच्या डोक्यावर केसांच्या जागेवर साप होते. जो पण तिच्याकडे
बघायचा, तो दगड होऊन जायचा. पर्सियस ने तिचं
डोकं कापून आपल्या शत्रूंच्या विरुद्ध त्याचा ढालीसारखा उपयोग केला होता.
32. ब्लैकजैक –
कैसिनोत खेळला जाणारा पत्त्यांचा लोकप्रिय खेळ.
